जकार्तातील रिक्कामे रस्ते!
९४ टक्के मुस्लिम वस्तीच्या इंडोनेशियात त्यातही जावा बेटावर इदुलफित्रीला सर्वांनी आपापल्या आई-वडिलांकडे किंवा आजी-अजोबांकडे जायचा प्रघात आहे. जकार्तात नोकरी करून आपले ऐश्वर्य मिरवायलाही कांहीं लोक जातात असे माझे कांहीं इंडोनेशियन मित्र म्हणतात. स्वतःचे नोक-झोकवाले कपडे, घरच्यांना द्यायला विकत घेतलेल्या भेटीं वगैरेमुळे बरेच लोक कर्जबाजारीही होतात.
असो. एरवी अॅक्सिलरेटर ऐवजी ब्रेकवर पाय ठेवून गाडी चालविणार्या आम्हा लोकांना हे चार दिवस म्हणजे "फॉर्म्यूला-१"चेच दिवस वाटतात.
मिसळपाव
"अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा" हे विष्णुशास्त्री व कृष्णशास्त्री चिपळूणकर या पिता-पुत्रांनी (यातील वडील कोण व मुलगा कोण, हे विसरलो - कृपया सांगावे) अनुवादित केलेले पुस्तक माझ्या लहानपणी घरात होते. ते नेहमी वाचायचो. फारच अद्भुत वाटायच्या त्या गोष्टी. मुख्य म्हणजे त्या आवृतीत कुणा इंग्रज चित्रकाराची फार छान चित्रे होती.