८० वर्षांच्या मुलीचा चांगुलपणा कसा कमी करु?
माझ्या ८० वर्षांच्या सासुबै प्रचंड समंजस आणि मनमिळावू आहेत. त्या सगळ्या गोष्टी नीट व व्यवस्थित करतात. त्या मला भांडण करायची संधीच देत नाहीत. त्या मुळे माझा संयम संपता संपत नाही आणि मला त्यांना शाब्दिक फटके देता येत नाहीत ज्याची परिणीती नंतर मला वाईट वाटण्यात होते.
त्यांना म्हणे मी भांडत नाही आणि आमच्यात कधीही शाब्दिक चकमक, रुसवे फुगवे होत नाहीत याचा फार आनंद होतो. असं त्या सगळीकडे सांगत असतात विशेषतः माझ्या मैत्रिणींना, त्यामुळे मी माझ्या मैत्रिणींची सहानुभूती गमावते आणि माझ्या मनासारखे काहीच होत नाही.
मिसळपाव