अशा प्रकारचा धिंगाणा पूर्वी अमेरिकेत अनेकांनी घातला आहे. मलिक माथेफिरु आहे ,त्याला शिक्षा झालीच पाहिजे ह्यात दुमत नाही.माथी कुठच्याही कारणावरुन फिरतात. ह्याचे धर्मावरुन फिरले.बाकीच्या अमेरिकनांनी तलवारी काढून अमेरिकेतल्या मुसलमानांना कापत सुटावे अशी तुमची अपेक्षा आहे का?
भारत नाही आहे तो. काय बोलतात अनिवासी भारतिय आमचे?
विनम्र लांडगा
श्री लांडगा यांच्याशी सहमत. अशा घटना नियमीतपणे घडतात. (आजच सकाळी घडलेले हे वाचा.) धर्माचा यात संबंध नसावा. एका माथेफिरु व्यक्तिच्या वर्तणुकीवरून सर्व समाजास दोषी धरणे चूक आहे.
खुनाच्या, गोळी घालून मारल्याच्या घटना भारतात , अमेरिकामेध्ये , जगात सर्वत्र घडतात. त्यावेळी खूनी 'जय हनुमान ' (किंवा इतर देवांची नावे ) किंवा जिझस असे म्हणून आपल्या कृत्यास सुरवात करीत असेल काय?
फोर्ट हुड ची घटना आणी इतर खूनाच्या , गोळीबाराच्या घटना वेगवेगळ्या आहेत.
श्री पक्या, प्रेरणा वेगळ्या असू शकतील पण परिणाम एकच. एखाद्या धर्मातील पवित्र शब्दांचा वापर करून कोणी दुष्कृत्य करत असल्यास त्या धर्मास दोषी धरणे योग्य नाही इतकेच. ग्रॅहॅम स्टेन्स यांना जिवंत जाळण्यात आले याचा विसर पडू देऊ नका. माथेफिरु सर्व धर्मात सापडतात.
धर्म कोणताच वाईट नाही आणि मी कोणत्याही धर्माला दोषी म्हटलेले नाही. पण धर्माचा वापर करून धर्माच्या नावाखाली काही दुष्कृत्य केल्यास तो माणूस नक्कीच दोषी आहे.
मला फक्त एकच सांगायचे आहे की वर उल्लेख झालेल्या दोन्ही घटना (फोर्ट हूड आणी 'हे वाचा ' मधील) वेगवेगळ्या आहेत. एका घटनेत ख्रिस्ती नाव आले म्हणून (माथेफिरू कोणत्याही धर्मात असतात हे दाखवण्यासाठी ) फोर्ट हूड च्या घटनेशी त्याचा संबंध लावू नये.
दोन्ही घटनांमध्ये अंदाधुंद गोळीबार करून निरपराध लोकांचा बळी गेला आहे, हे समान सूत्र दाखवणे हा उद्देश होता. दोन्ही घटना (फोर्ट हूड आणी 'हे वाचा ' मधील) धर्माच्या नावाखाली केल्या गेल्या असे म्ह्टल्याचे मला दिसले नाही.
>>दोन्ही घटनांमध्ये अंदाधुंद गोळीबार करून निरपराध लोकांचा बळी गेला आहे, हे समान सूत्र दाखवण हा उद्देश होता.
एवढाच उद्देश होता तर तो अनाठायी आहे .
अशी अजूनही काही समान सूत्रे ही घटना आणि इतर गोळीबाराच्या घटनांमध्ये सापडतील. म्हणून घटना समान ठरत नाहीत.
श्री पक्या, आपल्या मताचा आदर आहे. मला या दोन घटनांमध्ये फारसा फरक जाणवत नाही (तपशील वेगळे असले तरीही.) आपण एकाच निष्कर्षावर येणे शक्य वाटत नाही. तेव्हा हा संवाद थांबवत आहे धन्यवाद.
ग्रॅहम स्टेन्सला मारणार्या दारासिंगचा सर्वत्र हिंदू अतिरेकी असाच उल्लेख होतो. त्याला त्याची शिक्षाही झाली आहे. कसाब वा अफझलसारखे भिजत घोंगडे पडलेले नाही. दुसरे असे की जगात कुठेही अतिरेकी घटना घडली तर आजच्या घटकेला कुणाविषयी प्रथम शंका येते? रा. स्व संघ? विश्व हिंदू परिषद? दलाई लामाचे अनुयायी? का रोमन कॅथोलिक? पारशी? का ज्यूइश लोक?
अर्थातच मुस्लिम अतिरेकी. आणि त्याला ठोस कारण आहे. गेल्या पन्नास वर्षात, थंड डोक्याने कारस्थान करून, असंख्य निष्पाप लोकांना ठार मारण्यात कुणाचा हातखंडा आहे? अर्थातच मुसलमान अतिरेक्यांचा.
हिंमत असेल तर हिशेब करुन बघा.
तेव्हा त्या धर्माला असल्या कृत्यांचे श्रेय दिलेच पाहिजे.
१४०० वर्षे जुन्या तत्त्वज्ञानात काडीचाही बदल करायचा नाही अशी भूमिका कोणता धर्म घेतो? केवळ मुस्लिम धर्म. बाकी सगळ्या धर्मात सुधारणा घडल्या आहेत. संघर्ष होऊन का होईना, सगळ्यांनी नव्या युगात जगण्याकरता कात टाकली आहे. फक्त हाच धर्म तसे करायला नकार देतो आहे. हे आपल्या लक्षात का येत नाही? का शहामृगाप्रमाणे वाळूत मान खुपसून शत्रू अस्तित्वात नाही असे मानण्यात आपल्याला धन्यता वाटते?
१४०० वर्षे जुन्या तत्त्वज्ञानात काडीचाही बदल करायचा नाही अशी भूमिका कोणता धर्म घेतो? केवळ मुस्लिम धर्म. बाकी सगळ्या धर्मात सुधारणा घडल्या आहेत. संघर्ष होऊन का होईना, सगळ्यांनी नव्या युगात जगण्याकरता कात टाकली आहे. फक्त हाच धर्म तसे करायला नकार देतो आहे. हे आपल्या लक्षात का येत नाही? का शहामृगाप्रमाणे वाळूत मान खुपसून शत्रू अस्तित्वात नाही असे मानण्यात आपल्याला धन्यता वाटते?
१००० टक्के सहमत. इस्लाम शांती शिकवणारा धर्म आहे असली हास्यास्पद विधाने राजकारणी लोक करताना पाहून अंमळ मौज वाटते.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
श्री अक्षय,
'सर्व समाजास दोषी धरणे' हा शब्दप्रयोग आपण का केला आहे? कोणी अमेरिकेतल्या (किंवा जगातल्या) सगळ्या मुसलमानांना सबब खटल्यात शिक्षा व्हावी अशी अपेक्षा केलेली दिसली का आपल्याला?
शिवाय दाळीत प्रथिने असतात म्हणणारास तांदळात देखिल प्रथिने असतातच कि म्हणणे औचित्यपूर्ण आहे का? हाच एकमेव आपले पुरोगामीत्व आणि धर्मनिरपेक्षत्व सिद्ध करण्याचा मार्ग आहे?
सामान्य मुस्लिमाला दुखवण्याची कुणाची इच्छा नसते (हे दरवेळी टाईप करून प्राण कंठाशी येतात.) परंतु दहशतवादाच्या इस्लामिक स्रोतास कसे हातावे हा वाजवी, मोठा , महत्त्वाचा प्रश्न आहे.
धर्म श्रेष्ठ कीं राष्ट्र या प्रश्नाला येणार्या responseवरून नागरिकाची परिक्षा होते.
२ किंवा ३ वर्षापूर्वी क्रिस्तियान अमनपूर या सीएनएनच्या पत्रकारबाईंनी "Killing in the name of God" या विषयावर एक मालिका बनविली होती त्यात मुस्लिम व ख्रिश्चन या दोनही धर्माची उदाहरणे होती.
असेही वाचले होते की जेरुसलेममध्ये उगम पावलेल्या तीनही धर्मात 'एकच देव' ही भुमीका असते (ज्यू, ख्रिस्चन व मुस्लिम). अशा धर्मात अशा भावना खोलात रुजल्या असतात असे conclusion होते.
२००० सालाच्या आसपास आणखी एका ठिकाणी अमेरिकेतील मुस्लिमांच्या मतचाचपणीत (poll) बहुसंख्य अमेरिकन मुस्लिम नागरिक (७० टक्के) धर्माला जास्त priority देतात असेही वाचले होते. पण त्याला दहा वर्षे झाली व conclusion नीट आठवत नाही.
याबद्दल इतर लोकांच्या वाचण्यात काही आले असेल तर लिहावे.
सायबा
१. अमेरिकेतील मुस्लिम संघटनांनी बळींना मोठ्या घसघशीत रकमेची मदत करावी. अगदी पदराला खार लावून.
२. आपल्या अनुयायांना जाहीरपणे आणि खाजगीतही जोरदार ताकीद द्यावी की असल्या धोक्याच्या घंटा वाजताना ऐकू आल्या तर संबंधित मुस्लिम बांधवाची माहिती तत्काळ पोलिस व अन्य अधिकारी संस्थेला द्या. मशिदीत वा अन्य जागी असला आगलाऊपणा करत असेल तर त्याला कडवा विरोध आणि योग्य त्या सरकारी यंत्रणेला त्याची माहिती द्या.
३. सर्वशक्ती एकवटून मोठ्या संख्येने (महंमदाचे कार्टुन काढल्याच्या निषेधात जेवढा मोठा मोर्चा निघाला तेवढा किंवा त्याहून मोठा!) ह्या घटनेचा निषेध करण्याकरता मोर्चा काढा. नुसता तोंडदेखला निषेध नाही. जर अमेरिका अशी वागली नसती तर असे घडलेच नसते अशा छापाची पुस्तीही नको.
अर्थातच ह्यातले काही घडणार नाही. पण मुस्लिम संघटना खरोखरच प्रामाणिक असतील तर असे काही तरी केलेच पाहिजे.
हा माणूस आर्मी सायकिएट्रिस्ट होता असे मी सक्काळी रेडिफ वर वाचले.. पण तो सायको होता का ते माहीत नाही...
थोडक्यात ह्या हलकटाला त्याचे पालनपोषण करणारे सैन्य, आपले सैनिक सहकारी ह्यापेक्षा परदेशी, अनोळखी पण धर्माने मुस्लिम लोक जास्त जवळचे वाटतात असे दिसते आहे.
आपण खूप लवकर निष्कर्ष काढायचा प्रयत्न करताय.. सामान्य अमेरिकनांचा इराक आणि अफगाणिस्थानातल्या कारवायांना सध्यातरी विरोध आहे.. इराक आणि अफगाणिस्थानातून परत येउन डिप्रेशनच्या शिकार झालेल्या सैनिकांच्या कथा मी ऐकलेल्या आहेत.. एक व्यावसायिक म्हणून त्याला या गोष्टी माहीतही असतील आणि त्यामुळे त्याला डिप्रेशन आले असेल... त्याने फक्त मूर्खपणाच केलाय, यात धर्मा-बिर्माचा काहीही संबंध नाही असे मला वाटते..
बाय द वे, कुणी तुम्हाला नोकरीसाठी काबूल किंवा कंदाहार किंवा बगदाद ला पाठवत असेल तर तुम्ही जाल काय? ;)
आता त्याला लवकर फाशी देतात का डोके ठिकाणावर नाही म्हणून सरकारी इतमामाने जिवंत ठेवतात ते बघायचे.
त्याचे कोर्ट मार्शल होईल...
हा विडिओ पहा..
http://www.youtube.com/watch?v=f4B5RTS9d8E
--सुहास
>>
आपण खूप लवकर निष्कर्ष काढायचा प्रयत्न करताय.. सामान्य अमेरिकनांचा इराक आणि अफगाणिस्थानातल्या कारवायांना सध्यातरी विरोध आहे.. इराक आणि अफगाणिस्थानातून परत येउन डिप्रेशनच्या शिकार झालेल्या सैनिकांच्या कथा मी ऐकलेल्या आहेत.
