Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अगा लेखकांनो

स — सन्जोप राव, Fri, 06/18/2010 - 03:11

प्रतिक्रिया द्या
18283 वाचन

💬 प्रतिसाद (85)
म
मुक्तसुनीत Fri, 06/18/2010 - 20:32 नवीन
"मुंबईने भिकेला लावलं" ही ती कविता काय ? बाय द वे ... कोलटकरांनी तुकारामाचे इंग्रजी भाषांतर केलेले आहे. विकी एंट्री नुसार His early years in Mumbai were poor but eventful, especially his life as an upcoming artist, in the Rampart Row neighborhood, where the Artists' Aid Fund Centre was located[4]. Around this time, he also translated Tukaram into English. सो , आय स्टँड करेक्टेड. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ
अ
अडगळ Fri, 06/18/2010 - 20:39 नवीन
ती च ती कविता. तुकारामाच्या अनुवादाबाबत काय माहिती नाही , पण कोलटकरांनी जनाबाईच्या अभंगांचे इंग्रजी भाषांतर केलेले आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ध
धनंजय Fri, 06/18/2010 - 18:08 नवीन
आत्मनिरीक्षण. प्रत्येकाला करावेच लागते. नाट्यलेखनाच्या प्रक्रियेबद्दल लेखन (पु. लंचे "नाटक असे बनते" अशा काही नावाचा नात्यमय लेख, विरक्ती-हास्यरस), कवितांच्या प्रक्रियेबद्दल कविता ("ट ला ट री ला री..." बीभत्स-रौद्र रस), चित्रकलेबद्दल चित्रकला (वेलाथ्केथचे "चित्र काढतानाचे आत्मचित्र", शांत रस), वगैरे आहेतच. मात्र हा बेंबीशोध (बेलीबटन गेझिंग) खुद्दच थोडा स्वयंमैथुनी आहे. "स्वयंमैथुनात काय वाईट आहे" हा श्री. अक्षय पुर्णपात्रे यांचा प्रश्न सुयोग्य आहे. काहीच वाईट नाही. प्रश्न असा असतो, की स्वयंमैथुन-प्रसंगाचा एकला आनंद वितरित करता येतो का? कवी सुचवतात, की नाही. आणि त्या अर्थाने ही विरक्तीची उपमा वापरतात. कवी तरी त्यांच्या बेंबीशोधक स्वमर्दनातली रसनिष्पत्ती वाचकापाशी पोचवू शकले आहेत काय? मला वाटते होय. {अगदी स्वयंमैथुनाच्या चलचित्रणाच्या बाबतीतही विचार करू शकतो. आस्वादाच्या दृष्टीने बघावे, तर प्रेक्षकाला स्वयंमैथुनाची किंवा अन्य कुठली खरीखुरी अनुभूती होईल तरच स्वयंमैथुनाचे प्रदर्शन कलात्मक म्हणता येईल. (स्वमैथुनाच्या कित्येक पोर्नो अतिशय कंटाळवाण्या असतात, अशी माझी अंधुक स्मृती आहे. मात्र 'इ तु मामा ताम्बिएन' सारख्या चित्रपटांत स्वमैथुनाचे सांकेतिक चित्रण बर्‍यापैकी कलात्मक आहे.)} कविता वाचनीय आहे. जमेल तोवर लिखाण करत जावे, अशी वाचक म्हणून कवीला विनंती करतो.
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 06/19/2010 - 09:25 नवीन
?????????
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Mon, 06/21/2010 - 11:10 नवीन
