Skip to main content

संस्कृती

आदरणीय राहुल गांधी यांचे चरित्र

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 23/05/2010 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील जनता प्रगल्भ आहे. भारतातील लोकशाही तर भलतीच प्रगल्भ आहे. या प्रगल्भ लोकशाहीच्या परंपरेनुसार आज जवळजवळ प्रत्येक ज्येष्ट पुढार्‍याची कन्या, पुत्र, भाचे, पुतणे भारताच्या सेवेत मग्न आहेत. पण त्यात क्रमवारी लावायची ठरवली तर राहुल गांधी यांचा क्रमांक वरचा आहे. आणि दोन क्रमांक बिटिया प्रियांकाचा आहे हे कुणीच अमान्य करणार नाही. अशा वेळी राहुलजी : भारताचे महानायक हे चरित्र लायब्ररीत दिसले तर कोण बरे वाचणार नाही? श्री माणिक लाल आणि नील घोटे ह्या समर्थ लेखकांनी ह्या भारताच्या तारणहाराचे चरित्र लिहिले आहे. ते लवकरच विक्रीस येत आहे.

मी कवयित्री कसा झालो...? अर्थात जालिंदरजींची कृपा ... भाग १

लेखक भडकमकर मास्तर यांनी शुक्रवार, 21/05/2010 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या फ़ेब्रुवारीतली गोष्ट... मला विविध आजार एकदम होताहेत असं वाटायला लागलं... म्हणजे एकाच वेळी आळशी आणि उत्साही वाटणं, झोप न लागणं , वाट्टेल तेवढं झोपणं, अति भूक लागणं आणि दुसर्‍या दिवशी अजिबात भूक नसणं असं काहीही सुरू होतं.. डाक्टरांनी काही प्रथमिक तपासण्या केल्या आम्ही नार्मल आहोत असं दर्शवणार्‍या.. मग पुढला महिनाभर आम्ही (काही इस्पितळांचा खर्च भागवण्यासाठी आणि अनेकांना रेफ़रल फ़ी मिळवून देणार्‍या) भारी भारी तपासण्या असतात त्याही करून घेतल्या पण त्याही नार्मल होत्या... मग आमची रवानगी एका मानसतज्ञाकडे झाली.

शिवाजी महाराजांवर ई-बुक

लेखक अस्मी यांनी शुक्रवार, 21/05/2010 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
सारंग माडगुळकर यांनी शिवाजी महाराजांवर King Shivaji -the spiritual quest म्हणून एक ई-बुक मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांत लिहिले आहे... शिवइतिहासामध्ये 'मिर्झाराजांची मोहीम' व 'आग्रा भेंट' ही दोन प्रकरणे चुकीची लिहिली गेली आहेत, असं त्यांच मत आहे. भाग १ मिर्झाराजे जयसिंह प्रकरणाचे सत्य स्वरूप ! ...

एक चांगली बातमी ~~ नव्हे आदर्शवत बातमी म्हणू या !!

लेखक इन्द्र्राज पवार यांनी शुक्रवार, 21/05/2010 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
आपण आपल्या या संस्थळावर विविध विषयावर वेगवेगळ्या बाजूनी विचार मांडीत असतो, त्यांची देवाणघेवाण करीत असतो. अशाच प्रसंगी समाजात कित्येक चालिरीतीबाबतही मत व्यक्त करतो. "लग्न" हा असाच एक महत्वाचा आणि प्रत्येक कुटुंबाचा जिव्हाळ्याचा विषय. वर्षानुवर्षे "विवाह समारंभ" म्हटले, की भोजनावळ, जोरदार स्वागत समारंभ, वाद्यांचा दणदणाट असे समीकरण झाले आहे; आहेर देणे, घेणे, रुसवे फुगवे काढणे, फोटो, व्हिडिओ, आदीची रेलचेल. यात बदल तरी काय असणार? आपणदेखील वैयक्तिक पातळीवर यातील काही प्रथांना दूर केले तरी बहुतांशी लग्नात हेच दृश्य दिसत असते. अशावेळी काहीतरी "आगळे वेगळे" घडले तर मनाला फार हर्ष होतो.

