Skip to main content

संस्कृती

पं. भीमसेन जोशी यांना भारत रत्न, मिपावर अजून एकदा दिवाळी साजरी होणार... श्री. तात्या अभ्यंकर

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी मंगळवार, 04/11/2008 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव सुरू झाले बाबूजी, पुलं, कुसुमाग्रज आणि भारतिय अभिजात संगीताच्या क्षेत्रातले महापुरूष आदरणिय पं. भीमसेन जोशी यांच्या आशिर्वादाने. आत्ताच टीव्हीवर आलेल्या बातमीनुसार, पं. भीमसेन जोशी यांना भारत रत्न हा भारत सरकार तर्फे देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार जाहिर झाला आहे. मिसळपावचे मालक श्री. तात्या अभ्यंकर यांच्याशी आत्ताच झालेल्या बोलण्याप्रमाणे, मिपावर परत एकदा दिवाळी साजरी करण्यात येईल. व्यक्तिशः माझ्या तर्फे पंडितजींना शतशः नमन. आज खरंच 'भारतरत्न' पदवीला किंमत आली आहे असे वाटते.

डियर हंटींग अमेरिका भाग -२ ( आणि शेवटचा!!)

लेखक कपिल काळे यांनी मंगळवार, 04/11/2008 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
परंतु , त्याच्या गंधाने इतर इच्छुक नरसुद्धा तिथे येउन आधीच्या नराला आव्हान देतात. आणी मग सुरु होते ती त्यांची, मादीला प्राप्त करण्यासाठीची लढत.>> पहिला भाग इथे वाचा शिंगावर किती पॉइंट्स(गाठी) आहेत त्यावर नराचे वय / प्रौढत्व ठरत असते. पूर्ण वाढ झालेल्य नराच्या शिंगांवर १०- १२ पॉइंट्स असतात. आपली डौलदार शिंगे रोखून, दोन नर एकमेकांवर चाल करुन जातात. मध्येच ते आपला राग (आणी रग!) जिरवण्यासाठी,एखाद्या झाडावर शिंगे किंवा मानेचा, तोंडाचा भाग घासतात. लढतीच्या वेळी पालापाचोळा, धूळ उडत असते.

डियर हंटींग अमेरिका भाग -१

लेखक कपिल काळे यांनी शनिवार, 01/11/2008 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणात, माझ्या काकांबरोबर शिकारीसाठी भरपूर हिंडलो आहे. जंगलातही खूप भटकंती केली आहे.दसरयाच्या आसपास भातशेती कापणीला आली की, काकांना हमखास बोलावणं येई. भातशेतीची नासाडी करणारया रानडुकरांचा बंदोबस्त करायला. काकांबरोबर शिकारीला ,त्यांच्या गावातली माणसं उत्सुक असायची, कारण काका कधीच काही खात नसत. फक्त शौक म्हणून शिकार करायचे. त्यामुळे शिकार झाल्यावर आपल्याला मेजवानी मिळणार ह्या विचाराने, कोणीही तयार व्हायचं. मी त्यांच्याकडे असलो की मी पण जात असे भटकायला..... पण हे सगळं आत्ता आठवायचं कारण म्हणजे, इथे अमेरिकेत सध्या डिअर हंटींग चा मोसम चालू आहे. दरवर्षी ,ऑक्टोबर ते जानेवारी ह्या महिन्यांत असतो.

रांगोळी प्रदर्शन - वर्तमानाचे प्रतिबिंब

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 29/10/2008 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
रांगोळी! मराठी माणसाच्या दिवाळीमध्ये नवे कपडे, फराळ, अभ्यंगस्नान, उटणे व दिवाळीअंक यांच्या इतकेच महत्वाचे स्थान रांगोळी व रांगोळी प्रदर्शनाला आहे. सध्या ठाणे येथे न्यु गर्ल्स स्कूल येथे रांगोळी प्रदर्शन सुरू आहे. गेली अनेक वर्षे मी हे 'बलवंत मित्रमंडळ' आयोजित प्रदर्शन महापालिका शाळा क्र. १९ येथे पाहत आलो आहे. यंदा शाळेचे पुनर्निर्माण कार्य सुरू असल्यामुळे प्रदर्शनाचे स्थळ बदलले आहे इतकेच, मात्र त्यातल्या कलाकारांचा सामाजिक दृष्टिकोन मात्र तसाच आहे.

कार्तिक शुद्ध प्रतिपदा

लेखक सनातन यांनी बुधवार, 29/10/2008 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा. हा दिवस बलीप्रतिपदा म्हणून ओळखला जातो. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. हा दिवस `विक्रम संवत' कालगणनेचा वर्षारंभदिन म्हणून साजरा करतात. आज आपण बलीप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा या सणाचा इतिहास व हा सण साजरा करण्याची पद्धत यांविषयी माहिती पाहूया. बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा)इतिहास बलीराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथी जे मागेल ते दान तो त्याला देत असे. `दान देणे' हा गुण आहे; पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच असतो. कोणाला काय, केव्हा व कोठे द्यावे, याचा निश्चित विचार आहे व तो शास्त्रात आणि गीतेत सांगितलेला आहे. सत्पात्री दान द्यावे.

याहू!

लेखक विकास यांनी मंगळवार, 28/10/2008 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच याहूच्या संकेत स्थळावर गेलो होतो आणि एक सुखद धक्का बसला! त्यांच्या गृहपर्णावर (होमपेजवर भारतासाठीचे जे .in आहे त्यावर आहेच पण हे जगाचे मुख्य पान...) चक्क याहू या अक्षराच्या अलीकडे दोन लुकलुकत्या पणत्या आणि दुसरीकडे "हॅपी दिवाली" असा संदेश. त्याच्यावर टिचकी मारल्यावर दिवाळीवर विशेष माहीती मिळाली. वास्तवीक अशी रेखाटने मी गुगलच्या प्रमुखपानावर कायम पाहीली आहेत पण दिवाळीसाठी मात्र दिसले नाही...

अवघा रंग एक झाला....

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 28/10/2008 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
हे लेखन रेषेवरील उभा-आडव्या-सरळ-तिरप्या अश्या कुठल्याही अक्षरात बसत नाही असे नम्रपणे नोंदवू इच्छितो..! :) 'अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग..' रघुनंदन पणशीकरांनी भैरवीतला हा अभंग सुरू केला आणि समस्त श्रोतृसमुदाय दिवाळीच्या मुहूर्तावर त्या भैरवीच्या अभ्यंगस्नानात नाहून निघाला, तृप्त झाला..! रघुनंदन पणशीकर.. 'तो मी नव्हेच..' मधल्या निप्पाणीतल्या तंबाखूच्या व्यापार्‍याचा - लखोबा लोखंडेंचा, अर्थात नटवर्य प्रभाकरपंत पणशीकरांचा सुपुत्र. गानसरस्वती किशोरी अमोणकरांचा शागीर्द!

पयला पयला प्यार

लेखक ब्रिटिश यांनी मंगळवार, 28/10/2008 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
बा लय खुश व्हता. खारीतली २५ गुंठ रोडटच जमीन ईकलीवती. तीस लाख आलते. मंगलवारी माजा १७ वा वाडदीवस. 'मिथन्या हिकड ये. हे झे तुज्या वाडदीवसाचे ' बा न बलीवल आन पाच हजार काडून दिल्लं मी सुसाटलो ९३२२ १७ ३३ १४ सूर्‍याला मोबाइल लावला. सूरेश म्हात्रे. माजा लंगोटीयार . ईतका लंगोटी क खारीन ऊतराचा आसल न माज्याकड लंगोटी नसल त त्याची लंगोटी घालाचू. 'सूर्‍या , संद्याकाली भेट, आरजंट हाय.' सूर्‍या आला 'क रं बाला क बोल्तोस? 'आर बान मोप पैशे दिल्लन वाडदीवसाला. आपन बलीशेट कड बसू बीयर पीवाला.' 'तूजा वाडदीवस हाय ? वाडदीवस हाय ? मंग बलीशेटकड कनाला बसाचा ? आपन पनवेलला जावाचा.

लक्ष्मीपूजन

लेखक सनातन यांनी मंगळवार, 28/10/2008 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
आश्‍विन अमावास्या या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. सामान्यत: अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांना नाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य ठरते. या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्‍त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे. आज आपण लक्ष्मीपूजनासंदर्भात माहिती पाहूया. १.