Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

व
विकास
गुरुवार, 04/29/2010 - 05:37
🗣 73 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
21439 वाचन

💬 प्रतिसाद (73)
व
विकास गुरुवार, 04/29/2010 - 05:38 नवीन
वरील धाग्याची सुरवात करत आहे: पहीला मानः भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२) यांना देतो. त्यांचे गाजावाजा न करता केलेले सामाजिक कार्य स्फुर्तिदायी आहेच. त्याशिवाय ऐकीव माहीती प्रमाणे, जेंव्हा १९५८ साली त्यांना भारतरत्न प्रदान केले गेले, तेंव्हा त्यांनी नेहरूंना "संयुक्त महाराष्ट्र" स्थापना राहील्याची आठवण करू दिली होती. चिंतामणराव देशमुख (१८९६-१९८२)खः रिझर्व बँकेचे पहीले भारतीय गव्हर्नर (१९४३). नंतर नेहरूंच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री. नेहरूंनी जेंव्हा एकहाती मुंबई केंद्रशासित करण्याचा निर्णय जाहीर केला, तेंव्हा "तुम्हाला महाराष्ट्राबद्दल आकस आहे" असे म्हणत राजीनामा दिला आणि मागे घेतला नाही. नंतर नेहरूंच्या विनंतीस मान देऊन युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचे पहीले अध्यक्ष झाले खरे, पण केवळ रू. १ च्या मानधनावर, देशासाठी. आचार्य अत्रे: संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील एक सेनानी. तसेच बहुरंगी व्यक्तिमत्व! -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
द
दीपक उभे गुरुवार, 04/29/2010 - 10:40 नवीन
महाराष्ट्र स्थापनेच्या इतिहासाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 04/29/2010 - 12:08 नवीन
१. र.धों. कर्वे २. डॉ. प्रकाश आमटे ३. डॉ. अब्दुल कलाम आझाद सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
पाषाणभेद गुरुवार, 04/29/2010 - 16:33 नवीन
डॉ. अब्दुल कलाम आझाद मराठी कसे? Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
व
वाहीदा Sat, 05/01/2010 - 11:08 नवीन
डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर डॉ. जयंत नारळीकर अवांतर - चुकून नाव आले असेल.. आता तरी खुश ? चांगल्या धाग्यात उगाच वादविवाद नको :-) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
न
नेत्रेश Fri, 04/30/2010 - 00:43 नवीन
१. शिल्पा शिरोडकर २. किमी काटकर ३. राखी सावंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/29/2010 - 05:49 नवीन
'' माझे स्वप्न केवळ राजकीय सत्ता मिळविण्याचे नव्हते, तर समतेसाठी आवश्यक ते समाजपरिवर्तन घडवून आणण्याचे होते. संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर सत्ता अधिक लोकांकडे आली, लोकशाहीचे विकेंद्रीकरण झाले. परंतू ही सत्ता आता अधिक खालच्या व मागासलेल्या लोकांच्या हाती जाण्याई प्रक्रिया थांबली आहे. तसे काही विभाग मागासलेले राहून प्रादेशिक असमतोलही निर्माण झाला आहे. अशा वेळी जागृत जनसंघटनेच्या आधारे सत्तेच्या विकेंद्रीकरण व समतेकडे नेणारी सामाजिक परिवर्तनाची कामे निरनिराळ्या मार्गांनी व्हायला पाहिजेत. परिवर्तनाचे अटकलेले चक्र पुनश्च गतिमान व्हावयास हवे. '' संदर्भ : संयुक्त महाराष्ट्र : स्वप्न आणि वास्तव या एस.एम. जोशी यांच्या लेखातून. अजून एक मराठी मनावर प्रभाव असलेले नाव. सेनापती बापट. सेनापती बापटांनी लंडन येथील वास्तव्यादरम्यान बॉम्ब बनवण्याची कला हस्तगत केली. असे असले तरी "माझ्या बॉम्बमुळे एकही बळी गेला नाही". ते फक्त आमच्या कार्याकडे ल़क्ष वेधण्यास केले गेले होते" असे त्याचे म्हणणे होते. [मराठी विकिपीडियावरुन] याच सेनापती बापटांनी न्हावी दाढी करायला आला नाही म्हणून नंतर कधीच हजामत केली नाही असे म्हणतात. चुभुदेघे. :) अजून खूप नावे सांगता येतील. फूरसतीने त्यांची नावे आणि जराशी माहिती टंकतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
I
II विकास II गुरुवार, 04/29/2010 - 06:25 नवीन
>>एक आणि जास्तीत जास्त तीन स्फुर्तिदायी मराठी व्यक्तींची नावे येथे प्रतिसादांमधे लिहीत हा धागा मोठा करूया. :( स्वातंत्र्य वीर सावरकर शाहुराजे(चौथे, कोल्हापुरचे) महात्मा जोतिबा फुले (अधिक माहीती सवडीने) -- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 04/29/2010 - 06:30 नवीन
ह्म्म... संयुक्त महाराष्ट्राचे १०६ हुतात्मे :--- http://bit.ly/asrHZu या पैकी कोणाचीही विशेष माहिती महाराष्ट्र सरकारकडे नाही असे हल्लीच ऐकले आहे...म्हणजे यांचे कोणाचे वंशज जिवंत आहेत की नाही,घराचा पत्ता इ. जाता जाता :---- मुंबई, डांग, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदरसह संयुक्‍त महाराष्ट्र "झालाच" पाहिजे...असं म्हणणार्‍यांना फक्त एव्हढच सांगावेसे वाटते, अजुन ५० वर्ष वाट बघा !!!.कोणाला आहे तुमची पर्वा??? कसला आलाय मराठीचा अभिमान? इथे ठाण्यातच परप्रांतिय इतके झाले आहेत की आम्हीच महाराष्ट्रात आहोत का असा प्रश्न हल्ली मलाच पडतो !!! कर्जात बुडालेल्या...पाणी आणि वीज या मूलभूत सेवा देखील जनतेला न देऊ शकणार्‍या महाराष्ट्रात सामील होऊन काय मिळाणार तुम्हाला ? मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 04/29/2010 - 06:19 नवीन
बाबा आमटे: यांच्याबद्दल काहि लिहायची गरज आहे? अण्णा हजारे: माहीतीच्या अधिकाराचे प्रणेते पु.ल. देशपांडे: अखिल मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारे लेखक, वादक, गायक, अभिनेते, दिग्दर्शक वगैरे वगैरे वगैरे टिपः ३ ची अट जाचक आहे.. निदान १० तरी लिहू द्या हो ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments
अ
अमोल नागपूरकर गुरुवार, 04/29/2010 - 06:25 नवीन
महाराष्ट्र राज्य स्थापनेस सध्या ५० वर्षे पूर्ण होत आहेत. अभय बन्ग, सुरेश भट आणि विनोबा भावे
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 04/29/2010 - 13:24 नवीन
डोक्यात पन्नासच होते आणि टाईप करताना (टायपो) चुकलो. दुरूस्ती केली आहे. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल नागपूरकर
I
II विकास II गुरुवार, 04/29/2010 - 06:26 नवीन
>>टिपः ३ ची अट जाचक आहे.. निदान १० तरी लिहू द्या हो काका, ह्याच धर्तीवर आता, ३ आवडलेल्या मराठी माणसावर मराठी लेख लिहायचा उपक्रम चालु कराल काय? आम्ही पाठींबा देउ. -- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 04/29/2010 - 06:31 नवीन
१. सचिन तेंडुलकर २. लता मंगेशकर (या मूळच्या गोव्याच्या, पण मराठी या गटात मोडावेसे वाटते) ३. रघुनाथ माशेलकर (२ प्रमाणे) (मराठी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 04/29/2010 - 06:33 नवीन
एकाच सदस्याने कमाल किती प्रतिसाद द्यावेत यावर बंधन नसल्याची पळवाट साधून आणखी तीन - १. आशा भोसले (माझ्या आधीच्या प्रतिसादातील २ व ३ प्रमाणे) २. सुनील गावस्कर ३. अनिल काकोडकर (माझ्या आधीच्या प्रतिसादातील २ व ३ प्रमाणे) (मराठी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
भ
भारद्वाज गुरुवार, 04/29/2010 - 06:37 नवीन
महाराष्ट्र राज्य स्थापनेस ६० वर्षे पूर्ण होत आहेत.
कसे काय बुवा? :? :? २०१०-१९६०=६०? - जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments
भ
भारद्वाज गुरुवार, 04/29/2010 - 07:01 नवीन
१) छत्रपती शिवाजी महाराज : यांनीच तर स्थापन केला की हो.... २) पंडीत भीमसेन जोशी : यांच्या गायकीबद्दल सर्वांना सांगण्याची आवश्यकता नाही, पण त्यांचे ऑटोमोबाईलचे ज्ञानही अगाध आहे. ३) शहीद तुकाराम ओंबाळे : सुज्ञास सांगणे न लगे जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारद्वाज
व
विकास गुरुवार, 04/29/2010 - 13:23 नवीन
डोक्यात (आणि माहीतीत ;) )पन्नासच होते आणि टाईप करताना (टायपो) चुकलो. दुरूस्ती केली आहे. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारद्वाज
इ
इन्द्र्राज पवार गुरुवार, 04/29/2010 - 07:17 नवीन
सुन्दर धागा >>>>> तीन स्फुर्तिदायी मराठी व्यक्तींची नावे जी आपल्या प्रिय महाराष्ट्राच्या नसानसात भिनली आहेत :::: १. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर २. गानकोकिळा लता मंगेशकर ३. कवी कुसुमाग्रज ~~~ ही नावे मला व्यक्तिशः देव नामाहून अधिक प्रिय आहेत.... त्यामुळे यांच्याविषयी काही लिहिण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. धन्यवाद ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
स
सातबारा गुरुवार, 04/29/2010 - 07:20 नवीन
एकमेव स्फूर्तीदायी नाव. " हिन्दूह्रदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर " यांच्या नावानंतर दुसरे नाव लिहीता येत नाही. क्षमस्व ! ------------------------- हे शेतक-यांचे राज्य व्हावे.
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 04/29/2010 - 07:27 नवीन
१) साने गुरुजी: लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग २) आनंदीबाई जोशी: पहिली महिला भारतीय डॉक्टर, पहिली हिंदू डॉक्टर ३) दिपक घैसास: चीफ फायनानशियल ऑफीसर आणि चीफ एक्झीक्युटीव्ह ऑफीसर - आय-फ्लेक्स सोल्युशन्स थोडसं अवांतरः महाराष्ट्र राज्य स्थापनेस ५० वर्ष पुर्ण होत आहेत, ६० नव्हे
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 04/29/2010 - 07:36 नवीन
एकाच सदस्याने कमाल किती प्रतिसाद द्यावेत यावर बंधन नसल्याची पळवाट साधून आणखी तीन असेच म्हणून: १) बाल गंधर्व: ज्यांच्याबद्दल बोलताना पु. ल. देशपांडे, सुधीर फडके, भीमसेन जोशी यासारखी मंडळीही भारावून जातात, त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार!!! २) सुधीर फडके: पुन्हा एकदा शब्द नाहीत, नावच पुरेसं आहे. ३) दादासाहेब फाळके: भारतीय चित्रपटस्रुष्टीचे जनक
  • Log in or register to post comments
भ
भय्या गुरुवार, 04/29/2010 - 07:42 नवीन
काही महत्वाची नावे आगोदरच आलेली आहेतच. (महाराष्ट्रईय असून भारतावर ठसा उमटविणारे) राजकीय यशवंतराव चव्हाण, धनंजयराव गाडगिळ विखे पाटील शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन कला नाट्य -- दादासाहेब फाळके, व्ही. शांताराम भालजी पेंढारकर, जब्बार पटेल, मोहन आगाशे, आमोल पालेकर नाना पाटेकर शास्त्र - विजय भटकर, अनिल काकोड्कर, माशेलकर, जयंत नारळी कर संगीत भिमसेन जोशी, बाबूजी फडके, किशोरी आमोणकर वसंतराव देशपांडे साहित्यावर खू प मोठी यादी आहे ती परत कधीतरी
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 04/29/2010 - 16:50 नवीन
यशवंतराव चव्हाण, ते कस काय बुवा? ह्याच चव्हाणानी मुंबईस संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ह्या वाक्यात च वर जोर कशाला अस आचार्य अत्रेंना विचार तेव्हा अत्रे म्हणाले तुमच्या आडनावातला च काढा आणी मग बघा म्हणे ह्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला अहो हेच नेहरुसमोर म्हणाले महाराष्ट्रापेक्षा पंडीत नेहरु मला मोठे अशी लाचारी कॉग्रेसवाल्यांची विखे पाटील नक्की कोणते विखे पाटील तुम्हाला अपेक्क्शीत आहेत ? :? :? राधाकृय्ष्ण कि त्यांचे तिर्थरुप :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भय्या
प
प्रशु Fri, 04/30/2010 - 19:04 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
र
रामदास गुरुवार, 04/29/2010 - 08:57 नवीन
की सर्वात आधी आठवण झाली ती प्रल्हाद केशव अत्रे यांची.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी गुरुवार, 04/29/2010 - 08:59 नवीन
ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ
  • Log in or register to post comments
च
चिरोटा गुरुवार, 04/29/2010 - 09:17 नवीन
महर्षि कर्वे नरेंद्र जाधव भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
म
मी_ओंकार गुरुवार, 04/29/2010 - 09:39 नवीन
पूर्ण देशात ठसा उमटवणारी नावे जी स्फुर्तिदायक तर आहेतच शिवाय भारतात एक चळवळ उभी करण्याचे काम यांनी केले. १. पेशवे. (अर्थात दुसरा बाजीराव सोडून) २. लोकमान्य टिळक. ३. बाबासाहेब आंबेडकर.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 04/29/2010 - 09:55 नवीन
२ नावे १] तात्या अभ्यंकर २] टारझन
  • Log in or register to post comments
स
सातबारा गुरुवार, 04/29/2010 - 11:12 नवीन
- सहमत. :D ------------------ हे शेतक-यांचे राज्य व्हावे.
  • Log in or register to post comments
स
सातबारा गुरुवार, 04/29/2010 - 11:43 नवीन
१. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ~~~ ही नावे मला व्यक्तिशः देव नामाहून अधिक प्रिय आहेत.... त्यामुळे यांच्याविषयी काही लिहिण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. हे लिहून आपण काळजालाच हात घातला. - स्वातंत्र्यवीर सावरकर भक्तांचा दास .. ------------------------- हे शेतकर्‍यांचे राज्य व्हावे.
  • Log in or register to post comments
व
वारा गुरुवार, 04/29/2010 - 12:12 नवीन
१) अशोक सराफ २) शरद तळवळकर ३) लक्ष्मिकांत बेर्डे. ४) निळू फुले..(आमाला तुमच ईलेक्शन बी नगो आनी ईलेक्शनच तिकीट बी नगो आमाला फक्त पायजेल सपट चहा.)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 04/29/2010 - 12:22 नवीन
१.डॉ.हेडगेवार. २.प.पू.गोळवलकर गुरुजी. ३.नानाजी देशमुख.
  • Log in or register to post comments
श
शेखर Fri, 04/30/2010 - 11:29 नवीन
१००% सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा गुरुवार, 04/29/2010 - 12:30 नवीन
१.वासुदेव बळवंत फडके. २.बाबासाहेब पुरंदरे. ३.नथुराम गोडसे. (होय!कुणाला कितीही हे असत्य वाटलं, कोणी कितीही आदळआपट केली..तरीही हे वास्तव आहे. पटत नसेल तर अगदी छोटीशी बाब पहावी..ऑर्कुटावरची "श्री.नथुराम गोडसे" कम्युनिटी.)
  • Log in or register to post comments
ब
बट्ट्याबोळ गुरुवार, 04/29/2010 - 12:59 नवीन
लक्शमणराव किर्लोस्कर शंतनूराव किर्लोस्कर चितळॅ गरवारे विट्ठल कामत जगन्नाथ शंकरशेठ
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 04/29/2010 - 13:18 नवीन
यशवंतराव चव्हाण मेधा पाटकर एस एम जोशी (स्फूर्तिदायक नावे लिहायची आहेत म्हणून नाहीतर काम स्थानिक पातळीपासून अगदी आंतर्राष्ट्रीय पातळीवर कुठेही असले ज्याने समाजात फरक पडला असेल तर हवी. सगळ्या क्षेत्रातील व्यक्ती या अटींमध्ये बसणारे एक नाव आहे दाऊद इब्राहीम कासकर ;) ) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
ब
बट्ट्याबोळ गुरुवार, 04/29/2010 - 13:41 नवीन
आणि छोटा राजन पण !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
व
विकास गुरुवार, 04/29/2010 - 14:35 नवीन
"सगळ्या क्षेत्रातील व्यक्ती या अटींमध्ये बसणारे" याच बरोबर "स्फुर्तिदायी" पण म्हणलेले आहे ते विसरू नका. अर्थात तुम्हाला दाऊदच्या कारनाम्यामुळे दंगली करण्याची अथवा "एन्काउंटर" करण्याची स्फुर्ती मिळाली असे म्हणायचे असेल तर गोष्ट वेगळी ;) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
स
स्वाती२ गुरुवार, 04/29/2010 - 13:30 नवीन
अनुताई वाघ गोदावरी परुळेकर
  • Log in or register to post comments
भ
भोचक गुरुवार, 04/29/2010 - 14:50 नवीन
श्री. ना. पेंडसे - भलेही 'प्रादेशिक' कादंबर्‍या म्हणून हिणवलत, तरी श्रीनांनी दीर्घात मांडलेला तत्कालीन समाजजीवनाचा लेखाजोखा स्तिमित करणारा. विजय तेंडुलकर- मराठी साहित्याला 'आंतरराष्ट्रीय' परिमाण देणारा थोर आणि कालातीत साहित्यिक. गो. नि. दांडेकर- महाराष्ट्राचा इतिहास 'जिवंत' करणारा नि आयुष्याचे टक्केटोणपे खाऊन तावून सुलाखून निघालेल्या जीवनाचे तितकेच आरसपानी दर्शन घडविणारा अवलिया. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments
प
प्रशु Fri, 04/30/2010 - 19:08 नवीन
गोनिदा बाबत सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोचक
भ
भोचक गुरुवार, 04/29/2010 - 14:58 नवीन
विष्णू श्रीधर वाकणकर- भोपाळजवळच्या 'भीमबेटका' येथील तब्बल दहा हजार वर्षांपूर्वीची भित्तीचित्रे शोधली. अर्थ लावला. रॉक पेंटिंगबद्दल मूलगामी काम. प्रभाकर माचवे- मराठीसह हिंदीतही तितकेच लेखन. पण दुर्देवाने मराठी लोकांकडूनच उपेक्षा. अहिल्याबाई होळकर- प्रातःस्मरणीय. यांच्याबद्दल काय सांगावे? (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments
भ
भारद्वाज गुरुवार, 04/29/2010 - 15:32 नवीन
किर्लोस्कर- पहिले मराठी उद्योजक बी.जी. शिर्के- प्रसिद्ध बांधकाम व्यावसाईक आनंद देशपांडे- पर्सिस्टंट सॉफ्टवेयरचे संस्थापक - जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 04/29/2010 - 17:17 नवीन
बा़ळासाहेब ठाकरे. राज ठाकरे.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Fri, 04/30/2010 - 05:59 नवीन
इतिहासात काय असेल ते असेल ? आज तरी महाराष्ट्राचं मढं झालंय. मर्तिक घातलं पाहिजे. बा़ळासाहेब ठाकरे. राज ठाकरे. - हे स्फूर्तिदायक ? नक्की का ?
  • Log in or register to post comments
I
II विकास II Fri, 04/30/2010 - 06:08 नवीन
श्री आप्पा, ह्या धाग्यावर वाद नकोस. उगाच चांगल्या धाग्याची वाट लागेल. हवा तर नवीन धागा काढ. मलाही बाळ ठाकरे आणि राज ठाकरे हे इतर अनेक लोकांपेक्षा स्फुर्तीदायक कसे होउ शकतात हा प्रश्न पडला आहे. पण शेवटी दुसर्‍यालाही मत असते, त्यालाही मान द्यायला हवा. -- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
न
नम्रता राणे Fri, 04/30/2010 - 08:15 नवीन
मलाही बाळ ठाकरे आणि राज ठाकरे हे इतर अनेक लोकांपेक्षा स्फुर्तीदायक कसे होउ शकतात हा प्रश्न पडला आहे. पण शेवटी दुसर्‍यालाही मत असते, त्यालाही मान द्यायला हवा. दुसर्‍यांच्या मतालाही आदर दिल्याबद्दल लाख ला़ख धन्यवाद!!!!! धन्यवाद!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II
इ
इन्द्र्राज पवार Fri, 04/30/2010 - 11:28 नवीन
".....पण शेवटी दुसर्‍यालाही मत असते, त्यालाही मान द्यायला हवा." अत्यंत संतुलीत विचार आणि म्हणून आदर्शवत ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा