आहेर, भेटवस्तू आणि संकट
आहेर किंवा भेटवस्तू देणं-घेणं ही एक फार प्राचीन परंपरा आहे. प्रसंगानुरुप किंवा प्रसंगाशिवाय भेटवस्तू देणं किंवा स्वीकारणं हे आपल्या अंगवळणी पडलेलं आहे; इतकं अंगवळणी पडलं आहे की वस्तू काय आहे, तिची उपयुक्तता काय आहे, त्या वस्तूची आपल्याला गरज आहे का, त्या वस्तूची किंमत किती आहे वगैरे बाबी लक्षात न घेता आहेर किंवा भेटवस्तू दिल्या-घेतल्या जातात.
आता हेच बघा ना, लग्नातला आहेर किती गमतीदार असतो. अगदी जवळच्या नात्यातलं लग्न नसेल तर आहेर विकत घेतला जात नाही; तो घरातच जुळवला जातो.
मिसळपाव