हिषेब्...जमा खर्चाचा
वर्ष संपत आले की प्रत्येक वर्षी हेच फीलिंग येते. कोनीतरी अगदी जवळचे दुरावणार असल्यासारखे राहून राहून वाटत असते. डिसेंबर चा पहिला पंध्रवडा या हुरहुरीत जातो अन दुसरा येतो कधी अन जातो कधी तेच कळत नाही इतक्या भर्रकन संपलेला असतो.
या सरत्या वर्षात काय मिळवले काय गमावले याचा कधीतरी लेखाजोखा मांडुयात. नक्की काय अनुभव पदरी पडले ते पहाण्यात.प्रत्येक वर्षाखेरीला हा विचार मनात अख्खा महिनभर वारंवार डोकावत असतो. आणि आपण एखाद्या बेसावध क्षणी झोपायच्या तयारीत असताना हा विचार एकदम तोंड वर काढतो. झोपेची आराधना वगैरे करावे लागत नाही. विचारांची गाडी सुरू होते. आठवणींची स्टेशने मागे मागे जायला सुरुवात होते.
मिसळपाव
