Skip to main content

विडंबन

थोतांडवादी

लेखक आनन्दा यांनी शुक्रवार, 05/03/2021 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
अरे थोतांड थोतांड कसे रचले कुभांड धागा वाचता वाचता पसरले की भोकांड सारे भोकांड पंडित झाले की हो एकत्रित आणि लागले उकरू काहीतरी विपरीत करोनाच्या काळजीने जीव झाला माझा अर्धा ढवळ्या पवळ्याच्या जोडीने सुरू उलटीची स्पर्धा आले पंडित प्रकांड कधी उकरोनी कांड कुणी म्हणे नोटकांड कोणी म्हणे नॉटिकांड परी कसे विसरले बोलायला अटकांड भुलले वासनाकंड विझवले अग्निकांड जीव पुरता शिणला सारे थोतांड वाचून शुक्रवार आहे चला येऊ पेट्रोल टाकून
काव्यरस

(ठिपसे)

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 02/03/2021 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर: १. ठिपसे असे एक आडनाव असते. २. इथे केवळ मीटरमध्ये बसवायला आणि यमक जुळवण्यासाठी घेतले आहे. ३. त्यामुळे त्यावरून कृपया गैरसमजूत नको. ४. मूळ कविता आवडली आहेच, त्यामुळे कवींनी माफ करावे. प्रेरणा.. पालिकेतले कळकट ठिपसे काळ्या मळक्या फाईलींच्या ढीगात घुसूनि हरवण्याच्या थोडे आधी तिथून निघूया, पण ठिपश्यांच्या साहेबाला, खात्यापित्या ज्यूनियरांना सहकार्याचा कंठ फुटेतो जरा बसूया मग बोलूया, अन् ठिपश्यांची मंजुरीही पाकीट पाहून विकांताच्या थोडी आधी जलदगतीने नीट मिळू दे मग थांबूया
काव्यरस

प्रोफाइलवरती बाई..!!

लेखक चलत मुसाफिर यांनी शुक्रवार, 26/02/2021 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
(टीप: अनाहितांची साष्टांग माफी मागून) प्रोफाइलवरती बाई अशि काही दिसते धासू तो फोटो पाहुन येती झुंडीने चावट वासू कुणी भोजनपृच्छा करतो कुणी थेट घालतो डोळा बाईच्या भवती जमती भुंगे सतराशे सोळा बाईचे आशिक मुबलक कुणि पुतण्या तर कुणि काका रंगेल एकसे एक बाईस मारिती हाका मेसेज पटापट येती गालात हासते बाई पाहता गड्यांची गर्दी तिज हसू अनावर होई ती विचार करुनी लिहिते, पुसते, -अन पुन्हा लिहिते ते 'टायपिंग..' दिसताच वासूंचे भान हरपते डोळ्यात प्राण आणूनी व्याकूळ पाहती वाट कंठाशी येती प्राण वासूंची हालत 'ताठ' दो अशाच घटका जाती मग 'टिंग!' वाजतो फोन वासूंच्या टोळ्या येती तो वाचण्यास धावून उघडता फोनचा प

'असेल घडले' आज काही इतिहासात :(

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 16/02/2021 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
असेल घडले आज काही इतिहासात पकडून का ऐकविले पाहिजे ते प्रत्येकास? असेल घडले आज काही इतिहासात लेखांची माळ का लावली मिपाच्या शेतात? असेल घडले आज काही इतिहासात आदळते डोळ्यांवर मिपा उघडताच असेल घडले आज काही इतिहासात घडू द्या तिकडे चला आपण जगू वर्तमानात असेल घडले आज काही इतिहासात स्क्रोलचा पर्याय आहे अजूनी हातात

निळ्या टिक दाखवा हो।।

लेखक उपयोजक यांनी रविवार, 03/01/2021 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
काही लोक WhatsApp वर मेसेज वाचल्याचे कळू नये म्हणून निळ्या टिक ऑफ करतात.त्यांना विनंती मूळ गीत : निजरुप दाखवा हो गीतकार: ग.दि.माडगूळकर निळ्या टिक दाखवा हो।मॅसेज वाचल्याचे कळू द्या हो। निळ्या टिक दाखवा हो।। अपेक्षेने लिहितो मी; प्रतिसाद त्यास द्या हो। निळ्या टिक दाखवा हो।। कोणी इथे तळमळतो; त्याची चिंता सरु द्या हो। निळ्या टिक दाखवा हो।। दखल घेतलीसे माझी; हे मजला कळू द्या हो। निळ्या टिक दाखवा हो।।

ये जेवण है, इस जेवण का....

लेखक बाजीगर यांनी शुक्रवार, 01/01/2021 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
ये जेवण है, इस जेवण का यही है, यही है, यही है रंगरूप थोडी कम हैं, थोड़ी रोटीयाँ यही है, यही है, यही है पाव सूप ये ना कोसो, इसमें अपनी, मार है के पीट है उसे दफना लो जो भी, जेवण की सीट है ये स्वीट छोड़ो, यूं ना तोड़ो, हर फल इक अर्पण है ये जेवण है, इस जेवण का... धन से ना धनिया से, तूर ते ना गवार से दासों को घोर बंदी है, भरते के प्यार से बनिया लूटे, पर ना टूटे, ये कैसा लंघन है ये जेवण है, इस जेवण का...

बॅंक- एक भयाण अनुभव

लेखक शब्दानुज यांनी शुक्रवार, 18/12/2020 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज महत्वाचे काम होते बॅंकेचे. काहीही करून ते आजच पूर्ण करायचे होते. काम तसे पाच मिनिटाचेच होते. पण पुर्वानुभव लक्षात घेता चांगला एक - दीड तास बाजूला काढून ठेवला होता. गाडी चालू केली की लक्षात आले पेट्रोल संपले आहे. बहुधा माझ्या मुलाने संपवले असावे. रोजचे दोन - दोनचे 'पॅक' संपतात म्हणजे काय ? एवढे काय फिरायचे असते काय माहिती ! एकचा नवीन पॅक टाकून मी गाडी सुरु केली. मुख्य रस्यावर पोहचलो तर स्त्यावर ही मोठी गर्दी. कसाबसा बॅंकेच्या गेटपर्यंत पोहचलो. तिथे एक वॉचमन निर्विकार चेह-याने माझ्याकडे दुर्लक्ष करत होता. गेट उघडायला तो तयारच होईना.

काटेकोरांटीच्या विडंबनाचा लसावी......

लेखक गड्डा झब्बू यांनी मंगळवार, 08/12/2020 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
हे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय..... वरीजनल काटेकोरांटीची फुलं कथा खूप म्हंजे खूप म्हंजे खूपच छान आहे. तिच्या समोर हा लसावी म्हंजे सूर्या समोर काजवाच जणू. संवेदनशील कथेचा सत्यानाश करायची डेरींग झाली नाही म्हणून पहिल्या काही परिच्छेदांचे विडंबन..... ###### जावई कधीही प्यायचे. त्यांना दारूत पाणी मिसळायची गरज नव्हती.