महात्म्याची अखेर
💬 प्रतिसाद
(102)
अ
अडाणि
Wed, 06/02/2010 - 03:41
नवीन
अतिशय योग्य पुरावा ... नितीन ह्यांनी मागे दिलेल्या माहितीवरून सुद्धा हेच दिसून येत होते की गांधीजींच्या संपुर्ण धोरणात धार्मिक तेढ वाढू नये असाच प्रयत्न होता, दुर्दैवाने त्याचा उपयोग झाला नाही ....
ऋषिकेश , तुमचे गीतापठण वाया जाणार नाही अशी आशा करतो :)
-
अफाट जगातील एक अडाणि.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Wed, 06/02/2010 - 04:52
नवीन
उपोषण संपवतानाचे टायमिंग "जरा" चुकलेले वाटते. आता ते जाणून बुजून चुकवले का अजून काही ते नंतर बघू. पण उपोषण सुरु करण्याचे टायमिंग कसे होते? ५५ कोटी रोखून धरू असे भारत सरकारने म्हणताच लगेच उपोषण सुरु केले का? तसे असेल तर तेही विचारात घेतले पाहिजे.
अर्थात मुस्लिमांनी आपल्याकरता वेगळा देश बनवला, तिथल्या बहुसंख्य हिंदूंच्या कत्तली केल्या, जागा बळकावल्या, स्त्रियांवर बलात्कार केले आणि असंख्य लोकांना देशोधडीला लावले. आता असल्या धर्मांध लोकांना वठणीवर आणायला वाकड्यात शिरणे आवश्यक होते हे गांधीविरोधी लोकांचे मत अगदीच हास्यास्पद म्हणता येणार नाही.
उलट विस्थापित हिंदूंच्या हालाबद्दल काही चकार न शब्द काढता केवळ मुस्लिमांच्या हिताच्या गोष्टी करणे याने हिंदुत्ववाद्यांना राग आला तर ते चूक आहे का? काट्याने काटा काढायचा हे अत्यंत व्यवहारी तत्त्व आहे. आपल्या साधनशुचितेच्या कल्पना अनेक हिंदूंचा घात करत आहेत हे लक्षात न घेता लादायच्या आणि हे सगळ्यांनी गोड मानून घ्यायचे हे पटण्यासारखे नाही.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Wed, 06/02/2010 - 05:02
नवीन
>>तिथल्या बहुसंख्य हिंदूंच्या कत्तली केल्या, जागा बळकावल्या, स्त्रियांवर बलात्कार केले आणि असंख्य लोकांना देशोधडीला लावले.
असे खरेच घडले यात काही संशय नाही.
अशाच प्रकारच्या कथा तिकडच्या पु भा भाव्यांनीपण लिहिल्या असाव्यात.
>>आता असल्या धर्मांध लोकांना वठणीवर आणायला वाकड्यात शिरणे आवश्यक होते हे गांधीविरोधी लोकांचे मत अगदीच हास्यास्पद म्हणता येणार नाही.
ज्या लोकांनी वरच्या गोष्टी केल्या ते लोक दिल्लीत वेगळ्याच कुठल्यातरी मुसलमानांच्या कत्तली केल्याने कसे वठणीवर येणार होते?
असो. उपोषण सुरू करण्याचे टायमिंग फारच चुकले आहे. पैसे न देण्याचा निर्णय १ जानेवारीचा उपोषण १३ जानेवारीला.
अर्थात याचे ही जस्टिफिकेशन/एक्सप्लनेशन बिकांनी दिलेच आहे.
नितिन थत्ते
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Wed, 06/02/2010 - 06:30
नवीन
ज्या लोकांनी वरच्या गोष्टी केल्या ते लोक दिल्लीत वेगळ्याच कुठल्यातरी मुसलमानांच्या कत्तली केल्याने कसे वठणीवर येणार होते?
वेगळ्याच कुठल्यातरी असे म्हणण्याला काय अर्थ आहे ? हिंदूंना आपल्या बरोबरीचे अधिकार मिळावेत असं मुसलमानांना कधीच वाटलेलं नाही. आजही वाटत नाही. पाकिस्तानातला माणूस जे कुराण वाचतो तेच कुराण भारतातलाही मुस्लिम वाचतो. सगळे मुसलमान 'मुस्लिम धर्मीय' हे एक कुटुंब आहे असे मानतात. त्यामुळेच की काय इकडच्या मुसलमानांना अन्यधर्मीय भारतीयांपेक्षा पाकिस्तान किंवा तालिबान मधला मुस्लिम जवळचा वाटतो. हजारो वर्षे भारतात राहूनसुद्धा ते भारताला मातृभूमी मानत नाहीत. विजित भूमी मानतात.(दारुल हर्ब). झुरळ पाकिस्तानात असले काय किंवा भारतात असले काय त्याला हुरळाप्रमाणेच मारायला नको का ?
- Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू
Wed, 06/02/2010 - 06:51
नवीन
'सगळे मुसलमान', 'सगळे हिंदू', 'सर्व पुरुष', 'सर्व स्त्रिया', वगैरे शब्द दिसले की पुढील विधानाच्या सत्यतेविषयी शंकाच उत्पन्न होते. पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या अहमदिया मशिदींवरच्या हल्ल्याच्या निमित्ताने आजच्याच 'हिंदू'मध्ये पाकिस्तानात अहमदिया पंथाच्या लोकांचा कसा छळ होतो आहे, त्या विषयी माहिती आहे. मी सश्रध्द अहमदिया असतो, मला किंचितशी अक्कल असती, तर मला तालिबान्यांविषयी प्रेम वाटले नसते. अर्थात, हा निव्वळ तर्क आहे, आणि हृदयांच्या एकाधिकारशाहीपुढे तर्काचे काही चालत नाही, हे खरेच.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
- Log in or register to post comments
I
II विकास II
Wed, 06/02/2010 - 08:37
नवीन
>>'सगळे मुसलमान', 'सगळे हिंदू', 'सर्व पुरुष', 'सर्व स्त्रिया', वगैरे शब्द दिसले की पुढील विधानाच्या सत्यतेविषयी शंकाच उत्पन्न होते.
+१
असल्या विधानांना काही किंमत देउ नये.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Wed, 06/02/2010 - 11:03
नवीन
'सगळे मुसलमान', 'सगळे हिंदू', 'सर्व पुरुष', 'सर्व स्त्रिया', वगैरे शब्द दिसले की पुढील विधानाच्या सत्यतेविषयी शंकाच उत्पन्न होते.
१) का नाठाळ आहेत हो त्या वर्गातलि मुलं. एकजात उनाड. काट्यावर घेतलं पाहिजे सगळ्यांना एकदा.
२) सगळी लहान मुले खॉडकर असतात.
३) ती अमुक तमुक पोरगी पाहिलीस का ? कसला कडक आयटम आहे. असणारच ना बे. माल कुठला आहे शेवटी. टिळक नगरचा.
अशी शेकडो विधाने आपण व्यवहारात करतोच की. आता त्या वर्गात एक तरी नाठाळ नसणारा मुलगा असेलच. काही लहान मुलं तरी शांत असतीलच. आणि टिळक नगरच्या सगळ्याच पोरी काही सुंदर असतीलच याची काही हमी नाही. सगळे मुसलमान हे शब्द त्या अर्थी वापरले आहेत.
- Log in or register to post comments
D
Dipankar
Wed, 06/02/2010 - 11:21
नवीन
अप्पा++
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Wed, 06/02/2010 - 08:35
नवीन
जरा अवांतर :---
तिथल्या बहुसंख्य हिंदूंच्या कत्तली केल्या, जागा बळकावल्या, स्त्रियांवर बलात्कार केले आणि असंख्य लोकांना देशोधडीला लावले.
ह्म्म...मध्यंतरी या विषयावर यूट्युबवर हा व्हिडीयो माझ्या पाहण्यात आला होता...
मदनबाण.....
"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget
- Log in or register to post comments
I
II विकास II
Wed, 06/02/2010 - 04:53
नवीन
ऋषिकेशचे आभार ही माहीती दिल्याबद्दल.
>> पाकीस्तानला ५५ कोटी द्यावेत हे गांधीजींचे मत जरूर होते.
पाकीस्तानला ते पैसे देणे योग्यच होते. पण त्यावेळी पाकीस्तानने हल्ला (काश्मीरी टोळीवाल्यांच्या स्वरुपात) केलेला असताना देणे अयोग्य होते.
गांधीजीचे उपोषण त्यासाठी नसावे.
The matter regarding release of Rs. 55 crores to Pakistan towards the second installment of arrears to be paid to it under the terms of division of assets and liabilities requires to be understood in the context of the events that took piece in the aftermath of partition. Of the 75 crore to be paid the first installment of Rs. 20crore was already released. Invasion of Kashmir by self-styled liberators with the covert support of the Pakistani Army took place before the second installment was paid. Government of India decided to withhold it Lord Mountbatten was of the opinion that it amounted to a violation of the mutually agreed conditions and he brought it to the notice of Gandhiji. To Gandhiji's ethical sense the policy of tit for tat was repugnant and he readily agreed with the Viceroy's point of view. However, linking his stand in this matter with his fast he undertook, as you will find in the following lines, is an intentional mix-up and distortion of facts of contemporary history. The fast was undertaken with a view to restoring communal amity in Delhi.
http://www.mkgandhi-sarvodaya.org/fact.htm
अशीच उपयुक्त माहीती: जवाहरलाल नेहरुंची भाषणे: पान ७१
http://books.google.co.in/books?id=qlbb11cLGVwC&pg=PA71&lpg=PA71&dq=speeches+of+Jawaharlal+Nehru+%2B+55+crores&source=bl&ots=3GjbF4HIb-&sig=xPwKGczH85r4aSDIlrGyzonc9KY&hl=en&ei=XMQFTIfrL87CrAern-jdAg&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=1&ved=0CBwQ6AEwAA#v=onepage&q&f=false
त्याच पानावर खाली एक निवेदन सापडु शकेल.
थोडक्यात: गांधीजीचे उपोषण जरी ५५ कोटी द्यावेत ह्या साठी नसले तरी त्यांची इच्छा ते ५५ कोटी पाकीस्तानला ताबडतोब द्यावेत अशी होती. सरकारचे म्हणणे होते की ते पैसे पाकीस्तान काश्मीरमधील युध्दासाठी वापरेल. पण गांधीचे उपोषण संपवण्यासाठी चांगले वातावरण तयार करण्यासाठी सरकारने ते पैसे दिले.
आता प्रत्येकाने आपापले ठरवायचे गांधीजीचा ५५ कोटी देण्यात सहभाग किती?
अजुन एक नोंदः सयुंक्त राष्ट्रातर्फे युध्दबंदी २० जानेवारी १९४८ ला झाली. गांधीजीचे उपोषण १८ जानेवारीला संपले.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Wed, 06/02/2010 - 06:19
नवीन
जरासे अवांतर -
नरहर कुरुंदकर यांचे असे म्हणणे होते की हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींचा खून केल्यामुळे या देशामध्ये भडकत चाललेल्या मुस्लिमविरोधी भावना अचानक शांत झाल्या. जर महात्माजींचा खून झाला नसता तर महात्माजी लोकांच्या मनातून उतरले असते. ते मुस्लिमधार्जिणे होत चालले आहेत असा समज पसरायला ऑलरेडीच सुरुवात झाली होती. त्यांचे लोकमानसातील स्थान एवढे मोठे होते आणि त्यांच्या हौतात्म्याचा कडकडाट एवढा प्रचंड होता की त्यांच्या खूनामुळे सारा देश हतबुद्ध झाला आणि जागोजाग सुरू असलेल्या दंगली क्षणार्धात बंद पडल्या. ते पुढे म्हणतात की गांधीजींची हत्या झाली याचे कारण हे होते की मुस्लिमांची कत्तल होऊ नये यासाठी गांधीजी वारंवार उपोषण करतील आणि त्यामुळे फाळणीच्या वेळी हिंदूंच्या ज्या कत्तली झाल्या त्यांचा सूड घेता येणार नाही या एकाच कारणासाठी गांधीजींचा खून झाला. त्यांच्या मते हिंदुत्ववाद्यांचा हा तर्कच चुकीचा होता कारण एकटे गांधीजी दंगली शमविण्यासाठी कुठेकुठे जाणार होते? गांधीजींची हत्या करुन त्यांनी स्वतःच्याच उद्दिष्टाची हानी करुन घेतली. हे म्हणणे कुठवर खरे आहे हे ठरवण्यासाठी अनेक पुस्तकांची छाननी करावी लागेल. पण कुरुंदकर लिहितात ते निदान तर्काच्या कसोटीस उतरणारे आहेच आहे हे निश्चित.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Wed, 06/02/2010 - 06:52
नवीन
ऋषिकेश जी....उत्तर देत आहे.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 06/02/2010 - 09:05
नवीन
"गांधी हत्या आणि मी " मध्ये गोपाळ गोडसे म्हणतात :-
पुढे, म्हणजे गांधीहीचा उपवास चालु असताना, भारतशासनाने एक पत्रक काढले. "गांधीजींनी देशाला जे निवेदन केले आहे त्याला अनुसरून, (हिंदुस्तान आणि पाकिस्तान या) दोन राष्ट्रातील संदेहाचे आणि संघर्षाचे एक कारण दूर करण्याचे हिंदुस्तान शासनाने ठरवले आहे. राष्ट्रीय सन्मान आणि राष्ट्रीय हित यांशी असे करणे सुसंगत आहे आणि ते शासनाच्या कक्षेत आहे,
"या उस्फुर्त भावनेच्या बुडाशी शासनाची अशी तळमळ आहे की, यातील सदभावना ओळखली जावी आणि परस्परप्रेमसंबंधाचे वातावरण निर्माण व्हावे . या स्नेहबंधासाठी गांधीजी आज यज्ञवेदीवर देह झिजवत आहेत, या सदभावनेने त्यांचा उपवास थांबावा आणि त्यांना हिंदुस्थानच्या त्यांच्या सेवेत आणखी भर घालण्याची संधी मिळावी.
'उरलेल्या पैशांच्या भागाचे कार्यवाहन त्वरित करण्याचे हिंदुस्थान शासनाने ठरविले आहे...'
'हा निर्णय म्हणजे, या देशाच्या दैदिप्यमान परंपरेला अनुसरून शांती आणि सदिच्छा टिकविण्याकरीता गांधीजींच्या अहिंसक आणि उदात्त प्रयत्नाला हिंदुस्थान शासनाची मनःपूर्वक देणगी आहे. (Indian Information dated : 2-2-1948)
पंतप्रधानांनी काढलेल्या पत्रकातही, ' हिंदुस्थान शासनाचा हा निर्णय लक्षपूर्वक विचारा नंतर आणि गांधीजींशी केलेल्या विचारविनिमयानंतर घेतला गेला आहे' असे म्हटले आहे. (Indian Information dated : 2-2-1948)
------------
माझे (परा) मत :-
यावरुन हे स्पष्ट होते की ह्या पाकिस्तान धार्जिण्या सोकॉल्ड महात्म्याचे उपोषण ५५ कोटींसाठी सुद्धा होतेच होते.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Wed, 06/02/2010 - 10:13
नवीन
वा! एका वेगळया संदर्भाबद्दल आभार..
