Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अगा लेखकांनो

स — सन्जोप राव, Fri, 06/18/2010 - 03:11

प्रतिक्रिया द्या
18283 वाचन

💬 प्रतिसाद (85)
प
पाषाणभेद Fri, 06/18/2010 - 03:37 नवीन
कवितेचा उत्तरार्ध वास्तवतेची जाणीव करून देतो. एखादा लेखक / कवि त्याच्या कलाकृतीवर प्रेम करतो. त्यात तो आकंठ बुडतो. त्याला तेच योग्य वाटू लागते. बाह्यजगाला तो विसरतो. जगाची चालरीत, इतर लोकांची त्याच्याप्रती वागणूक तो विसरतो. अन जेव्हा वास्तवाचे भान येते तेव्हा कदाचित वेळ झालेला असतो. बाह्यजगाला त्याच्या कलाकृतीशी काहीच घेणेदेणे नसते. त्या वेळी त्याला केवळ इतरांसारखेच जीवन जगणे भाग पडते. तो कलाकृतीशी फारकत घेवू इच्छीतो. सन्जोपरावांनी हेच अगदी योग्यरित्या कवितेत मांडलेय. प्रत्येक कलाकाराच्या बाबतीत असे अनुभव त्याला काही कालावधीपुरते तरी येवू शकतात. जो यातून बाहेर पडतो तो एकतर सिदहस्त कलाकार गणला जातो किंवा एक सामान्य माणूस म्हणून तो तयार होतो. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 06/18/2010 - 04:37 नवीन
मेणकट मेहरबानी ललीत काफीरबानी मेजवानीश्च मितहारी नोकरीचाकरी लै भारी पॉझिटीव्ह जीए चाय्व्ही जळजळांग हे लाहीलाही हा तर मिभो काय म्हणत होते गुप्त संदेश वगैरे वगैरे --------------------------------------- नॉट एव्हरीथिंग दॅट ग्लिटर्स इज गोल्ड, नॉट एव्हरीबडी नेम्ड हुहुहुहु इज हीए.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 06/18/2010 - 05:08 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) हरकाम्या इल्ल्यास सुकवता है कपडे पचास नखरे तेरे , तेरे पास मे म्हैने मे कैसे ये उपास लोफर कही का गटर की पैदास जमलं जमलं ... आमाला बी जमलं =)) -- सर्जेराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
व
विनायक प्रभू Fri, 06/18/2010 - 09:05 नवीन
सहज रावांनी तर पुरुषांना सुद्धा ते दिवस असतात असे क्रिप्ट मधे सुचवले आहे की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
अ
अवलिया Fri, 06/18/2010 - 09:22 नवीन
मे णकट मेहरबानी ल लीत काफीरबानी मे जवानीश्च मितहारी नो करीचाकरी लै भारी पॉ झिटीव्ह जीए चाय्व्ही ज ळजळांग हे लाहीलाही
क्या बात है ! सहज अगदि मनातलं बोललास... नेत्र लागले रे पैलतीरी.... असे झालेले दिसतेय. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
भ
भडकमकर मास्तर Fri, 06/18/2010 - 13:11 नवीन
सहजकाकांनी कमीतकमी वाक्यात मोठा संदेश दिलेला पाहून आनंद वाटला... सह्हजकाका झिन्दाबाद... पॉझिटीव्ह जीए चाय्व्ही या ओळींना विशेष दंडवत __/\__ :) ही कविता वाचून अमर्त्य सेना वसंतसेना सेनासमथिंग कलहारी अशा काही इलिनॉईच्या दुगाण्या आठवल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
आ
आनंदयात्री Fri, 06/18/2010 - 04:50 नवीन
अले व्वा .. सरांना कित्ती कित्ती लेखक अन कवी माहिती आहेत नै !! सहीच आहेत सर !!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 06/18/2010 - 06:42 नवीन
आंद्याशी सहमत हाटेलातल्या मेन्यू कार्डावरच्या पदार्थांची लिस्ट लिहुन झालीय लेखकांच्या नावाची लिस्ट हे देखील साहित्य मानौन घ्यावे . असो...... लेखणीच्या उतारवयामुळे हे असे व्हायचेच अवांतरः कधीकाळी भविश्यात उत्खनन झालेच तर शौचालयातील भिंतीवरच्या मुक्तकाना सुद्धा शिलालेखांचा दर्जा मिळेल Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
