Skip to main content

संस्कृती

आज्याची शिकवन

लेखक ब्रिटिश यांनी बुधवार, 03/09/2008 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
मी तवा सातवीत आसन मी माजे दोन चुलतभाउ सादारन यकाच वयाच आमी तवापासुन आज्याच्या बीड्या चोरुन पीवाचो. त्याची पन यक झम्मड हाय आजा म्हन्जे गावचा सरपंच. पन लई पेताड. सकाली उटला क आंगोल धवाचे आदी भट्टी वर हजर न दुपारचा जेवला क बेड्यान (सुद मराटीत - बैलांचा गोठा) झोपाचा आनी संद्याकाली उतरली क गावचे कामाला लागाचा. म्हन्जे तेला भेटाचा आसन तर संद्याकालीच. पन गावान धाक जबरा. यकदा क आवाज टीपवला क कोनाची टाप नाय सामनी यवाची तर क झाल्त , आमाला रोज बीड्या लागाच्या आनी खीच्यान पैस कुटल ? रोज दुपारच्या टायमाला आमी सगले आज्याची वाट बगाचू.

लालबागच्या राजाचा विजय असो...!

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 03/09/2008 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, मुंबईचा मानाचा बिंदू, मुंबईचं वैभव असणारा लालबागचा राजा या वर्षी अमृतमहोत्सवी वर्षात पदर्पण करत आहे. त्याकरता मी आमच्या "लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा"चे समस्त मिपा परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो...! एकेकाळी राजाचं दर्शन अगदी सहज मिळायचं, परंतु आता आमचा राजा सेलिब्रिटी झाला आहे! :) मराठी माणसाला ज्यांचा अभिमान वाटावा असे हिंदी रजतपटावरील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितिन देसाई यांनी या वर्षी लालबागच्या राजाच्या सजावटीची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे.

मिपाचा प्रथम वर्धापन दिन आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा...!

लेखक सरपंच यांनी बुधवार, 03/09/2008 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, समस्त मिपाकरांना मिपाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आणि गणेशोत्सवानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा! केवळ अन् केवळ मायबाप मिपाकरांच्या सहकार्यामुळेच मिपाला गेल्या वर्षभराची वाटचाल करता आली. गेल्या वर्षभरात जे काही चांगलं झालं असेल, उत्तम झालं असेल ते सर्व मिपाकरांमुळेच झालेलं आहे आणि जे काही चुकलं असेल त्याकरता मी स्वत: जबाबदार आहे... या पुढेही मिपाकर सभासदांचा स्नेहाशीर्वाद मिपाच्या डोक्यावर अखंड राहो एवढीच श्री गजाननाचरणी प्रार्थना..! गणपतीबाप्पाची तुम्हाआम्हा सर्वांवर नेहमीच कृपादृष्टी राहो, हीच शुभकामना...! आपला, (कृतज्ञ) तात्या अभ्यंकर. मिपाचे श्रद्धास्थान - लालबागचा राजा.

ऑनलाईन गणेशोत्सव पहा

लेखक तु तिथं मी यांनी सोमवार, 01/09/2008 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो तुम्हाला १ बातमी द्यायची आहे आपला मराठी उत्सवाची आस्स्मिता जपण्यासाठी व आपला आवडता गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मला १ माध्यम मीळाले आहे ते मी आपल्या सगळ्यांना सांगतो. एकदा जरुर पहा. www.devbappa.com

जो भी बिछडें है, कब मिले है फराज़....

लेखक मनिष यांनी बुधवार, 27/08/2008 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळ मधे वाचलेल्या बातमीनुसार जेष्ठ शायर अहमद फराज़ उर्फ 'सईद अहमद शाह' ह्यांचे २५ ऑगस्टला निधन झाले (सकाळ ची तारीख चुकली आहे - पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांमधे २५ ऑगस्टला निधन झाले असे म्हटले आहे). त्यांनी पाकिस्तानातील लष्करशाहीला खुलेआम विरोध केला होता.

माझी रेखाटने- कृष्ण

लेखक सैरंध्री यांनी शनिवार, 23/08/2008 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आधीच्या रेखाटनांचा प्रतिसाद बघून अजून काही रेखाटने टाकण्याचा हुरूप आला आहे. आधीच्या रेखाटनांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद आज गोकुळाष्टमी.

वृत्ती-प्रवृत्ती..

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 08/08/2008 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग पहिला औरंगाबादमध्ये ऑफिसच्या कामासाठी गेलो होतो. तिथल्या टिव्ही सेंटर नावाच्या भागात होतो. हा भाग मुख्य गावापासून तसा बराच दूर आहे. पुन्हा गावात यायचं होतं. डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये काम होतं. जवळच्याच रिक्षा स्टॅंडवर गेलो. तीन-चार जणांच्या कोंडाळ्यातून पन्नाशीच्या वयाचा एक बापुडवाणा चेहरा पुढे आला आणि 'चला साहेब' मी घेऊन जातो म्हणाला. रिक्षात बसलो. रिक्षा आंबेडकर कॉलेजच्या दिशेने निघाली. वाटेत थोडं फार बोलणं झालं, त्यात रिक्षाचालक मुसलमान असल्याचे जाणवले. आंबेडकर कॉलेज म्हणून सुरवातीला या रिक्षावाल्याने चुकून मराठवाडा विद्यापीठात रिक्षा घुसवली. मला आत शिरतानाच जाणवलं काही तरी चुकतंय.

शुभेच्छा!!

लेखक प्राजु यांनी शनिवार, 02/08/2008 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सगळ्या मिपा कुटुंबातील मित्र आणि मैत्रीणींना मैत्रीदिनाच्या हार्दीक शुभेच्छा! आपली मैत्री अशीच वृद्धींगत होत राहो हीच ईशचरणी प्रार्थना!!! गंध अलौकिक याचा क्षणभंगूर जीवन जरी शुभ्र पाकळ्या कोमल नाजूक नाभी शेंदरी छंद समर्पाणाचा आगळा वेड्याने त्या जोपासताना मातीलाही गंध दिला फांदीवरूनी ओघळताना मैत्री व्हावी ऐसी जिवाला जीव देणारी जीवन ऐसे सार्थ व्हावे पारिजात फुला परी... - प्राजु