Skip to main content

संस्कृती

संकल्प मत्स्यपुराणाचा

लेखक सुनील यांनी मंगळवार, 17/02/2009 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांपासून मिपावर बर्‍याच मत्स्याहारी पाकृ येत आहेत. मासे आवडणार्‍या परंतु माशांबद्दल फारशी माहिती नसलेल्या काही मिपाकरांनी विविध प्रकारच्या "खाणेबल" माशांबद्दल एखादा लेख लिहिण्याची सुचना केली होती.

साताजन्माचा वनवास..!

लेखक पारोळेकर यांनी मंगळवार, 17/02/2009 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या आयुष्यात मुंबईच्या उपनगरात भरधाव वेगाने धावणार्‍या लोकल गाड्याप्रमाणे एकामागून एक असे अनेक अविस्मरणीय क्षण येत असतात... परंतु, असे क्षण हाताच्या ओंजळीत थांबले तर मोहरा...अन् निसटले तर माती...! तिच्यासोबत घालवलेले काही क्षण त्याने मनाच्या पानावर टिपून ठेवले आहेत. 'तिच्या' अशा काही आठवणी त्याने बकुळाच्या फुलाप्रमाणे हृदयाच्या कोपर्‍यात लपवून ठेवल्या आहेत...'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्तानं 'त्याची' व 'तिची' प्रेमाची गोष्ट.... 'तो' एका जाहिरात कंपनीत नोकरीला...

सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे?

लेखक ॐकार यांनी सोमवार, 16/02/2009 05:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यावाचून संध्याकाळ माझी लांबली होती तुझ्या पदरात सोनेरी उन्हे मी बांधली होती सुखाची काळजी काही करावी लागली नाही मुळी दु़:खेच माझी दीनवाणी, गांजली होती भले झाली असावी वेळ झोपेची, कसा झोपू? तुझ्या डोळ्यांतली स्वप्ने मगाशी भांडली होती सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे? अशी ही कोणती इछा? कुठे मी डांबली होती? सुदैवाने तिला प्रेमात हे कळलेच नाही की बरा होतो जरासा मी, तशी ती चांगली होती खरे तर चंद्र केव्हाचा मला विसरून गेलेला कधीची चांदणी दारात माझ्या टांगली होती तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती?

च्याव ज्झ

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 15/02/2009 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
चीनला जायचे तर सिंगापुरला लेकराला भेटुनच जावे असा विचार करुन आस्थापनेच्या पर्यटन संस्थेला सिंगापुर मार्गे प्रवासाची व्यवस्था करायला सांगितली तर त्यांनी नकारघंटा वाजवली. म्हणे सिंगापुर एअरलाईन्सने पर्यटन संस्थांना अडत देणे बंद केल्याने सर्व पर्यटन व्यावसायिक संस्थांचा सिंगापुर एअरलाईन्सवर सध्या बहिष्कार आहे. त्यांनी शिताफीने हॉंग कॉंग, कुआला लुंपुर, बॅंकॉक अशा तीन रुपरेषा आखुन दिल्या. पण जाणार तर पोराला भेटुनच जाऊ यावर मी ठाम होतो. मग मी सिंगापुर एअरलाईन्सच्या संस्थळावर गेलो आणि चार दोन वेळा मागे पुढे होता करता अखेर हव्या त्या तारखांची तिकिटे जमवली.

ठकीचा संसार

लेखक प्राची यांनी शनिवार, 14/02/2009 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना माझा नमस्कार. मिपावरील हा माझा पहिलाच प्रयत्न आहे,त्यामुळे काही चुकले तर,सांभाळून घ्या,चुकले तर सल्ला द्या ही विनंती. मागच्या आठवड्यात 'पवार पब्लिक स्कूल्,भांडुप' येथे श्री. विलास ना.

कार्तिकी जिंकली!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 08/02/2009 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
झी मराठी च्या सारेगमप स्पर्धेत कार्तिकी गायकवाड अंतिम विजेती ठरली. कार्तिकीला मन:पूर्वक शुभेच्छा!! :)

तुझे सब है पता... चा भावानुवाद

लेखक आचरट कार्टा यांनी गुरुवार, 05/02/2009 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
मागे ऑर्कूट वरच्या "मराठी कविता" या समुहात माझ्यासकट अनेकांचे भावानुवादाचे प्रयत्न चालू होते. त्यात हे लिहिलं होतं. आज मिपा च्या मुखपृष्ठावर या गाण्याबद्दल वाचलं, आणि म्हटलं तुम्हालाही दाखवावं...
Taxonomy upgrade extras

मराठीचा अभिमान मराठीची शान ! मराठी महाजालावर... - मी मराठी

लेखक दशानन यांनी गुरुवार, 05/02/2009 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषेच्या सर्वांगीन विकासासाठी व वाचकांना खाद्य पुरवण्यासाठी आज पासून आम्ही आमचे नवीन संकेतस्थळ मी मराठी चालू करत आहोत. तुमचे मी मराठी नेटवर्क मराठी लोकांच्यासाठी मराठीतून भावना / कला व्यक्त करण्यासाठी हे स्थळ निर्माण करण्यात आलं आहे. स्थळावर मराठी मध्ये लेखन करा, आपले विचार, मत तुम्ही आम्हाला admin@mimarathi.net पाठवू शकता. आई भवानीच्या साक्षीने आहे आम्ही संकेतस्थळ चालू करत आहोत. ५ फेब्रुवारी २००९ पासून हे स्थळ

शेराला सव्वाशेर

लेखक ब्रिटिश यांनी गुरुवार, 05/02/2009 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
आर शित्याला पोलीसांनी धरलाय. जाम मारतान बग. बारक्या बातमी झेउन आला. शित्या. सिताराम म्हात्रे. यकदम झोलर मानुस. आखोंशे सुरमा नीकालनेवाला. तो न्हेमी म्हानायचा ' ऊधारी ने वलखी वाडतात'. गणा पाटलाची दोन येकर जमीन त्यान सात जनांना ईकलीवती. दुनीयेची ऊधारी आंगावर. यकदा माजे घरी दोगा जनांना झेउन आला. माज घर तस रोडटच हाय. वटीवर बसवल न घरात आला . आयला म्हनला 'लांबन आल्यात पावनं. गुळपानी दे. पाच मिन्ट बसतील न जातील.' गेला मागल्या दारानं. धा मीन्ट जाली पंदरा मीन्ट, पावनं ऊटाया मागनात. आय म्हनली 'बाबांनो क काम हाय क तुमच ?' तर म्हनल क 'शित्याला पाटवा.

मनाच्या कुपितले-निरोप

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 04/02/2009 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मनाच्या कुपितले या सदरातला हा सहावा लेख मनातले थोडेसे-माझ्या गेल्या लेखावर त्यातील लिखाण शैलीवर खुप साधक बाधक चर्चा झाली .या चर्चीतुन मी स्वतःला सुधारीन असे नकी सांगतो.यातुन एक महत्वाची गोष्ट समजते ती म्हणजे माझ्या लेखनाचे दोन प्रकार पडतात एक स्वतःसाठी केलेले आणि दुसरे जे लोकाना वाचायला आवडेल असे ! यापुढे मी लोकाना आवडेल असे लिखाण द्यायचा नकी प्रयत्न करीन पण आतापुरत्ये मला माफ करा हे लिखाण मी" स्वान्त सुखाय |" लिहिले आहे .