आता वाक्ये लक्षपूर्वक पाहु
इथे गांधीचे प्रयत्न स्नेहबंधासाठी असल्याचे म्हटले आहे. नाहितर या पत्रकात पाकिस्तानला त्याचा वाटा मिळावा यासाठी गांधीजी आज यज्ञवेदीवर देह झिजवत असे नसते का म्हटले?!
इथे गांधीजी जो प्रयत्न करत आहेत त्याला पूरक व स्नेहबंध वाढवण्यासाठी म्हणून शासनाने उचलेले ते पाऊल आहे. गांधींचा आग्रह केवळ दंगल थांबावी इतकाच होता.
बरोबर आहे. वर म्हटल्याप्रमाणे "पाकीस्तानला ५५ कोटी द्यावेत हे गांधीजींचे मत जरूर होते. व ते त्यांनी उपोषणा आधी तसेच उपोषणादरम्यानही सांगितले आहे."
*अवांतरः (या अवांतराबद्द्ल चर्चा करायची असल्यास खरडीतून / वेगळा धागा उघडून करावी ही प्रार्थना)
पुस्तक पहिल्यांदा हातात पडले व जेव्हा गांधींबद्द्ल केवळ विरूद्धमते कानी येत होती त्याकाळात गोपाळ गोडसे देखील "गांधी हत्या" म्हणत असलेले पाहून आश्चर्य वाटाले होते आणि नंतर आता थोडे फार वाचन झाल्यावर ते योग्य वाटते.
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
गुरुवार, 06/03/2010 - 01:41
नवीन
१. ह्या संदर्भात गोपाळ गोडसे ह्यांचे अवतरण किती न्यूट्रल म्हणून घ्यावे ? माझ्यामते शून्य.
२. सरकारी पत्रके गांधीजींच्या निधनानंतर ३ दिवसांनी का आली ?
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
- Log in or register to post comments
व
वेताळ
Wed, 06/02/2010 - 10:07
नवीन
हे मान्य करा.
त्यामुळे ते ही सर्व करत होते ते बरोबर होते किंवा त्यानी आयुष्यात कोणतीच चुक केली नाही असा गैरसमज सगळीकडे आहे.
तसेच त्याचे विरोधक एकजात मुर्ख होते,त्याची वैचारिक पातळी खुप उथळ होती हे मानणे देखिल योग्य नाही.
वेताळ
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Wed, 06/02/2010 - 10:19
नवीन
हे मान्यच आहे. ते एक माणूस होते व त्यांच्याही चुका झाल्या.. काहि तर त्यांनी स्वतःच लिहून ठेवल्या आहेत.
त्यांनी अगदी चोरी करण्यापासून मोठ्या राजकीय चुका केल्या आहेत / असतील पण म्हणून त्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट चूक आहे किंवा मूर्खपणाची आहे असा सूर दिसला (जो ह्या तसेच घरगुती सावरकर या चर्चेत सुदैवाने फारसा दिसलेला नाहि. ) की वाईट वाटते इतकेच.
तसेच अशी लवचिकता प्रत्येक महामानवाच्या अनुयायांनी/समर्थकांनी दाखवली पाहिजे अशी तुमची रास्त अपेक्षा आहे असे मी समजतो.
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
- Log in or register to post comments
D
Dipankar
Wed, 06/02/2010 - 10:43
नवीन
त्यांनी प्रत्येक गोष्ट चुक केली असती तर त्यांच्या हत्येनंतर देशामध्ये भडकत चाललेल्या मुस्लिमविरोधी भावना अचानक शांत झाल्या नसत्या. त्या भावना शांत झाल्या कारण लोकांमधे असलेला त्यांच्या विषयीचा आदर.
पण हत्या होण्याआधी त्यांचा कल हा मुस्लिमधाजिर्णा बनला होता व हीच चुक आहे हे लोकांना वाटत आहे.
- Log in or register to post comments
S
satish kulkarni
Wed, 06/02/2010 - 10:57
नवीन
ज्या गान्धीनी आयुष्यभर अहिन्सेचा पुरस्कार केला.... त्यान्च्याच अनुयायानी त्यान्च्या वधा नन्तर सरसकट ब्राम्हणान्ची घरे जाळली व हत्येचा प्रयत्न केला. हा त्यान्च्या शिकवणुकीचा (अहिन्सेच्या) सर्वात मोठा पराभव नाहि काय?
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 06/02/2010 - 11:05
नवीन
हॅ हॅ हॅ अहो ते प्रक्षोभक जमावाचे कृत्य आणी गांधीहत्या म्हणजे माथेफिरु हिंदु ब्राम्हणाने केलेली हिंसा.
बाकी आदरणीय नथुराम गोडसेंचे मतपरिवर्तन करण्याचा कुठलाच प्रयत्न कोणत्याही गांधीवाद्याने का केला नाही हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Wed, 06/02/2010 - 19:01
नवीन
नथुराम गोडसे एकदम माथेफिरू का? गांधींमुळे अजून देशाचे तुकडे होऊ नयेत म्हणून त्याने हत्या केली असावी...त्यात काय चूक? व्यक्तीपेक्षा देश मोठा..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
- Log in or register to post comments
प
पंगा
Wed, 06/02/2010 - 22:38
नवीन
(फाळणी गांधींमुळे झाली की नाही झाली हा वाद तूर्तास बाजूस ठेवू, पण...)
गांधींमुळे देशाचे अजून किती तुकडे होऊ घातले होते याबद्दल काही माहिती देऊ शकाल काय?
उदाहरणार्थ, गांधींमुळे महाराष्ट्र उर्वरित भारतापासून - खास करून उत्तरप्रदेश-बिहारपासून - वेगळा होऊ घातला होता काय? आणि समजा असता, तर त्यात गोळी घालण्यासारखे नेमके काय होते ते सांगू शकाल काय? उलट तुमचा लाडका भय्या-प्रॉब्लेम निर्माण होण्यापूर्वीच आपोआप सुटला असता, म्हणून त्या परिस्थितीत गांधींचे आभारच मानणे प्राप्त नसते काय?
नथुरामास दूरदृष्टी असती, तर उलट देशाची आणखी एक फाळणी होऊन महाराष्ट्र स्वतंत्र व्हावाच, या आग्रहानिशी त्याने गांधींबरोबर स्वतः उपोषणास बसावयास नको होते काय? पण त्यास ही दूरदृष्टी नव्हती, म्हणून त्याने उलट गांधींचीच हत्या केली, सबब त्यास 'माथेफिरु'च का, 'कृतघ्न'ही म्हणावयास हवा!
असला कसला 'मराठी माणूस'??????
- पंडित गागाभट्ट.
(डिस्क्लेमर: हा प्रतिसाद, 'आस्क अ स्टुपिड क्वेश्चन, गेट अ स्टुपिड आन्सर' या तत्त्वास अनुसरून वाचावा.)
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Wed, 06/02/2010 - 22:59
नवीन
thank you for your stupid answer...NOT =)) =)) ...
तुम्हाला मुस्लीम आणि भैय्या लोकांचे भल्तेच प्रेम आहे....तुम्च्यापुर्तेच ठेवा
भुंगा
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
- Log in or register to post comments
प
पंगा
Wed, 06/02/2010 - 23:12
नवीन
बाय द वे, हिंदुस्थानी ही भारताची राष्ट्रभाषा असावी याचा पुरस्कार गांधीजी करत.
