Skip to main content

संस्कृती

दहीहंडीचा आधुनिक अवतार

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 10/08/2012 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज दहीहंडीच्या दिवशी मुंबईत हंडीचा आधुनिक अवतार पाहायला मिळाला. पारंपारिक हंडी ही रस्त्याच्या दोन बाजुंना परस्परासमोर उभ्या असलेल्या इमारती वा खांब यांच्यावर दोरखंडाने बांधुन उंच टांगलेली असते. मात्र यंदा प्रथमच मुंबईत बांधकामासाठी वापरल्या जाणार्‍या उंच क्रेनचा वापर मी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हंडी टांगण्यासाठी केलेला पाहिला. क्रेनच्या टोकाला लटकलेली हंडी, वर सोनेरी छत्र व ध्वज, पताका यांची सजावट या कल्पकतेला मनोमन दाद द्यावीशी वाटली. मला फोटो टिपायला जमले नाही, पण माझ्या मागोमाग आलेल्या माझ्या साहेबांनी त्यांच्या ब्लॅकबेरीवर ही हंडी टिपली आणि मला धाडली.

दहीहंडी २०१२

लेखक मदनबाण यांनी शुक्रवार, 10/08/2012 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी सकाळ पासुन दहीहंडीची मजा अनुभवायला मिळत आहे... :) पाउस सुद्धा हजेरी लावुन आहे...

ऑलंपीक - अविस्मरणीय क्षण.

लेखक मोदक यांनी गुरुवार, 09/08/2012 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
ऑलंपीक - अविस्मरणीय क्षण. "ऑलंपीक" हा शब्द जरी उच्चारला किंवा कानावर आला की खालच्या घटना डोळ्यासमोरून स्लाईड शो प्रमाणे झरझर सरकू लागतात, काळ वेळ ठिकाण सर्व विसरून!! १) डेरेक रेडमंड - १९९२ बार्सिलोना ऑलंपीक. ४०० मीटर धावण्याची सेमी फायनल सुरू झाली.. पूर्ण भरात असलेल्या डेरेक रेडमंड ने भन्नाट सुरूवात केली.. अर्धे अंतर पार केले न केले तोच त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला. होणार्‍या वेदनांमुळे रेडमंड ट्रॅकवरच कोसळला. बाकीचे स्पर्धक पुढे निघून गेलेच होते. ऑलंपीकचे स्वप्न भंगल्याचे दु:ख इतके तीव्रपणे जाणवले की रेडमंड हमसून हमसून रडू लागला.

अनोखे रक्षाबंधन

लेखक आनंद भातखंडे यांनी सोमवार, 06/08/2012 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
अनोखे रक्षाबंधन दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी माझ्या मुलीच्या विद्यानिकेतन शाळेत पालक सभेच्या निमिताने जाण्याचा योग येतो. एका चांगल्या आणि नावाजलेल्या शाळेत माझ्या मुलीला प्रवेश मिळाला आणि तिची शैक्षणिक प्रगती सुरु झाली. या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेचे सगळे सोपस्कार पूर्ण करून ज्यांना प्रवेश मिळतो त्यांचे पालक कृतकृत्य होतात आणि ज्यांना मिळत नाही ते नेहेमी प्रमाणे त्यांच्या कार्यप्रणालीला नावे ठेवतात. विद्यानिकेतन शाळा तशी डोंबिवलीच्या गजबजाटापासून लांबच.

देश- राष्ट्र काहीसे विस्कळित....

लेखक मन१ यांनी शुक्रवार, 03/08/2012 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
वैधानिक इशारा:- पुढील मजकूर काहिसा विस्कळित आणि वादावादी करताना अचानक आठवलेला मजकूर इतकाच समजावा. फार अधिक माहितीमूल्य वगैरे ह्यात अजिबात मिळणार नाही. नॉर्मल माणसांना आनंदाच्या उकळ्या फुटतात तशा आम्हाला विस्कळित प्रतिक्रियांच्या उकळ्या फुटतात असे समजून माफी करावी. अठराव्या शतकात इंग्रज जिंकणारच होते. आपण एकसंध नव्हतो ना. भारत कधीच एकसंध वगैरे नव्हता ना. शेकडो राज्ये होती. एकसंध असा भारत नव्हता वगैरे वगैरे नेहमीची शाळकरी बडबड काल परवा कुणीतरी करत होतं. शुंभांनो, त्याकाळी भारतच नव्हे, तर आख्खे जग तस्सेच होते. युरोपमध्ये सामंतशाहीचीच थोडी नवी आवृत्ती सुरु होती.

वांग मराठवाडीची संघर्षगाथा...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शुक्रवार, 03/08/2012 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मी वांग मराठवाडीला भेट देऊन आलो. त्याबद्दल इथे लिहिलं आणि खूप जणांनी जाहिर / वैयक्तिक प्रतिसाद दिले. काही जणांनी नेमके प्रश्न विचारून या सर्वच प्रकरणाबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता दाखवली. काही जणांनी प्रत्यक्ष मदत करायच्या दिशेने पाऊल टाकले. सगळ्यांचेच आभार. मनापासून. त्या लेखात मी म्हणलं होतं की माझी माहिती फार तोकडी आहे. आणि म्हणूनच, या संघर्षात, सुरूवातीपासून आघाडीवर असणार्‍या सुनिती सु. र. यांनी लिहिलेला हा लेख इथे देत आहे. त्यावरून अजून बर्‍याच बाबी वाचकांना नीट समजतील अशी आशा आहे.

( ढोस देशीही तू, हर दिवशी तू)

लेखक नाना चेंगट यांनी मंगळवार, 31/07/2012 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - http://misalpav.com/node/22392 ढोस देशीही तू, हर दिवशी तू गुत्त्यात हरेक, असशी परी तू तुझी रंगभूमी, ही सृष्टी जरी बारमधे तू, बारीतही तू ढोसून उठशी, गुत्यातूनी तू तर्राट होशी, लाल होऊन तू मग जोकर विदुषक होशी प्रकार अनेक, डोलकर तू पडता गटारीत, तोल जात रूप रम्य सृष्टीचे, दाखव तू चालत कधी, धप्कन पडून तू कौतूक तुझे, सत्‌ एकची तू दाविशी दिव्य, जरी हे तू दुसरे दिवशी, विसरशी तू नानुडी सांगे, परका न कुणी एकच सगळे जण, मी आणि तू (आमचे परममित्र ... हो तेच ते ..
काव्यरस

शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 29/07/2012 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
'राजा शिवछत्रपती' हा ग्रंथ म्हणजे मराठी माणसाची अस्मिता. राजा शिवछत्रपती न वाचलेले किमान आमच्या पिढीतले तरी कुणी शोधुन सापडणार नाही. लहानपणी म्हणजे प्राथमिक शाळेत असताना मला बाबासाहेबांची राजा शिवछत्रपती ही व्याख्यानमाला ऐकायची संची मिळाली. पहिल्या पुष्पातच सर्व श्रोते अगदी भारावुन गेले होते. त्यावेळी बाबासाहेबही पन्नाशीत होते. तेजस्वी चेहरा, लकाकणारे डोळे आणि आवेशपूर्ण आवाजाच्या या शिवशाहीराने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन ठेवले होते.

आद्य आंदोलक- गोदाईवा

लेखक खेडूत यांनी रविवार, 29/07/2012 05:03 या दिवशी प्रकाशित केले.
आता अण्णा पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार आणि कदाचित नेहमीप्रमाणे ते संपणार किंवा कसे याबद्दल विचार सुरु होते. कारण ‘ नेमेची येतो’ प्रमाणे दर संसद अधिवेशना आधी ते होऊ लागलंय. एकूणच आंदोलनं वगैरे कधी सुरु झाली असावीत? राजेशाहीत तर ते दुर्मिळच. लोकशाही किंवा त्यासदृश राज्य व्यवस्थेतच ते शक्य आहे. असंच एक आंदोलन इंग्लंड मध्ये झालं होतं. ते वेगळं अशासाठी की ते लोकांचं नव्हतं पण लोकांसाठीच होतं. हेच कदाचित पाहिलं आंदोलन असेल.. इंग्लंडवर पण परकीय आक्रमण करून रोमन आणि नंतर जर्मन राजानी राज्य केलं होतं. नंतर अनेक वर्षं राजेशाही सुरु होती. सन दहाशे त्रेचाळीस! अंग्लो-साक्सन राजवटीचा काळ.