Skip to main content

संस्कृती

मामाचे गाव - तात्या (२)

लेखक दशानन यांनी सोमवार, 15/09/2014 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
पण आजोबांना सोडून ते कोणाला देखील घाबरत नसावेत. कारण कित्येकवेळा ते रात्र रात्रभर शेतात काम करायचे व पहाटे पहाटे घरी यायचे. गावी लाईट नसायची. जेव्हा लाईट येईल तेव्हा धावत पळत शेतात येऊन पाण्याचा पंप चालू करावा लागत असे, नाहीतर मग दुसरा दिवस विहिरीतून मोटाने पाणी उपसत बसावे लागे. ते म्हणत विहिरीतील पाणी काढून काढून त्यांचे दंड असे बलदंड झाले आहेत. मागील भाग मग दुपारची उन्हं कलू लागली की, तात्या हातात मोठं घमेलं घ्यायचा, व झोपडीत असलेल्या पोत्यातून घमेल्यात काहीतरी भरायचा.

आणि यांनी घडविली अमेरिका! .. १) कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट

लेखक अमित खोजे यांनी रविवार, 14/09/2014 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
America was not discovered; it was built! अमेरिका सापडली नाही, ती उभारली गेली! हे एक प्रसिद्ध वाक्य मी बऱ्याच वेळेला ऐकले होते. नुकतीच 'The Men Who Built America' ही मालिका History channel वर बघितली. त्यामधील उद्योजकांच्या गोष्टी पाहून आश्चर्य तर वाटलेच परंतु अमेरिकेचा इतिहाससुद्धा समजला आणि वरील वाक्य तर शतशः पटले. या मालिकेमध्ये इतक्या छान तऱ्हेने सर्व उद्योजकांचा इतिहास समजावून दिला होता कि मला तो इतिहास तुमच्या बरोबर वाटून घ्यावा असे न वाटेल तरच नवल. खूप काही शिकण्यासारखे होते. न्यूयॉर्कमध्ये रहात असल्याने कितीतरी वेळा ग्रँड सेन्ट्रलला जाउन आलोय.

गोष्ट लग्नाची

लेखक भिंगरी यांनी गुरुवार, 11/09/2014 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
हुंडा देणे, घेणे गैर आहे हे माहित असूनही अजूनही हे प्रकार सर्रास चालूच आहेत. याविषयावर अनेक चर्चाही होतात. पण काही ठिकाणी चांगल्या प्रथाही पहावयास मिळतात.

तंत्रदर्शन्-भाग२

लेखक शरद यांनी बुधवार, 10/09/2014 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
तंत्र भाग २. भारतातील तंत्रविकास आजच्या भागात आपण भारतात तंत्राचा विकास किंवा प्रसार कसा झाला ते पाहू. तंत्र ही सज्ञा तन् (विस्तारणे, वृद्धी करणे) या धातूवरून आली आहे. वैदिक कालात यज्ञ हा एकच धर्म होता व अर्चनेचे साधन होते. जनसामान्यांच्या अर्चनेच्या कल्पनांना वाव देण्यासाठी जास्त विधींची गरज होती व तंत्राने त्याला वाव दिला. पहिल्या भागात पाहिल्याप्रमाणे स्त्रीसृजनतेचा पगडा जनांवर होताच. तो भागही तंत्रात सामावला गेला. पण तेथे जाण्याआधी आपण यज्ञसंस्थेतील तंत्र पथम पाहू यज्ञवेदीला यज्ञ(अग्नि)चिती म्हणतात. यज्ञचितीची आकृती व संबंधित फळ यां बाबत शूल्बसूत्रांमध्ये माहिती मिळते.

मामाचे गाव - तात्या

लेखक दशानन यांनी बुधवार, 10/09/2014 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
लाल ठसठशीत कुंकू, हातात बांगड्या, आणि समोर निखारा फुललेली चूल. मावशीने चूलीवरून गरम गरम भाकरी काढली आणि माझ्या ताटात ठेवत म्हणाली "राज्या, उटा माडू, मते वन क्लसा माड अप्पि!" मी गरम भाकरीचा तुकडा मोडला व तोच समोरून काम आले हे पाहून तिच्याकडे पाहू लागलो तर मला तात्यांचे जेवण शेतात द्यायचे काम करावे लागणार होते. मावशीने शिदोरी बांधली व माझ्या हातात दिली. माझ्यावर माझ्या आईपेक्षा जास्त प्रेम करणारी ही मावशी व तिचा मी शब्द टाळेन हे शक्यच नव्हते. तीन तीन मुलींची ती आई, पण लहानग्या बहिणीच्या या पोरावर तिचा फार जीव. जसा ती माझा शब्द खाली पडू देत नसे तसाच मी तिचा शब्द खाली पडू देत नसे.

पेरू : भाग ११ : लोकजीवन

लेखक समर्पक यांनी सोमवार, 08/09/2014 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
या भागात पेरूच्या समाजाचे जवळून दर्शन. कुठल्याही प्रदेशात नुसतं 'बघायला' न जाता अनुभवायला जायचं असेल तर स्वत:च्या 'फॉरेनर टॅग' चा उपरेपणाचा रंग उतरवून उत्सुक, जिज्ञासू रंगाचा उपयोग करून घेता आला पाहिजे. आजुबाजूच्या लोकांशी शक्य तितका संवाद साधत आपला अनुभव अधिकाधिक गडद व सखोल करता आला तर अभ्यास व आनंद दोन्ही वृद्धिंगत होतात. प्रत्येक समाजाची एक वैशिष्ट्यपूर्ण वीण असते, पोत असतो, त्याविषयी जाणण्याचा, ज्या ज्या लोकांना भेटण्याचा योग आला त्यातून या समाजाविषयी जाणण्याचा केलेला हा प्रयत्न, व बरोबरच काही साधी चित्रे.

तंत्रदर्शन-- १

लेखक शरद यांनी रविवार, 07/09/2014 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
तंत्र (भाग १) जगातील सर्वांत जास्त पुरातन, आजही जगभर, सर्व धर्मातील लोकांचा ज्यावर विश्वास आहे असे तत्वज्ञान कोणते असे विचारले तर याचे उत्तर आहे "तंत्र". विश्वात एक विशिष्ठ शक्ती आहे. काही तांत्रिक प्रक्रियांच्या (उदा. मंत्र, यंत्र, मुद्रा इ.) सहाय्याने या शक्तीस वश करता येते. ही वश झालेली शक्ती तुम्हास पंचमहाभूतांवर ताबा मिळवून देवू शकते व तुम्ही असाधारण कृत्ये करून दाखवू शकता असे हे तत्वज्ञान मानते. ही एक "यातु" विद्या आहे. यातु म्हणजे जादू. थोडक्यात तंत्र म्हणजे जादूटोणा. आता तुम्हाला पहिले वाक्य हास्यास्पद वाटेल. पण थोडे थांबा.

मलई!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 05/09/2014 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
.........................आत्मूज जिल्बी भांडार......................... जिल्बी क्रमांकः- ............. अशीच!* =)) (*-चे.पु.वर आमच्या-पाठी :p दुर्बिण घेऊन फिरणार्‍या एका मित्राच्या ग्रहास्तव,सदर जिल्बी तळायला :D सोडत आहोत!यथायोग्य आस्वाद घ्यावा. आणि आकारापेक्षा चविशी सलगी साधावी...ही विणम्र विणंती! =)) ..) सदर जिल्बीमधे:- व्यवसायात नविन पडलेल्या,किंवा वर्षानुवर्ष नविनच राहिलेल्या एका विक्रेत्याची कैफियत मांडायचा प्रयत्न केला आहे.

प्रेम म्हणजे प्रेम असतं...

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 04/09/2014 14:50 या दिवशी प्रकाशित केले.

रमा-माधव !

. .... प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं... तुमचं आमचं सेम असतं. मग ती इतिहासातली पात्रं असली तरी प्रेम हे प्रेमच असतं. एखाद्या निर्मात्या दिग्दर्शकाला अशा प्रकारचा ऐतिहासिक विषयावरचा चित्रपट करावासा वाटणं त्यातही जिथे प्रेक्षकसंख्या मर्यादित आहे अशा मराठीत करावासा वाटणं हीच कौतुकाची गोष्ट आहे. (कृपया ध्यानात घ्या हे रमा-माधव या चित्रपटाचे परीक्षण नाही.

माझ्या घरचा बाप्पा!

लेखक संपादक मंडळ यांनी रविवार, 31/08/2014 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. काहीजणांकडे बाप्पांना पुढच्या वर्षी यायचे निमंत्रण देऊन निरोपही दिला आहे. सगळी मंडळी मोदकांवर ताव मारून सुस्त झालेली असणार! गेल्या वर्षी आपण घरोघरच्या गणेशासाठीच्या सजावटी, मखरे यांच्या फोटोंची स्पर्धा आयोजित केली होती आणि तिला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी मात्र छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त "महास्पर्धा" चालू असल्याने श्रीगणेश सजावटीची स्पर्धा रद्द करत आहोत. मात्र घरबसल्या सर्वांना इतर मिपाकरांच्या घरच्या गणपतीबाप्पाचे दर्शन व्हावे म्हणून हा धागा काढत आहोत.