हिंदुस्थानी म्हणजे हिंदी आणि उर्दूचे मिश्रण. आणि ते दोन्ही लिप्यांसहित अंगीकारावे असे त्यांचे मत होते.
हिंदी आणि उर्दूचे मिश्रण! आणि तेही दोन्ही लिप्यांसहित!! मज्जा!!! =D> =))
- पंडित गागाभट्ट.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Wed, 06/02/2010 - 23:19
नवीन
बाय द वे
बाबौ!!! यकदम विंग्रजी का? 8}
अदुगर हिंदी मंग विंग्रजी पुढाल्ली भाषा कुठाल्ली? :?
हिंदुस्थानी ही भारताची राष्ट्रभाषा असावी याचा पुरस्कार गांधीजी करत.
तेबी एक कारण असाव ... ;) =)) =)) =))
चुन्गा
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
- Log in or register to post comments
प
पंगा
गुरुवार, 06/03/2010 - 00:27
नवीन
हो मग? त्यात 'बाबौ' काय? 'बाय द वे' हा काही एकदम हायफंडू, 'उच्च' इंग्रजी वाक्प्रचार नाही. कोणालाही येतो आजकाल! अगदी मलासुद्धा!
कोकाटेसरांनी नुकताच फाडायला शिकवला वाट्टं... :?
पुढाल्ली भाषा वापरली तर मग हितं कुणालाबी कळत नाय. मग प्रतिसाद काऊ नेतो. (अनुभव! :()
म्हणजे मराठी माणसाचा भाषिक न्यूनगंड हा गांधीजींच्या हत्येस कारणीभूत ठरला, असे आपले म्हणणे आहे काय?
हल्लीसारखाच माहौल तेव्हाही असला, तर हे सहज शक्य वाटते.
- पंडित गागाभट्ट.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
गुरुवार, 06/03/2010 - 05:03
नवीन
म्हणजे मराठी माणसाचा भाषिक न्यूनगंड हा गांधीजींच्या हत्येस कारणीभूत ठरला
सगळ्यांनाच तुमच्यासारखा न्यूनगंड नसतो....म्हणूनच तुम्ही मराठी सोडून इतर भाषांच्या मागे लागलात वाटतं
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
- Log in or register to post comments
आ
आंबोळी
Wed, 06/02/2010 - 11:58
नवीन
"आम्ही ५५ कोटींना गांधीजींचे प्राण विकत घेतले" अश्या अर्थाचे वाक्य पाकिस्तानला पैसे दिल्यावर नेहरूंनी म्हणल्याचे कुठेतरी वाचल्याचे स्मरते... पण संदर्भ देता येत नाहिये....
कुणाला माहिती आहे का?
आंबोळी
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Wed, 06/02/2010 - 15:30
नवीन
यापूर्वीच्या धाग्यात सांगितल्याप्रमाणे माझे अद्यापही हेच मत आहे की, व्यक्ती असो वा देशातील सामाजिक, राजकीय उलाढालीचे चित्रण असो, ते संतुलीतरित्या लोकांच्यासमोर मांडणे इतिहासाच्या दृष्टीने फार महत्वाचे असते. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदविले, भिंत चालविली, तुकाराम सदेह स्वर्गाला गेले, शिवाजी महाराजांना भवानीने प्रकट होऊन "तलवार" दिली या गोष्टी आपण स्वीकारतो तो काही "इतिहास" म्हणून नव्हे तर त्या त्या व्यक्तीविषयी एक भक्ती भाव, आदर म्हणून. इतिहासाला असे "चमत्कार" सर्वस्वी अमान्य आहेत. गांधी असो, नेहरू, पटेल व सावरकर असोत, यांची चरित्रे वाचणे म्हणजे 'अमुक' याने ते लिहिले म्हणून त्यातील बाबी मला मान्य, आणि 'तमुक' याने लिहिले म्हणून तो मला अमान्य, असे म्हणणे म्हणजे आपण सत्यशोधन न करता केवळ आपल्या मनाला ज्या गोष्टी भावल्या त्याच तेवढ्या मी घेणार, मानणार, असे होते... बाकीच्या बाबींविषयी मला काही घेणेदेणे नाही. इतिहासातील प्रत्येक घटनेचे विश्लेषण आणि त्याचे अनुकूल-प्रतिकूल परिणामांचे मूल्यमापन करणे हीच अभ्यासकाची निकड असते. "महात्मा" हे खर्या अर्थाने महात्मा होतेच पण तेही तुम्हा आम्हा सारखे हाडामासाचा देह असलेले, भावनाप्रधान व्यक्ती होतेच ना? १५० वर्षाच्या गुलामगिरीनंतर १५ ऑगस्ट १९४७ ला सारा देश "स्वातंत्र्य"च्या रंगात रंगला असताना, गांधी त्याबद्दल बोलताना म्हणाले, "या उत्सवात भाग घेणे मला शक्य नाहे. हा दुखद प्रसंग आहे." ~ आता इथे आपल्यातील कुणी गांधींच्या या भावनेला दोष देईल का हा प्रश्न आहे.....बहुतेक आपण सर्वच त्यांच्या त्या विचाराशी सहमत होऊ.
स्वातंत्र्य आले खरे पण रक्ताचे पाट घेऊनच. दिल्लीवर तर प्रेतकळा आली होती. गांधी म्हणतात, "स्वातंत्र्यात निर्वासितांचा प्रश्न निर्माण होणे ही आपल्या राष्ट्राला लाज आणणारी गोष्ट आहे...." २७ सप्टेंबर १९४७ च्या संध्याकाळच्या प्रार्थनेत ते म्हणतात, "हिंदुस्थानात आम्ही एकाही मुसलमानाला राहू देणार नाही, याशिवाय दिल्लीत मला दुसरी भाषाच अलीकडे ऐकू येत नाही.".....
२ ऑक्टोबर.... स्वतंत्र हिंदुस्तानातील "महात्मा गांधी" यांचा पहिला वाढदिवस....आणि ते आता ७८ वर्षाचे. या दिवशीही त्यांनी उपास केला, सूत कातले, आणि सायंकाळी शुभेच्छा द्यायला जमलेल्यांना प्रार्थनेतच सांगितले की, "माझी प्रार्थना आहे की, सध्याचा जातीय संघर्ष संपणार नसेल, तर परमेश्वराने मला आता न्यावे हे बरे. हिंदुस्थान पेटलेला आहे अशा स्थितीत मला आणखी एखादा वाढदिवस पाहण्याची इच्छा नाही. (थोडेसे अवांतर : काय विलक्षण योगायोग....खरेच, स्वतंत्र भारतातील त्यांचा पहिला वाढदिवस हा त्यांचा शेवटचाच वाढदिवस ठरला...!)
विषयांतराचा धोका पत्करून सांगत आहे की, मी जाणीवपूर्वक गांधीजींच्या सुप्रसिद्ध "सांय प्रार्थनेचे" संदर्भ देत आहे कारण हा मौल्यवान ऐवज ~ अगदी गांधीजींच्या आवाजात ~ तसेच लिखित स्वरूपात "गांधी मेमोरिअल सेंटर, साबरमती आश्रम, अहमदाबाद, गुजरात" इथे पाहण्यास मिळतो. इच्छुकांनी जरूर एकदा भेट द्यावी असे हे ठिकाण आहे. असो.
