Skip to main content

समाज

मिशी

लेखक शितल यांनी बुधवार, 24/09/2008 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, तुम्ही आता विचार करत असाल मिशी ह्यावर काही लिहीण्याजोगे आहे का ? पण चला जाता जाता वाचु या. “ मुछे हो तो नथ्थुलाल जैसी वरना ना हो ! ” हा डायलॊग तर सर्वांना परिचयाचा असेलच. तर मिशी हा काही पुरूषांचा अभिमानाचा, सौंदर्याचा विषय आहे. मिशीमुळे रूबाबदार पणा वाढतो असे काहींजणांना वाटते, मिशी शिवाय पुरूषाला शोभा नाही असे ही उदगार ऐकले आहेत. दाढीचा तसा माना शी संबध नाही जसा मिशीचा आहे, का बरे असे असेल कोणी सांगु शकेल का?

"लव" इज द "गेम"!

लेखक मृगनयनी यांनी बुधवार, 24/09/2008 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या गाभार्‍यात , कधीकधी भरुन येतात भूतकाळाचे मेघ... आणि मग एकेक लडींप्रमाणे उलगडत जातात, त्या आठवणी... मी म्हणायचे, "मला आवडते काळ्या दगडावरची रेघ. " तू म्हणायचास, " मला मात्र भुरळ पाडतं अळवावरचं पाणी. " मी विचारायचे, "राधा खरी की रुक्मिणी ? " तू विचार करुन म्हणायचास, "मीरा च खरी विरहिणी. " मी : म्हणजे राधेच्या प्रेमात, नव्हतीच का कधी भक्ती? तू : हो..... पण विष पचवायलाही लागते मोठी शक्ती...! मी : तरी पण सांग ना.....

पुतळा ( लघु कथा )

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 23/09/2008 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
पुतळा ------------------------------------------------------ ' साहेब ...' ' बोल ...' ' शासनाच्या प्रत्तेक निर्णयाला विरोध करायचा हीच आपली पक्षीय नीती आहे ना ? ' ' बरं ? मगं ? ' ' मग मुख्यमंत्र्यांच्या नव्या घोषणेचं आपण स्वागत आणि समर्थन कसं केलत ? ' ' कोणती घोषणा ? ' ' तीच ... शहरातल्या मध्यवर्ती भागात त्या राजनेत्याचा पुतळा उभा करण्याची ? आपण म्हणालात, की कुठल्या ही विधायक कार्यात आम्ही सत्याधार्‍यांच्या बाजूने राहू ! सत्ताधारी पक्षाला साथ देऊ ! ' ' अरे मूर्खा , पुतळा उभा करण्यासाठी वर्गणी गोळा करावी लागेल .' ' बरोबर ! ' ' या कामात आपण त्यांना मदत करु ! ' ' का ?

राज ठाकरे आणि प्रसारमाध्यमे

लेखक भोचक यांनी सोमवार, 22/09/2008 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषा, मराठी माणूस, राज ठाकरे आणि त्याला अनुषांगिक उपप्रकरणे जया, अमिताभ, युपी, बिहारी वगैरे वगैरे. या सगळ्या विषयांनी गेले काही महिने नुसते गाजवून सोडले आहेत. राज ठाकरे यांची बर्‍यापैकी पाठराखण मराठी प्रसारमाध्यमांनी (छापील आणि दृकश्राव्य दोन्ही) केली आहे. हिंदी व इंग्रजी मीडीयाने मात्र राज ठाकरे हा कुणीतरी गुंड असल्याचे चित्र उभे केले आहे. त्याचाच परिणाम म्हणून की काय पण हिंदी प्रांतातही राज नावाचा कुणीतरी एक राक्षस महाराष्ट्र नामे प्रांतात असून तेथे जाणार्‍या प्रत्येकाला तो मराठी बोलायला भाग पाडतो. 'जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी' त्याला फक्त मराठीच दिसते अशी काहीशी इमेज निर्माण झाली आहे.

कलेचा बाजार....

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 21/09/2008 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, मी एकंदरीतच दूरदर्शन आणि त्यावरचे रिऍलिटी शोज फारच कमी पाहातो, किंबहुना पाहातच नाही. आज साला सन्डे होता. दुपारी जेवल्यावर सहज म्हणून दूरदर्शन संच सुरू केला. ष्टार प्लस वाहिनीवर कुठलीशी एक जोडी एका ध्वनिमुद्रणावर नाचत होती. प्रेक्षक मंडळी बसली होती. तीन परिक्षक तो नाच बघत होते. (नंतर मला कळले की त्या कार्यक्रमाचे नाव 'आजा माहिवे..' असे होते.) "अच्छा! म्हणजे नृत्याच्या कुठल्याश्या स्पर्धा सुरू दिसताहेत. बघुया तरी..!" असा मनाशी विचार करून मी तो कार्यक्रम पाहाणे सुरू ठेवले.

पुरस्कार (लघुकथा )

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 19/09/2008 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
'दुहेरी फायदा' ही लघुकथा आवडल्या बद्दल धन्यवाद !! ------------------------------------------------------------------------- पुरस्कार पुलावरुन धडधड करत राजधानी एक्सप्रेस निघून गेली. रोजच्या प्रमाणेच आजही भिकू जागा झाला. तो पळत पळत गल्लीत असलेल्या सार्वजनिक नळावर गेला. हात, पाय, तोंड धुतलं. बायको मुलं अजून झोपलेली होती. त्याने समोरच्या हॉटेलातून चहा आणि गरमागरम भजी आणली आणि चहा बरोबर तो भजी खाऊ लागला.
Taxonomy upgrade extras

जागतिक आर्थिक पेचप्रसंग आणि अरिष्ट

लेखक अभिजीत यांनी शुक्रवार, 19/09/2008 04:06 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक आर्थिक पेचप्रसंग आणि अरिष्ट गेले वर्षभर चालु असलेल्या जगभरातील आर्थिक घसरणमुळे अमेरिकेत आणि जगभरात दीर्घकालीन परिणाम घडतील यात आता काही शंका नाही. वाचकांसाठी हा एक धावता आढावा - २००३ पासुन विविध आर्थिक क्षेत्रात जगभरात तेजीला सुरुवात झाली. विकसित देश अधिक श्रीमंत होत होते आणि विकसनशील देशात मध्यमवर्ग वाढत होता. यामुळे आता सर्वत्र सुजलाम्-सुफलाम परिस्थिती येणार अशी खात्री अर्थतज्ञ, मोठमोठ्या बँकांमधे मोठमोठ्या पगारावर काम करणारे अधिकारी आणि सरकारी उच्चाधिकारी यांनी द्यायला सुरुवात केली होती.

वयम् मोठम् खोटम्!

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 17/09/2008 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस हा एक विचीत्र प्राणी आहे. जे आपल्यापाशी नाही त्यासाठी झुरत असतो. ईतरांचे सोडा, पण आपल्यापाशी जे आहे त्याचे कौतूक त्याला स्वत:लाच नसते. कुणीतरी नमूद करून ठेवलेच आहे. आपल्या सर्व मित्रांची मुले आज्ञाधारक आणि हुशार असतात. समोरच्या बसस्टॉपवर उभ्या असलेल्या माणसांसाठी पटापट एकाच नंबरच्या दोन दोन बसेस येतात. आपल्या बाजूला मात्र हवी असलेली बस एक तास वाट पहायला लावून येते, आणि आपल्या पुढल्या माणसाला आंत घेतल्यावर कंडक्टर आपल्यावर खेकसतो "दरवाजा छोडो". एकूण आपल्याला जे हवे असते ते आपल्याला मिळतच नाही.

गणेशोत्सव जपानमधला

लेखक गणा मास्तर यांनी मंगळवार, 16/09/2008 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
जपानमधील गणेशोत्सवाची काही छायचित्रे पाठ्वीत आहे. तोक्योमधील ग्योतोकुला भारतीयांनी एकत्र येउन गणेशोत्सव साजरा केला, ही विसर्जन मिरवणुकीची छायाचित्रे श्रींची मुर्ती हा कार्यक्रम हवाच !!!