प
प्रकाश घाटपांडे Fri, 06/18/2010 - 04:55 नवीन
थोडक्यात जव्हर टंकनी चालतीय तव्हर काही बी लिवा. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Fri, 06/18/2010 - 05:23 नवीन
समजली. हस्तमैथुनाने काहीतरी वाकडे होते असा गैरसमज आहे. मुक्तक वाचून तो गैरसमज समज वाटला.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 06/18/2010 - 05:37 नवीन
हस्तलाघव समजुन वाचावे प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
अ
अक्षय पुर्णपात्रे Fri, 06/18/2010 - 12:38 नवीन
आत्ममैथुन समजून पुन्हा वाचले. (हस्तलाघवही चपखल आहे पण आत्ममैथुनातला सच्चेपणा त्यात नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 06/18/2010 - 12:54 नवीन
कंसाशी सहमत आहे. आत्ममैथुन म्हणजे कसं संशयाला जागा उरत नाही... हस्तलाघव थोडं ऑल इन्क्लुझिव होईल. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
अ
अक्षय पुर्णपात्रे Fri, 06/18/2010 - 14:20 नवीन
मुक्तक या लेखनप्रकारात अपेक्षित असलेला ध्येयहीन स्वच्छंद प्रस्तुत लेखनात आढळत नाही. तेव्हा प्रस्तुत लेखनप्रकारास आत्ममैथुन असे नाव देणे योग्य ठरेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
र
रामदास Fri, 06/18/2010 - 15:34 नवीन
हस्त नक्षत्रावर केलेले ते असा तर अर्थ नसेल ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Sat, 06/19/2010 - 05:07 नवीन
नक्षत्रफलित 'सौख्य' असले म्हणजे झालं. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
न
नीलकांत Fri, 06/18/2010 - 05:27 नवीन
मौनावरचे व्याख्यान आवडले. :) - (अज्ञ) नीलकांत
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 06/18/2010 - 05:38 नवीन
गोलपिठा मधल्या "त्या" (कु?)प्रसिद्ध कवितेची आठवण करून देणारी कविता - मात्र "त्या" कवितेमागच्या एकंदर पार्श्वभूमीचा अभाव असणारी. आणि मग थकून जमिनीवर पडाल जेंव्हा डोळे मिटून आकाशात एकच मोठा डोळा उघडावा तसं विक्राळ गगनभेदी आयुष्य दिसेल क्षणभर आपल्या कोट्यावधी रक्ताळलेल्या हातांनी तुम्हाआम्हांला कुस्करणारं, कुरवाळणारं आणि तुमच्या अजरामर वगैरे साहित्याच्या छाताडवर चिखलतुडव नाचत खदाखदा हसणारं या जातीचा अनुभव प्रस्तुत कवितेच्या पहिल्या परिच्छेदात आलेल्या (आणि न आलेल्या) काही नावांनी केलेल्या लिखाणामधे आल्याचे काही लोक म्हणू शकतात. अर्थात दुसर्‍यांना आलेल्या अशा अनुभवाचे वर्णन "रीकींग ऑफ काँडेसेंशन" अशा शब्दांत करता येईलच. कवितेच्या शेवटच्या परिच्छेदात आलेल्या "प्रोक्लेमेशन"चे अजून दिव्यदर्शन प्रत्यक्षांत येऊ न शकल्याने (निदान आज-उद्या-परवा तरी) चार शब्द वाचेन असे म्हणतो. गुलाल उधळणे, कुरवाळणे इत्यादि गोष्टी आजवर जमल्या नाहीत पण आता काळ थोडा राहिलासे वाटते. सरतेशेवटी, शब्दांच्या देवघेवीच्या व्यवहाराचे वैयर्थ वर्णन करण्याकरता, त्याला चूड लावायला पुन्हा शब्दांचाच आश्रय घ्यावा लागतो हे पाहाताना अंमळ वाईट वाटले खरे. जर का एकंदर ज्ञानाच्या प्रक्रियेची, वाचन-लिखाण-वेव्हाराची फलश्रुती अशी "रिती" वाटत असेल तर त्याबाबत येणारे छद्म, त्याबद्दल बोलताना येणारे शब्दांमधले (!) विष कितपत अर्थपूर्ण ठरते ? शतकानुशतके चालत आलेल्या प्रक्रियेला एखाद-दोन परिच्छेदांमधे कचर्‍यामधे टाकताना त्याबद्दलच्या नकाराखेरीज नवे कसले सत्यदर्शन घडताना येथे दिसत नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 06/18/2010 - 09:13 नवीन
कवितेच्या शेवटच्या परिच्छेदात आलेल्या "प्रोक्लेमेशन"चे अजून दिव्यदर्शन प्रत्यक्षांत येऊ न शकल्याने (निदान आज-उद्या-परवा तरी) चार शब्द वाचेन असे म्हणतो. ........ सरतेशेवटी, शब्दांच्या देवघेवीच्या व्यवहाराचे वैयर्थ वर्णन करण्याकरता, त्याला चूड लावायला पुन्हा शब्दांचाच आश्रय घ्यावा लागतो हे पाहाताना अंमळ वाईट वाटले खरे. जर का एकंदर ज्ञानाच्या प्रक्रियेची, वाचन-लिखाण-वेव्हाराची फलश्रुती अशी "रिती" वाटत असेल तर त्याबाबत येणारे छद्म, त्याबद्दल बोलताना येणारे शब्दांमधले (!) विष कितपत अर्थपूर्ण ठरते ? शतकानुशतके चालत आलेल्या प्रक्रियेला एखाद-दोन परिच्छेदांमधे कचर्‍यामधे टाकताना त्याबद्दलच्या नकाराखेरीज नवे कसले सत्यदर्शन घडताना येथे दिसत नाही.
!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
भ
भोचक Fri, 06/18/2010 - 13:41 नवीन
मुसूंशी संपूर्ण सहमत. (भोचक) जाणे अज मी अजर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
व
विजुभाऊ Mon, 06/21/2010 - 10:28 नवीन
मुक्त सुनीत काकांचे कौतूक करावे तेवढे कमीच होईल. एरव्ही फारसे ल्हिणर नाहीत पण संजोप काकांचे काही असले की त्यांची प्रतिक्रिया हमखास येतेच. फक्त प्रश्न असा पडतो की स्वतःची उत्तम अशी प्रतिभा असताना अशी ही आरती का गाता? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मुक्तसुनीत Mon, 06/21/2010 - 13:49 नवीन
माझ्या प्रतिक्रियेत आरती नेमकी कुठे दिसली ते कळवले तर आनंद होईल. बाकी तुमच्या प्रतिक्रियेमधे नक्की काय आहे ते वेगळे सांगायची गरज नाही. तुमचा जो काही पर्सनल अजेंडा आहे तो पुढे करण्याकरता इतरांचा उद्धार करू नका असे सुचवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ Tue, 06/22/2010 - 16:20 नवीन
पर्सनल अजेन्डा काहीच नाही. आणि कशासाठी ठेवायचा म्हणे तो तसा? प्रतिसादातदेखील तुम्ही इतके उत्तम लिहिता..... फक्त ते प्रतिसाद केवळ एखाद्या विषिष्ठ लेखकाच्या लिखाणावरच देत असता. म्हणून ते तसे लिहिले होते. ( एखादा अगदी फालतू लेख आवडला नाही तरी तुमच्या उत्तम प्रतिसादासाठी मात्र तो धागा आवर्जून उघडतो) असो. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ऋ
ऋषिकेश Fri, 06/18/2010 - 05:46 नवीन
(काहिसे भडक) मुक्तक आवडले ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 06/18/2010 - 05:58 नवीन
एक छोटासा संवाद आहे तो देतो आहे. हू टॉट यु ऑल धिस डॉक्टर ? प्रॉम्ट केम रीप्लाय. सफरींग . सर ,आयुष्याचे अनुभव सच्चे असतील तर अंताला तुम्ही म्हणता तसे होण्याची काही शक्यता दिसत नाही किंबहुना तसे आधीच झाले म्हणून काही अजरामर कलाकृतींची निर्मीती झाली. पण सुडो लेखकांच्या आणि वाचकांच्या बाबतीत तुम्ही म्हणत तसे होण्याची शक्यता दाट आहे. ग्रेस्,खानोलकर,जीए ज्यांनी अनुभवले असतील त्यांना धक्का बसणार नाही पण त्या लेखकांची/कवींची केवळ बेगडी नक्कल लिहून करणार्‍यांची अवस्था मात्र तुम्ही म्हणता तशी होईलही. *वर प्लेगचा केलेला उल्लेख आठवणीवर भरोसा टाकून केला आहे. एखादा शब्द इकडे तिकडे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे मुक्तक आणखी रीफाईन करणे तुमच्या प्रतिभेला सहजशक्य होते असे वाटते.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 06/18/2010 - 07:44 नवीन
अर्थातच, रामदासांशी सहमत.
