कावड , टरबुज अन शक्ती !
आम्ही या नव्या घरी रहायला येउन २-३ आठवडेच झाले होते.
काल संध्याकाळि घरि येताना गल्लीच्या तोंडाशी थोडि गजबज जाणवलि. तिथे एक मारुतिचे मंदिर आहे.
एरवी एक पुजारि अन एक दोन वयस्क सोडले तर कुणी फारसे दिसले नव्हते.
हिला विचारले, "आज कोणवार गं, बुधवार ना ?"
"ह्म्म !" दिवसभराच्या ऑफिसच्या रगाड्यामुळे दमलेल्या आवाजात तिने ऊत्तर दिले.
"मग बरोबर आहे. ऊद्या हनुमान जयंती ना ! त्याचीच गड्बड असेल." मी थोडेसे मनाशीच बोलल्यासारखे म्हणलो.
"तुला काय माहित? कालनिर्णय तर सापडत नाहिये नविन घरात आल्यापासुन"
"अगं, शुक्रवारिच तर रामनवमीची सुटि होती ना? मग रामनवमी पासुन सहा दिवसांनी हनुमान जयंती!
मिसळपाव
