Skip to main content

संस्कृती

ओशो भाष्य " कबीर बाणी"

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी मंगळवार, 12/07/2011 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
जही घट प्रीती न प्रेमरस , पुनि रसना नहि राम ते नर इस संसार मे, उपजि भये बेकाम || " नेहमी शोधत राहायचे की आपल्या हॄदयामध्ये प्रेमरस ओत्तप्रोत भरलेला आहे की नाही आणि समजा भरलेला नसेल, आणि लक्षात आले की आतमध्ये वाळवंट आहे, तेथे पाउस पडणार नाही. तेव्हा त्वरा करा, अहंकार बाजूला करण्याची..!! तेच ध्यान आहे , हीच प्रार्थना आहे! अहंकाराला बाजूला सारण्याची कला म्हणजे योग , तोच खरा धर्म...!! अहंकार आणि विचार सोडले तर तुमच्या हृदयात प्रेमरस भरू लागेल. बाहेर पाउस बरसतच असतो..

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मराठी संस्कृतीचे दर्शन :

लेखक शाहिर यांनी सोमवार, 04/07/2011 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
मूक चित्रपट पासून ते आज वर मराठी कलाकारानी चित्रपटसृष्टी मध्ये मोठे योगदान दिले आहे ..अनेक नामवंत कलाकार , अभिनेते ,दिग्दर्शक आणि निर्माते आजवर तयार झाले आहेत ..तसेच हिंदी चित्रपटाची कर्मभूमी मुंबई हि देखील महाराष्ट्र मध्ये आहे ..परंतु आजवर तयार झालेल्या हिंदी चित्रपटांकडे नजर टाकली तर असे दिसून येते कि मराठी संस्कृती व मराठी व्यक्तिरेखा यांना कायमच दुय्यम स्थान दिले गेले आहे ..पूर्वी च्या चित्रपट मध्ये बिझिनेस मन कोण ?? तर सिंघानिया !! मेहता ..वर्मा ...कपूर ..शहा .. का? एखादा किर्लोस्कर ? गरवारे ?

रावेरी - सीतामंदीर

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 03/07/2011 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
रावेरी - सीतामंदीर रावेरी, त.राळेगाव जि. यवतमाळ येथे भुमीकन्या सीतामाईचे मंदीर असून हे सीतामाईचे देशातले एकमेव मंदीर आहे. प्रभूरामचंद्राने सीतामाईचा त्याग केल्यानंतर याच दंडकारण्यात सीतामाईचे वास्तव्य होते. लवकुशाचा जन्म होऊन अश्वमेघ यज्ञाचा घोडा अडवेपर्यंत याच रावेरी गावात सीतेचे वास्तव्य होते. अयोध्यास्थित राममंदीरासाठी संपूर्ण देशात रामायण-महाभारत घडत असताना रावेरीचे सीतामाईचे एकमेव मंदीर जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे, याकडे कुणाचे लक्षही नव्हते.

कोकणस्थ (चित्तपावन/चित्पावन)

लेखक शरद यांनी शनिवार, 02/07/2011 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणस्थ (चित्तपावन/चित्पावन) इतिहास : कोकणस्थांचा १४ व्या शतकाच्या आधी कोकणात उल्लेख मिळत नाही. मग हे कोठून आले ? या बद्दल तीन मते आहेत. (१) हे बर्बर देशातून जलमार्गे कोकणांत आले. ह्या प्रदेशाचा उल्लेख जुन्या ग्रंथांत मिळतो. त्यातच यांचा व परशुरामाचा संबंधही सांगितला आहे. परशुरामाला समुद्र किनारी १४ शवे मिळाली. त्याने जिवंत करून त्यांची कोकणात स्थापना केली. शवे सोडा, आसन्नमरण माणसे मिळाली; त्यांची सुश्रुषा करून त्यांना वाचवले. मग त्यांना ब्राह्मणत्व दिले.म्हणून चित्तपावन परशुरामाचे भक्त. या मताप्रमाणे यांचा गोरा रंग,सरळ नाक वगैरेची व्यवस्था लावता येते.

छोटे वारकरी ---

लेखक निवेदिता-ताई यांनी शुक्रवार, 01/07/2011 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गावातील बालकमंदिरातील छोट्यांची दिंडी (पाउले चालती पंढरीची वाट) निघाली आहे.
From

हैयोहैयैयो नाडी ग्रंथ ताडपट्टयातील नावाच्या उल्लेखांचे प्रात्यक्षिक दाखवणार

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 01/07/2011 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, नाडीग्रंथांवर अनेकांनी बरेच लिखाण दोन्ही बाजूनी केले आहे. या धाग्याने नाडीग्रंथांचे प्रात्याक्षिकाचा अनुभव घेणाऱ्यांसाठी माहिती.... ....आज दि, १ जुलै ला इतिहास संशोधन मंडळाच्या पोतदार सभागृहात सायंकाळी ६ वाजता भाषण आहे. त्यात हैयोहैयैयो नाडी ग्रंथ ताडपट्टयातील नावाच्या उल्लेखांचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. इच्छुकांनी नोंद घ्यावी. मिपाच्या धोरणांत अशी माहिती देणे बसणारे नसेल तर धागा काढून टाकावा.