Skip to main content

संस्कृती

माझे महान प्रयोग - २

लेखक दशानन यांनी मंगळवार, 24/03/2009 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
माझे महान प्रयोग - १ मागील भाग. सकाळ : ७.१५ मिनिटे नंतर टाईम आसपास ग्रहीत धरा. सतबीरला काल सुट्टी घे म्हणून सांगतले होतेच, त्यानुसार तो सकाळ पासूनच गायब होता + फ्रिज मधील बियर चे कॅन पण. चहाची तलफ होती, त्यामुळे उठल्या उठल्या सरळ किचन मध्ये प्रवेश केला, वरुन कोणीतरी फुले टाकत आहे.. दुरवर कुठे तरी जय हो जय हो चा घोष चालू आहे, कोणी तरी सुगंधी द्रव्य शिपंडत आहे असा काही तरी भास मला जेव्हा मी प्रथम काहीतरी निर्माण करण्यासाठी किचन मध्ये प्रवेश करताना झाला ! माझ्या मते चहा ही एक सोपी कृती आहे, चहा पावडर, साखर व दुध !

माझी ओडिया

लेखक आळश्यांचा राजा यांनी शनिवार, 21/03/2009 05:48 या दिवशी प्रकाशित केले.
भाषावार प्रांतरचनेमुळे मला वाटत होते की ओडिया ही बऱ्यापैकी एकसंध भाषा असून संपूर्ण ओरिसा राज्यात थोड्याफार फरकाने एक प्रमाण भाषा म्हणून प्रचलीत असेल. पण हे तितकेसे खरे नाही. अर्थात विविधता ही सर्वच भाषांमध्ये असते. माझा एक मित्र यवतमाळहून पुण्याला शिकायला आला होता तेंव्हा त्याचे मित्र त्याला म्हणाले होते, सांभाळ बे, तिकडचे लोक छापल्यासारखे बोलतात! भाषा दहा कोसांवर बदलते म्हणतात. पण ओडियामध्ये असे बदल लक्षणीय आहेत. संबलपूर भागातील ओडिया ही कटक – पुरी भागातील ओडियापेक्षा इतकी निराळी आहे की आपल्याला आपल्या कोंकणी, अहिराणीची आठवण व्हावी.

"नेणीव" आवडला

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 18/03/2009 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
नेणीव भावला प्रती, नीरज हाय, काय म्हणतोस कसा आहेस गेली जवळ जवळ १ वर्षे आपली भेट नाही त्यापुर्वी दररोज भेटणारे आपण आपली कॉलेजेस बदलल्याने गेल्या वर्षात भेटलेलो नाही .आपली मैत्री जरी विविध पायावर उभारलेली असली तरी त्याचा पाया म्हणजे दोघाना मनापासुन आवडणारा संदीप खरे आहे हे तु लगेच मान्य करशील ,सांगायची गोष्ट अशी की की कालच अगदी पहिल्या रांगेत बसुन नेणीवेची अक्षरे बघायचा योग आला म्हणजे मी चान्स मारला .आयला त्या संदीप खरेना लेख दील्यानंतर व त्यावर त्यांची प्रतीक्रीया आल्यानंतर मी हवेतच गेलो होतो म्हणले आता पुढचा कार्यक्रम पह

श्यामची आई

लेखक आनंद घारे यांनी रविवार, 15/03/2009 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
छम्‌ छम्‌ छम्‌ ..... छम्‌ छम्‌ छम्‌। छडी लागे छ्मछ्म, विद्या येई घमघम ।। छम्‌ छम्‌ छम्‌ ..... छम्‌ छम्‌ छम्‌ हे गाणे माझ्या लहानपणी सगळ्या मुलांना अतीशय आवडत असे. माझ्या पुढच्या पिढीमधल्या मुलांनी ते क्वचितच ऐकले असेल, पण त्यानंतरच्या पिढीतल्या लिटल् मॉनिटर मुग्धा वैशंपायन हिने हे गाणे सारेगमप लिटल् चँप्सच्या स्पर्धेत सादर केले आणि सर्वांनी ते अक्षरशः डोक्यावर घेतले. सारेगमपच्या महाअंतिम फेरीत तिनेच ते गायिले, मुग्धावर झालेल्या खास भागात या गाण्याचा समावेश होता आणि वाशीला झालेला या लिटल् चँप्सचा एक कौतुकसोहळा मी पाहिला त्यातसुध्दा तिने सादर केलेल्या या गाण्याला अमाप टाळ्या पडल्या.

रसराजेश्वर..!

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 13/03/2009 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
साला, मुक्तछंदातल्या आमच्याही या काही ओळी.. मार्च अर्धा संपला जवळजवळ! तो आता येणारे, तो येतोय, येऊ घातलाय..! चला त्याचं स्वागत करुया, सज्ज राहूया, गुढ्यातोरणं उभारून! तो राजा आहे, तो बादशहा आहे तो सम्राट आहे..! तो साक्षात चक्रवर्ती आहे..! तो माणसाला माणूस जोडतो, तो मनातले सारे विकार करतो नाहीसे एका क्षणात.. तो वाटतो फक्त प्रेम

होळीच्या शुभेच्छा! :)

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 11/03/2009 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपाकरांना होळी-रंगपंचमीच्या अनेकानेक शुभेच्छा! :) आपले, अनुष्का शेट्टी, तात्या शेट्टी! :)

महाजालावर मराठीचा जय हो

लेखक विनायक पाचलग यांनी सोमवार, 09/03/2009 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
{पुर्वप्रकाशीत्-सदरचा लेख ६ मार्च २००९ रोजीच्या सकाळ वृत्तपत्राच्या कोल्हापुर आव्रुतीत मुक्तपीठ या सदरात प्रसिद्ध झालेला आहे. हा लेख वृत्तपत्रात येणार हे माहीत असल्याने सर्व संकेतस्थळे दीलेली आहेत ,यातील बरीचशी मिपाकराना माहीत असण्याची शक्यता आहे. हा लेख आपण येथेही वाचु शकता. http://farm4.static.flickr.com/3314/3340207823_baf982819d_b.jpg}
महाजालावर मराठीचा जय हो
इंटरनेटला जोडलेला संगणक..

राम आणी वाली

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 09/03/2009 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर बागडत असताना एका ठिकाणी प्रभु रामचंद्रानी वालीची हत्या करुन कसे अधर्म चरण वगैरे केले आहे ह्याची मनोरंजक कहाणी वाचायला मिळाली. त्यात सितेकडे केलेली अग्नीपरिक्षेची मागणी कशी अन्यायकारक वगैरे होती हे ही वाचायला मिळाले. रामचंद्र हे आधी राजा असल्याने त्यांनी स्वत:चा आदर्श जनतेपुढे घालुन देण्यासाठी त्यांनी सितेकडे अशी अपेक्षा व्यक्त केली असावी काय ? वाली वधाविषयी मात्र खुप बोलायची इच्छा आहे. खरेतर मागे मिपावर हा प्रश्न उपस्थीत झाल्याचे पुसटसे आठवते पण तेंव्हा भवतेक कंटाळ्यामुळे हे येव्हडे सगळे टंकले नाही. आज वेळ मिळाला आहे तर हा राम आणी वाली संवाद तुमच्या पुढे सादर करत आहेत.