Skip to main content

संस्कृती

बाबूकाका

लेखक यकु यांनी सोमवार, 03/01/2011 03:56 या दिवशी प्रकाशित केले.
डोक्याच्या घेरावर बारीक होत गेलेला पोलीसकट, पांढरे होत चाललेले केस, तरूणपणीच्या शम्मी कपूरसारखाच चेहेरा आणि अंगयष्टीही तशीच, अंगात सफारी किंवा तसलाच साहेबी वाटणारा पोषाख, हातात एक लहानशा आकाराची ब्रीफकेस असे काहीसे वर्णन करता येईल असा माणूस एसटीतून उतरण्याची वाट पाहात खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट घातलेला एक पोरगा बसस्टॅण्डवर कितीतरी वेळापासून थांबलेला असे. ते त्याचे बाबूकाका होते. बाबूकाका त्याचे आजोबा लागत असले तरी घरातील इतर सर्वजण त्यांना बाबूकाकाच म्हणत असल्याने त्याच्यासाठीही ते बाबूकाकाच होते.

उस्ताद अमीरखाँसाहेब !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 01/01/2011 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख माझ्या आजोबांना म्हणजे कै. केशव चिंतामण कुलकर्णी यांना अर्पण. यांनी मला शास्त्रीय संगीताची ओळख करून दिली तो दिवस मला आजूनही आठवतो. सवाई गंधर्वला मी त्यांच्या मांडीवर मस्त झोपलो होतो. तेव्हा पं भिमसेन जोशी गात होते. पण मी त्या दिवशी बरेच ऐकले हेही तितकेच खरे. मी मला वाटते चवथीत असेन. माझे आजोबा स्वत: उत्तम पखवाज वाजवायचे. दुर्दैवाने मला न ऐकवताच ते गेले. उस्ताद अमीरखाँसाहेब ! १७ फेब्रुवारीला या घटनेला बरोबर सदतीस वर्षे पूर्ण होतील.

हैप्पी ३१ स्ट

लेखक विनायक बेलापुरे यांनी शुक्रवार, 31/12/2010 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
दारु की खुश्बू गुटके की मिठास गांजे की महेक और चरस का स्वाद भांग के पकोडे और विल्स का प्यार मुबारक हो आपको बेवडों का त्योहार हैप्पी ३१ स्ट (एका समस वरुन साभार)

एक संवाद

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 28/12/2010 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
पती पत्नींच्या तक्रारीचे धागे वाचून एक संवाद आठवला पति-आज काय करणार आहेस जेवणात? पत्नी- तुम्ही सांगा फर्माइश. काय खायचा मुड आहे ते "फारशी काही भूक नाही. आमटी अन भात बनव फक्कडसा . आई करायची तशी चिंच गुळाची" ' काल तर केला होती तसली आमटी अन भात' ' मग पोळी अन बटाट्याची भाजी बनव काचर्‍यांची ' ' अहो मुलाना नाही आवडत नुसती पोळी भाजी ' ' मग वांगे भात बनव सोबत?' ' वांगी भात ? वातूळ होते ' ' भाकरी अन पिठले?' ' पिठले रात्री खात नाहीत' ' ठीक आहे मग बाहेरच जाउयात ?' ' रोज रोज काय खायचे बाहेर. शिवाय मुलाना सकाळची शाळा आहे..

पूर्णब्रह्म!

लेखक असुर यांनी सोमवार, 27/12/2010 05:01 या दिवशी प्रकाशित केले.
खाण्याचा विषय निघाला आणि पुणेकरांनी तिथे आपले मत व्यक्त केले नाही असं आजपर्यंत झालं नाहीये. आणि मीही अस्सल पुणेकर आहे, त्यामुळे जाईन तिथे, आणि जमेल तिथे मतप्रदर्शन करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि आद्यकर्तव्य आहे. असो, पुणेकरांचे हक्क आणि त्यांचे कर्तव्यपालन हा एक चर्चेचा वेगळा विषय होऊ शकतो, तूर्तास आपण खाण्याकडे वळूयात. मुळात आपण भारतीय लोक चवीच्या बाबतीत अतिशय लकी आणि सुखी आहोत हा शोध मला भारतात होतो तेव्हा लागला नव्हता हे करंटेपण मान्य करूनही मी हे सांगू इच्छितो की आपली खाद्यसंस्कृती ही आंग्लभूमीला खरोखर भयभीत करून सोडणारी आहे. एखादा इंग्रज खाण्याचे असे किती प्रकार सांगू शकेल?

चालो जमवा: अहमदाबाद मिपाकट्टा.

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 27/12/2010 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
आय आय एम चा कॅम्पस कस्त भटकून झाला. संध्याकाळचे साडेआठ वाजले होते. जागतीक अर्थव्यवस्था . संघ आणि भाजप , गांधीवाद , गुजराती लोक आणि त्यांच्या सवयी , अणु युद्ध होईल का , आपण किती इंचाने माघार घेत आहोत , खलिस्तान चळवळ आणि बिहारी , युरो डॉलर आणि भारतीय रुपया ,मिपावरील डामरट प्रतिसाद , सिग्नेचर किंग टार्‍या इत्यादी विषयंवर तज्ञामध्ये गहन चर्चा सत्र झाल्यानन्तर क्लिंग्टन आणि विजुभाऊ ना कडकडून भूक लागली होती. अहमदाबादच्या रस्त्यांवर नेहमीप्रमाणेच खाद्यपदार्थांची रेलचेल होती.

सवय

लेखक टारझन यांनी शुक्रवार, 24/12/2010 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , असा एकपण माणुस नाही ज्याला एखादी का होईना "सवय" नाही. किंबहूणा ज्याला सवय नाही तो माणुसंच नाही . सवयी तर दारु पिण्याच्या असतात तर सिगारेट फुंकण्याच्या असतात. तंबाखु , दारु , सिगारेट किंवा तत्सम सवयी ह्या व्यसन ह्या प्रकारात मोडतात. काहींना खोटं बोलण्याची सवय असते. काहींना ऑफिसात येऊन शिला जाण्याची सवय असते ( आमच्या हापिसातली फ्रेशरुम सकाळच्या प्रहरी कधीही जा कायम एंगेज्डच असतात ) तर काहिंना उशीरा उठन्याची सवय असते. काही जणांना चार चौघात विना रुमाल तोंडाला लावता शिकायची सवय असते. काहिंना दुसर्‍याच्या प्लेट मधे हात घालायची सवय असते.

वॉल्व्हर

लेखक निनाद यांनी गुरुवार, 23/12/2010 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
वॉल्व्हर चित्रपटाची सुरुवात दोघी बहिणी आणि एक मुलगी घाईने स्मशानभूमीत जाण्याने होते. दोघीजणी आपल्या आईवडिलांच्या समाधी-शिला स्वच्छ करतात. या दोघी बहिणींचे आईवडील एका आगीत जळून वारले आहेत. असे बोलण्यातून लक्षात येते. त्यानंतर त्या आजीच्या घरी जातात. जातांना रायमुंदाला आणि पावलाला पाहून ओळखीचे कुणी भेटतात. ते म्हणतात, 'अगदी तुझ्या वडिलांसारखे डोळे आहेत हिचे'. आजीकडे त्यांना त्याची आई जशी बिस्किटे करत असे तशीच बिस्किटे मिळतात. त्या दोघींना आनंद होतो.

अशोक केळकर यांना 'रुजुवात'साठी साहित्य अकादमी पुरस्कार

लेखक चिंतातुर जंतू यांनी बुधवार, 22/12/2010 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर यांना 'रुजुवात' या लेखसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकवाङ्मय गृहानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. वाङ्मयाची आणि कलेची आस्वाद मीमांसा आणि समीक्षा या विषयांतल्या केळकरांच्या काही लेखांचं संकलन या पुस्तकात आहे. म्हैसूरची भारतीय भाषा संस्था (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिअन लँग्वेजेस), मुंबईची राज्य मराठी विकास संस्था, पुण्याची मराठी अभ्यास परिषद अशा संस्थांमागे केळकरांची प्रेरणा आणि त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. वैखरी, मध्यमा वगैरे त्यांची भाषाविषयक पुस्तकंही मराठीत यापूर्वी रसिकप्रिय झाली आहेत.