<<
हा इसम एक दिवस देखील युद्धावर गेला नव्हता. ह्याचा पेशा हा सायकियाट्रिकचा होता लढाऊ सैनिकाचा नाही. तेव्हा डिप्रेशन वगैरे दावे साफ फोल आहेत. ह्याला त्याच्या धर्माचा अनाठाई उमाळा होता आणि त्याकरता त्याने हे केले. धर्माचा संबंध आहे एवढेच नव्हे तर धर्म ही हे कृत्य करण्यामागची प्रेरणा आहे.
ह्या घटनेतून माहित नाही पण तुमचा लेख वाचून बर्याच लोकांना स्फूर्ती मिळेल असे वाटते ....
अजून सगळ्या का आणि कसे ह्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत
असे असताना,
अल्ला हु अकबर च्या आरोळ्या ठोकत त्याने गोळीबार सुरु केला
अन्य मुस्लिमांना मारायचे ह्या कल्पनेने तो बिथरला होता
हि माहिती आपल्याला कुठे मिळाली? मि काल पासून हि बातमी फॉलो करतोय, मला कुठेही अशी माहिती मिळाली नाही....
बिबिसी वर दिलेली माहिती अशी आहे -
he had faced harassment over his "Middle Eastern ethnicity" and had been trying to leave the army. - अधीक
-
अफाट जगातील एक अडाणि.
>>अल्ला हु अकबर च्या आरोळ्या ठोकत त्याने गोळीबार सुरु केला - >>हि माहिती आपल्याला कुठे मिळाली?
येथे वाचा
http://news.yahoo.com/s/ap/20091106/ap_on_re_us/us_fort_hood_shooting
त्यात अशा ओळी आहेत - Soldiers reported that the gunman shouted "Allahu Akbar!" — an Arabic phrase for "God is great!" — before opening fire, said Lt. Gen. Robert Cone, the base commander. He said officials had not confirmed that Hasan made the comment.
A.P. चि बातमी असल्याने विश्वासार्ह वाटते आहे. एका प्रश्नाचा संदर्भ मिळाला आहे, दुसर्याची वाट बघतो आहे.
संदर्भ नसल्यास विनाकारण भडकावू विधान काढून टाकावे हि संपादकांना विनंती.
-
अफाट जगातील एक अडाणि.
http://news.yahoo.com/s/ap/20091106/ap_on_re_us/us_fort_hood_shooting
इथे वाचा.
हे वाक्य
A recent classmate said Hasan once gave a jarring presentation to students in which he argued the war on terrorism was a war against Islam
आणि हेही
http://www.foxnews.com/story/0,2933,572827,00.html
"He obviously didn’t want to go," said Duane Reasoner, 18, who looked up to Hasan as a sort of religious mentor. "He said he shouldn’t be going to Iraq, and Muslims shouldn’t be in the military — it was an obvious conflict of interest. Muslims shouldn’t be killing Muslims. He told me not to join the military."
हे सगळे सैन्यदळात भरती व्हायच्या आधी करायला हवे होते. सगळे फायदे उकळून झाल्यावर अशी उपरती होणे योग्य नाही.
आणि हे सगळे बाहेर आलेच पाहिजे. ह्यावर चर्चा झालीच पाहिजे. नाहीतर पुन्हा कधीतरी कुठेतरी अजून एक निदाल हसन मलिक असेच भयानक काहीतरी करायचा.
माणूस माथेफिरू झाला होता का त्याने समजून-उमजून वरील कृत्य केले याबद्दल तपास बहुदा केला जाईलच. पण एक-दोन प्रश्न पडले.
अमेरिकन सैन्यदल इतके ढिसाळ असेल असे वाटले नव्हते.
ढिसाळ म्हणजे काय? ज्यांना बंदुका धरण्याचे परवाने आहेत आणि जे लष्करी तळावरच आहेत त्यांच्यापैकी एकाने त्या बंदुकीचा वापर क्षणिक रागाच्या भरात सूड घेण्यासाठी किंवा समजा छुपा अतिरेकी असल्याने केला तर त्यात संपूर्ण अमेरिकन सैन्यदल ढिसाळ कसे काय ठरते?
असल्या नालायक माणसाला नोकरी देऊन आपल्याच पायावर कुर्हाड मारून घ्यायची काय गरज होती?
तो सुरूवातीपासून नोकरी देण्यास नालायक होता हे सिद्ध झालेले आहे का? त्याचा धर्म अमूक आहे म्हणून नोकरीसाठी तो नालायक ठरत नाही हे कृपया लक्षात घ्यावे. लोकशाही देशात सर्वांना धर्मनिरपेक्ष संधी उपलब्ध असाव्यात असे वाटत नाही का? त्यात एखाद्यावर केवळ तो एका धर्माचा आहे म्हणून संधी नाकारणे हे चुकीचे आहे.
बाकी ल. लां. म्हणतात,
"बाकीच्या अमेरिकनांनी तलवारी काढून अमेरिकेतल्या मुसलमानांना कापत सुटावे अशी तुमची अपेक्षा आहे का? भारत नाही आहे तो. "
हाही एक आरोपच झाला. २६ नोव्हेंबरनंतर सगळे भारतीय उठून कोणाच्या अंगावर तलवारी घेऊन कापत सुटल्याचे ऐकले नाही.
श्री लांडगा यांच्या प्रतिसादाशी सहमत असल्याने चित्रातैंच्या प्रतिसादातील असहमतीच्या मुद्द्यावर मत मांडत आहे. त्यांच्या बाकी प्रतिसादाशी सहमत आहे.
२६ नोव्हेंबरनंतर सगळे भारतीय उठून कोणाच्या अंगावर तलवारी घेऊन कापत सुटल्याचे ऐकले नाही.
२६ नोव्हेंबर मध्ये असे घडले नाही, हे भारतीय समाजाच्या प्रगल्भतेचे लक्षण आहे. (अर्थात तशी रास्त भिती व्यक्त होत होती.) परंतु गोध्रानंतर गुजरातेत जे घडले त्यानंतर 'भारतात असे घडू शकत नाही' या समजास तडा गेला. तेव्हा या आरोपात तथ्य नाही असे म्हणता येणार नाही.
अमेरिकेत एक अशीच गोष्ट घडली आहे - त्यामुळे सर्व अमेरिकनांना ते कापत सुटतात असे म्हणणार का?
