Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वृषभ राशीच्या व्यक्तींची वैशिष्ट्ये...

न
निमिष सोनार
Fri, 05/28/2010 - 07:52
🗣 54 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
26373 वाचन

💬 प्रतिसाद (54)
न
निमिष सोनार Fri, 05/28/2010 - 17:44 नवीन
कुंडलीत प्रथम स्थानी २ हा आकडा असेल (वृषभ) तसेच प्रथम स्थानी शुक्र ग्रह असला तरीही...तरीपण त्या व्यक्तीचा स्वभाव वृषभ राशीसारखा असू शकतो, मूळ रास वेगळी असली तरी...
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 05/28/2010 - 19:55 नवीन
तुम्ही लग्नराशी आणि जन्मराशीत गल्लत करताय, असे वाटते. चू. भू. द्या. घ्या. कुंडलीत चंद्र ज्या राशीत आहे, ती जन्मराशी (मग राशीस्वामी कोणत्याही स्थानी असो). तसेच कुंडलीत प्रथम स्थानी जी राशी असते, ती लग्नराशी (पुन्हा, लग्नेश = लग्नराशीचा स्वामी, कोणत्याही स्थानी असो). भारतीय ज्योतिषशास्त्रात मन (स्वभाव) आणि तन (विचारपद्धती) वेगळे मानले गेले आहे. चू.भू.द्या.घ्या. तसेच तन म्हणजे फक्त रंगरूप, वजन-उंची इ. नव्हे. तर विचारपद्धती, जिच्यावर मेंदूचा अंमल असतो, ती सुद्धा. तनु (रंगरूप, उंचीवजन इ.) आणि विचारपद्धती (मेंदू) यांवर लग्नराशीचा प्रभाव असतो, तर मनावर (स्वभावावर) जन्मराशीचा (चंद्रराशीचा) प्रभाव असतो. स्वभाववैशिष्ट्ये, विचारपद्धती इ. केवळ राशीच्या अधिपत्याखाली नाही, तर राशीस्वामी व इतर ग्रहांचे गुणात्मक योग कसे झाले आहेत, इ. घटकांवर अवलंबून असते. (माहीतगार)बेसनलाडू माझा या शास्त्राचा अभ्यास नाही. हे शास्त्र/विज्ञान आहे की नाही, यावर निरंतर वाद चालू आहे; त्यात मी कधीच पडत नाही. माझ्यासाठी या प्रकारावरचा विश्वास-अविश्वास, श्रद्धा-अतिश्रद्धा-अंधश्रद्धा इ. परिस्थितीच्या सोईने ठरत असतात, परिस्थितीजन्य असतात :) (सोयीस्कर)बेसनलाडू इतके असूनही जालावर व इतरत्र वाचून वगैरे जी माहिती मिळते, त्यावरून वरील प्रतिसाद लिहिला आहे. (लेखक)बेसनलाडू मिसळपाववर पूर्वी नियमित लेखन करणारे व ज्यांनी मिसळपाववर छंदशास्त्र हा विभाग चालू केला, ते धोंडोपंत यांच्या ज्योतिषशास्त्रविषयक जालनिशीवर बरीच माहिती उपलब्ध आहे. अशा अनेक हिंदी, मराठी, इंग्रजी जालनिशा उपलब्ध आहेत. (दुवादार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष सोनार
न
निमिष सोनार Fri, 05/28/2010 - 18:13 नवीन
एखाद्या वाचकाचा ज्योतिषशास्त्रावर ब्लॉग आहे का? माझ्या ब्लॉगला जरुर भेट द्या- http://nimishthinkcity.blogspot.com
  • Log in or register to post comments
फ
फटू Fri, 05/28/2010 - 20:34 नवीन
कंच्या दुनयेत र्‍हाता तुमी? लय आदी हितं येक म्होटे जोतीशी लिवायचे. हल्ली नाय लिवित हितं. पन त्यांचा बलाग हाय. त्या बलागावर ते कुनाचा लगन कदी ठरंल, घर कदी कोन यिकत घेइल, पॉर्गा व्हईल का पोर्गी ह्याबदलची त्यांची (म्हंजे त्यानी त्यांच्या जातकांची सांगितलेली) सगली भविश्ये कशी खरी झाली तो लिवतात. आजून येक लय म्होटं जोतीशी हितं हायेत. ते पन बलाग लिवतात. आता न्यामका आटवत नाय पन भौतेक यिंग्रजीत लिवतात ते. त्याना वलकायला येगदम सोपा हाय. हितं मिपावर येकादया कायद्याचा फायदा घेवुन बायका आपल्या न्हवर्‍याला कसा तरास द्यातात आजुन सुर्य ह्या राशीतना त्या राशीत ग्यालावर तो कुनाला वाईट हाय आसा यकादा धागा दिसला का समजून जायाचा, ह्या धाग्याचा लेकक म्हनजेच आपलं बलाग लिवनारं जोतीशी. छे ! दमलो बुवा. सवय नाही राहीली आता गावच्या बोलीभाषेत बोलायची, लिहायची. फटू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष सोनार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा