Skip to main content

समाज

समाधान !

लेखक खेडूत यांनी शनिवार, 18/06/2016 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
कविता हा आधीच औघड प्रकार, त्यात मीटर वगैरे सांभाळायचं म्हणजे कठीणच ! पण म्हणून कुणी प्रयत्न करूच नये की काय? तरी जिलबी गोड मानून घ्यावी ही विनंती …! *** होती अमुची प्रिया एक ती आमची मंजे कंपनीची सदैव वाटे तिजला कांही नविन करावे प्रतिमासी कधी कनेक्टे हार्ट आमुचे कधी पॉलीस्यां अपडेटवी तसा एकदा सर्व्हे केला 'समाधान सर्वेक्षण' म्हणुनि ! मनात नसता भाग घेउनि सारे प्रतीसादून आले सर्व्हे झाला पटपट आणिक सार निघाले हो झटपट स्वमनिचे निष्कर्ष घेऊनि छान छान पी पी टी सजवून आली हो ऐटीत पुण्याला प्रिया विमानी त्वरित बसून सगळ्यांना गोळा करूनि पोपटपंची झाली करून सगळे आपण कित्ती ह्याप्पी

अवघे विश्वचि माझे घर... हे कितपत खरं?

लेखक वडापाव यांनी शुक्रवार, 17/06/2016 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
आपण जन्माला कोणामुळे आणि कोणाच्या पोटी येऊ, कुठल्या वातावरणातल्या घरात वाढू, कोणत्या समाजात राहून लहानाचे मोठे होऊ, कसे निपजू आणि किती जगू या सगळ्यातल्या काही गोष्टी तरी आपल्या हातात नसतात. आपल्या हातात असत्या तर? या कल्पनेला रंगवताना आपण आपल्या आयुष्याच्या कुठल्या अवस्थेत आहोत आणि आपली मनस्थिती कशी आहे यानुसार रंगसंगतीत कायम फेरफार होत राहतात.

बाप हाय मी

लेखक अभ्या.. यांनी गुरुवार, 16/06/2016 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
"बरं मग वकीलसाहेब, आलं समदं ध्यानात? ह्येच्यापुढं मी काय सांगू नये, तुमी इचारु नये" "लका, वकीलसाहेब झालो नंतर, आधी जिगरयार हौत. चड्डी घालता येत नव्हती तवापासून दोस्ती आपली" "म्हणूनच. म्हणूनच... चल लाग आता कामाला, लै लेट बी झालाय, वैनीसाब वराडतील" "झोप तू बी. डोळे लेन्स लावल्यागत झालेत लालभडाक" "झोपेचं तेवढं सोडून बोल. ती ग्येली आता कायमची, निघ तू" ................. "नाग्या, सगळं घीवून ये बे वर" "मालक, वैनीसाब येते म्हणतेत वर, कसं करु?" "झोपा म्हनाव त्येंना. तू ये घीवून. च्यायचं आकरामाशी" ************************** तिज्यायला कोनाय बे आकरामाशी. कोन म्हणतंय? समोर ये उंडग्या.

एक संघ मैदानातला - भाग १४

लेखक शि बि आय यांनी गुरुवार, 16/06/2016 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री पत्ते खेळत चकाट्या पिटल्यामुळे सकाळी काही वेळेत जाग आली नाही. शेवटी दादांनी येउन उठवल्यावर आमचा सूर्योदय झाला. सकाळचा वाॅर्मअप करण्यासाठी आम्ही तयार होऊ लागलो पण संडास आणि बाथरूम इतर संघांनी अडवल्यामुळे आमची पंचाईत झाली होती. १५ मिनिट कानोसा घेत आत बाहेर केल्यावर आपली इथे डाळ शिजण कठीण आहे हे दिसलं. तोंड धुवून प्रत्येकीने पिशवीमध्ये आपापले अंघोळीनंतरचे कपडे कोंबले आणि आम्हाला दिलेली बादली आणि मग घेऊन आम्ही तशाच हाफ पॅन्ट आणि शूजमध्ये ग्राउंडच्या दिशेने सुटलो. सकाळी सकाळी वाॅर्मअप करायचं सोडून हि सगळी फौज बादली आणि पिशव्या घेऊन कुठे चालली हे बघायला दादा आमच्या मागे पळत आले.

थक्क करणारी एक घोडदौड

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 15/06/2016 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
पेला अर्धा भरला आहे.. पेला अर्धा सरला आहे... पाडगावकरांच्या या कवितेतले भाव इतके कालातीत आहेत की बास! आणि क्षणोक्षण त्याचा प्रत्यय येत राहतो. शंभर व्यक्ती भेटतात, शंभर गोष्टी कानावर पडतात. नाव, गाव, चेहरा, व्यवसाय या पलिकडची माणसाची एक ओळख असते ती म्हणजे त्याचा विचार. त्याला दृष्टिकोन म्हणा, स्वभाव म्हणा, किंवा अ‍ॅटिट्यूड म्हणा इंग्लिशमधे. हा अ‍ॅटिट्यूड माणसाची खरी ओळख करून देतो, तोच माणसाला घडवतो किंवा बिघडवतो. बाकी सगळं दुय्यम असतं. संकटं, अडचणी सगळ्यांनाच येतात. काही त्यात खचतात, काही त्यातही रचतात, काही विरतात, काही उरतात, काही पडतात, काही घडतात. अ‍ॅटिट्यूड.

वाट पहात आहे.....

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 11/06/2016 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
त्या पक्ष्याची वाट पहात आहे..... बसेन ते झाड माझे, शिटेन ती फांदी माझी, असले त्याचे आक्रमण नाही! घरटोघरटी माझी पिले माझ्याच पिढ्या, माझेच वंश असली माणुसकी त्याची नाही! मैत्री कधी कुणाशी केली नाही, पण बुडत्या मुंगीसाठी पान टाकायचे विसरला नाही! चमचमणारी छाती फुगवणे नाही,कि तोऱ्याने मान फिरवणे नाही! पंखांचे मिटणे केवळ सुंदर जणू मौनाचे शिल्प पुरातन! पाय कधी दिसू नयेत इतके त्याचे असणे प्रगाढ, युगायुगांची पौर्णिमा उजळावी इतके त्याचे पंख सतेज! स्थलांतरावर जगत रहावे इतकी त्याची तकतक नाही, घिरट्या घ्याव्यात एकाच किनाऱ्यावर इतके उड्डाण तोकडे नाही! किनाऱ्या किनाऱ्या

मी बाई होते म्हणुनी .. भाग ०८

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 10/06/2016 03:12 या दिवशी प्रकाशित केले.
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४ http://misalpav.com/node/24073 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०५ http://misalpav.com/node/35964 मी बाई होते म्हणुनी ..

ज्योतिष विषयातील चर्चा करण्यासाठी ज्योतिष व्हॉट्सअ‍ॅप समुह

लेखक निनाद यांनी गुरुवार, 09/06/2016 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योतिष विषयातील चर्चा करण्यासाठी ज्योतिष व्हॉट्सअ‍ॅप समुह तयार केला आहे. हा समुह ज्यांना ज्योतिषाची थोडीफार माहिती आहे, या विषयात रस आहे अशा सदस्यांसाठीच आहे याची नोंद घ्यावी. ज्योतिष विषयावर माहितेची देवाण घेवाण, सल्ला मसलत, कुंडलीची चर्चा, बदलत्या ग्रहस्थितीमुळे होणारे परिणाम याची चर्चा, नवीन प्रसिद्ध झालेली मासिके, पुस्तके आणि लेख यावर विचार विनिमय, अशा विषयांसाठी असावा अशी धारणा आहे. या समुहावर ज्योतिष/भविष्य संबंधित विषयाशिवाय इतर कोणतीही चर्चा करता येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

पिस्तुल्या

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 08/06/2016 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
नागराज मंजुळेची हि पहिली शॉर्टफिल्म. अहमदनगरच्या चित्रकार्यशाळेत तिसऱ्या वर्षी त्यानं केलेला खरंतर हा एक प्रोजेक्ट होता. तंत्रज्ञानाच्या बाबतीत बरीच पिछाडीवर असलेली ही कार्यशाळा नागराजला राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यापासून रोखू शकली नाही, यातच खरंतर नागराजचं घवघवीत यश आहे. मोजून दोन दिवसात (की सहा?) पिस्तुल्याचं चित्रीकरण पु्र्ण झालं. मात्र त्याआधी त्याने कित्येक दिवस तयारी केली होती. कॅमेरा कोठे ठेवायचा, लोकेशन्स, पात्रनिवड, वगैरेवर बरीच मेहनत घेतली होती. हि केवळ १५ मिनिटांची शॉर्टफिल्म आहे. मात्र नागराजनं त्यातही एक जग उभं केलंय हे नक्की. पात्रं अभिनय करतायत असं कुठेच वाटलं नाही.