१९९२ च्या रॉडनी किंगला मारहाण केल्यानंतर झालेल्या दंगली - तात्कालिक कारण पुढीलप्रमाणे सांगितले गेले.
http://en.wikipedia.org/wiki/Los_Angeles_riots_of_1992
In addition to the immediate trigger of the Rodney King verdicts, a range of other factors were cited as reasons for the unrest. Specific anger over the sentence given to a Korean American shop-owner for the shooting and killing of Latasha Harlins, an African American girl, was pointed to as a potential reason for the riots, particularly for the African-American/Korean-American tensions witnessed during the disturbances. Publications such as Newsweek and Time suggested that the source of these racial antagonisms was derived from cultural differences, and from perceptions amongst blacks that Korean-American merchants were taking money out of their community and refusing to hire blacks to work in their shops. According to this view, these tensions were intensified when the Korean-American shop owner, Soon Ja Du, was sentenced to five years probation for the killing of Harlins
वरील ठिकाणी झालेल्या हानीचे प्रमाण खालीलप्रमाणे होते असे सांगण्यात येते.
By the time the police, the US Army, the Marines and the National Guard restored order, the casualties included 53 deaths, 2,383 injuries, more than 7,000 fires, damages to 3,100 businesses, and nearly $1 billion in financial losses.
http://en.wikipedia.org/wiki/Rodney_King
चित्रातै, श्री लांडगा यांनी 'सर्व भारतीय (एका समाजातील ) कापत सूटले' असे विधान केलेले नाही. त्यांच्या मताचा मला समजलेला मतितार्थ असा: भारतात एखाद्या क्रियेची प्रतिक्रिया म्हणून ज्या घटनांचे समर्थन केले जाऊ शकते अथवा तशी प्रतिक्रिया व्हावी म्हणून आवाहने केली जातात. (उदाहरण वर दिले आहे. तसेच इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीखांविरुद्ध दंगली. या दोन्ही ठिकाणी पोलिसांनी बघ्याची भुमिका घेतली असे म्हणण्यास जागा आहे.) तसे अमेरिकेत घडू शकणार नाही. भारतात जमावास भडकावणे अमेरिकेच्या तुलनेत सोपे आहे, असे वाटले.
आपल्याला त्यांच्या विधानाचा कसा अर्थ जाणवला याची कल्पना नाही. पण आपल्या प्रतिसादावरून 'भारतात लोक रस्त्यावर येऊन सरसकट इतरांना कापत सुटतात' असे काहीसे असावे. श्री लांडगा यांना नेमके काय म्हणायचे आहे ते तेच स्पष्ट करू शकतील. पण आपण म्हणता तसा अर्थ त्यांना अभिप्रेत असल्यास आपल्या आक्षेपाशी मी सहमत आहे.
ल. लां. यांनी असे जे म्हटले आहे ते त्यांना तसेच म्हणायचे आहे असे मलाही वाटत नाही.
हे काही लोकांच्या (कदाचित मॉब/जमावाच्या) बेताल वागणुकीचे सार्वत्रिकीकरण जाते आहे त्याला माझा विरोध आहे. पोलिसांनी काय करायला हवे त्याचे आदेश बहुदा सरकार काढते. इथे म्हटल्याप्रमाणे
http://books.google.com/books?id=TprnBctKCE4C&pg=PA105&lpg=PA105&dq=police+response+Rodney+King&source=bl&ots=GOoNQj67-M&sig=WTTrdHs5pgeTv89ZBD9H2V8X6yE&hl=en&ei=AYH1So-fBImh8AbdrqjzCQ&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=3&ved=0CAwQ6AEwAg#v=onepage&q=police%20response%20Rodney%20King&f=false
दंगली होण्याच्या सुरूवातीला पोलिसांनी फारसे काही नियंत्रण केलेले दिसत नाही. याचा अर्थ हे अमेरिकेत घडले, म्हणून भारतातही चालावे असा नाही. फक्त ते अमेरिका म्हणजे काही भारत नाही, या वाक्याला छेद देऊन जाते असे मला वाटते.
जरी दोन्ही देशांत भरपूर फरक असले तरी वरील गोष्ट एवढेच दाखवते की जेव्हा भावना भडकलेल्या असतात तेव्हा अशा कुठच्याही देशातील माणसांच्या जमावांचे वागणे हे जुन्या रागद्वेषांवरून "सूड घेण्यात" बदलू शकते. यासाठी जर काही हवे असले तर ते एरवीच्या वेळी अतिरेकी बोलणे किंवा वागणे टाळणे.
आणि तो अतिरेकीपणा दोन्ही बाजूंचे लोक करीत असतात, आमच्यासारखे दोन्ही बाजू घेऊ न शकणारे मात्र एकदा याचे, आणि एकदा त्याचे, असे टोले परतवत राहतात. असो.
दोन-तीन दंगलींच्या नावे सगळ्या भारताला कायमस्वरूपी वेठीला धरले जाऊ नये; मात्र अशा दंगली परत होऊ नयेत म्हणून लोकशिक्षण व्हावे, इ. इ. मला वाटते.
दोन-तीन दंगलींच्या नावे सगळ्या भारताला कायमस्वरूपी वेठीला धरले जाऊ नये
भारतिय उपखंडाचा विचार केलात तर दंगली आपल्याला नव्या नाहीत चित्राताई. ह्यात धर्माचा संबंध नाही हे पुन्हा एकदा नमूद करतो. १९४७ पासुन बघा. फाळणीच्या वेळच्या दंगलीचा ईतिहास वाचलात तर अंगावर काटा येतो."त्यांनी" प्रेतांनी भरलेली ट्रेन पाठवणे.त्याला प्रत्युत्तर म्हणून इकडून तशीच ट्रेन पाठवणे.कलकत्त्यात ट्राम्सची तिकिटे महाग झाली की पेटवा गाड्या.कुठल्यातरी जातीला आरक्षण दिले की पेटवा परत गाड्या,सरकारी बसेस्.कुठल्यातरी पुतळ्याला कोणी भोंदु चपलांचा हार घालतो,दुकाने जाळा. कुठल्यातरी राजकिय नेत्याला अटक होते,जबरदस्तीने दुकाने बंद करा.कुठल्या तरी राजकिय नेत्याची हत्या होते-अमुक राज्य बंद्,लोकांना मारहाण्.दुसर्या राज्यातले लोक नोकरीला येतात्-कानाखाली आवाज काढा त्यांच्या.प्रत्येक ठिकाणी हिंसा आहे. बरोबर? अमेरिकेत अशा घटना घडतात का वारंवार? आपण बाहेर राहूनही भारताची बाजु घेता हे कौतुकास्पद आहे. पण एखादी गोष्ट वाईट असेल तर ते मान्य करायला काय हरकत आहे?भारतात अशा गोष्टींना राजकिय वरदहस्त असतो,बर्याचवेळा लोकांचा पाठींबा असतो हे मान्य आहे की नाही? अमेरिकेत ह्या गोष्टींना थारा दिला जात नाही.
