Skip to main content

विडंबन

मोकलाया दाहि दिश्या - एक भावार्थ सुडंबन

लेखक चामुंडराय यांनी सोमवार, 01/04/2019 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
मोकलाया दाहि दिश्या - एक भावार्थ सुडंबन आजपर्यंत मिपाकरांनी एखाद्या लेखाचे किंवा कवितेचे विडंबन वाचले असेल किंवा केले देखील असेल. विडंबन म्हणजे एखाद्या प्रसिद्ध साहित्यप्रकाराचा निरागस (किंवा खोचक) विनोद निर्मितीसाठी केलेला व्यक्रोक्तिपूर्ण उपहास. विडंबन हे मूळच्या गंभीर विषय आणि शैली असलेल्या लेखन किंवा कविता अशा साहित्यप्रकाराचे करतात. मात्र मुळातच विनोदी आणि टवाळखोर पद्धतीने लिहिलेल्या एखाद्या कलाकृतीचे जी स्वतःच विडंबीत आहे अशा साहित्यिक प्रकाराचे सुडंबन करता येईल का?

कारण हे निमित्तमात्र

लेखक शब्दानुज यांनी शनिवार, 30/03/2019 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
मग पुढे असं होतं की .. अोळखीचा समोरचा आज अनोळखी वाटतो हाच का तो हा प्रश्न मनास पडतो शोध नव्याच्या नव्यानी चालू होतो डोके टेकवायला 'ताजा' खांदा शोधतो नवा खांदाही शेवटी जुना होतो अपेक्षांच्या अोझ्याला जरासा बळी पडतो सोबतीच्या लक्षावधी क्षणांना क्षणात विसरतो एखादा फुटकळ क्षण बाहेर डोकावतो अव्याहत भूक हा तर इथला जिवनमंत्र नाती संपावयास कारण हे निमित्तमात्र..

बसणं हे निमित्तमात्र

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 30/03/2019 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
लई दिसानं आस्ला कच्चा माल घावला: छटाक, आतपाव, पावशेर, अर्धाशेर. वरल्या मापात घेतला आन फायनल प्राडक्ट पाझीटीव केल्यं. घ्या. मग पुढे असं होतं की .. पावलांमधलं अंतर कमी होत जातं अंगामधलं पाणी सुकत जातं. ओठावरचं हसू वाढत जातं. स्पर्श लागतात आठवायला. आणि भांडणं होतात विसरायला. नातं लागतं विणायला. असं व्हावं म्हणून भेटायचं.. बसणं हे निमित्तमात्र.. - पाभ्या
काव्यरस

दारू ही केवळ निमित्तमात्र..

लेखक चामुंडराय यांनी शुक्रवार, 29/03/2019 06:22 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना म्हणुनी काय पुसता? आम्हाला तर दोन दोन प्रेर्ना !! मग पुढे असं होतं की .. मैत्री मधलं अंतर वाढत जातं. गळा भेटी कमी होत जातात. कट्टे, दंगे मागे पडत जातात.. पाठीवरचे गुद्दे होतात विसरायला.. आणि जुने दिवस लागतात आठवायला.. मैत्र लागतं विरायला.. असं होऊ नये म्हणून बसायचं.. दारू ही केवळ निमित्तमात्र..

डॉक्टर हा निमित्तमात्र..

लेखक सोन्या बागलाणकर यांनी गुरुवार, 28/03/2019 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ प्रेरणा: काॅफी ही निमित्तमात्र.. (मूळ कवयित्री प्राची अश्विनी यांची माफी मागून) मग पुढे असं होतं की .. दातामधलं अंतर वाढत जातं. डोळ्यामधला नंबर वाढत जातो. बोळक्यामधलं हसू निवत जातं... नावं होतात विसरायला.. आणि घरचे लागतात रागवायला.. फुफ्फुस लागतं धापा टाकायला.. असं होऊ नये म्हणून भेटायचं.. डॉक्टर हा निमित्तमात्र..