ग्रेस्,खानोलकर,जीए ज्यांनी अनुभवले असतील त्यांना धक्का बसणार नाही पण त्या लेखकांची/कवींची केवळ बेगडी नक्कल लिहून करणार्‍यांची अवस्था मात्र तुम्ही म्हणता तशी होईलही.
यात फक्त थोडे पु.ल. आणि इतर काही (प्रस्तुत कवितेत यादी नसली तरी पुरेसे सूचक बरेच काही आहे) वाढवले की संजोप रावांना काय म्हणायचे आहे हे बहुदा सापडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
अ
अक्षय पुर्णपात्रे Fri, 06/18/2010 - 12:50 नवीन
पण सुडो लेखकांच्या आणि वाचकांच्या बाबतीत तुम्ही म्हणत तसे होण्याची शक्यता दाट आहे.
सुडो आणि खरे लेखक, वाचक यांच्यात काय फरक आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 06/18/2010 - 12:56 नवीन
सुडो आणि खरे लेखक, वाचक यांच्यात काय फरक आहे? फरक डाव्या उजव्याचा असावा. ;) आय मीन, डावं उजवं करता येण्याच्या ताकदीचा असावा. काय म्हणता? :D (मध्यम) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
अ
अक्षय पुर्णपात्रे Fri, 06/18/2010 - 14:27 नवीन
स्युडो म्हणजे खोटे. लेखक कदाचित खोटेपणाने लिहू शकतील. (तसे करण्यासाठी अनेक प्रेरणा सांगता येतील. उदा. पुस्तक/ लेखन खपण्यासाठी प्रणयप्रसंगांचे अतिशयोक्त वर्णन वगैरे) पण स्युडो वाचक कोण हे कळत नाही. (नावे फेकण्यासाठी (नेम्सड्रॉपिंगसाठी) कोणी वाचन केल्याचा दावा करत असल्यास ती व्यक्ति (न वाचताच) व्यक्ति खोटे बोलत आहे म्हणजे वाचक नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
न
नील_गंधार Fri, 06/18/2010 - 06:31 नवीन
मुक्तक काहिसे भडक आहे. त्यावर रामदासांची प्रतिक्रिया समर्पक वाटते. प्रश्न उमटतो तो कविने अशी कविता कोणत्या अवस्थेत केली असेल. खुद्द कविच अशा विरक्तीकडे चालु लागला आहे काय? नील. अवांतर : जाता जाता कविता पुन्हा एकदा वाचलि .कवितेचा दर्जा फार वरचा आहे हे जाणवते.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 06/18/2010 - 06:32 नवीन
कवितेवर भाष्य करणे समर्पक. कवीवर करणे अयोग्य. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नील_गंधार
छ
छोटा डॉन Fri, 06/18/2010 - 06:48 नवीन
+१ बाकी आमची कवितेवर बोलण्याची लायकी नाही. ----- छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
न
नंदन Fri, 06/18/2010 - 07:32 नवीन
हा सवाल बहुतेक अनेक प्रतिभावंतांना आजवर पडला असावा. शिवाय, यक्ष-युधिष्ठिर संवादाप्रमाणे उद्याची शाश्वती नसताना आपण अमर आहोत अशा थाटात बेत रचणारे लोक हे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य आहे इ. गोष्टी खर्‍या आहेत. मात्र रोजच्या जगण्यात या आकळलेल्या विश्वाची मर्यादा आपसूक कमी करून घ्यावी लागते - आपण काही थोर लिहित/वाचत आहोत हा भ्रम आणि त्या भ्रमाचा भोपळा फोडण्यासाठी सरसावलेले काही - हे सारे त्याच वर्तुळात (फार तर वेगवेगळ्या त्रिज्यांनिशी) येत असावेत असं माझं एक वैयक्तिक, अल्प अनुभवांवर आधारित मत. >>> लोकांना माहिती असलेले तर घ्याच, पण माहिती नसलेले आधी घ्या --- हे भारीच :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 06/18/2010 - 08:17 नवीन
जगावं की मरावं हा एकच सवाल.. की झोकून द्यावं स्वत:लाच मृत्यूच्या काळ्याशार डोहात..! रावशेठ, फार दिवसांनी एक उत्तम, उच्च दर्जाचे मनस्वी मुक्तक वाचले.. वरीलपैकी काहींच्या 'मुक्तक काहीसे भडक आहे' या मताशी असहमत.. मुक्तक भडक नसून प्रखर वास्तववादी आहे असं मी म्हणेन.. जियो रावशेठ..! तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 06/18/2010 - 08:45 नवीन
रावसाहेब...एकदम शून्यात गेले? :O
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 06/18/2010 - 09:12 नवीन
सहज रावांना प्रतिसाद ऑफ द इयर ह्या असा पुरस्कार द्यावा असे मी अनुमोदन करतो.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 06/18/2010 - 09:57 नवीन
आज सकाळी झोपेतुन उठल्या उठल्या मित्राच्या सांगण्यावरुन हा धागा उघडला. एक अक्षरही लागल नाही. झोपेच्या अंमलाचा परिणाम म्हणुन सोडुन दिलं. पण आता हापिसात परत एकदा वाचुन काढल. वरवर उथळ दिसणार्‍या आणि बरच अगम्य वाटणार्‍या या मुक्तकात बराच अर्थ दडलाय. आवांतर : मास्तरांच्या वरच्या सुचनेला आपलपण अनुमोदन. अतिआवांतरः शरदीनी तैंचा कवितापण वाचाव्यात का अजुन २-४ वेळा :?
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 06/18/2010 - 11:41 नवीन
कविता हा आपला प्रांत नव्हे हे परत एकदा कळले. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 06/18/2010 - 11:42 नवीन
"आपला" हे स्वत:ला की कवीला उद्देशुन? --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
भ
भडकमकर मास्तर Fri, 06/18/2010 - 12:03 नवीन
जगाला आवडलेले पुस्तक कोणी वाचाच, असे सांगितले आणि ते भिकार वाटले आणि चारचौघांत तसे म्हणायची सोय नसली तर या कवितेतली भावना दाटून येते... रावांनी नुकतेच वाचून संपवलेले कोणते ओवररेटेड पुस्तक (किंवा लेखक) असेल बरे असा विचार करत आहे....
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 06/18/2010 - 13:04 नवीन
आवशींक खांव वरान! जल्लां हयसर तं पक्का दशावतारीचो खेळ रंगलो असां! ए रव्या...खंय असां मरें? हयसर झाडार मियां जागा धरुन बसलो असां मरें... शॉट्ट है भौ.. कविता की धडा की मुक्तक की स्फुट की अस्फुट की काय ते चिवडा-लाडू जे असेल ते खंगरीच! वर त्याच्यावरचे प्रतिसाद म्हणजे....आहाहा.... एखादी आवडीची व्हिस्की मस्त शरीर पिसासारखं हलकं करेपर्यंत प्यायल्यावर, बाहेर येऊन ठेल्यावरच्या पानवाल्यानं आपली केवळ नजर पाहुनच, न सांगता 'चुना जादा, एकसोबीस तीनसो, कडक रिमझिम डब्बल किमाम..' असं दणदणीत पान लाऊन आदरानं समोर धरावं आणि ते पान तोंडात टाकल्याबरोबर डोक्यात आणि डोळ्यापुढं ठाण्णकन दहा सुर्य चमकुन उतरायला लागलेली धुंदी पुन्हा दसपटीत भिरभिरत चढत जावी तसं काहीतरी झालंय बॉ ह्या धाग्याचं! आम्ही हौतच हितं पान चघळत! चालु द्या मंडळी... चालुद्या ;)
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Fri, 06/18/2010 - 13:06 नवीन
सन्जोप राव, तुमचा साहिर लुधियानवी तर होणार नाही ना .. हर एक जिस्म घायल हर एक रूह प्यासी... निगाहों में उलझन दिलों में उदासी.... जला दो इसे फूँक डालो ये दुनिया... मेरे सामने से हटालो ये दुनिया तुम्हारी है तो तुम्ही संभालो ये दुनिया... ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है.... --साहिर लुधियानवी क्यों जीने के ये मकसद मुझे रिझाते नहीं... रंगरलियाँ, ऐशो-आराम क्यों मुझे भाते नहीं... हकीकत मुझे हर एक मंजर में नज़र आती है... दुनिया के बनाये नज़ारे मुझे नज़र आते नहीं... रौशनी देने वाले अंधेरे में चिराग ढूढ़ते हैं ... बेरुखी भरे समंदर में एक बूँद आस ढूढ़ते हैं... कब के मर चुके जमीर इस दुनिया में... और वो बाज़ार में आबरू और ईमान ढूढ़ते हैं... ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sat, 06/19/2010 - 05:48 नवीन
>>कब के मर चुके जमीर इस दुनिया में... >>और वो बाज़ार में आबरू और ईमान ढूढ़ते हैं... क्या बात है !! जियो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
व
विजुभाऊ Mon, 06/21/2010 - 10:35 नवीन
प्यासा मधील विरक्तीकडे जाणारा गुरुद्त्त आठविला प्यासा मधला विरक्तीकडे जाणारा कवी...... हा विरक्तीकडे जाणारा वाटत नाही तर तो नाकर्तेपणाचा उदोउदो करतजाणारा एक निष्क्रीय बांडगूळ वाटतो. कॉलेजात असताना प्यासा पुन्हा पुन्हा पाहिला होता. त्यावर जोर्दार चर्चादेखील केल्या होत्या. त्यावेळी त्यातला कवी सच्चा वाटायचा पण आज त्यावर विचार करता असे वाटते की स्वतःचे असे काहीच निर्माण न करणार्‍याला मोठे का मानायचे? जगाला फालतू मानणारा हा कवी स्वतः का मोठा आहे हे कधीच सिद्ध करायला तयार होत नाही. शेवटाच्या प्रसंगात तर तो चक्क पळपुटा वाटतो Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
त
तिमा Fri, 06/18/2010 - 14:50 नवीन
सध्ध्या मिपावरील कवि, लेखक शरपंजरी पडलेले आहेत आणि टवाळ फिरताहेत एकमेकांची पाठ खाजवत! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 06/18/2010 - 15:29 नवीन
मुक्तक अतिशय सुंदर आहे. विषण्ण करणारं आहे. पण हेच मुक्तक उलटंदेखील वाचता येऊ शकतं. एका सकारात्मक दृष्टीकोनातून - आयुष्य रक्ताळलेल्या हाताने सर्वांना -चिमण्या पाखरांपासून ते मानवापर्यंत सर्वांना कुस्करत , कुरवाळत आहे म्हणून "आयुष्य" या जालीम रोगावर उपाय प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार शोधतो आहे. हे लिखाण, कविता, माहाकाव्य, प्रार्थना, कला, प्रेम या गोष्टी या रोगावरचे उपचार. जसं बायबल मधे म्हटलं आहे " अ फेथफुल फ्रेन्ड इज द मेडीसीन ऑफ लाइफ". प्रेम , भक्ती हे रामबाण औषध आहे या रोगावरचं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
अ
अडगळ Fri, 06/18/2010 - 17:04 नवीन
साहित्य ही आयुष्यावर जगणारी , त्यातले रस शोषून तगणारी परजीवी गोष्ट आहे असे नेमाडेंचे वाक्य आठवते .तेव्हा आयुष्य तर नेहमीच एक पायरी वरच राहणार. तुकाराम नावाच बिलंदर माणूस तर आधी सगळं आयुष्य शब्दात मांडतो आणि "मज विश्वंभर बोलवितो" म्हणुन शब्द कर्तृत्व (आणि पर्यायाने येणारा अहंभाव पण)पण नाकरतो .कोलटकर तर तुकाराम विकून खिमापाव खातात.परत आयुष्य एक पायरी वरच. जाता जाता : बिजेची चंद्रकोर दाखवताना कोणी सांगते कि ति बघ , त्या फांदीच्या मागे . शब्दांचे काम त्या फांदीसारखे.बाकी चंद्रकोर दिसली की झालं.
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 06/18/2010 - 17:08 नवीन
सुंदर, अप्रतिम प्रतिसाद. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ
म
मुक्तसुनीत Fri, 06/18/2010 - 18:00 नवीन
कोलटकर तर तुकाराम विकून खिमापाव खातात कोलटकरांनी तुकारामावर कविता/भाष्य/भाषांतर यापैकी काही केल्याचे स्मरत नाही ? तुम्हाला दि. पु. चित्रे तर म्हणायचे नव्हते ? चूभूदेघे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ
अ
अडगळ Fri, 06/18/2010 - 20:06 नवीन
कोलटकरांच्या एकाच कवितेत तुकारामाचा उल्लेख येतो, ती कविता , ज्यात त्यांना पांढर्‍या दाढीचा प्रेमळ म्हातारा भेटतो. भिक्षापात्र भटकलो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा