Skip to main content

संस्कृती

आपापले जग.

लेखक कलंत्री यांनी बुधवार, 01/10/2008 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरच्या कोठेतरी गर्भप्रतिबंधित गोळ्या आणि गरबाच्या पार्श्वभूमीवर हे लेखन करत आहे. काल्पनिक वाटले तर तो माझ्या लेखनाचा दोष समजावा. ज्याचे मन तरल आहे त्याने हे वाचण्याचे शक्यतो टाळावे. आता विषय प्रवेश. २५/३० वर्षापूर्वीचा प्रसंग. स्थळ १५००० वस्तीच्या गावातील मित्रांशी गप्पा. अनेक विषयानंतर खालील चर्चेचा प्रसंग. माझा मित्र, अरे आपल्या अमूक अमूक चे लग्न ठरले होते ते माहित आहे ना? मी : हो, माहित आहे. तो : अरे त्याचा काडीमोड झाला. मी : असे कसे? काहीकाळापूर्वीच त्याचे आमंत्रण पाहिले होते.

सलामत हरी राया!!!

लेखक स्वप्ना हसमनीस यांनी बुधवार, 01/10/2008 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
मलेशियासारख्या मुस्लिम राष्ट्रात "हरी राया" हा सण आपल्याकडील दिवाळीसारखा मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा केला जातो. ह्या सणापूर्वी एक महिना अगोदर "रमाधान"महिना सुरु होतो.महिनाभर येथील लोक सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी काहीही खात पीत नाहीत. त्यामुळे दिवसभर शांतता पण संध्याकाळपासून जागोजागी खाण्यापिण्याची तंबूवजा हॉटेल्स माणसांनी खचाखच भरुन वाहत असतात. रमाधानच्या काळात सर्वत्र 'प्रमोसी'(सेल) चालू असतात.लोक भेटवस्तू खरेदी करतात.सकाळ संध्याकाळ प्रार्थना केल्या जातात. कामानिमित्त शहरामध्ये वास्तव्य असलेले लोक,हरी रायाच्या

मातृमांगल्याचा महामहोत्सव.

लेखक कलंत्री यांनी मंगळवार, 30/09/2008 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
मातृमांगल्याचा महामहोत्सव आणि महाराष्ट्र्शारदेच्या चरणी एक छोटेसे कमळ.
आजपासून महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशभर मातृमांगल्याचा महामहोत्सव सुरु होत आहे. त्याचा सुंदर आढावा भाग्यश्री ताईंनी "आठवणीतलं नवरात्र" या लेखात घेतला आहेच. कृषी संस्कृती, मातृशक्ती आणि विद्याकलांची अधिष्ठात्री महासरस्वती यांच्या पूजनाचा त्रिवेणी संगम म्हणजे "शारदीय महोत्सव' आहे. आई जगदंबा भवानी ही अनेक प्रेरणांची स्त्रोत आहे. या अनेकविध प्रेरणेत शौर्य,शांती, भक्ति, बुद्धी, लेखन, कला इत्यादीचा समावेश होत असतो.

सौभाग्याचे रंग-सौरंगी

लेखक रामदास यांनी सोमवार, 29/09/2008 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
दोन आठवड्यापूर्वी सकाळी हिंदुस्थान टाईम्सची कॅफे पुरवणी चाळत असताना जहांगीर आर्ट गॅलरीतल्या एका चित्र प्रदर्शनाचा फोटो पाहीला. फोटो पाहिल्यावर मी मंत्रमुग्ध झालो.पाच दहा मिनीटं माझ्या डोळ्यासमोर रंगपट उलगडत गेला. तपशील वाचल्यावर कळलं की ही चित्रं प्रदर्शनाचं नाव सौरंगी आहे आणि कलाकाराचं नाव आहे शंकर देवरुखे. त्या चित्राची मोहीनी एव्हढी जबरदस्त होती की त्या दिवशीचे बाकी सर्व कार्यक्रम रद्द करून मी जहांगीर आर्ट गॅलरीकडे पळत सुटलो. मनात अनेक शंका होत्या. आर्टीस्ट भेटेल का? आपण जर दाद दिली तर ऍकनॉलेज करेल का? जहांगीरच्या प्रदर्शनाची एक खासीयत असते. आर्टीस्ट फार व्यस्त असतो.

