Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नवीन थीमबाबत चर्चा

न
नीलकांत
Sat, 12/31/2016 - 21:10
🗣 182 प्रतिसाद
नमस्कार, आज मिपाला एक नवीन रूप आहे. याला नवीन थीम असं म्हणू या. या नवीन थीमबाबत तुमचं मत काय? यातील काय आवडलं? काय नाही आवडलं? ते नक्की लिहा. या रंगरूपासोबत आपण मिपाची ठेवण बदलायला सुरुवात केलीये. एखादं नवीन लेखन करताना जोडायचे संबंधित टॅग आता सहज जोडता येतील. नवीनसुद्धा जोडता येतील. आजपासून प्रत्येक सदस्याला आपला फोटो लावता येईल. सर्वांना विनंती आहे की त्यांनी 'माझे खाते'मध्ये जाऊन आपला फोटो लावून घ्यावा. याशिवाय यापुढे काही काळ हे बदल होत राहतील, त्या बदलांबाबतसुद्धा येथेच चर्चा व्हावी. आपल्या प्रतिक्रिया, सूचना, मत हे मिपाच्या जडणघडणीत खूप मोलाचं आहे. त्यामुळे आवर्जून आपलं मत मांडा. - नीलकांत
वर्गीकरण
थीम
चर्चा
मत

प्रतिक्रिया द्या
42493 वाचन

💬 प्रतिसाद (182)
श
शार्दुल_हातोळकर Sat, 12/31/2016 - 22:43 नवीन
पण आमुलाग्र बदल झालेला असल्यामुळे सवय व्हायला थोडा वेळ लागेल. मात्र अशी अपेक्षा आहे की कमीत कमी "स्वगृह" मधे तरी पुर्वी जशी रचना होती तसे एखादे स्वतंत्र पान असायला हवे होते. बाकी पुर्वी जसे धागे प्रतिक्रियांनुसार वर वर येत होते, तसेच आताही नव्या रचनेत असणार आहे का? आणि प्रोफाईलमधे खरडवही वर टिचकी दिली असता एरर आला. सर्व मिपाकरांना नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sat, 12/31/2016 - 23:20 नवीन
"नवे लेखन" च्या पानावर टिचकी दिली आणि "स्वगृह" बद्दलचा प्रश्न निकाली निघाला. नवीन थीममुळे थोडासा गोंधळ उडाला. आता फक्त कविता/लेख वगैरे विभागातील नेवीगेशनचा प्रश्न सुटला तर छानच होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर
आ
आशु जोग Sun, 01/01/2017 - 14:08 नवीन
कमेंटसच्या क्रमाने धागे दिसायला हवेत. तसेच ज्या क्रमाने धागे आले त्या क्रमानेही दिसायला हवे. स्वगृहमधे नवे लेखन दिसायला हवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर
श
शार्दुल_हातोळकर Sat, 12/31/2016 - 22:52 नवीन
आणि नेवीगेशन जर पुर्वीसारखे पान क्रमांकांप्रमाणे देता आले तर उत्तम होईल. आता next बटन वर टिचकी देऊन पुढे जावे लागत आहे, जे अडचणीचे वाटत आहे. एकदम विशिष्ट क्रमांकाच्या पानावर जाण्यासाठी पुर्वीची नेवीगेशन ची सुविधा जास्त चांगली होती.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sun, 01/01/2017 - 01:48 नवीन
मिपाचे नवीन रूप मोबाइल फ्रेंडली आहे. मोबाइल वर डावीकडे उजवीकडे स्क्रोल करावे लागत नाही. बाकी नवीन रुपाची सवय होइल हळू हळू
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sun, 01/01/2017 - 01:49 नवीन
स्वत:चा फोटो अपलोड करायची सोय आवडली
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Sun, 01/01/2017 - 01:57 नवीन
थीम फारच छान आहे. सोपी अन सुटसुटीत ...
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Sun, 01/01/2017 - 02:22 नवीन
मेनू बटन खाली स्क्रोल केल्यावर गायब होत न टॉपला जाऊन त्यातून नेव्हीगेट करावं लागत. त्याऐवजी जर मेन्यू बटनदेखील स्क्रोल करत खाली येत गेले तर छान होईल. (कदाचित मी मोबाईलहुन बघत असल्याने असे होत असेल?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
क
कैवल्यसिंह Sun, 01/01/2017 - 02:07 नवीन
मिपाचे नविन रुप खुपच झक्कास आहे... पन नविन मिपावर मला आजुनही शोध/शोधा हा पर्याय सापडलाच/दिसलाच नाही.. शोधा हा पर्याय नविन मिपात हवा आहे.. म्हणजे सर्व लेख, प्रतिसाद, व मजकुर शोधने सोप्पे जाईल.. - कैवल्यसिंह
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sun, 01/01/2017 - 03:42 नवीन
मोबाईलवर वरती काळ्या पट्टीत "मिसळपाव" या अक्षरांशेजारी तीन आडव्या पांढऱ्या रेघा आहेत. त्यावर टॅप केलं की स्वगृह, साहित्य प्रकार वगैरे विकल्प असलेली खिडकी उघडते. त्याच्या डोक्यावर "शोध" ही सोय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैवल्यसिंह
क
कैवल्यसिंह Sun, 01/01/2017 - 04:44 नवीन
मी मिपा ओपेरा मिनी वरुन बघतोय पन मला त्या काळ्या तीन रेघांच्या पर्यायामध्ये स्वगृह साहित्य प्रकार नवे लेखन मिपा विशेषांक घोषणा मदत पान एवढेच पर्याय दिसतात... शोध हा पर्याय दिसतच नाही.. मी अँड्रॉइड ४.२.२ वर ओपेरा मिनी वापरतोय....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ग
गामा पैलवान Sun, 01/01/2017 - 14:21 नवीन
आदूबाळ,
मोबाईलवर वरती काळ्या पट्टीत "मिसळपाव" या अक्षरांशेजारी तीन आडव्या पांढऱ्या रेघा आहेत.
या तीन आडव्या रेघांना हँबर्गर आयकन म्हणतात. आपण त्यास वडापावचिन्ह म्हणूया. आ.न., -गा.पै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Sun, 01/01/2017 - 17:45 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ख
खेडूत Sun, 01/01/2017 - 03:04 नवीन
छान . नव्या रूपाची सवय होईलच. लॅपटॉपवरून अजून पाहिले नाही. ऑफिसातून वाचणार्‍यांचा नक्की विचार व्हावा. त्या दृष्टीने रंगाचा बटबटीतपणा कमी झालाय बहे चांगलेच. खरं तर एक ऑफिस व्हर्जन असावे, ज्यात निव्वळ टेक्स्ट दिसेल. पण ते तातडीचे नाही.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 01/01/2017 - 03:35 नवीन
काल मोदींनी भाषणातुन हवा तसा धक्का दिला नाही पण येथे मालकांनी 'पुरे घर के बदल डालुंगा' च्या धर्तीवर संपुर्ण कायापालट केला. मी सकाळी पहिल्यांदा मोबाईलवरुन संकेतस्थळ उघडले ते अतिशय छान दिसले. आता लॅपटॉपवरुन बघत / लिहित आहे. नव्या वर्षात मालकांनी चांगली भेट दिली आहे. आपले आभार ! थोडा वापर केल्यावरच नवीन रुपाबद्द्ल अधिक लिहिता येईल.
  • Log in or register to post comments
R
Ram ram Sun, 01/01/2017 - 04:14 नवीन
आज्बात आवाडली नही थेम. येळ तारीख काय सम्जत नय. पैलंच चांगलं हुतं.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 01/01/2017 - 04:57 नवीन
नविन थिम अतिशय आवडली. सतत बदलत रहाणे ही मिपाची प्रवृती आहे. आणि त्या मुळेच मिपा अजूनही तरुण आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 01/01/2017 - 05:50 नवीन
नविन थिम आवडली, पांढरा रंग थोडासा लाईट केल्यास रात्री वाचताना डोळ्यावर ताण कमी येइल. खरडवही दिसत नाहीये तसेच प्रतिसाद दिल्यावर धागे वर येत नाहीत. स्मायलीज दिसण्याची सोय हवी होती...

