Skip to main content

समाज

रांगोळी प्रदर्शन - वर्तमानाचे प्रतिबिंब

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 29/10/2008 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
रांगोळी! मराठी माणसाच्या दिवाळीमध्ये नवे कपडे, फराळ, अभ्यंगस्नान, उटणे व दिवाळीअंक यांच्या इतकेच महत्वाचे स्थान रांगोळी व रांगोळी प्रदर्शनाला आहे. सध्या ठाणे येथे न्यु गर्ल्स स्कूल येथे रांगोळी प्रदर्शन सुरू आहे. गेली अनेक वर्षे मी हे 'बलवंत मित्रमंडळ' आयोजित प्रदर्शन महापालिका शाळा क्र. १९ येथे पाहत आलो आहे. यंदा शाळेचे पुनर्निर्माण कार्य सुरू असल्यामुळे प्रदर्शनाचे स्थळ बदलले आहे इतकेच, मात्र त्यातल्या कलाकारांचा सामाजिक दृष्टिकोन मात्र तसाच आहे.

याहू!

लेखक विकास यांनी मंगळवार, 28/10/2008 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच याहूच्या संकेत स्थळावर गेलो होतो आणि एक सुखद धक्का बसला! त्यांच्या गृहपर्णावर (होमपेजवर भारतासाठीचे जे .in आहे त्यावर आहेच पण हे जगाचे मुख्य पान...) चक्क याहू या अक्षराच्या अलीकडे दोन लुकलुकत्या पणत्या आणि दुसरीकडे "हॅपी दिवाली" असा संदेश. त्याच्यावर टिचकी मारल्यावर दिवाळीवर विशेष माहीती मिळाली. वास्तवीक अशी रेखाटने मी गुगलच्या प्रमुखपानावर कायम पाहीली आहेत पण दिवाळीसाठी मात्र दिसले नाही...

बिग सर....

लेखक बबलु यांनी रविवार, 26/10/2008 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
या ऊन्हाळ्याच्या शेवटाला आमच्या घरापासून जवळच असलेल्या "बिग सर" पॅसिफिक सामुद्रिक Scenic Highway ला गेलो होतो. मस्त प्रकरण आहे हे ! अतिविशाल पॅसिफिक समुद्र, क्यालिफोर्नियाची नयनरम्य coastline आणि उत्कृष्ट हवामान. त्यातलेच काही फोटू....

मराठीपणा

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 26/10/2008 04:32 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपामधे दोन विषयांवर भरपूर चर्चा वाचायला मिळाली आहे. पहिला विषय- राज ठाकरे ह्यांनी धसास लावलेला, मराठी प्रदेशात मराठी माणसांना नोकरी मिळण्यास प्राधान्य हवे हा. दुसरा शुद्ध, अशुद्ध भाषेचा. ह्या दोन्ही विषयांना जोडणारी एक बातमी इ सकाळवर वाचली. कर्नाटकात, मराठीपळ्या आणि कोननकल्ल गावात १७९७ सालापासून स्थायीक झालेली मराठी कुटूंबे. २०० वर्षे जुना बाज असलेली भाषा तिथे अजूनही वापरली जाते. मराठीपळ्यात १००% मराठी लोकसंख्या आहे.

मराठीपणा

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 26/10/2008 04:31 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपामधे दोन विषयांवर भरपूर चर्चा वाचायला मिळाली आहे. पहिला विषय- राज ठाकरे ह्यांनी धसास लावलेला, मराठी प्रदेशात मराठी माणसांना नोकरी मिळण्यास प्राधान्य हवे हा. दुसरा शुद्ध, अशुद्ध भाषेचा. ह्या दोन्ही विषयांना जोडणारी एक बातमी इ सकाळवर वाचली. कर्नाटकात, मराठीपळ्या आणि कोननकल्ल गावात १७९७ सालापासून स्थायीक झालेली मराठी कुटूंबे. २०० वर्षे जुना बाज असलेली भाषा तिथे अजूनही वापरली जाते. मराठीपळ्यात १००% मराठी लोकसंख्या आहे.

जागतिक मंदीवर अमेरिकेत २० देशांच्या नेत्यांची बैठक

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी शुक्रवार, 24/10/2008 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
जगातील आर्थिक मंदीवर चर्चा करण्यासाठी २० देशांच्या नेत्यांची बैठक अमेरिकेत आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी आमंत्रित केली आहे. आमंत्रित 20 देशांच्या नेत्यांमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही समावेश आहे. १५ नोव्हेंबरला वॉशिंग्टनमध्ये ही बैठक आहे. व्हॉईट हाऊसमध्ये ही बैठक होणार आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ४ नोव्हेंबरला आहे. निवडणुकीनंतर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

आजतकचा कौल - आवाहन

लेखक आनंदयात्री यांनी गुरुवार, 23/10/2008 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
आजतक या न्युज चॅनेलने इथे मनसेवर बंदी घालावी की नाही असा कौल सुरु केला आहे. त्यांना बहुदा उद्याची हेडलाईन बनवायला भातमीची भ्रांत पडली असावी, कारण बर्‍याच दिसात बच्चनला काय सर्दी झाली नाहिये अन एखाद्या सिनेतारकेच्या कुत्तरड्याला तापही भरला नाहीये. तर सांगायचा मुद्दा असा की आपण मराठी माणसाने तिथे जाउन दाखवुन द्यायला हवे की आपल्याला काय हवे आहे ते, नायतर उद्या त्यांना बोंबाबोंब करायला आहेच .." देखिये जनता की आवाज !! लोग चाहते है म न से पार पाबंदी लगे !" चला तर मग ..

भाषा - फ्रेन्चचा ढासळता बुरुज

लेखक सुनील यांनी गुरुवार, 23/10/2008 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात एक घटना घडली. जगाच्या दृष्टीने म्हटले तर अगदीच क्षुल्लक वाटणारी. भारतातील वृत्तपत्रात तर शेवटच्या पानावरदेखिल तिला स्थान मिळाले नसावे. पण फ्रान्समध्ये मात्र त्या घटनेने मोठा गदारोळ उठला. अशी काय होती ती घटना? रवांडा हा अफ्रिकेतील एक टिनपाट देश. अधिकृत भाषा फ्रेन्च. पण गेल्याच महिन्यात रवांडा सरकारने इंग्लीश ही अधिकृत भाषा करण्याचे संकेत दिले. येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळांत फ्रेन्चऐवजी इंग्लीश शिकविण्याचे ठरविले. आणि फ्रान्समध्ये हलकल्लोळ माजला! आपल्या भाषेविष्यी, जगातील तिच्या स्थानाविषयी फ्रान्स अतिशय हळवा आहे.

मराठी तरुणांसाठी नोकरी-उद्योग देणारा वेबमंच

लेखक अभिरत भिरभि-या यांनी बुधवार, 22/10/2008 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी तितुका मेळवावा. महाराष्ट्र धर्म वाढवावा सध्याच्या काळात मराठी तरुणांसाठी रोजगार हा ज्वलंत प्रश्न बनल्याचे दिसते आहे. ही नाराजी ग्रामीण व शहरी अशा दोन्ही स्तरावर जाणवते आहे. बर्‍याचदा आपण आपल्या नोकरी / व्यवसायाच्या निमित्ताने खुल्या झालेल्या जागा दिसतात; पण तुमच्या परिचयाचा कोणी उमेदवार माहिती नसल्याने ही संधी लायक व गरजु तरुणांपासुन वंचित राहते. मिपावर आपण आपली भाषिक/सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी येथे येतो. अप्रत्यक्षपणे येथे नेटवर्क तयार होते.