राखून ठेव दुधाचे थेंब तू

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 15/03/2019 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
राखून ठेव दुधाचे थेंब तू मज पाडसा पाजावया रक्त माझे शोषलेस काही नाही त्यास द्यावया घास देई तू मजप्रती दुध देते मी म्हणोनि अर्थ नाही, व्यर्थ आहे जीवन शिंगे असोनि कामधेनु, गोमाता नावे मज अनेक ती भाकड पैदा होता खाटीकास विकती निचाहूनी नीच तू तुझ्यासम कुणी नसे धर्माचे स्तोम फक्त अंतरी आत्माच नसे विकशील का मुलीला ? वांझ जर असेल ती जरा खरचटता तिला झोपही उडेल ती वळू नको, भाकड नको दुभती गाय पाहिजे माग तू याच जन्मी मग नरकात जायचे (( सिद्धेश्वर विलास पाटणकर ))

नकळत सारे घडले ४

लेखक शाम भागवत यांनी बुधवार, 06/03/2019 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
हे एक विडंबन आहे हे कायम लक्षात असू द्या!!!! दुसरा: सर, आपलं एफ१६ जरी पडलं असलं तरी त्या अगोदर आपल्या वैमानिकाने भारतात जाऊन तिथे मिझाईल डागलं याचा मला अभिमान वाटत होता. पण त्याचाही नेम चुकला. फुरफुर: कुठे धरला होता: दुसरा: धरला नव्हता. धरणार होता. फुरफुर: (जरा ओरडून) अरे पण कुढे? दुसरा: भारतीय ब्रिगेडच्या मुख्यालयावर. फुरफुर: पुढे दुसरा: ती मिग२१ अपेक्षेपेक्षाही लवकर आली. जणू भुताटकी झाली. फुरफुरः ????? दुसराः श्रीनगर विमान तळावरून सुखोई, मिराज व मिग२१ आली. आता सुखोई प्रथम यायला पाहिजे.

नकळत सारे घडले ३

लेखक शाम भागवत यांनी मंगळवार, 05/03/2019 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
हे एक विडंबन आहे हे कायम लक्षात असू द्या!!!! तिसरा: आणि.. फुरफुर: (हताश आवाजात पण कुतूहल मिश्रीत आवाजात): अजूनही काही सांगण्यासारखं आहे तुझ्याकडे? आता एका दमात सगळं सांगून टाक. माझ्या मनाची काहीही ऐकायची तयारी झाली आहे. तिसरा: मिग२१ ला एका एफ१६ ने मिझाईल मारले. पण ते त्याला लागलेच नाही. मिग२१ ने ते चपळाईने चुकवले. त्यामुळे.. फुरफुर: अरे बोल ना तिसरा: त्यामुळे ते... फुरफुर: अरे बोल ना. तिसरा: त्यामुळे ते भारताच्या हद्दीत जाऊन पडलंय. फुरफुर: बापरे. ही तर महाभयंकर बातमी आहे. भारताकडे आपल्याविरुद्ध भरभक्कम पुरावा जमा झालाय. ते मिझाईल फक्त आणि फक्त एफ१६ वरूनच सोडता येत हे सगळ्यांना माहीत आहे.

नकळत सारे घडले २

लेखक शाम भागवत यांनी मंगळवार, 05/03/2019 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
हे एक विडंबन आहे हे कायम लक्षात असू द्या!!!! पहिला: सर, वैमानिकांच्या संख्येबद्दल काय जाहीर करायचे? आपण तीन तर जाहीर करून बसलोय. दुसरा: होना. तिसरा: विमाने पण तिनांची दोन करायला लागली. पहिला: आपण आकडा फुगवून सांगतो व नंतर कमी करतो अस कोणाला वाटायला नको. दुसरा: पण आपण मुद्दामहून तसं थोडंच केलंय? पहिला: तेही खरंच म्हणा. फुरफुर: जे झाले ते झालं. त्या बद्दल ताबडतोब चर्चा बंद करा. आता काय जाहीर करायचे त्याबाबत सांगा. तिसरा: आपण एक सापडलाय तर एकच जाहीर करू. हातात जसजसे येतील तसतसे आकडे वाढवत जाऊ. फुरफुर: (स्वगत) खरंच की. असच करायला पाहिजे. मी जरा जास्तच उतावीळपणा केला.