आठवणीतलं नवरात्र

लेखक भाग्यश्री कुलकर्णी यांनी सोमवार, 29/09/2008 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
नवरात्रौत्सवात सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येक गावचा नवरात्रोत्सव हा निरनिराळा असतो. मिरजेत असताना सोवळ्यातला स्वयंपाक हा विषय सोडला तर इतर कर्मकांड फारशी नव्हती. आजी गं. भा. होती. तर आजीचे मोठे दीर दशग्रंथी ब्राह्मण. त्यांना तर आजीच्या हातचे पाणी देखील चालायचे नाही. पण म्हणून माझ्या मैत्रिणी इतर जातीच्या आहेत (म्हणजे ब्राम्हणेतर) म्हणून त्यांना घरी मज्जाव नव्हता. मी ही त्यांच्याकडे मुक्त संचार करत असे. गावात एक अंबाबाईचं मोठं मंदिर होतं. (आजही आहे) वर्षभरातून कधी तरी त्या मंदिरात जाणारे आम्ही मात्र नवरात्रात दररोज जायचो. मंदिराच्या बाजूला जत्रा भरायची.

मम सुखाची ठेव...

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 28/09/2008 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
किंचित कवी असलेल्या तात्या अभ्यंकरांच्या या वेड्यावाकड्या ओळी कुसुमाग्रजांच्या चरणी अर्पण...!
मम सुखाची ठेव....
ती आली, तिनं पाहिलं, तिनं जिंकलं! ती स्वरलता आहे, ती गानसम्राज्ञी आहे, ती मेलडीक्वीन आहे.....! षड्ज पंचम भावातला सुरेल जुळलेला तानपुरा, अन् त्यातला नैसर्गिक शुद्ध गंधार.. तो तर तिच्या गळ्यातच आहे...! नव्हे, तर त्या गंधाराचं तंबोर्‍यातलं स्वयंभूत्व हे तिच्या गळ्यानेच सिद्ध केलेलं आहे...! कोमल अन् शुद्ध रिखभ, हे एरवी एकमेकांचे वैरी, स्वभावाने अगदी एकदुसर्‍याच्या विरुद्ध, परंतु दोघेही तिचेच

सोलापुर- छायाचित्रे

लेखक झकासराव यांनी गुरुवार, 25/09/2008 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
मी मध्यंतरी सोलापुरला जाउन आलो. तिथे फिरायला जाण्यासारख एकच ठिकाण आहे. ते म्हणजे सिद्धेश्वर मंदीर. ह्या मंदीराची खासियत म्हणजे हे एका तलावाच्या मध्येच आहे. :) चारी बाजुनी पाणी आणि मध्येच मंदीर. एकदम मस्त वाटत. ही मी काढलेली तिथली काही प्रकाशचित्रे. हा त्या तलावाचा एक व्ह्यु. ह्या तलावात आधी मासे देखील दिसायचे बरेच. आता दिसत नाहीत. बहुद्धा जाळ टाकुन पकडतात. :( हा त्या मंदीरात जायचा रस्ता.

मी बोलतेय बहिणाई...

लेखक पारोळेकर यांनी बुधवार, 24/09/2008 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
असं कसं हे जग बापा अशी कशी ह्‍ये दुनिया कुढी गेली आडल्या लोकाय मधली दयामया..! नही घराले घरपण नही घरात सासू दोन्ही जाता कामाले घर सांभायती कुत्र वासू..! आमुचं कसं ह्‍यतं एकोप्‍याचं खटलं घरात दिसलं म्हातारं त् ते त्याह्‍यच्या डोयात खपलं..! नही तुयस- नही दिवा नको उठणं - नको सारयोणं नही रांगोयी -नही पूजा नही घराले तेह्‍यच्या आंगण..! नको नको देवा मले पाठवू खालच्या देशात माणसं त् माणसं आता बाया बी नशात..! मह्‍या वक्ती लय सुखी ह्‍यता माह्‍या खान्देश अन् आता त् काय रे देवा लोकायनं केला त्याचा घानदेश..! ( स्व.बहिणाबाई चौधरी यांना नतमस्तक होऊन )
Taxonomy upgrade extras

सारातोव्ह,रशियातील बाप्पा मोरया!!!!!!!

लेखक चिन्या१९८५ यांनी बुधवार, 17/09/2008 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि | तन्नो दन्ति: प्रचोदयात् | आमच्या होस्टेलमध्ये नेहमीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव साजरा झाला.

ज्ञानदेवे रचिला पाया, ............ तुका झालासे कळस!

लेखक वारकरि रशियात यांनी मंगळवार, 16/09/2008 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस! आपल्यापैकी बर्याच जणाना आपल्या होम पेज वरचे हे दोन चरण माहित असणारच ! आणि ते एखाद्या अभन्गातून उद्ध्रुत केले आहेत हेही माहित असणारच ! फक्त कदाचित हे अवगत नसेल की हे दोन चरण त्या अभन्गात सलग (ओळीने) नसून येथे मध्यमपदलोपी समास (!) झालेला आहे.