एखादी गोष्ट चांगली असेल तर ती खुल्या दिलाने मान्य करावी. भारतातल्या लोकांच्या वाईट प्रवुत्तींवर टिका म्हणजे काही तुम्ही भारतविरोधी आहात असा अर्थ नाही होत.
लबाड लांडगा
आपला मुद्दा जरी बरोबर असला तरी यावर 'सामान्य लोक' ही कृत्ये करतात का? हा प्रश्न विचारात घेण्यासारखा आहे. गोध्रा सारख्या घटनांव्यतीरिक्त इतर दंगेखोर(इथे नक्की काय हे अजुनतरी गुलदस्त्यात आहे) हे 'लोक' नसुन राजकीय भाडोत्री गुंड, ज्याला ते युवा कार्यकर्ते म्हणतात, असतात असे मला वाटते, अर्थात मी हे सिद्ध करु शकत नाही पण आजतागायत माझ्या ओळखीतला/ऐकण्यात एकही निरपेक्ष(मतदान सोडुन इतर वेळेस) मतदार म्हणता येईल असा तरुण अशी गुंडगीरी करेल असे वाटत नाही.
सर्वप्रथम संपादकांचे अभिनंदन, शीर्षक संपादित करून आपले "निधर्मी" नाणे खणखणीत वाजवून दाखवल्याबद्दल!
>>
ढिसाळ म्हणजे काय? ज्यांना बंदुका धरण्याचे परवाने आहेत आणि जे लष्करी तळावरच आहेत त्यांच्यापैकी एकाने त्या बंदुकीचा वापर क्षणिक रागाच्या भरात सूड घेण्यासाठी किंवा समजा छुपा अतिरेकी असल्याने केला तर त्यात संपूर्ण अमेरिकन सैन्यदल ढिसाळ कसे काय ठरते?
<<
हा इसम त्याच्या सहकारी व अन्य लोकांशी इराक युद्धाविरुद्ध मते मांडत असे. अमेरिकेने सुरु केलेली युद्धे ही इस्लामविरोधी आहेत असे तारे तोडले होते. हे सगळे मॉनिटर करता येत नाही का सैन्याला? नसले तर ते घातक आहे. इतक्या धोक्याच्या घंटा वाजून त्याच्या विरुद्ध कडक कारवाई का नाही केली गेली? सैन्याकडून शिक्षणाची सुविधा घेऊन सैन्याची सेवा करण्याच्या करारावर सही केल्यानंतर असले काही विरोधी बोलण्याचा ह्या नालायकाला अधिकार नव्हता. आणि तरीही तो तसे करत असेल तर त्याला कडक समज वा अन्य कारवाई करणे आवश्यक होते.
हे सगळे मॉनिटर करता येत नाही का सैन्याला? नसले तर ते घातक आहे.
अहो, साधे इथे काहींना संपादक असून सगळे समजत असूनही काही नेट(नत) द्रष्टांना 'मॉनिटर करणे' अवघड जाते तसेच हे समजा ना. ;)
कधी निरूपद्रवी तोंडाला येईल ते बोलणे आणि खरोखरचे अतिरेकी विचार यातील सीमारेषा पुसट असते, त्यामुळे कधी कायद्यांच्या भितीमुळे, अधिकारांच्या कमतरतेमुळे, कधी योग्य मार्गदर्शनाअभावी काही करता येत नाही, असेही सैन्यातील लोकांचे होत असावे.
(बाकी मी जर माझ्या ऑफिसच्या निर्णयाबद्दल मला तो पटत नाही, अमूक एका कारणासाठी पटत नाही, असे म्हटले, तर लगेच वरिष्ठांनी रेड फ्लॅग लावून माझ्यावर कॅमेरे बसवावे, जाता येता माझे बोलणे ध्वनीमुद्रित करावे असे केले तर मला काम करणे नकोसे होईल हो. अर्थात सैन्यात विरोधी बोलणे चालते, का करायचे नसते, हे मी सैनिक नसल्याने मला माहिती नाही. )
आपण मिसळपाववरील सदस्यांचे लेखन मॉनिटर करणे आणि सैन्यात भरती झालेल्या सैनिकाचे वागणे मॉनिटर करणे ह्याची तुलना करत असाल तर आपली कीव करावीशी वाटते.
सैन्यात एकदिलाने काम करणे हे इतके महत्त्वाचे असते की त्यात कुचराई झाल्यास जीवनमरणाचा फरक होऊ शकतो. फंदफितुरीचा फटका फौजेइतका दुसर्या कुठल्या व्यवसायात होत असेल असे वाटत नाही. अगदी डॉक्टर असला तरी तो वेळप्रसंगी युद्धात सामील व्हायला योग्य असावा लागतो.
अमेरिकेविरुद्ध सतत बोलणारा, अतिरेकाविरुद्ध पुकारलेले युद्ध म्हणजे इस्लामविरुद्ध युद्ध असे म्हणणारा असला इसम युद्धभूमीवर पाठवणे म्हणजे ढिसाळपणाचा एक नमुना आहे.
करदात्यांचा अमाप पैसा खर्च करून असल्या अवलादीला नोकरीला लावणे म्हणजे त्या पैशाचा अपमान आहे.
ऑफिसातले काम आणि सैनिकाचे काम ह्यात खूप फरक आहे हो. तुम्हाला खरेच कळत नाही का तुम्ही वेड पांघरून पेडगावला जात आहात? सैन्यात भरती होताना व्यक्तीस्वातंत्र्यावर खूप खूप बंधने घातली जातात. आणि ती सुरक्षितता, सैनिकांच्या हिताकरता ह्या कारणाकरताच. हे सगळे पटत नसल्यास सैन्यात भरती होऊ नये हे उत्तम. त्याच्या सगळ्या सवलती लाटून युद्धाला पाठवायची वेळ आल्यावर अल्लाहु अकबर म्हणून बेछूट गोळीबार करणे हा हलकटपणा आहे.
हरकत नाही माझी कीव केलीत म्हणून. माझी बुद्धी सध्या पेंडच खाते आहे, नाहीतरी.
करदात्यांचा अमाप पैसा खर्च करून असल्या अवलादीला नोकरीला लावणे म्हणजे त्या पैशाचा अपमान आहे.
ठीक. आधी मुळात नको त्या ठिकाणी युद्धे सुरू करणे यातच करदात्यांच्या पैशाचा अपमान झालेला आहे ते आपण सध्या बाजूला ठेवू.
मी आधीच सांगितले आहे, मी सैनिक नसल्याने नक्की कुठचे बोलणे हे योग्य आहे आणि सीमारेषेबाहेरचे आहे, (शिवाय त्याची शिक्षा काय असावी/असते) हे मला माहिती नाही. तुम्हाला माहिती असल्यास (विशेषतः लष्करी कॉलेजमधून शिक्षण झाल्यास अशा लोकांना शिक्षण संपल्यावर लष्करी कामकाज मिळण्याआधी काही अटींची पूर्तता करावी लागते का, हे मला तरी माहिती नाही) जरूर सांगा.
मी परत एकदा सांगते - (हे माझ्या अनुभवावरून) एखाद्या बाबतीत नुसतेच विरोधी बोलणे आणि ती सीमारेषा ओलांडून पलिकडे जाणे ह्यातला फरक समजणे कठीण असते, समजला तरी नियंत्रण करणे कठीण असते. कायदे किचकट असतात. एखाद्या माणसाच्या वेडसरपणाची नुसती शंका आल्यावर त्या माणसाला प्रवेश बंद होत नाही, त्यासाठी इतर काही चिकित्सा लागतात.
डॉक्टराने मेडिकल कॉलेजमधील त्याचा निदालबरोबरचा अनुभव सांगितला आहे त्यावरून कळावे की तो असे काही करेल याची शंका त्याच्या टीकाकारांनाही सुरूवातीस आली नव्हती. -http://abclocal.go.com/kabc/story?section=news/local/los_angeles&id=7106859
Finnell said Hasan would become visibly upset when people challenged him about his beliefs, but no one ever thought he would resort to such violence.
"My reaction was first I was shocked. But then knowing the extreme beliefs that Maj. Hasan had, I was not surprised," said Finnell.
एखाद्या बाबतीत नुसतेच विरोधी बोलणे आणि ती सीमारेषा ओलांडून पलिकडे जाणे ह्यातला फरक समजणे कठीण असते, समजला तरी नियंत्रण करणे कठीण असते. कायदे किचकट असतात. एखाद्या माणसाच्या वेडसरपणाची नुसती शंका आल्यावर त्या माणसाला प्रवेश बंद होत नाही, त्यासाठी इतर काही चिकित्सा लागतात.
१००% सहमत
'हे एका दुष्ट धर्माचे कृत्य आहे ' इथपासून 'ह्याचा धर्माशी अजिबात संबंध नाही, हे एका माथेफिरू व्यक्तिचे काम आहे' -- अजून फारशी बातमी हाती आली नसतांना ह्या दोन्ही टोकाच्या भूमिका लोक कसे घेऊ शकतात, हे कळत नाही.
सी. एन. एन. ने आताच ही बातमी दिली आहे:
http://edition.cnn.com/2009/CRIME/11/06/fort.hood.suspect.muslim/index.html
अखिल विश्वात अमेरिकन समाज सर्वात सभ्य समाज आहे.भारतात कामचुकार,टुकार,साध्या साध्या गोष्टीत भड़कणारे लोक राहतात.
हे मला माहितच नव्हते.
अमेरिकन लोकांचे कौतुक वाटते मला किती सहनशील व सभ्य समाज आहे.
वेताळ
अगदी अगदी !
सहमत आहे. अमेरिकन म्हणजे अगदी सकाळ संध्याकाळ आरती केली तरी कमीच.. !
आता अमेरिकनांमधे आरती करत नसावेत.. ते काम दगडाला पूजणा-या बिनडोक, बेअक्कल, अर्धवट, अशिक्षित निवासी हिंदूचे.. ! :)
अमेरिकेने पाच पन्नास अणूध्वम टाकुन असल्या जगायला नालायक हिंदूना मारुन टाकावे अशी आमची ओबामाचरणी विनम्र प्रार्थना !
सगळयात पहिला आमच्या डोक्यावरच टाकावा.. !
जय हो अमेरिकन ! जय हो अमेरिकन !!
तुम्ही आहात म्हणुन मानवता टिकुन आहे हो.. !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
नव्हे, नव्हे, अवलियासाहेब!
<<जय हो अमेरिकन ! जय हो अमेरिकन !!
तुम्ही आहात म्हणुन मानवता टिकुन आहे हो.. ! >>
या ऐवजी
"तुम्ही आहात म्हणून पाकिस्तान (टिकून) आहे
व पाकिस्तान टिकून आहे म्हणून भारत अजून सुपरपॉवर झालेला नाही"
किती हे उपकार !
जय अमेरिका !!
------------------------
असेल हिंमत व आवड, तर ऐका हे मुळात पंकज उधासने गायलेले गीत! http://www.youtube.com/watch?v=4HUwuNk0Tc4
हा दुवा उघडा व निदाल मलिक हसनबद्दल सध्या काय चर्चा चालू आहे ते वाचा!
http://tinyurl.com/yjelba8
नकाशात पाकिस्तानचा किती मोठा भाग अतिरेक्यांच्या (पाकिस्तानी तालीबान व पाकिस्तानी अल-कायदा) ताब्यात आहे हेही पाहू शकाल.
पाकिस्तानी सेनेची जर अशीच पीछेहाट होत राहिली तर तो देश लवकरच अतिरेक्यांच्या/कर्मठ लोकांच्या हाती जाण्याची जबरदस्त शक्यता आहे. (कारण पैसेखाऊ अधिकार्यांच्याबद्दल सैन्यातील जवानांना काय आदर असणार?)
पाकिस्तान असे चुकीच्या लोकांच्या हाती पडले तर मात्र काय होईल ते सांगणे कठिण आहे!
वरील लेखावरच्या वाचकाच्या (बर्याच प्रमाणावर समतोल) प्रतिक्रिया वाचा या खालील दुव्यावर!
http://tinyurl.com/yk32u4o
सुधीर
------------------------
http://tinyurl.com/yg4oklu वर दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या समारंभात मी गायलेले व की-बोर्डवर साथ दिलेले गीत ऐका!
इथल्या संपादक मंडळाप्रमाणे उर्वरित मिडियाही हळूवार मनाचे दिसत आहेत. ह्या नराधमाविषयी फारशा बातम्या ऐकू येत नाहीत. त्याच्या धर्माचा तर उल्लेखही होत नाही.
बहुधा कोंबडे झाकल्याने सूर्य उगवायचा थांबत नाही ही म्हण खोटी असावी. तमाम कोंबडेमालकांनी आपापली कोंबडी झाकली तर सूर्य उगवायचा थांबेलही कदाचित. बघू या पुढच्या हाहाकारापर्यंत वाट बघू या!
पूर्वी इजिप्त एअरच्या एका को-पायलटने मेन पायलट बाथरूमला गेलेला असताना असेच अचानक अल्लाह चे नाव घेत विमानाची इंजिने बंद करुन आणि कंट्रोल खाली दाबून धरून विमान क्रॅश केलं आणि सर्व २१७ लोक मारले गेले.
बाथरूमहून परत आलेला मेन पायलट हे पाहून शॉक झाला त्याने विमानाचे नाक वर घेण्यासाठी खूप झगडा केला पण काही करू शकला नाही कारण को पायलटने आपलं प्रेशर कॉलमवर धरुन ठेवलं. मग विमान ऑलरेडी रिकव्हर होण्यापलिकडे डाईव्ह मधे गेलं.
फ्लाईट डाता रेकॉर्डरमधे दोघांच्या विरुद्ध दिशेच्या खेचाखेचीचं धक्कदयक चित्रण आहे.
विमान पाडता पाडता. तो सतत Tawakkalt ala Allah असे म्हणत होता.
अधिक माहिती हवी असल्यासः
http://en.wikipedia.org/wiki/EgyptAir_Flight_990
त्याने हे कृत्य हॅरॅशमेंटमुळे केले म्हणतात. आता यात धर्माचा संबंध किती माहीत नाही. पण माथेफिरुपणा मात्र होता.
शिवायः
http://www.independent.co.uk/news/world/americas/egyptair-crash-was-copilots-revenge-for-harassment-claim-654144.html
ह्या हरामी, कृतघ्न निदाल हसनला एकदाची मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली. हलकटाने अनेक युक्त्या प्रयुक्त्या वापरुन खटला पुढे ढकलायचा प्रयत्न केला. दाढी वाढवू द्यायची का नाही ह्या निरर्थक मुद्द्यावर अनेकदा खल केला गेला.
पण अमेरिका असल्यामुळे खटला सुरु झाल्यावर फार आढेवेढे न घेता शिक्षा सुनावली गेली. आता सदर महात्मा ७२ कुमारिका मनःपूत भोगण्याकरता कधी रवाना होतो ते बघायचे! इतक्या काफिरांना निर्घृणपणे मारले असल्यामुळे निदान डझनभर तरी मिळाव्यात!
http://www.foxnews.com/us/2013/08/28/fort-hood-gunman-maj-nidal-hasan-sentenced-to-death/?test=latestnews
मंगल पांडेने १८५७ साली जे केलं तेच यानेही केलं - आपल्या धार्मिक भावना सैनिकी कर्तव्यापेक्षा महत्त्वाच्या मानल्या. दोघांनाही तीच शिक्षा झाली. मंगल पांडेविषयी तुम्ही अशीच तुच्छतेची भूमिका घेत आहात असं गृहित धरतो.
कुणावर हल्ला केला: सशस्त्र ब्रिटिश सैनिकांवर. मंगल पांडेवर गोळ्या झाडल्या गेल्या पण तो वाचला.
मंगल पांडेचे सैन्यातील स्थानः एक सामान्य शिपाई. १८५७ मधे गोर्या सैनिकांचे स्थान हे काळ्यांच्या कायम वरती असायचे. आपल्या देशात आपल्या रंगामुळे दुय्यम स्थान मिळणे हे खचितच आनंददायक नसावे.
हिंसक व्हायचे कारणः गाईच्या चरबीत बुडवलेल्या बंदुकीच्या गोळ्या तोंडाने उघडणे एक धार्मिक हिंदू म्हणून अपमानकारक वाटले आणि त्यावर दाद मागून काही उपयोग झाला नाही.
किती लोक मारले: १
निदाल हसन
स्थळः अमेरिकेचा अमेरिकेतील लष्करी तळ.
कुणावर हल्ला केला: नि:शस्त्र कर्मचारी. त्यात एक गर्भवती स्त्रीही होती जी मारली गेली
निदाल हसनचे सैन्यातील स्थानः त्याला डॉक्टर बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. पूर्णपणे सैन्याच्या खर्चाने. त्याला कुठल्याही प्रकारचा भेदभाव सहन करायला लागल्याची नोंद नाही. अमेरिकेत डॉक्टर बनणे हे महाखर्चिक प्रकरण आहे. अनेक अमेरिकन गोर्यांच्याही आवाक्याबाहेरचे आहे. ते उच्चशिक्षण ह्या इसमाला दिले गेले. ते घेताना अमेरिकेचे इस्लामविरोधी वागणे विचारात घेऊन ते नाकारण्याचा मोठेपणा दाखवला नाही. उलट हा इसम अनेक प्रसंगी अमेरिकेविरुद्ध गरळ ओकला होता त्याकडे काणाडोळा करण्यात आला.
हिंसक व्हायचे कारणः हा इसम अमेरिकेत जन्मलेला. आईबाप पॅलिस्टिनी. अमेरिकेने पॅलिस्टीनवर हल्ला केलेला नव्हता. निव्वळ अमेरिकेने काही मुस्लिम देशांवर हल्ला केला म्हणून सदर इसम बिथरला आणि त्याने बेछूट गोळीबार केला.
किती लोक मेले: १३ मृत, ३० जखमी
हे फरक वाचून आपले दोन्ही सारखेच हे बिनडोक मत बदलले असेल अशी एक अंधुक आशा.
कदाचित आपण निदाल हसनला शिरसावंद्य हुतात्मा मानत असाल. पण अन्य कुठल्या देशाचे लोक त्याला हुतात्मा मानतील? अफगाणिस्तान? पाकिस्तान? सौदी अरेबिया? येमेन?
तुमचं लंबंचवडं उत्तर वाचून धार्मिक हिंदू लोक कधीच डोकेफिरूपणा करत नाहीत हे तुमचं मत आहे असं लक्षात आलं. तसं असेल नाहीतर मंगल पांडे डॉक्टर नसल्यामुळे त्याने जे काही केलं ते डोकेफिरूपणा नसेल असं कदाचित असेल.
पण एक कळलं नाही, मंगल पांडेला जर आपला देश परक्यांनी बळकावल्याचं इतकं वाईट वाटत होतं, तर प्रसंगी आपल्याच देशातल्या इतरांवर गोळ्या झाडायला भाग पडेल अशा प्रकारची परक्यांच्या सैन्यातच नोकरी का केली असावी?
महादेव गोविंद रानडे आख्खी हयात ब्रिटिश सरकारच्या सेवेत होते. त्यांनाही हाच नियम लागू होतो का? संभाजी महाराज औरंगजेबाचे मनसबदार होते. त्यांनाही हाच नियम लागू होतो का?
मंगल पांडेचा उद्रेक आणि मलिकचा धिंगाणा यात काहीच फरक नाही असे तुम्ही कसे काय म्हणु शकता?
मलिकने धिंगाणा घातला तो त्याला इराक अफ्गाणिस्तानात जाऊन मुसलमानांना मारायला लागणार म्हणुन. थोडक्यात अल कायदा याला भावासारखे पण याला पोसणारा, संपन्न करणारा देश आणी त्यातील निरपराध नागरिक याचे दुष्मन.
मंगल पांडे बिथरला कारण सैन्यातील अधिकारी त्याच्यावर गोमांसाचे आवरण असलेल्या काडतुसा तोडण्याची जबरदस्ती करत होते. जे त्याला नामंजूर होते. सशस्त्र उठाव असाही उंबरठ्यावर होता आणि हे त्याला माहिती होते. अश्या परिस्थितीत त्याने माथेफिरुपणाने त्याला थोडी लवकर सुरुवात केली. ज्यामुळे उठावाचे नुकसान झाले हे मान्य आहे पण त्यामुळे तो मलिकच्या रांगेत जाउन बसत नाही. कारण तो एका परकीय सत्ते विरुद्धच्या सशस्त्र लढ्याचा भाग होता. मंगल पांडे ब्रिटन मध्ये जाउन, त्यांचेच अन्न खाउन, त्यांच्याच संपत्तीवर पोसला जाउन, त्यांच्याच निरपराध नागरिकांना मारत नव्हता.
रस्त्यावर बेछूट गोळीबार करणारा माथेफिरु आणि एका परकीय सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा देणारा सैनिका यामध्ये काहितरी फरक असतो की नाही?
- स्थळःस्वतःचा देश जो इंग्रजांनी बळकावला होता.
- कुणावर हल्ला केला: सशस्त्र ब्रिटिश सैनिकांवर. मंगल पांडेवर गोळ्या झाडल्या गेल्या पण तो वाचला.
- मंगल पांडेचे सैन्यातील स्थानः एक सामान्य शिपाई. १८५७ मधे गोर्या सैनिकांचे स्थान हे काळ्यांच्या कायम वरती असायचे. आपल्या देशात आपल्या रंगामुळे दुय्यम स्थान मिळणे हे खचितच आनंददायक नसावे.
- हिंसक व्हायचे कारणः गाईच्या चरबीत बुडवलेल्या बंदुकीच्या गोळ्या तोंडाने उघडणे एक धार्मिक हिंदू म्हणून अपमानकारक वाटले आणि त्यावर दाद मागून काही उपयोग झाला नाही.
- किती लोक मारले: १
निदाल हसन- स्थळः अमेरिकेचा अमेरिकेतील लष्करी तळ.
- कुणावर हल्ला केला: नि:शस्त्र कर्मचारी. त्यात एक गर्भवती स्त्रीही होती जी मारली गेली
- निदाल हसनचे सैन्यातील स्थानः त्याला डॉक्टर बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. पूर्णपणे सैन्याच्या खर्चाने. त्याला कुठल्याही प्रकारचा भेदभाव सहन करायला लागल्याची नोंद नाही. अमेरिकेत डॉक्टर बनणे हे महाखर्चिक प्रकरण आहे. अनेक अमेरिकन गोर्यांच्याही आवाक्याबाहेरचे आहे. ते उच्चशिक्षण ह्या इसमाला दिले गेले. ते घेताना अमेरिकेचे इस्लामविरोधी वागणे विचारात घेऊन ते नाकारण्याचा मोठेपणा दाखवला नाही. उलट हा इसम अनेक प्रसंगी अमेरिकेविरुद्ध गरळ ओकला होता त्याकडे काणाडोळा करण्यात आला.
- हिंसक व्हायचे कारणः हा इसम अमेरिकेत जन्मलेला. आईबाप पॅलिस्टिनी. अमेरिकेने पॅलिस्टीनवर हल्ला केलेला नव्हता. निव्वळ अमेरिकेने काही मुस्लिम देशांवर हल्ला केला म्हणून सदर इसम बिथरला आणि त्याने बेछूट गोळीबार केला.
- किती लोक मेले: १३ मृत, ३० जखमी
हे फरक वाचून आपले दोन्ही सारखेच हे बिनडोक मत बदलले असेल अशी एक अंधुक आशा. कदाचित आपण निदाल हसनला शिरसावंद्य हुतात्मा मानत असाल. पण अन्य कुठल्या देशाचे लोक त्याला हुतात्मा मानतील? अफगाणिस्तान? पाकिस्तान? सौदी अरेबिया? येमेन?