लेखकमुक्त विहारियांनी सोमवार, 14/09/2015 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार, मिपाकर मोदक (हे लायन सो-सो, श्री-अमुक-तमुक. अशा चालीवर वाचले तरी चालेल.), सध्या मुंबई परीसरात असून ते कट्टा करायला तयार आहेत असे समजले.
जास्त पाल्हाळ न लावता, कट्ट्या संर्दभात माहिती देत आहे.
तारीख - १५-०९-२०१५
वेळ - रात्रीचे ८
ठिकाण - ३८, बँकॉक स्ट्रीट, ठाणे.
लेखकचतुरंगयांनी रविवार, 13/09/2015 05:19 या दिवशी प्रकाशित केले.
विशाल कुलकर्णींची सुरेख गजल 'तुझे मजवरी भाळणे ते अवेळी वाचली आणि लगोलग वेगळ्याच अवेळा आठवल्या. सादर आहे ... ;)
तुझे पाशवी बोलणे ते अवेळी
तुझे चक्रमी हासणे ते अवेळी
जसे नासिकेचे अकाली बरसणे
तुझे काहिही बरळणे ते अवेळी
लपे 'चंद्र' केसांमध्ये तातडीने
तुझे वीग शाकारणे ते अवेळी
नको आप्त, वीकांत हा फक्त माझा
तुझे तात का 'बैसणे' ते अवेळी?
नको स्वर्ग, मी कुंभिपाकीच जातो
तुझे रातचे घोरणे ते अवेळी
मिटे आसही या क्षणी ऐहिकाची
तुझे हालती पाळणे ते अवेळी!!
'लगावली' : अगागा अगागा अगागा अगागा
वृत्त : भुजंगप्रपात
-चतुरंग
लेखकमाहितगारयांनी शनिवार, 12/09/2015 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
कामधेनु दावणं सोडून केव्हाच गेली
काळाच्या पडद्याआड गोठाही केव्हाच गेला
न पळी राहिलीए ना पंचपात्र
किणकीणाट होतो कधीतरी कुठे कुठे
रिकामा किणकीणाट करणारे,तेवढेच
त्यांच्या नावे नुसताच टाहो फोडणारे
संपत आलेल्या किणकीणाटाला
खणखणाट समजून अथवा भासवून
उगाच खडे फोडतात कधी कधी
शिळ्याकढीला ऊत आणून
कधी सत्तेच्या आशेने
कधी कल्पवृक्ष मिळवून देण्याच्या
मृगजळी स्वप्नाने
कधी कामधेनू आपल्याही
गोठ्यातून निघून गेली या दु:खाने
त्यांनी इतिहासाच्या अभिमानाची रेष
जेवढी फुगवून दाखवीली बरोबरीस
अन्यायाची रेष तेवढीच फुगवून दाखवतो
पण मूळ रेषेत फुगवटा होता हे मी विसरूनच जातो.
ते इतिहासात आहेत याचं रडगाण मी गातो
पण
लेखकप्रसाद गोडबोलेयांनी मंगळवार, 08/09/2015 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
इच्छामटण ह्याचा अर्थ मनात इच्छा आली की "चांगले मटण" खायला मिळणे असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात आणि शेवट तांबड्या पांढर्या रस्स्याने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते , बायकोच्या हातात असते. ’इच्छामटण हवे’ असे तोंड खवळलेल्या व्यक्तीने सांगितले तरी श्रावणात घरातल्यांना ते पटत नाही.
चातुर्मासात घरी गुपचुप मटण बनवुन खाणे अवघड असते. बायको समजुतदार असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु बायको श्रध्दाळु असली आणि नातेवाई़क आसपास रहाणारे असतील तर मात्र अशा चवीने मटण खाणार्यांची अवस्था खुप दयनीय होते.
लेखकश्रीगुरुजीयांनी मंगळवार, 08/09/2015 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल.
2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील.
3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील.
4.
लेखकमाहितगारयांनी सोमवार, 07/09/2015 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा आणि प्रेरणा
जणू खिशांत नागर मर्जी, जग माझिया वाणीवरती
पण अवखळ नागरवासी, मज संत म्हणाले नाही
....... किती काळ उलटला मंत्र्या, नित नवीन म्हणशी तूही
....... जरी रूप पालटले तुही, तू मंत्री आगळा नाही
मी परतून आलो तरीही, माझे ना सरले काही
दमलो मी घेऊन माला, मज संत म्हटले नाही
....... समजता मोल खातीचे आलेला परतून जाई
.......
लेखकदमामियांनी सोमवार, 07/09/2015 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
१ रोज सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा डोळे उघडावेत. यामुळे झोप निघून जाण्यास फायदा होतो.
2 नंतर चेहरा धुवावा. त्यामुळे ताजेतवाने वाटते.
३ यानंतर दात घासावेत. टुथपेस्ट आणि ब्रशने घासले तर फारच उत्तम, पण ते नसल्यास मीठ, हळद, लिंबू, कोळसा यापैकी काहिही वापरले तरी चालेल. मुख आरोग्यास लाभदायक असते.
४ यानंतर शौचास जाऊन यावे. कुणा थोर व्यक्तीने (म्हणजे मीच ) म्हटल्याप्रमाणे "पोट साफ तर मन साफ)
५ आणि नंतर पेला भरून वाफाळता चहा घ्यावा.
या पाच गोष्टी नित्य नियमाने केल्यास दिवस चांगला जातो.
लेखकश्रीगुरुजीयांनी रविवार, 06/09/2015 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही.
अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले.