Skip to main content

संस्कृती

६४ कलेत पारंगत

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 08/01/2009 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
६४ कलेत पारंगत हिंदु संस्कृतित काम शास्त्रा ला अन्यनसाधारण मह्त्व होते, आहे. काम शास्त्रा च्या नियमाप्रमाणे,कुमारीकेस,खालील ६४ कलेत पारंगत असण्याची आवश्यकता सांगीतली आहे, ह्या कला तिने स्वतः गुप्त पणें अभ्यास करुन शीकायच्या व आत्मसात करावयच्या शिकवण्यासाठी खालिल पैकि शिक्षिकेचि नियुक्ती केली जायची.

बाप्पाला स्वेटर

लेखक दिपक यांनी बुधवार, 07/01/2009 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात लाडक्या बाप्पाला स्वेटर घालण्यात आले. कालच ही बातमी टीव्हीवर पाहिली होती. स्वेटर आणि कानटोपी घातलेला गंपती बाप्पा फारच क्युट दिसतोय. :)

गाभ्रीचा पाऊस हा मराठी चित्रपट साता समुद्रा पलीकडे चालला

लेखक शनआत्तार यांनी मंगळवार, 06/01/2009 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ४ जानेवारी २००९ च्या टाईम्स ऒफ इंडीया या पेपर च्या पुणे पेपर मध्ये प्रकाशित झालेली बातमी आपणा सर्वांच्या महीती साठी देत आहे. हा मराठी चा अभिमान आहे Marathi film makes it to Rotterdam fest 5 Jan 2009, 0621 hrs IST, Rahul Chandawarkar, TNN PUNE: Satish Manwar is smiling from ear to ear. And with good reason. The young writer-director's very first Marathi feature film Gabhricha Paus (The damned rain) has been selected for the prestigious Rotterdam Film Festival and also the Pune International Film Festival (Piff).

नाताळी बाजार

लेखक शाल्मली यांनी मंगळवार, 06/01/2009 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
जर्मनीत आल्यापासूनच नाताळचा सण कसा साजरा होतो ते पाहण्याची उत्सुकता होती. नाताळ हा जर्मनीतील एक मुख्य सण. आपल्याकडे जशी दिवाळी तसाच इथे नाताळचा सण अतिशय आनंदात, उत्साहात आणि आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करतात असे ऐकून होते. नाताळच्या आधीच्या चार रविवारी ऍडवेंट साजरे केले जात असल्याने साधारण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच सगळीकडे सणाचे वातावरण होऊ लागले होते. बाहेर वातावरणात गुलाबी थंडी तर घराघरांत सर्वत्र झगमाट दिसू लागला. इथे प्रत्येक जण आपले घर सुशोभित करतो. आता घराघरांत दिव्यांच्या माळा आणि आकाशदिवे दिसू लागले. अनेकांनी बागेतली झाडे सुद्धा दिव्यांच्या माळा सोडून उजळवून टाकली.

मराठी भाषा

लेखक smartsagar यांनी सोमवार, 05/01/2009 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
विदेशी कपडे घातले तरी हृदय अजून मराठी आहे तोडून तुटत नाहीत या मजबूत रेशीम गाठी आहेत. पिझा, बर्गर खाल्ल्यावरही पोट पुरणपोळीच मागतं ईंग्रजी पुस्तकं वाचली तरी मन मराठी चारोळीच मागतं. मात्रुभूमि सोडली की आईपासून दूर गेल्यासारखं वाटतं भाषा सोडली की अस्तित्व हरवल्यासारखं वाटतं. वडाची झाडं मोठी होऊनही परत मात्रुभूमिकडे झुकतात कितीही दूर गेलं तरी पाय परत मात्रुभूमिकडेच वळतात. काहीही बदललं तरी हृदय अजून मराठी आह॑. सागर देसाई ९४०३३६९७३४

कमाल आहे!

लेखक शशिधर केळकर यांनी शनिवार, 03/01/2009 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
(मित्रहो, ही खरेतर स्मृतीतील एक कथा. केव्हा कुठे वाचली, ते लक्षातही नाही. पण कथा मात्र विसरली नाही. अशा कथा खरेतर तुमच्या आमच्या सर्वांच्याच वाचनात येतात. कोणाला हिचा खरा आणि मूळ लेखक आणि मूळ कथा माहीत असेल, तर जरूर सांगावे! कारण हा कथाविषय माझा नाही. जमले आणि लोकाना आवडले, तर अशा कितीतरी स्मृतीआडच्या कथा मिपावर लिहाव्यात असा मानस आहे) तात्याबा भर दुपारी शेतावर काम करत होते. नेहमीचीच संवय त्यांची. दुपारची शिदोरी आटपून विश्रांती वगैरे भानगडीत न पडता कामाला लागावे हाच नेम. विठाबाई कातावून म्हणे, "अहो वयाकडे लक्ष द्यावं जरा.

पंचमचे पहिले गीत

लेखक प्रदीप यांनी बुधवार, 31/12/2008 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
तसे म्हटले तर चित्रपटांतील प्रत्येक गीत एक स्वतंत्र प्रकल्पच असतो. कधी गीत आधी लिहीले जाते व त्याबरहुकूम चाल बसवली जाते, तर कधी चालीची फ्रेम प्रथम तयार असते, व गीतकार त्यावर गीत लिहीतो. काही असले तरी त्या दोघांचा सुंदर मिलाप झाला व ते प्रथितयश गायकांनी/ गायिकांनी निपुण साजिंद्यांच्या साथीने गायले की एक वेगळीच बहार निर्माण होते. ह्यापूढे त्याचे चित्रीकरणही त्या गीताच्या साजेश्या तर्‍हेने झाले तर ते गीत प्रेक्षणीयही ठरते, पण अनेकदा हे असे होतेच असे नाही.

कॉम्पीटीशन

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 31/12/2008 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो, हे पत्र जरा देउन याल का"? मला रस्त्यात मिळाले आहे. घरात शिरताना पहिले वाक्य. मी पत्ता बघितला. नीटसा कळला नाही. माझा गोंधळ बघुन लगेच कुटूंब उद्गारले., "गेट्मधुन बाहेर पडल्यावर उजव्या हाताला दुस-या गल्लीत चवथी बिल्डींग, १७ माळ्याचा टॉवर आहे.". बहुतेक प्रिमियम ची नोटीस होती. "जाताच आहात तर इंटीरियर पण बघुन या". कीचन जरा नीट बघा. आता पोस्ट्मनला किचन दाखवायची नविन सिस्टीम सुरु झाल्याची मला कल्पना नव्हती. उच्च्च मध्यमवर्गियांचा टॉवर होता तो. दरवाजा उघडला. समोर मालकिण बाई उभ्या. मी पत्र हातात दिले. पुढे काय बोलणार इतक्यात त्याच म्हणाल्या.

ती शाळा,तो बाक व ते शिक्षक

लेखक विनायक पाचलग यांनी गुरुवार, 25/12/2008 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो, माझा १ सप्टेबरच्या सकाळ मध्ये आलेला माझ्या शाळेवरचा लेख येथे पुनर्प्रकाशित करत आहे.
आणि ज्या माझ्या शाळेबद्दल मी हे सर्व लिहिले ती ही माझी शाळा प्रायव्हेट हायस्कूल ...माझी शाळा ..माझा अभिम