Skip to main content

संस्कृती

पूर्वेच्या देवा तुझे 'सूर्य'देव नाव

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 26/01/2009 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतिचे महात्म्य हेच की क्रांतिने रोमांचित झालेला एखादा सामान्य मनुष्य आपल्या ध्येयाने वेडा होऊन असा एखादा बेहोष क्षण जगतो की त्याचे सामान्यत्व त्याच्या नकळत गळुन पडते आणि त्याच्या तेजाने आसमंत दिपुन जातो. आपण कोण, आपले सामर्थ्य किती, आपली झेप कुठवर, आपला शत्रु किती प्रबळ, आपले ध्येय किती असाध्य याच यत्किंचितही विचार न करता ’मला माझ्या ध्येयाखातर काहीही दिव्य करावे लागले तरी मी ते साध्य करणारच’ हा ध्यास जे घेतात तेच लौकिकार्थाने अमर होतात.

माझी निवड चुकली तर नाही ना?

लेखक मोगॅम्बो यांनी शनिवार, 24/01/2009 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
ई मेल वरून आलेल्या एका लेखाचा हा अनुवाद. एका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, "मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही ना हे मला कसे काय कळेल?". वक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ हे बरेच स्थूल दिसत होते. वक्ते महाशयांनी प्रश्न केला, "तुमच्या शेजारी बसलेले गृहस्थ हेच तुमचे जीवनसाथी आहेत काय?" अत्यंत गंभीरपणे तिने उत्तर दिले," तुम्ही कसे काय ओळखले?" वक्ते महाशय उत्तरले,"तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मला आधी देऊ द्या. कारण त्या प्रश्नामुळे तुम्ही खरोखर खूप अस्वस्थ आहात असे दिसतेय.

इकडची तिकडची खादाडी, अर्थात, अन्न हे पूर्णब्रह्म..!

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 23/01/2009 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, आंतरजालावर उत्तमोत्तम पाककृतींचे आज अनेक ब्लॉग्ज उपलब्ध आहेत. तिथे मुशाफिरी करतांना विविध पाककृतींनी नटलेला, खाद्य संस्कृतीची सुंदर उधळण करणारा असा एखादा ब्लॉग सहजच दृष्टीस पडतो आणि डोळ्याचं पारणं फिटतं, जीव तृप्त होतो! हे सदर केवळ अश्या ब्लॉगांसाठीच!

बायबल-कारी.

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 22/01/2009 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
प्रारंभी देवाने स्थलावकाश व समरभूमी निर्माण केली. तेव्हा (समर)भूमी आय्डीविरहीत व शून्य होती, आंतरजालीय पृष्ठावर गांभीर्याचा अंधःकार होता आणि देवाचा आत्मा (आंतर)जालावर तळमळत राहिला होता. तेव्हा देव बोलला, हास्यचैतन्याचा प्रकाश होवो आणि प्रकाश झाला ! देवाने हास्य-चैतन्य-प्रकाश पाहिला की तो चांगला आहे आणि देवाने हास्यप्रकाश आणि प्रशासकी गांभीर्यांधार वेगळे केले. देवाने हास्यप्रकाशाला दिवस आणि गांभीर्यांधाराला रात्र म्हण्टले ; हा पहिला दिवस. मग देव म्हणाला, आंतरजालाच्या मध्यभागी अंतराळ होवो व ते आंतरजालास (म्हणजे त्यातील लोकांस एकमेकांमधे) विभागणारे होवो.

मनाच्या कुपीतले -क्षण

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 21/01/2009 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपीतले या सदरातला हा चवथा लेख .........
क्षण
कोणी एक नवा जीव जेंव्हा भूतलावर अवतरतो. तो क्षण त्याचा......... बऱ्याच प्रयत्नानंतर जेंव्हा एक कोवळा जीव टाहो फोडतो. तो क्षण त्याचा. .................. 8-9 महिन्यानंतर चिमुकल्याचे चालणे, ते पहिले पाऊल पडण्याचा क्षण त्याचा. ............. 3 ऱ्या वर्षी जेंव्हा ते बाळ शाळेच्या पहिल्या पायरीवर पाऊल टाकतं. तो क्षण त्याचा. ............. तोच बाळ जेंव्हा । अशी ग ची पहिली रेप ओढतो..... तो क्षण त्याचा............. जेंव्हा एखादा मुलगा पहिले बक्षीस घ्यायला दुडूदुडू धावत जातो.

संक्रांत कशासाठी

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 14/01/2009 07:36 या दिवशी प्रकाशित केले.
संक्रांत म्हटलं की तीळ-गुळ, तिळाचे लाडू, तीळ लावलेल्या भाकरी, वाला-वांगी-पेरु-बोर वगैरे भाज्यांच्या रसरशीत व खमंग गावराण जेवणाचा अस्वाद, सुवासिनिंचे हळद-कुंकवाला एकमेकींकडे जाणे येणे, आवा लुटणे, नवीन सुगड्यात बोरे, चिंचा, उसाची कांडे भरुन त्यांची पुजा करणे, चिल्या-पिल्यांचे बोर न्हाण, पतंगांच्या भरार्‍या... ही सगळी लगबग डोळ्यासमोर येते. मला मात्र एक गोष्टीची गंमत वाटते. आजकालच्या संक्रांतीची भेटकार्डे व शुभेच्छापंत्रांत तिळ-गुळाचा भरपूर उधो-उधो होतो. पण त्यासारख्याच किंबहुना त्याही पेक्षा महत्वाच्या सांस्कृतीक गोष्टींकडे मात्र आपण पाहिजे तेवढे लक्ष देत नाही.

संक्रांत!

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 13/01/2009 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
"हे ऽऽ काऽऽऽप्पेऽऽऽ" असं बेंबीच्या देठापासनं ओरडत, उन्हानं तावलेल्या लालबुंद चेहेर्‍यानं गच्चीवरुन धावत जायचं आणि अनवाणी पायांना चटके बसत असले तरी गच्चीवरल्या कुंभीवर चढून कापला गेलेला पतंग कोणत्या पोरांचा होता हे टाचा उंच करुन शोधायचं हे दृश्य आता माझ्यासाठी तरी इतिहासजमा झालं आहे. जानेवारी महिना आला तरी थंडी सुरुच असायची पण सकाळी-सकाळी उन्हात एकप्रकारचा प्रेमळ उबदारपणा जाणवायला सुरुवात झालेली असायची. संक्रांतीआधी तीनचार दिवस आम्ही मित्रमंडळीचा एककलमी कार्यक्रम पतंग बनवणे आणी मांजा सुतवणे. त्याची तयारी सुद्धा साग्रसंगीत असायची. आधी बाजारात जाऊन मजबूत धागा असलेला दोरा घेऊन येणे.

यशदा

लेखक स्वाती फडणीस यांनी रविवार, 11/01/2009 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
यशदा ============================ . . ती म्हणाली.. मी समर्पित आहे.. माझ्या इच्छा.. माझे विचार.. माझ्या स्वप्नांसकट. इतकी की आता माझी मला ही मी सापडत नाही. . ती म्हणाली.. मी सुखात आहे.. माझ्या इच्छा.. माझे विचार.. माझ्या स्वप्नांशिवाय. इतकी की आता दुःख माझ्या आसपास फिरकत नाही. . ती म्हणाली.. मी यशदा आहे.. माझ्या इच्छा.. माझे विचार.. आणि माझ्या स्वप्नांची. इतकी की आता अपयश माझ्या नजरेस पडतच नाही. . . ============================ स्वाती फडणीस ............................ १०-०१-२००९

जिवासवे जन्मे मृत्यू

लेखक शशिधर केळकर यांनी शनिवार, 10/01/2009 03:47 या दिवशी प्रकाशित केले.
स्वर्गामधे देवांची वार्षिक सभा व स्नेहसम्मेलन भरले होते. कोट्यवधी देवांनी यंदाच्या सम्मेलनाला उपस्थिती लावली होती. संध्याकाळी नित्याप्रमाणे सौंदर्यावलोकन करायला विविध मार्गिकांतून आज सर्वजण बाहेर पडले होते. गर्दी टाळून यमदेव एकटेच नंदनवनाकडे वळले. अतिशय सुंदर हवा पडली होती. नंदनवनात अनेक लतापल्लवी, लक्षावधी वल्लरी, रंगीबेरंगी आणि सुगंधी फुले बहरली होती, मोहक सडा पडला होता. सुगंधी वायू वाहात होता. पक्षी सुरेल सुस्वरामधे कूजन करत आनंदात विहरत होते. क्षणभर यमदेवांना परिपूर्ण शांतीचा आस्वाद घेता आला. समाधानाने त्यांचा ऊर भरून आला. इतक्यात गरुडाचे तिथे आगमन झाले.