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- हम दोनो दो प्रेमी, दुनिया छोड़ चले जीवन की हम सारी रस्मे तोड़ चले... :- Ajnabee (1974)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 01/27/2017 - 00:51 नवीन
खरडवही परत आली आहे पण त्यात आधीची एकही खरड नाही ! :( शिवाय खरडवही असे दिसण्या ऐवजी चतुरानंद यांची खरडवही असे दिसत आहे ! :प मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Puli Urumudhu... :- Vettaikaaran
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
स
समाधान राऊत Sun, 01/01/2017 - 05:58 नवीन
पण मोबायलात प्रतिसाद of प्रतिसाद वाचताना झुम केल्यावर काळा मेन्युबार ४०% स्क्रीन माझीच असं म्हनतोय-(horizontal mode) अन सर्च इंजान पायजे राव , नविन मिपाकराने सहा सात वर्षापुर्वीचे लेख कसे शोधायचे. एकं दोनं करायचं जिवावर येत कधीकधी. गुरुप केल्या मुळं फरक पडणार म्हणा
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Sun, 01/01/2017 - 06:06 नवीन
नवी थीम हाताळायला पहिल्या थिम पेक्षा थोडी अवघड वाटली, कदाचित सवय होईल. पण, मिपाचं सगळ्यात आवडतं वैशिष्ट्य असणारं प्रतीसादांचं लेवलिंग गायब झालेलं दिसतंय! म्हणजे दुसऱ्या प्रतिसादानंतरचे सगळे प्रतिसाद एकाच लेवलला दिसत आहेत. शिवाय प्रतिसादानंतर धागा वर येत नाहीये.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 01/01/2017 - 06:20 नवीन
थीम फारशी आवडली नाही. मोबाईल फ्रेंडली अजिबात वाटली नाही. फिनेसही नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sun, 01/01/2017 - 06:45 नवीन
मिपाची नवी थीम एकदम नेटकी वाटत आहे. संगणकावरून तर उत्तम दिसतच आहे पण चतुरभ्रमणध्वनीवर तर खूपच सोयीची वाटत आहे. या बदलांसाठी अनेक धन्यवाद. अधिक वापरल्यावर काही सुधारणा सुचल्या किंवा समस्या जाणवल्या तर या धाग्यावर प्रतिसादाच्या रुपात आवर्जुन नोंदवीन.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 01/01/2017 - 07:34 नवीन
थीम प्रचंड जास्त आवडलेली आहे हो मालक. बेज्या झकास दिसू राहला सब्बन सेटप, मोकळंचाकळ स्वरूप आवडलेले आहे. रंग सुद्धा शांत अन डोयाले आल्हाददायक वाटतायत. तुम्ही घेत असलेल्या मेहनती करता तुमचे खूप आभार अन पुढील वाटचाली करता खूप शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
च
चिगो Mon, 01/02/2017 - 10:19 नवीन
एकदम सुटसुटीत आहे थीम.. पानावर आल्याआल्या आपल्याले पाहीजे तिकडं जाता येते. उगाच गण्याच्या घरी जाले ग्यानबाच्या दारातुन जाची गरज नाही.. रुळल्यावर हळूहळू आणखी गुणावगूण कळतील थीमचे, त्यानुसार बोलेनच.. पण 'फर्स्ट इंप्रेशन' झक्कास.. धन्यवाद ! आणि हो, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कंजूस Sun, 01/01/2017 - 07:38 नवीन
निरनिराळ्या ब्राउजरमध्ये वेबसाइट्स डेस्कटॅाप, रीडिंग व्ह्यु,सिंगल कॅालम व्ह्यु बघण्याची सोय नवीन फोन्समध्ये असतेच त्यामुळे मला काही अडचण जाणवली नव्हती. पण आता मिसळपाव साइट फक्त सिंगल कॅालम/रीडिं व्ह्यु ठेवली आहे का? १) जुन्या आणि नव्या "नवे लेखन/स्वगृहचे अॅड्रेस बदलले आहेत ते पुन्हा बुकमार्क केलेत. २) जुन्या आणि नव्या "नवे लेखन/स्वगृहचे कोड चेक केले तेव्हा नवीन कोड २० टक्के कमी झालेला दिसतोय.( ४००० >>३४०० शब्द).यामुळे सर्वरसाइड लोड कमी झाला असेल. ३) आइडी फोटो अपलोड करताना किती साइजचा हवा हे सूचना दिसली नाही. २ एमबीचा २०० केबी करून टाकलाय. ४) अनुक्रमणिकेतील धाग्याची मोठी शीर्षकं फुल व्ह्युमध्ये शेवटी कापली जाताहेत पण सिंगल कॅालम व्ह्युमध्ये पूर्ण दिसताहेत.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sun, 01/01/2017 - 07:41 नवीन
नवी थिम बघून २००६ च्या सुमारास मनोगत होते त्याची आठवण झाली. नवे लेखन वर क्लिक केल्यानंतर पूर्वीप्रमाणेच सगळे लेख बघायला मिळत आहेत हे चांगलेच आहे. बाकी मिपा हे आपलेच आंतरजालावरील घर आहे. त्यामुळे ते जसे आहे तसे, ज्या थिममध्ये आहे त्या थिममध्ये चांगलेच आहे आणि असेल.
  • Log in or register to post comments
भ
भाते Sun, 01/01/2017 - 07:48 नवीन
मिपामधले काही बदल अजुन चालु असतील किंवा नंतर येणार असतील. पण मला लक्षात आलेल्या काही गोष्टी इथे नमूद करतो. १) मुखपृष्ठावर वरती डाव्या कोपऱ्यात 'मिसळपाव' अशी अक्षरे दिसत आहेत. तिकडे मिपाचा लोगो अपेक्षित आहे. बॅनर सोडल्यास मुखपृष्ठावर इतर कुठेही मिपाचा लोगो दिसत नाही आहे. २) मिपाच्या बॅनरचा आकार आणखी थोडा मोठा हवा होता. मिपा लोगोच्या वरचा मजकुर वाचायला त्रास होतो आहे. ३) मिपा विशेषांकवर टिचकी मारल्यावर मदत पान दिसते आहे. तिकडे मिपाचे सगळे मिपा विशेषांक दिसणे अपेक्षित आहे. ४) आधीच्या रचनेमध्ये ऊजव्या बाजुला असलेले दखल सदर नव्या रूपात गायब झाले आहे. ते पुन्हा आणता येईल का? ५) रात्रीच्या वेळी मिपावर आल्यावर पांढऱ्या रंगामुळे वाचायला त्रास होतो. मिपावर 'नाईट मोड' आणणे शक्य आहे का? सध्या लक्षात आलेल्या गोष्टी इथे लिहिलेल्या आहेत. नंतर त्यात योग्य ती भर घालेनच.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sun, 01/01/2017 - 08:01 नवीन
पूर्वी सगळ्या लेखांची यादी यायची.त्या यादीत सर्वात नवीन प्रतिसाद आलेला लेख सर्वात वर दिसायचा. आता 'नवे लेखन' वर (लॉगिनच्या खाली) क्लिक केले तर पूर्वीप्रमाणे यादी येते. पण त्या यादीत सर्वात वर नक्की कोणता लेख आहे याचा निकष समजला नाही. दुसरे म्हणजे सर्वात वर असलेल्या काळ्या पट्टीत 'नवे लेखन' वर क्लिक केले तर तशी यादी न दिसता कविता, लेख, चर्चा इत्यादी गोष्टीप्रमाणे लेख दिसतात. नवीन लेखन या एकच नावावर क्लिक केल्यावर दोन वेगळ्या गोष्टी दिसतात. त्यामुळे थोडी दिशाभूल व्हायची शक्यता आहे. त्याविषयी काही करता येईल का? दुसरे म्हणजे खरडवहीला पंख लावले गेले आहेत की काही दिवसांनी खरडवही परत येणार आहे? वर म्हटल्याप्रमाणे मिपा जसे आहे तसे आपलेच आहे. पण या गोष्टी समजल्या नाहीत.
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Sun, 01/01/2017 - 09:27 नवीन
मिपा तर मोदींच्याही दोन पावलं पुढे आहे....आधी केले मग सांगितले....सध्या थोडं गोंधळायला होतंय पण होईल सवय....मात्र सगळी शीर्षकं एकाच ठिकाणी दिसतील अशी एक तरी लिंक हवी....
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Sun, 01/01/2017 - 09:27 नवीन
मिपा तर मोदींच्याही दोन पावलं पुढे आहे....आधी केले मग सांगितले....सध्या थोडं गोंधळायला होतंय पण होईल सवय....मात्र सगळी शीर्षकं एकाच ठिकाणी दिसतील अशी एक तरी लिंक हवी....
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sun, 01/01/2017 - 10:04 नवीन
ज्यांनी फोटो लावला नाहीये तिथे अमुक अमुक'स पिक्चर असं लिहून येतय. ते नावाबरोबर मिक्स होऊन खिचडी दिस्तय. फोटो नसेल तर रिकामा चौकोन चांगला वाटेल.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 01/01/2017 - 10:12 नवीन
सर्व सदस्र्यांना विनंती, कृपया आपल्या प्रोफाईल फोटोवर कोणता तरी फोटो टाकाच. प्रतिसाद दिल्यावर "सदस्यांचा नाव' 's picture" असं दिसतंय. परत सदस्याचं नाव आल्याने ते विचित्र दिसत आहे. फोटो टाकाल तर तसं दिसणार नाही. नीलकांत, शक्य असेल तर अ‍ॅडमीनला प्लेसहोल्डर इमेज टाकता येईल काय सर्वांसाठी... ?
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Sun, 01/01/2017 - 10:25 नवीन
सेट केलीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 01/01/2017 - 12:28 नवीन
अरेवा! धन्यवाद ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
प
पाटील हो गुरुवार, 01/05/2017 - 12:18 नवीन
प्रोफाईल फोटो change करता येईना . प्लेसहोल्डर इमेज change होत नाहीय .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कंजूस Sun, 01/01/2017 - 10:22 नवीन
पुर्वी भटकंतीचे धागे पाहताना मी मुद्दामहून फोन ब्राउजरमधला रीडिंग /सिंगल कॅालम व्ह्यू करून चित्रे पाहात असे. त्यात ती मोठी आणि स्पष्ट दिसायची. आता थीमच तशी असल्याने काम झाले.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 01/01/2017 - 10:24 नवीन
मोठ्या आडव्या मॅानिटरवाल्यांना खाली स्र्कोल करत जावे लागत असेल.
  • Log in or register to post comments
R
rahul ghate Sun, 01/01/2017 - 11:40 नवीन
Nawin theme chan ahe wapartana saway hoyil halu halu . sarw manywar sadasyanna nutan warsha bhinandan
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 01/01/2017 - 11:53 नवीन
डीफॉल्ट इमेज कशी दिसते ते पाहतो.
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Sun, 01/01/2017 - 12:00 नवीन
प्रतिसाद दिल्यानंतर धागा वर येत नाहीये का? का?
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Tue, 01/03/2017 - 04:31 नवीन
१. माझ्या मोबाईलवर असं दिसतंय : Image removed. मेन्यूबारची गिचमिड झालिये. मेन्यूचा आयकॉनही दिसत नाहीये. २. प्रतिसाद टाईप करण्याच्या खिडकीतला फाँटसाईझ इतर साईटपेक्षा लहान आहे. तो मोठा करता आला, तर माझ्यासारख्या वाचण्याचा चष्मा उर्फ वृद्धदृष्टीता असलेल्या लोकांची सोय होईल. ३. मोबाईलवर लॉगिन करताना स्क्रॉल करून पानाच्या शेवटापर्यंत जावं लागतंय. ती सोय वर आली तर छान होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
क
कैवल्यसिंह Tue, 01/03/2017 - 08:27 नवीन
तुमच्या मोबाईलचा ब्राउजर चे नाव काय आहे? माझ्याकडे Opera mini android browser आहे. पन असे नाही दिसत थोडे वेगळे दिसतेय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ Tue, 01/03/2017 - 17:28 नवीन
हा मोबाईलचा फायरफॉक्स आहे. डेस्क्टॉपवर ठीक दिसतं, फाफॉत. मेन्यूबार गंडलेला आहेच पण बरा दिसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैवल्यसिंह
न
निष्पक्ष सदस्य Sun, 01/01/2017 - 12:07 नवीन
छान हा!!! मोबाईलफ्रेंडली थीम आहे.
  • Log in or register to post comments
न
निष्पक्ष सदस्य Sun, 01/01/2017 - 12:11 नवीन
नव्या थीममध्ये स्वतःचा प्रतिसाद संपादित करायची सर्वांना सोय दिली असती,तर बरे पडले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निष्पक्ष सदस्य
स
समाधान राऊत Sun, 01/01/2017 - 12:19 नवीन
Displaying profile Picture's Rights' must be reserved...
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sun, 01/01/2017 - 12:34 नवीन
मिपाचे हे नवे फॉन्ट तर फारच देखणे आहेत. पण मिपाचे पान व पार्शवभूमी यांचा रंग एक नको. तो आता सफेदच आहे. पार्श्व भूमीचा रंग ग्रे किंवा ग्रे प्लस ग्रीन असाही चालेल.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 01/01/2017 - 13:51 नवीन
नवी थीम गैरसोयीची वाटतेयं .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
ग
गामा पैलवान Sun, 01/01/2017 - 14:32 नवीन
संजय क्षीरसागरांशी सहमत. फिरस्त्यावरून (=मोबाईल) बरीच अडचणीची आहे. मेन्यूबार बरीच जागा खातो. नवे लेखन पानावर आडवी उलगड (= हॉरिॆझाँटल स्क्रॉलिंग) वापरल्याशिवाय उजवीकडील मजकूर दिसंत नाही. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा