Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग २

ह
हैयो हैयैयो
Sat, 03/06/2010 - 11:53
🗣 17 प्रतिसाद

Book traversal links for असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग २

  • ‹ असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय?
  • Up
  • असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग ३ ›

प्रतिक्रिया द्या
7679 वाचन

💬 प्रतिसाद (17)
श
शुचि Sat, 03/06/2010 - 16:12 नवीन
फारच सुंदर , अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहे. आनंद लुटला. . मला मराठीत अशी कविता सपडली नाही दुर्देवाने. संस्कृतमधील "मधुराष्टक" याच धर्तीवर आहे. http://www.stutimandal.com/gif_misc/madhurashtakam.htm असे लेख येऊ अजून द्यात. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 03/06/2010 - 17:49 नवीन
आपले जाम आवडते गाणे आहे हे. छोटी सी आशा वेताळ
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 03/06/2010 - 18:03 नवीन
वा...भाग २ आला याचा आनंद झाला... :) असचं मराठी गाणं ह्म्म्म..शोधायला हवं खरं.... बाकी ए.आर म्हंटलं की मला हेच ऐकावेसे वाटते... http://www.youtube.com/watch?v=7HVsGIj5fdY हैयो महाशय हे जर तमिळ असेल तर ते मला आवडत... http://www.youtube.com/watch?v=J_RKWIz5dyE मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 03/06/2010 - 18:47 नवीन
छान लेख. गाणेही आवडतेच. - - - येथे मी गोविंदाग्रजांचे महाराष्ट्र गीत मराठीतले उदाहरण म्हणून दिले होते. प्रतिसाद उडाल्याबद्दल आश्चर्य वाटत आहे.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Sat, 03/06/2010 - 18:54 नवीन
कुठचे तरी मराठी गाणे असे असणार असे वाटत होते, ते सांगितल्याबद्दल धन्यवाद. गाण्याच्या अर्थाबद्दल हैय्यो हैय्यय्यो यांचे आभार. ** इथे सध्या मी एकटीच संपादक (आणि तात्या) दिसत आहेत, म्हणून खुलासा - प्रतिसाद कधी लिहीला आणि कोणी काय उडवला/चुकून उडला हे मला माहिती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
व
विसोबा खेचर Sat, 03/06/2010 - 19:01 नवीन
इथे सध्या मी एकटीच संपादक (आणि तात्या) दिसत आहेत, म्हणून खुलासा - प्रतिसाद कधी लिहीला आणि कोणी काय उडवला/चुकून उडला हे मला माहिती नाही.
मलाही काहीच कल्पना नाही.. नक्कीच चौकशी करतो.. धनंजयराव, क्षमा असावी, तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
श
शुचि Sat, 03/06/2010 - 18:59 नवीन
छान उदाहरण दिलत ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 03/06/2010 - 19:42 नवीन
>>येथे मी गोविंदाग्रजांचे महाराष्ट्र गीत मराठीतले उदाहरण म्हणून दिले होते. प्रतिसाद उडाल्याबद्दल आश्चर्य वाटत आहे. आपण उपक्रमवर गोविंदाग्रजांचे उदाहरण दिले आहे. आपण प्रतिसाद इथेच टंकला होता का ? कारण उपक्रमच्या त्या धाग्यावर आपला प्रतिसाद तिथे विनाकारण आला आहे, असे मला वाटते. राहिले प्रतिसाद उडवण्याबद्दल, एकतर सध्या वाचायलाच वेळ मिळत नाही. आणि गेले महिनाभरात आम्हाला एकही प्रतिसाद संपादित किंवा डिलीट करण्याची संधी संपादक म्हणून मिळालेली नाही. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ज
ज्ञानेश... Sat, 03/06/2010 - 19:20 नवीन
हैयो चे आभार ! मराठीत असा 'काव्यप्रकार' बहुधा नाही, पण अशी कविता मात्र आहे. सुरेश भटांची ही कविता पहा- लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी || आमुच्या मनामनात दंगते मराठी आमुच्या उराउरात स्पंदते मराठी आमुच्या नसानसात नाचते मराठी आमुच्या रगारगात रंगते मराठी || आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी आमुच्या लहानग्यात रांगते मराठी आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी आमुच्या घराघरात वाढते मराठी || आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी आमुच्या फुलाफुलात हासते मराठी आमुच्या दिशादिशात दाटते मराठी आमुच्या नगानगात गर्जते मराठी || येथल्या दरीदरीत हिंडते मराठी येथल्या वनावनात गुंजते मराठी येथल्या तरूलतात साजते मराठी येथल्या कळीकळीत लाजते मराठी || येथल्या नभामधून वर्षते मराठी येथल्या पिकामधून डोलते मराठी येथल्या नद्यामधून वाहते मराठी येथल्या चराचरांत राहते मराठी || पाहूणे जरी असंख्य पोसते मराठी आपुल्या घरीच हाल सोसते मराठी हे असे अनेक खेळ पाहते मराठी शेवटी मदांध तख्त फोडते मराठी || जय महाराष्ट्र !
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 03/06/2010 - 19:47 नवीन
तामिळ भाषेतील काव्य आणि त्याची वैशिष्टे समजून घेण्यात आनंद वाटत आहे. अजून लिहित राहावे...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 03/06/2010 - 23:10 नवीन
बिरुटे सरांनी बघितले ते खरेच! तात्या, चित्रा - माझी चूक - प्रतिसाद चुकीच्या ठिकाणी टंकला... - - - महाराष्ट्र गीत - गोविंदाग्रज मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा! प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।धृ.।। राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा। नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा।। अंजनकांचनकरवंदीच्या काटेरी देशा। बकुलफुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशा।। भावभक्तिच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा। शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दाच्या देशा। ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणवरी नाचते करी।। जोडी इहपरलोकांसी व्यवहारापरमार्थासी वैभवासी वैराग्यासी।। जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा।। प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।1।। - - - (जवळजवळ प्रत्येक ओळीच्या शेवटी "देशा" आहे.)
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sun, 03/07/2010 - 00:05 नवीन
मूळ कवितेचे शब्द व त्याशेजारी अर्थ वाचता आला तर कवीच्या प्रतिभेची थोडी का होईना कल्पना यायला मदत होते मेहङ्गळै ऎल्लाम् तॊट्टु विड आसै --सार्‍या ढगांना स्पर्शून सोडण्याची इच्छा सोहङ्गळै ऎल्लाम् विट्टु विड आसै --सार्‍या दु:खांना सोडून टाकण्याची इच्छा या दोन ओळीत नादसाम्य तर आहेच, पण सोडणे हा शब्द दोन वेगळ्या छटांनी आलेला दिसतो. मराठीत त्या दोन छटा आहेत, पण क्रम बदलावा लागतो. प्रत्येक ओळीत आलेली शब्दचित्र सुंदरच. रोजा बघितला तेव्हा हिंदी गाण्यातून इतका अर्थ प्रतीत झाला नव्हता. शेवटचे शब्द एकच ठेवून केलेल्या रचना आत्ता सुचत नाहीत. पण मोरोपंतांच्या काही होत्या असं वाटतं. अर्थात त्यांनी एकच शब्द - किंवा अक्षरमाला वेगवेगळ्या ठिकाणी तोडून अनेक अर्थ बनवले होते. त्यात एक यांत्रिकता, किंवा अतिरेकी कौशल्य येतं असं वाटतं. 'महाराष्ट्र देशा' किंवा 'मराठी' सारखी सहजता नव्हती. आसै मध्ये ती खूपच जाणवते. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 03/07/2010 - 01:15 नवीन
'रोजा'तलं हे दिल है छोटासा गाणं अफलातूनच आहे. हिंदी तर आवडतच पण आता तमिळ अर्थ माहीत झाल्यामुळे आधी नुसतीच आवडणारी चाल आता अर्थासहित आवडू शकेल ह्याचे अप्रूप आहे! हैयोंना धन्यवाद. वरती राजेशने म्हटले आहे तसे मोरोपंतांच्या काही चमत्कृतीपूर्ण रचना पूर्वी पाठ केल्या होत्या त्यातली एक अचानक आठवली - देविदयावति दवडिसि दासाची दु:ख दुर्दशा दूर पापाते पळवितसे परमपवित्रे तुझा पयःपूर चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव Sun, 03/07/2010 - 09:01 नवीन
वळीच्या शेवटी तेच तेच शब्द मराठी कवितेत हायेत सुरेश भटायच्या 'कुत्रे' या हजलेतील चार वळी पाहा एकमेकांना कसे हे चावती कुत्रे. हाडकांसाठी कसे हे भांडती कुत्रे. हालती या शेपट्याही नेमक्या वेळी हे जरी संतापलेले वाटती कुत्रे. हैयो हैयैयो साहेब मंगेश पाडगावकराच्या काय कवितेच्या सुरुवातीला सारखे शब्द येतात तुमच्या तामिळी कवितेत हाय का तसं ? बाबुराव :)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Sun, 03/07/2010 - 13:15 नवीन
गझल (किंवा हजल)चा फॉर्म असाच असतो, की तिथे दर एका ओळीआड एकच शब्द (अंत्ययमक/रदीफ) येतो. आणि हे प्रत्येक गझलेत होते. 'हैयो' ला हे नक्कीच अभिप्रेत नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबुराव
ऋ
ऋषिकेश Sun, 03/07/2010 - 10:37 नवीन
सुंदर लेखमाला पुढील भागासाठी उत्सूक ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Tue, 03/09/2010 - 19:53 नवीन
श्री. हैयौ हैयैयो, तमिळ काव्य, साहित्य, संगीत रसग्रहण करणाऱ्या नीरक्षीर विवेकी हैयोंना त्रिवार सलाम. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा