कोणे एके काळी...
कोणे एके काळी...
कोणे एके काळीच म्हणावे लागेल. कधी घडले यावर जर एकमत नसेल, असे काही घडलेच नसेल असे तथाकथित विचारवंत ठासुन सांगत असतील, पण सत्य कुठे अग्नी वा कुठे धुराच्या रुपात लोककथांमधुन, बोलीतुन पुढे सरकत असेल, त्याला इतिहास म्हणुन मान्यता द्यायची की नाही यावर काथ्याकुट चालत असेल तर माझ्यासारखा सामान्य माणुस कोणे एके काळी असे घडले असे म्हणुनच सुरवात करणार.
तर कोणे एके काळी.
काशी नगरीतल्या एका वृद्ध ब्राह्मणाची कथा. पहाटे उठावे. गंगेवर स्नान करावे. काशी विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे. घरी येवुन नित्य नैमित्तिक पूजा अर्चा करावी, वाचन मनन चिंतन लेखन करावे.
मिसळपाव