Skip to main content

संस्कृती

कॅलेब

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 26/03/2010 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
कॅलेब ओबुरा ओब्वांतिनिका.... मध्यंतरी टीव्ही च्या कोणत्या तरी चॅनलवर एक गाजलेला मराठी चित्रपट लागला होता. ''मुक्ता''. सोनाली कुलकर्णी, विक्रम गोखले, डॉ. श्रीराम लागू, अविनाश नारकर ह्या अभिनय क्षेत्रातील नामवंत मंडळींचा समावेश, जब्बार पटेल ह्यांचे दिग्दर्शन... अशी भट्टी जमल्यावर खरे तर चित्रपट सुपर ड्यूपर हिट व्हायला हवा होता. पण बहुधा तसे झाले नसावे. चित्रपटात हाताळलेल्या संवेदनशील विषयामुळे असेल कदाचित. पण ह्या चित्रपटात एक व्यक्ती मात्र भरपूर भाव खाऊन गेली. कॅलेब ओबुरा ओब्वांतिनिका.... माझा वर्गमित्र. मला कॉलेजमधील ते सुरुवातीचे दिवस अजूनही आठवतात.

चित्रगुप्ताची कैफ़ियत : दस्तुरखुद्दांचि अजब, अनोखी, दिलकश दास्तान

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 25/03/2010 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेख संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे. -शुद्धलेखनाचा आग्रह असणारा मिपा संपादक. चित्रगुप्ताची कैफ़ियत दस्तुरखुद्दांचि अजब, अनोखी, दिलकश दास्तान : भाग १. नमस्कार मंडळी, मी चित्रगुप्त......

शुकसारिका

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 25/03/2010 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
शुक-सारिका
Rightवरदा बुक्सचे प्रकाशक ह अ भावे यांच्या दरबारी आमची हजेरी अधून मधून असतेच. आजच बसलो होतो. त्यांना आंतरजालीय वाद व गमतीजमती याबाबत गप्पा मारत माहिती देत होतो. तेवढ्यात त्यांना पुस्तक मागणीचा फोन आला.ग्राहक अधिक माहिती विचारत होता. "शुक म्हणजे पोपट, सारिका म्हणजे मैना. ....."भावे नीरगाठउकलतंत्राने फोड करून फोनवर सांगत होते तोता मैना की कहानी तो पुरानी हो गय़ी!

भारतीय कायदे आणि पुराणातील संदर्भ

लेखक II विकास II यांनी गुरुवार, 25/03/2010 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेख संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे. -शुद्धलेखनाचा आग्रह असणारा मिपा संपादक. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात कृष्ण-राधा यांचा संदर्भ देऊन एकप्रकारे भारतीय कायद्यांना नवीन दृष्टिकोनातून पाहायला सुरवात केली. या गोष्टीची स्तुती करावी तितकी थोडीच. ज्या देशाचे सरकार राम अस्तित्वातच नव्हता, त्याच देशाचे न्यायालय कृष्णाचा आधार घेते, ह्यातच खूप मौज सामावली आहे. असो. ह्याने काही नवीन प्रश्न सामोरे येण्याची शक्यता आली आहे. न्यायालयाने हिंदूंच्या देवाचा दाखला दिला, ह्यामुळे, सरकारच्या अधर्मी( म्हणजे धर्मरहीत) प्रतिमेला तडा गेला असेल काय?

आजीची भातुकली

लेखक सुनिल पाटकर यांनी मंगळवार, 23/03/2010 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
भातुकली...आजच्या इंग्रजी माध्यमात ,संगणक युगात वावरणा-या मुलांना हा शब्द माहितही नसेल .परंतु एकेकाळी या शब्दाभोवती लहान मुलांचे भावविश्व गुंफलेले होते.एकत्रित जमण्याचे मैत्री वाढविण्याचे संकेत भातुकलीचा हा खेळ मुलांना द्यायचा.काळनुसार खेळही बदलले.जुन्या पिढीचे ते खेळ ,भातुकलीतील ती चिमुकली भांडी , १०० वर्षांपूर्वी वापरात असणा‍र्‍या त्या वस्तू..आपल्याला आजही पहावयास मिळतात. पुणे येथिल विलास करंदीकर यांनी २० वर्षांपासून अशा वस्तू जमवल्या आहेत.

अमृत महोत्सवासाठी काढण्यात आलेले भित्तिचित्र...

लेखक डावखुरा यांनी सोमवार, 22/03/2010 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
सर जमशेटजी जीजीभाई उपयोजित कला महाविद्यालय्, किल्ला[फोर्ट], दा.नौ.मार्ग, मुम्बई.४००००१.

सावध ऐका (मागल्या) हाका!

लेखक भोचक यांनी सोमवार, 22/03/2010 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
पदार्थाची चव लिहून सांगता येत नाही, तो अनुभवाचा भाग आहे, तद्वतः इंदूरी हाकांचे विश्व हा खास अनुभवाचाच भाग आहे. आता लेखाची सुरवातच खाद्यपदार्थाच्या शब्दाने व्हावी हा खास इंदुरी असल्याचा अपरिहार्य नि अटळ परिणाम आहे. पण तो अट्टल खवय्या असल्याची साक्षही आहे. इंदुरात आल्यावरही इथल्या हाकांमध्ये भिजले नाहीत नि त्या हाका तुमच्या जिभेत भिजल्या नाहीत, तर तुम्ही 'इंदौरकर' कधीच होऊ शकणार नाही. इथल्या भय्याचा उच्चार तुम्ही कोणत्या वेळी, कोणासमोर नि कसा करता यावरही तुम्ही इंदौरी आहात की नाही हे ठरते.

लुटा लुत्फ विसापुरचा अर्थात वाटा चुकत चुकत केलेल्या ट्रेकचा वग

लेखक झकासराव यांनी रविवार, 21/03/2010 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
मध्ये लोहगडला जाउन आलो. दुवा तेव्हाच विसापुर बघुन तिकडे जायच नक्की केल. पण ह्या ना त्या कारणाने ते पुढे ढकलतच गेल. मग एके दिवशी काही मित्रानी बाहेर जाउन खा खा खादाडी करण्याचा कार्यक्रम करुया का अस विचारल होत. त्यावर मी माझ्या वाढलेल्या ढेरीकडे बघत त्याआधी एक किल्ला बघुन येवु मगच खादाडी करु अशी एक "पोट"सुचना (:D) दिली. चारजण तयार झाले. आणि मग रविवारी सकाळी ७ चा मुहुर्त (मीच) ठर(व)ला. आणि मीच ७:३० ला निगडी चौकात गेलो. (पर्फेक्ट आयएसटी :D ) तिथुन निघालो.