माझ्या मनातले राऊळ

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 20/05/2010 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
(विचारतरंग जसे उमटलेत तसे मांडलेत. कदाचित विस्कळित वाटतील. पण त्यांच्यातील सच्चाई समजून घ्यावी! ) देऊळ म्हटलं की आपल्या किती ठराविक संकल्पना असतात, नाही? जे जे उदात्त, उत्तम असते त्याचेच मूर्त स्वरूप म्हणजे मंदिर - देऊळ. पंचमहाभूतांना मानवी संकल्पनेत बंदिस्त करून त्या द्वारे संपन्न अनुभव व आत्मिक समाधान प्राप्त करण्याचे स्थान मानले जाते देऊळ. पण कितीतरी वेळा आपण अशा अनुभवाला काही छोट्यामोठ्या कारणांनी पारखे होतो. कधी ते कारण गर्दी असते, तर कधी त्या ठिकाणची अस्वच्छता. कधी भक्तीचा बाजार आपल्याला उबग आणतो तर कधी लोकांच्या अंधश्रद्धा! आणि मग ज्या कारणासाठी देवळात गेलो ते कारणच बाजूला पडते.

बडे दिनो के बाद हम बेवतनों को याद...

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 16/05/2010 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
बडे दिनो के बाद हम बेवतनों को याद वतन की मिट्टी आयी है, चिठ्ठी आयी है अमेरिकेत आलो त्याला बरीच वर्षं झाली. नशीबाची गोष्ट म्हणजे एकाच वर्गातल्या आम्हा तिघांना एकाच युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिप मिळाली. त्यामुळे ती खूपच सोय झाली. आम्ही तिघे एक अपार्टमेंट घेऊन राह्यलो. एकगठ्ठा तिघं जण एकत्र असल्यामुळे साहजिकच पहिल्या थॅंक्सगिव्हिंगला इतर जनता गावोगावहून आमच्या घरी जमली. परत एकदा मोठ्ठा ओळखीचा ग्रुप जमत होता. ग्रॅड स्टुडंट असल्यामुळे बजेटं तशी मर्यादितच होती. पण दुकानात दारू खरेदी करायला गेलो तेव्हा आमच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. आंद्रे शॅंपेन - बाटलीची किंमत केवळ दोन डॉलर‍! मिळाली.

मलंग आणि माणुसकी

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 15/05/2010 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
काही वेळा आयुष्यात फार गमतीशीर प्रसंग घडतात. पण त्या त्या वेळेस तुम्ही त्या प्रसंगातील अनोखेपण अनुभवू शकालच ह्याची काहीच हमी नसते. आपले आधीचे पूर्वग्रह किंवा समज बदलून टाकायला एखादी घटनाच पुरेशी असते. असाच एक प्रसंग बऱ्याच वर्षांपूर्वी आमच्या कुटुंबाने अनुभवला. त्याचीच ही कहाणी. माझे आई-वडील फार ''देव-देव'' करणाऱ्यातले नाहीत. जगात ईश्वर आहे, तो सगळीकडे आहे आणि त्याला आपण मानतो अशी त्यांची विचारसरणी. त्यात कोणत्याही प्रथा परंपरांचे अवडंबर नाही. स्वधर्माचा अभिमान आहे पण इतर धर्मांविषयीही यथायोग्य आत्मीयता.

मॅकमोहन गेला!

लेखक सन्जोप राव यांनी मंगळवार, 11/05/2010 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी चित्रपटसृष्टीतला आघाडीचा चरित्रनायक मॅकमोहन याचे काल निधन झाले. (मॅकमोहन यांना आदरार्थी संबोधणे अवघडच वाटते. आपण आपल्या आजीला कधी 'अहो आजी' म्हणतो का? एकेरी संबोधण्याने आजीची पदरमाया कधी कमी होते का?) 'हकीकत' या चित्रपटातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणार्‍या मॅकमोहनने हिंदी पडद्यावर असंख्य अजरामर भूमिका साकारल्या आहेत. त्याचा 'सांबा' तर प्रसिद्ध आहेच, पण 'इतने पैसे के लिये तो मै अपने बाप को भी बेच दूंगा' म्हणणारा 'मजबूर' मधला त्याचा अ‍ॅन्टिक्सचा व्यापारी, 'ताश का सबसे छोटा पत्ता तिर्री नही, दुर्री होता है मेरे दोस्त' म्हणणारा 'काला पत्थर' मधला त्याचा कलाबाज ताशबहाद्दर...

फतेहपुर-सीक्री सहल..

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 11/05/2010 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
फतेहपुर-सीक्री सहल..
..
काहींनी 'यात काय मोठेसे?' असे म्हणून नाके मुरडली. ते पाहून चाचाजी म्हणाले , 'मला भरीला घालून उड्या मारायला लावता व परीक्षा पहाता हे मला माहित आहे. असे 'बडबोले' मी रोजच पहातो. मला उड्या मारायला लावून त्यांना वाटते, 'पहा यडा कसा आमच्या तालावर नाचतोय. बरा बनवला!' ... चाचा म्हणाले, 'लक्षात ठेवा, मी उड्या मारणारच होतो. तुम्ही म्हणालात तरी. नाही म्हणाला असतात तरी.