जिव्हा शुद्धी एक राष्ट्रीय अभियान
पचा पच थुंकणे व तसेच येता जाता कशा न कशा कारणांनी शिव्या देणे हा आपला राष्ट्रीय टाईम पास आहे. माता व बहिणींवर अशा मेहरबानीयां फार होतात. `च्या यला` हे पालुपद जास्त अन् ग्राम्य शिवी कमी अशी आजची अवस्था आहे.
बामणांच्या चिकन मटन खाण्यामुळे मागणी वाढून भाव चढले असे चेष्टेने म्हणतात. खरे खोटे माहिती नाही. पण शिव्यांच्या मक्तेदारीत गैरब्राह्मण समाजाच्या मुक्त संचारात ब्राह्मणी जिव्हा तितक्याच जिव्हाळ्याने चालताना ऐकून, 'लगे रहो' असा पवित्र संदेश द्यावासा वाटतो...!
भाषा शुद्धीच्या चर्चा कानावर येतात. पण शिव्यांना 'चले जाव' करायला आपली जीभ का कचरावी?