इकडे दिल्ली दंगलीने पेटली असता तिकडे जिनांच्या मिलिटरी व घुसखोरांनी काश्मीरमध्ये थैमान मांडले होते आणि सरदार हे "पोलादी पुरुष" म्हणून ओळखले जात होते त्यामुळे त्यांच्यासारख्या व्यक्तीला पाकिस्तानचे हे लाड खपवून घेणे परवडणारे नव्हतेच. त्यांनी दिनांक १२ जानेवारी १९४८ रोजी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत (याचा वृत्तांत त्या वेळेच्या सर्वच इंग्लिश आणि हिंदी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला आहे...) हिंदुस्तानची या बाबतीतील भूमिका अतिशय स्पष्ट शब्दात मांडली आहे. ती थोडक्यात अशी, : "पाकिस्तानची काश्मीरमधील घुसखोरी ही दोन देशांच्या फाळणीमधील कराराचा सरळ सरळ भंग करणारी बाब आहे, त्यामुळे त्यांच्याशी करावयाच्या आर्थिक व्यवहारचे कार्यावहन विलंबिले यात आम्ही न्यायोचित व्यवहार केला आहे. पैसे देण्यासाठी नियत अवधीचे बंधन त्या संधीत आम्हावर नाही. सध्या पाकिस्तानने आपल्या सैन्यानिशी आमच्याशी सशस्त्र संघर्ष चालविला आहे त्याची व्याप्ती पाहता त्या आर्थिक बाबीचा पायाच उध्वस्त होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत उरलेले पैसे द्यावेत असा वाद आमच्याशी पाकिस्तानला कोणत्याही न्यायाने घालता येणार नाही...." ~~ (याचा पूर्ण स्वरूपातील इंग्रजी तर्जुमा जेएनयू दिल्ली येथील गव्हर्न्मेंट गॅझेटमध्ये उपलब्ध आहे.). पटेल यांना तर आपण "जहाल" नेते म्हणून ओळखते, पण नेहरू मंत्रीमंडळातील मवाळ समजले जाणारे अर्थमंत्री श्री. षण्मुख चेट्टी, तसेच गांधीचे कट्टर अनुयायी कन्हैय्यालाल मुन्शी यांचेदेखील या आर्थिक व्यवहाराबद्दल मत काही वेगळे नव्हते.
इकडे दिल्लीतील दोन्ही गटातील दंगलीचा मर्क्युरी वाढत असताना दोन्ही समाजातील तेढ नाहीशी व्हावी म्हणून गांधी जमेल ते प्रयत्न करीतच होते.... आता तशात १२ जानेवारीचा पत्रकार परिषदेतील पटेलांचा ५५ कोटी बाबतचा ठाम निर्धार गांधीजींच्या कानावर गेला. साहजिकच त्यांना वेदना झाल्या आणि आपण पाकिस्तानची अशी कोंडी करताना अहिंसा या तत्वापासून घसरत आहोत अशी त्यांची धारणा झाली.
आणि आता दिनांक १३ जानेवारी १९४८ च्या सांयप्रार्थनेतील गांधीजींची ही घोषणा... (जी हिंदी मध्ये मी मुद्दाम देत आहे, कारण याची टेप साबरमती आश्रमात उपलब्ध आहे....तसेच महात्मा गांधी यांचे समग्र जीवन चरित्र ज्यांनी प्रकाशित केले आहे त्या अहमदाबादच्या "नवजीवन प्रकाशन मंदिर" यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातदेखील आहे....)
"...मगर ऐसा मौका भी आता ही जब अहिंसा का पुजारी समाज के किसी अन्याय के सामने विरोध प्रकट करणे के लिय उपवास करनेपर मजबूर हो जाता है ! वह ऐसा तभी कर पाता है जब अहिंसा के पुजारी की हैसियात से उसके सामने दुसरा कोई रास्ता खुला नही रह जाता ! ऐसा मौका मेरे लिये आ गया है...!" प्रकट केलेल्या विचाराप्रमाणे गांधीजींनी उपोषणाला आरंभ केला. १२ ला ५५ कोटी अडविले जातात आणि त्या पाठोपाठ गांधीजी उपोषण सुरु करतात....दोनच दिवसात (१५ जानेवारीला) नेहरू पाकिस्तानला ५५ कोटी दिल्याची घोषणा करतात... आणि मग उरलेल्या मुद्द्यासाठी विविध संघटनांच्या नेत्यांच्या सह्या गोळा करण्याची मोहीम... व नंतर गांधींचा उपोषण सोडण्याचा निर्णय.....
या सर्व गोष्टी आता या संस्थळावरील जवळपास सर्वांनाच चांगल्याच माहित झाल्या आहेत.... त्यामुळे दूर करूया ती सर्व पुस्तके (मग ती गांधींच्या बाजूने लिहिलेली असो वा सावरकर यांच्या बाजूने..... य. दि. फडके, जगन फडणीस, शेषराव मोरे, धनंजय कीर आदी ठळक नावे तर आपल्या राज्यातील झाली.... मी आणि तुमच्यापैकी कित्येकांनी दुर्गा दास, शंकर घोष, महादेव देसाई, प्यारेलाल नायर, ही भारतीय लेखक मंडळी तसेच अनेक युरोपियन लेखक यांची पुस्तके वाचलेली आहेत...हजारो पुस्तकांचा सागर आहे "गांधी" या विषयावर... मग कुठली प्रमाण मानणार आहोत आपण?) आणि आपल्यातील "मॅच्युअर" आहेत...कुणीही शाळेला जाणारे विद्यार्थी नाही, की ज्याला पुस्तकातील ओळ अन ओळ समजावून सांगणे गरजेचे आहे. फक्त आपली सारासार विचार करण्याची बुद्धी लक्षात घेऊन फक्त इतकेच पहा (ज्याला गणिती भाषेत "डीडक्शन" काढणे असे म्हणतात....) की १२ जानेवारीला सरदार पटेल ५५ कोटी पाकिस्तानला देणार नाही म्हणतात आणि १३ जानेवारीला गांधी उपोषणाला बसतात आणि दोनच दिवसांनी नेहरू ते ५५ कोटी पाकिस्तानला तत्काळ देऊन टाकतात..... काहीतरी संगती आहे कि नाही या घटना क्रमात?....आता १८ ला गांधीनी उपोषण सोडले हा मुद्दा इथे किती महत्वाचा आहे? १६ व १७ ला दिल्लीतील दंगली थंडावल्या होत्या का? की, गांधीनी १८ ला उपोषण समाप्त केल्यानंतर दिल्लीतील "राम आणि रहीम" लागलीच कुठे चांदनी चौकात नूरजहानचा चित्रपट बघायला जोडीने गेले? केवळ त्या हमीपत्रावर ५५ कोटीचा उल्लेख नाही म्हणून उपोषणाचा आणि देणे रकमेचा काही संबंध नव्हता ही समजूत स्वत:शीच फसवणूक केल्यासारखे आहे. "हमीपत्र" म्हणजे "दंगली होणार नाहीत, मुसलमानांच्या मालमत्तेचा हिंदू ताबा घेणार नाही......गुण्यागोविंदाने राहू..." अशा बिनकण्याचा बाबींनी भरलेला मजकूर ज्याला दिल्लीतील गटाराच्या कडेला बसलेल्या पोराने देखील किंमत दिली नसेल... कारण देणे रक्कम त्या अगोदरच देऊन आम्ही पाकिस्तानपुढे झुकतोय हे तर नेहरूंनी दाखवूनच दिले होते....
......तीच परंपरा आजही चालू आहेच ना?
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Wed, 06/02/2010 - 16:24
नवीन
वैयक्तिक 'मूल्यांची' जपणूक करण्याकरता आणि दूरगामी विचार न करता तात्कालिक प्रश्नांमधून सोडवणूक करण्याकरता राष्ट्राची अस्मिता ज्यावेळी पणाला लावली जाते त्यावेळी राष्ट्र म्हणून आपला पराभव झालेला असतो!
चतुरंग
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 06/02/2010 - 17:19
नवीन
संपूर्ण अवांतर आहेच पण 'नाझी भस्मासुराचा उदयास्त'मधे वि.ग.कानिटकरांनी हेच विधान इंग्लंडचे तत्कालिन पंतप्रधान नेव्हील चेंबर्लेन यांच्याबद्दल केलं आहे. रक्ताचा थेंबही न सांडता हिटलरने ऑस्ट्रीया आणि (तत्कालिन) झेकोस्लोवाकिया घशात घेतला याचा त्या विधानाला संदर्भ आहे.
अदिती
- Log in or register to post comments
र
रामपुरी
Wed, 06/02/2010 - 17:25
नवीन
स्वतंत्र भारतातील त्यांचा पहिला वाढदिवस हा त्यांचा शेवटचाच वाढदिवस ठरला
Better an end with horror than horror without end...
रोज रोजची ती मुसलमानधार्जीणी उपोषणे तरी बंद झाली.
- Log in or register to post comments
स
समंजस
Wed, 06/02/2010 - 16:21
नवीन
तुमच्या म्हणण्यात बरचसं तथ्य आहे इन्द्रराजसाहेब.
तुमच्या आतापर्यंतच्या प्रतिसादातून देण्यात आलेल्या संदर्भांवरून तसेच इतर ठिकाणी वाचण्यात आलेल्या माहितीवरून, महात्मा गांधींच्या या १२ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यानच्या उपोषणामागे प्रथमदर्शनी प्रमुख दोन कारणे दिसून येतात.
१)पाकिस्तानला दिल्या जाणार्या एकूण ७५ कोटीं पैकी उर्वरीत ५५ कोटी हि रक्कम भारत सरकारने थांबवून न ठेवता ती लवकरात लवकर द्यावी.
२) दिल्लीत मुस्लीम-हिंदू/शिख याच्यांत होत असलेल्या दंगली थांबवणे.
अर्थातच त्या ७-८ दिवसांमधे घडलेल्या घटनांचा क्रम लावता, त्या ७-८ दिवसांमधे वर्तमानपत्रांमधे आलेल्या भारत सरकारच्या वक्तव्यांचा (१२ जानेवारीचं पटेलांचं वक्तव्य, १५ जानेवारीचं नेहरूंचं वक्तव्य) लक्षात घेता हे दिसून येतं की, भारत सरकारचा जो १२ जानेवारीला निर्णय होता उर्वरीत ५५ कोटी पाकिस्तानला न देण्याचा(काश्मिरातून त्यांच्या सैन्याने पुर्ण माघार घेइ पर्यंत) तो निर्णय भारत सरकारने १५ जानेवारीला बदलला. का???.....या ३-४ दिवसात असं काय विशेष घडलं की भारत सरकारला आपला निर्णय बदलावा लागला?? जर महात्मा गांधींचं उपोषण या निर्णयबदला मागे कारणीभूत नव्हतं तर दुसरं काय कारण असू शकतं ??? कोणाला हे दुसरं कारण माहीत असल्यास कृपया काही संदर्भ द्यावेत ही विनंती.
महात्मा गांधींच्या उपोषणामागे असलेल्या दुसर्या कारणाबाबतीत तरी कोणताच मतभेद आढळून येत नाहीय.
- Log in or register to post comments
स
सोम्यागोम्या
Wed, 06/02/2010 - 21:49
नवीन
>>या ३-४ दिवसात असं काय विशेष घडलं की भारत सरकारला आपला निर्णय बदलावा लागला??
+१
अगदी पटेश.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Wed, 06/02/2010 - 17:33
नवीन
त्या धाग्यावरील इंद्रराज पवार यांच्या प्रतिसादात खालील प्रमाणे माहिती आहे.
५५ कोटी..... खरे खोटे !!!
प्रेषक इन्द्र्राज पवार ( मंगळ, 06/01/2010 - 10:47) .
"....आता खरे खोटे कसे सिद्ध करणार?...."
ज्यावेळी एखादा चरित्रकार त्याच्या मनी असलेल्या व्यक्तीबद्दल लिहिण्यास घेतो त्यावेळी "त्याला" जे वाटत असते त्याचेच प्रतिबिंब त्याच्या लिखाणात उमटते. आपण "खरे खोटे कसे सिद्ध करणार?" असे म्हटले आहे. त्यासाठी आपणास (शक्य असल्यास....)"टाईम्स ऑफ इंडिया" मुंबईच्या लायब्ररीत जावे लागेल व खालील तारखेचे अंक पाहावे लागतील.... (ही सोय तिथे उपलब्ध आहे...). या तारखेच्या या बातम्या अंकाच्या मुखपृष्ठावर ८ कॉलमरितीने प्रकाशीत झाल्या आहेत. ::
१. गुरुवार दि. १ जानेवारी १९४८
NO PAYMENT TO PAKISTAN
Supply of Military Stores Stopped
India against implementation of financial settlement. Demand to give up Kashmir Adventure.
२. मंगळवार दि. १३ जानेवारी १९४८
MAHATAMA GANDHI STARTING FAST FROM TODAY
इंद्रराज यांनीच पूर्वी दिलेल्या माहितीतून पैसे न देण्याचा निर्णय १२ जानेवारीला घेतलेला नसून १ जानेवारीला घेतला होता हे दिसते.
त्यामुळे १२ जाने ला पटेलांनी घोषणा केली ....१३ जानेवारीला उपोषण..... हे लॉजिक टिकत नाही.
असो. लखनौ करार करणारे टिळक मुत्सद्दी आणि मुस्लिम लीगशी कोणताही करार न करणारे गांधी-नेहरू मुस्लीम लांगूलचलन करणारे अशी झापड एकदा डोळ्यावर लावली की मग पुढे नीट काही दिसेनासे होते हे खरे.
नितिन थत्ते
- Log in or register to post comments
स
सोम्यागोम्या
Wed, 06/02/2010 - 21:56
नवीन
सारासार विचार करायचा की वाक्यांचे कीस पाडण्यात धन्यता मानायची हे ज्याचे त्याने ठरवावे.
झोपलेल्याला उठवता येते झोपेचे सोंग घेणा-याला कसे उठवणार, तेव्हा पवार साहेब जे म्हणतात त्यात तथ्य आहे, गांधीचे उपोषण ५५ कोटीसाठी नव्हते यावर विश्वास बसण्या सारखी एकही ठळक गोष्ट समोर आलेली नाही.
काय घडले ह्यावर प्रकाश टाकताना तारखा , कात्रणे, ध्वनिफिती फॅक्ट्स या सोबत व्यक्तिच्या स्वभावाची बाजू लक्षात घ्यावी म्हणजे सगळा ताळमेळ लागतो. गांधीचा लांगूलचालनाचा स्वभाव पाहता उपोषण कशासाठी होते हे सहज कळेल.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 06/03/2010 - 11:44
नवीन
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Wed, 06/02/2010 - 19:21
नवीन
गांधींच्या मुस्लीमधार्जीणेपणामुळे आणि जिनाच्या सत्तेच्या लालचेमुळे देशाचे तुकडे झाले...आता जीनापेक्षा गांधींचे महत्व केव्हाही जास्तच होते, आहे...त्यामुळेच गांधीनी राष्ट्र्विभाजानाला विरोध केला असता तरी चालले असते...दुर्दैवाने असे झाले नाही...त्याची फळे आपण अजूनही भोगतो आहोत...काश्मीरचा नरक केला आहे पाकिस्तानने....काश्मीर प्रश्न जवळच्या भविष्यात सुटेल असे वाटत नाही कारण अजूनही चर्चेचे गुऱ्हाळ चालू आहे...पाकिस्तानबरोबर चर्चा हा उपाय नाही...कारण एकीकडे ते चर्चा करतात आणि त्याचवेळी दुसरीकडे काश्मिरात थैमान घालतात...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Wed, 06/02/2010 - 20:00
नवीन
"...त्यामुळे १२ जाने ला पटेलांनी घोषणा केली ....१३ जानेवारीला उपोषण..... हे लॉजिक टिकत नाही.....
श्री . नितीन जी ... तुमच्यासारख्या अभ्यासकाने अशा प्रकारच्या शंकांचा काथ्याकुट करावा याबद्दल सखेद आश्चर्य वाटते. अहो .... ४० कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेला हा देश होता त्यावेळी , सार्या जगाचे लक्ष लागले होते त्या काळात हिंदुस्थानातील या घटनाकडे. युनोचे अधिवेशनही या भारत-पाक ताणावर बोलाविण्यात आले होते. एक तारखेला नकार दिला म्हणजे त्यासाठी पाकिस्तानने लगेच माऊंटबॅटनकडे धाव घेतली आणि "मला माझ्या वाटणीचा पिझ्झा दिल नाही.." म्हणून भोकांड पसरले असे नाही. असे राजनैतिक पातळीवर होत नसते. तो आठवडा वेगवेगळ्या घटनांनी गजबजलेला असणारच... गृह खात्याच्या त्या घोषणेनंतर "डिप्लोमॅटिक" पातळीवर काहीतरी बोलणी, मधला मार्ग काढणे ही बोलणी चालू असतीलच ना. एक लक्षात घ्या, गांधीजी सरकारच्या दैनंदिन व्यवहारात लक्ष घालत नसत. मात्र सरकारची ती घोषणा त्यांच्या कानावर जाताच त्यांनी नेहरूंच्याकडे याबद्दल विचारणा केली असणार यात संदेह नाही. आता नेहरूंनी पटेल यांना गांधींचे मत सांगितल्यावर त्यांची मनस्थिती काय झाली असेल हे सांगायला नको. त्यांनी तर नेहरूंचे ऐकले नसणारच, कारण भारताचे गृहमंत्री म्हणून त्यांच्यासमोर दिल्लीशिवाय अनेक प्रश्न आ वासून पुढे होतेच. त्याही स्थितीत घाटीतील संघर्ष चिघळल्यावर आणि तशातच पाकिस्तानचे प्रतिनिधी लॉर्ड माऊंटबॅटन यांना करारासंदर्भात भेटायला आल्यावर त्या संदर्भात त्यांनी १२ जानेवारीला "ती" पत्रकार परिषद घेतली व देण्याघेण्याबाबातच आपला ठाम निर्धार व्यक्त केला.... मग मात्र आता इथे गांधीनी आपले उपोषणाचे अखेरचे अस्त्र बाहेर काढले.....!!
तुम्हाला त्यांच्या उपोषणाच्या तारखेने गोंधळात टाकले आहे... कारणाने नाही....हे मान्य करूया.... मग त्यांना "दिल्लीतील दंगली संपाव्यात" यासाठी १३ जानेवारी हीच तारीख का सापडावी, असें मी विचारले तर? हे मी या साठी म्हणत आहे की, १ सप्टेंबर १९४७ ला कलकत्यातील दंगल शमावी म्हणून गांधीजीनी तेथे उपोषण सुरु केले. ४ सप्टेम्बरला दोन्ही धर्माच्या नेत्याकडून "शांततेचे" आश्वासन घेऊन त्यांनी ते उपोषण सोडले. कलकत्त्याहून ८ सप्टेंबर १९४७ ला गांधी पंजाबला जायला निघाले. पण ते दिल्लीपर्यंत पोचतात तोच दिल्ली पेटली....आणि दिल्लीतील तो आगडोंब शमावा यासाठी गांधीजींनी पंजाबचा दौरा रद्द केला व दिल्लीतच पुनश्च दोन्ही जातीच्या शांततेसाठी प्रयत्न करायचे निश्चित केले. इथे पहा...८ सप्टेंबरला गांधी "पेटलेली दिल्ली शांत व्हावी" म्हणून काम सुरु करतात आणि ती थंड होत नाही म्हणून नेमके १३ जानेवारीला "उपोषण" करणार असे सांगतात.... याचा अर्थ सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या चार महिन्यात दिल्लीत काय २०-२० च्या मॅचेस चालू होत्या काय? या चार महीन्यांच्या दीर्घ काळात त्यांना नाही वाटले की आपण आता दंगली, जाळपोळी, हत्या थांबाव्यात म्हणून "उपोषण" सुरू केले पाहिजे?
बाकी इतिहास...? त्याची परत परत उजळणी नको.
घोषणा...सर्व शासकीय पातळीवर होत असलेल्या घोषणा या कासवाच्या गतीनेच चाललेल्या हालचाली असतात.... ज्या आज जाहीर केल्या म्हणजे उद्या लगेच अंमलात आली असे होत नसते. अहो, सरकारने साधा महागाई भत्ता २ टक्के वाढविण्याची घोषणा केली, तर तो कर्मचार्याच्या पगारात "अॅड" व्हायला तीन महिने लागतात...आणि ती वरील बाब तर दोन देशातील धुमसत असलेला प्रश्न !!
जाता जाता.... ~~ "सावरकर धाग्यात" तुम्हीच असा शेरा मारला होता कि, "धागा सावरकर यांच्यावर.... मात्र चर्चा चालू आहे गांधी-नेहरू यांच्यावर..."
तुमच्याच पावलावर पाऊल टाकून आता मी असे म्हणतो की... "धागा महात्मा गांधीवर.... मग त्यात त्या बिचार्या बळवंतरावांना कशाला लखनौला नेत आहात...?"
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
गुरुवार, 06/03/2010 - 02:00
नवीन
मुळात तुम्ही म्हटले की १२ जानेवारीला ५५ कोटी न देण्याचा निर्णय जाहीर झाला.
नितीन रावांनी पुरावे देऊन ती तारीख १ जानेवारीपर्यंत मागे नेली.
ही चूक कृपया प्रांजळपणे कबूल करावी.
ज्या विद्याचे विश्लेषण करून आपण एका निर्णयाप्रत पोहोचला आहात, तो विदाच चूक दाखवून दिला असल्याने, आपल्या निर्णयाप्रत शंका निर्माण होते.
आता, १ जानेवारी ते १३ जानेवारी काय झाले, ह्याबद्दल संशोधन करावे ही विनंती.
वरील प्रतिसादात "दिल्लीत २०-२० च्या मॅचेस" असे शब्द वापरल्यामुळे, तुम्हाला इतिहासाचे अभ्यासक म्हणवता येत नाही. तुमच्या आधीच्या प्रतिसादात इतिहासाचे अभ्यासक असल्याचा आभास निर्माण करण्यात आपण यशस्वी झालात, हे कबूल करतो.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
- Log in or register to post comments
आ
आवशीचो घोव्
गुरुवार, 06/03/2010 - 05:07
नवीन
@मिसळभोक्ता
....आता, १ जानेवारी ते १३ जानेवारी काय झाले, ह्याबद्दल संशोधन करावे ही विनंती.....
यावरील प्रतिक्रीया इंद्राजींनी आधीच दिली आहे, नितीनरावांना उत्तर म्हणून.
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
गुरुवार, 06/03/2010 - 05:13
नवीन
@आवशीचाघोव,
माफ करा, मी इंद्ररावांची प्रतिक्रिया सुमारे १५ वेळा वाचली. त्यात गांधीजींनी १ जानेवारी १९४८ ते १२ जानेवारी १९४८ च्या दरम्यान ५५ कोटींविषयी काय विचार व्यक्त केलेत ते लिहिलेले नाही.
तुम्हाला काय सापडले ?
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
- Log in or register to post comments
आ
आवशीचो घोव्
गुरुवार, 06/03/2010 - 12:14
नवीन
@मिसळभोक्ता
एक तारखेला नकार दिला म्हणजे त्यासाठी पाकिस्तानने लगेच माऊंटबॅटनकडे धाव घेतली आणि "मला माझ्या वाटणीचा पिझ्झा दिल नाही.." म्हणून भोकांड पसरले असे नाही. असे राजनैतिक पातळीवर होत नसते. तो आठवडा वेगवेगळ्या घटनांनी गजबजलेला असणारच... गृह खात्याच्या त्या घोषणेनंतर "डिप्लोमॅटिक" पातळीवर काहीतरी बोलणी, मधला मार्ग काढणे ही बोलणी चालू असतीलच ना. एक लक्षात घ्या, गांधीजी सरकारच्या दैनंदिन व्यवहारात लक्ष घालत नसत. मात्र सरकारची ती घोषणा त्यांच्या कानावर जाताच त्यांनी नेहरूंच्याकडे याबद्दल विचारणा केली असणार यात संदेह नाही. आता नेहरूंनी पटेल यांना गांधींचे मत सांगितल्यावर त्यांची मनस्थिती काय झाली असेल हे सांगायला नको. त्यांनी तर नेहरूंचे ऐकले नसणारच, कारण भारताचे गृहमंत्री म्हणून त्यांच्यासमोर दिल्लीशिवाय अनेक प्रश्न आ वासून पुढे होतेच. त्याही स्थितीत घाटीतील संघर्ष चिघळल्यावर आणि तशातच पाकिस्तानचे प्रतिनिधी लॉर्ड माऊंटबॅटन यांना करारासंदर्भात भेटायला आल्यावर त्या संदर्भात त्यांनी १२ जानेवारीला "ती" पत्रकार परिषद घेतली व देण्याघेण्याबाबातच आपला ठाम निर्धार व्यक्त केला.... मग मात्र आता इथे गांधीनी आपले उपोषणाचे अखेरचे अस्त्र बाहेर काढले.....!!
१ जाने. ते १३ जाने. या काळात गांधीजींनी काय विचार व्यक्त केले याबाबतीत इंद्राजींनी माहिती दिली नाही हे खरे आहे. पण तुम्ही "या काळात काय घटना घडल्या?" असा प्रश्न उपस्थित केला होता, ज्याचे उत्तर वर दिलेले आहे.
- Log in or register to post comments
श
शेखर काळे
Wed, 06/02/2010 - 21:21
नवीन
दंगली अगदी ताबडतोब थांबल्या का ?
गांधीजींनी उपोषण संपविण्याचा निर्णय घेतला तो दंगली थांबविण्याचे आश्वासन मिळाले म्हणून. मग तसे झाले का ? नसेल तर मग उपोषण का संपविले ?
- Log in or register to post comments
ट
टारझन
Wed, 06/02/2010 - 21:24
नवीन
असं काय ? भुक लागली असेल नं त्यांना ? ;) कितीही मोठे असले तरी "माणुस" होते ते :)
मी तर रोज इनामे इतबारे सकाळी ९ ते दुपारी १ ह्या काळात उपोषण करतो !!
- टारझनदास पांदी
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 06/03/2010 - 11:49
नवीन
=)) =)) =))
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
गुरुवार, 06/03/2010 - 02:30
नवीन
मिपावर (आणि त्या आधी मनोगतावर) गांधी हा विषय बरेचदा चघळला गेला आहे. गांधींनी भगतसिंगाला फाशीवर चढवले, ह्याचे पुरावे अडीच वर्षापूर्वी सर्किटने मगितले होते, ते अद्याप मिळालेले नाहीत, असे कळते. असो. इतिहास संशोधनाला मास-मीडिया च्या चष्म्यातून पाहणे ही हल्ली फ्याशन आहे.
पण मला ह्याव्यतिरीक्त खटकणारी बाब अशी, की गांधी म्हटले, की हमखास "गांधी-नेहरू" असा उल्लेख होतो. जणू दोघेही एकच होते. हे चूक आहे, हे मास-मीडिया वाले देखील मान्य करतील. पण तरी देखील, सो कॉल्ड इतिहास संशोधक अजूनही "गांधी-नेहरू" म्ह्णतात.
२५ डिसेंबर १९४७ ला गांधींनी प्रार्थना सभेत केलेल्या भाषणाची सुरुवात सदर "संशोधकांना" मनोरंजक वाटेल. त्याचा माझ्या अल्पमतीने केलेला अनुवाद.
---
बंधु भगिनींनो,
काश्मिरात जे काही घडते आहे, त्यासंबंधी तुम्हाला थोडीफार तरी माहिती असेल. पण मला तुमचे लक्ष काश्मिरविषयक एका प्रस्तावाकडे वेधायचे आहे. भारत आणि पाकिस्तान ह्या देशांत काश्मिर झगड्यावर मध्यस्थी करण्यासाठी तिसर्याच कुठल्यातरी संस्थेला विनंती करण्यात यावी असे बोलले जात आहे, आणि वर्तमानपत्रेदेखील ह्या कल्पनेला पाठिंबा देत आहेत. असे का ? असे किती दिवस चालणार ? ह्या समस्येचे समाधान होण्याऐवजी, आत आणखी एक तिसरी बाजू उघडणार. आपण हे आपल्यातच सोडवू शकत नाही का ?
----
नेहरू (ज्यांचा कल काश्मिरप्रश्न संयुक्त राष्ट्रसंघामार्फत सोडवण्याकडे होता) आणि गांधी स्वतंत्र विचार करायचे, हेच इथून सिद्ध होत नाही का ?
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
गुरुवार, 06/03/2010 - 04:15
नवीन
'पुरावे' म्हणून सांगितलेल्या गोष्टी टिकत नाहीत असे पाहून शाब्दिक कीस वगैरे म्हटले जात आहे.
अवांतर: टिळकांना यात ओढणे हे अवांतर नाही कारण बरीच चर्चा मुस्लिम लांगूलचालन या विषयाभोवती फिरत आहे. म्हणून तशाच प्रकारचे लांगूलचालन- नुसते बोलके नव्हे, प्रत्यक्ष लेखी कराराद्वारे- करणार्या एका 'आपल्याला रिस्पेक्टेड असलेल्या' आणि कोलू न पिसलेल्या ;) आणखी एका नेत्याचे नाव सांगितले.
नितिन थत्ते
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 06/03/2010 - 11:55
नवीन
'आपल्याला रिस्पेक्टेड असलेल्या'
थोडेसे अधिक.
रीस्पेक्टेड असलेल्या आणि ३ वेळा राजद्रोहाचा खटला भरला गेलेल्या आणि त्यातल्या १ दा डोंगरीच्या तुरुंगात साधारण ८-१० महीने काढलेल्या आणि १ दा मंडालेच्या तुरुंगात ६ वर्षे काढलेल्या (आगाखान पॅलेसात नव्हे) एका नेत्याचे नाव.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
- Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे
गुरुवार, 06/03/2010 - 14:37
नवीन
हा हा हा!
सहमत
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »