Skip to main content

संस्कृती

म. टा. मधे सुरु झालेले नवीन सदर , सेक्स न्यूज : नवं सेग्मेंट

लेखक शरुबाबा यांनी सोमवार, 09/06/2008 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
म. टा. मधे सुरु झालेले नवीन सदर सेक्स न्यूज : नवं सेग्मेंट http://maharashtratimes.indiatimes.com/articlelist/3103033.cms आपली प्रतीक्रीया ?

बीबी का मकबरा

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 06/06/2008 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आम्हाला आमच्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराचं फार कौतुक. प्रत्येकाला प्रत्येकाच्या शहरात अभिमान वाटावा अशा काही कलाकृती सतत आनंद देत असतात. ताजमहालाची प्रतिकृती असलेला बीबी का मकबरा त्या पैकी एक.

बीवी का मकबरा

रायगड

लेखक चेतन यांनी सोमवार, 02/06/2008 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या महिन्यात रायगडला जायचा योग आला त्याचे काही फोटु http://picasaweb.google.co.in/crdanave/fGgZKD चेतन

आमेरिकन बिवटी - येक पिक्चर...

लेखक फटू यांनी सोमवार, 02/06/2008 05:27 या दिवशी प्रकाशित केले.
(हा लेक म्हंजे 'आमेरिकन बिवटी ' ह्या इंग्लिस पिक्चरचा परीक्शन हाय. ह्ये परीक्शन वरिजनल आमेरिकन पिक्चरवर आदारीत हाय. (मना आसा म्हनायचा हाय का हा परीक्शन भारतीय शेंसॉर बॉर्डाने शेंसॉर केलेल्या 'आमेरिकन बिवटी' चा नाय. असो.) तर सांगायचा मुद्दा हा हाय की पिक्चरमदी काय पन दाकवलेला असला तरी मी लेक लिवताना लय संबालून लिवलाय. तरीपन सरपंचाना किवा कुना आदर्नीय मिपा कराना काय आब्जेक्शन आसला तं मना काय नं सांगता हितना हा लेक काडून टाकला तरी माजा काय म्हनना नाय...) ...गावाकड दुपारच्या टायमाला जोरान हुती येते. हुती म्हनजे वा~याचा भवरा.

मजेशीर शब्द

लेखक आर्य यांनी शुक्रवार, 30/05/2008 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल भाषाशुद्धी-शुद्धलेखन या आणि अशा बर्‍याच विषयांवर बराच काथ्याकुट करुन झाला आहे. शब्दकोश हा धनकोशापेक्षा वेगळाच आहे! तो वापरल्याने मोठा होतो आणि नुसताच ठेवून दिला तर त्याचा र्‍ह्सा होतो, हाच धागा पकडून ऐक नविन चर्चा पुढे चालू करु. मिपावर फक्त पश्चिम महाराष्ट्रातले नसून जगातल्या विविध भागातले सदस्य आहेत / गेलेत. चला तर मग आपला शब्द संग्रह वाढवूया.

भासा सूद्धी

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 29/05/2008 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
भासा सुद्धी चे हे कैसे कैसे चाळे चालले आहेत सध्या संस्थालावर ? लळीतांचा सुकाळु तेथ आनंदाचा दुष्काळु.... घालोन येकमेकांच्या गळ्यात गळु .... आनन्दे वोरडोनी अक्कल पाजळु... दुसर्‍याते असूद्ध म्हणोनी त्याते बहुत घोळु ऐसे शेवाळु हिरवाळु आम्ही बरळु लोका येई पोटाते गोळु आम्ही इये मराठीचे भासा वळु ऐसी मनोगते रोजच खेळु......... कपाळा हात लावोन बसे विजुभाऊ साधाभोळु...
Taxonomy upgrade extras

शिवमानसपूजा - आदि शंकराचार्य!

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 24/05/2008 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच एक स्तोत्र ऐकण्यात आले. त्याची गेयता, नादमधुरता, त्यातल्या रमणीय कल्पना ऐकून ते आदि शंकराचार्यांचे असावे असा अंदाज बांधला, तो खरा निघाला. त्यांचेच हे स्तोत्र 'शिवमानसपूजा' ह्या नावाने ओळखले जाते. प्रत्यक्ष खरोखरीच पूजा करणे जरी शक्य नसेल तरी ह्या स्तोत्राच्या पठणाने खर्‍या पूजेचे पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे. तो भाग जरी क्षणभर सोडून दिला तरी ऐकताक्षणीच मनाचा कबजा घेणारे हे सुंदर संस्कृत स्तोत्र मराठीत अनुवादित करायचेच असा चंग बांधला. माझा संस्कृतचा अभ्यास वगैरे नाही अंदाजाने अर्थ लागू शकतो इतपतच समजते.

त्या गुर्जरनगरी: ओळख

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 24/05/2008 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच कुठे अमेरिकायण संपवून मायदेशी परतलो होतो. बर्‍याच दिवसांनी आईच्या हातचं रुचकर जेवण नशिबी येत होतं. त्याशिवाय मित्रांबरोबरचं पूर्ववत फिरणं (खरंतर भटकणं- अगदीच खरं सांगायचं तर उंडारणं), विकेंडला १-२ चित्रपट, हळूहळू येऊ लागलेले आंबे वगैरे गोष्टींचा आनंद मनापासून घेत होतो. अमेरिकेत राहून ज्या स्थळांच - व्यक्तींचं - प्रसंगांचं महत्त्व नव्याने कळलं होतं त्या सार्‍या स्थळांना-व्यक्तींना-क्षणांना नव्याने भेटत होतो. लोकलची गर्दी , धूळ, कचरा या गोष्टीही माझ्या आयुष्याचा भाग मोठ्या सहजतेने बनू लागल्या होत्या. थोडक्यात सारं काही आलबेल होतं.