कविता आवडली. बर्‍याच जणांनी मुक्तक वगैरे म्हटलं आहे, पण मी कविताच म्हणेन. या कवितेत एक काहीसं भडक, लैंगिक रूपक वापरलं आहे, म्हणूनही काहींन ती भडक वाटली (ते रूपक कळल्यामुळे की केवळ हस्तमैथुन शब्दामुळे ते कळलं नाही) मला या कवितेचा लागलेला अर्थ असा. या घनघोर आयुष्याच्या अनुभवरूपी विराट महाकाय सौंदर्यवतीशी संग करण्यात मनुष्य, विशेषतः कलाकार थिटा पडतो. ही तफावत असल्यामुळेच की काय, तो आपलं लेखणीरूपी शिस्न हातात घेऊन हस्तमैथुन करतो. त्यातून जे वांझ काही पाझरतं त्यातून त्याला जीवनाच्या चित्रणाचं समाधान मिळतं. त्याच थेंबांचा, प्रतिमांचा उदो उदो करत तो आत्मसंतुष्ट असतो. सत्य जीवनाच्या जीवघेण्या अनुभुतींशी तुलना केली तर ही केवळ बुजगावण्यांची चित्रं आहेत असं कवीला म्हणायचं आहे. खरं आयुष्य तुम्हाला जेव्हा तुम्हाला पाठीवर पाडून *वून जाईल तेव्हाच तुम्हाला यातला फोलपणा जाणवेल. तोपर्यंत चालू द्यात तुमचे पौगंडी पोरखेळ... थोडक्यात सांगायचं झालं तर 'मोठे व्हा'
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 06/21/2010 - 11:31 नवीन
आमचं हे गुर्जी म्हणजे च्यायला अ‍ॅरिस्टॉटल आणि मस्तराम ह्यांचं सम-समान मिश्रण आहेत बॉ! ;) काय ती अगाध प्रतिभा, काय तो दांडगा व्यासंग... काय ती सखोल विचारधारा!!! धन्य धन्य जाहलो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
अ
अक्षय पुर्णपात्रे Mon, 06/21/2010 - 13:17 नवीन
खरं आयुष्य तुम्हाला जेव्हा तुम्हाला पाठीवर पाडून *वून जाईल तेव्हाच तुम्हाला यातला फोलपणा जाणवेल.
वरील विधान व आमैकाराने (तुमच्या कवीने) वापरलेल्या 'संभोग' या शब्दात सुसंगती नाही. तसे पाहीले तर मूळ लिखाणातच ही सुसंगती नाही. आत्मसाक्षात्करी अनुभव बलात्काराप्रमाणे वाटावा इतका तीव्र, अनपेक्षित, लुळे पाडणारा, इनवेसिव आहे तर अनुभवांती संभोगानंतरचा रितेपणा आहे बलात्कारानंतरची घृणा नाही. आमैकार (तुमचा कवी) लुळा पडावा, सरन्डर करण्यास तयार व्हावा इतका अशक्त आहे काय? तसे असल्यास कलेचा, अनुभवांच्या प्रतिमांचा आधीपासून असलेला हव्यास हा निव्वळ 'ग्रुपी' प्रकारचा वाटतो. थोडक्यात 'मी मोठा नाही म्हणून जग मोठे नाही'.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Mon, 06/21/2010 - 14:37 नवीन
वरील विधान व आमैकाराने (तुमच्या कवीने) वापरलेल्या 'संभोग' या शब्दात सुसंगती नाही.
आमैकार हा शब्दप्रयोग खटकला. इथे या कवितेचा कवी हा आमैकार नाही. मुळात आमै शब्दच कवीने वापरलेला नाही. सर्व कलाकार हे आपल्या कलेच्या 'उत्पादना'साठी सृजनशील (किंवा सर्जनशील - योग्य तो शब्द निवडा) काही करत नसून आपल्या मनांतील कल्पना प्रतिमा आठवून हस्तमैथुन करतात असं कवीला म्हणायचं आहे.
आत्मसाक्षात्करी अनुभव बलात्काराप्रमाणे वाटावा इतका तीव्र, अनपेक्षित, लुळे पाडणारा, इनवेसिव आहे तर अनुभवांती संभोगानंतरचा रितेपणा आहे बलात्कारानंतरची घृणा नाही.
बलात्कार शब्दही खटकला. या अनुभवातली आक्रमकता कवीला अधोरेखित करायची नसून त्या अनुभवाची तीव्रता ही खर्‍या संभोगाप्रमाणे आहे असं सूचित करायचं आहे. त्या तीव्रतेची तुलना हस्तमैथुनाशी करायची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
अ
अक्षय पुर्णपात्रे Mon, 06/21/2010 - 17:08 नवीन
आमैकार हा शब्दप्रयोग खटकला. इथे या कवितेचा कवी हा आमैकार नाही. मुळात आमै शब्दच कवीने वापरलेला नाही.
आमैकार हा शब्द अर्थातच लेखकाने वापरलेला नाही.
सर्व कलाकार हे आपल्या कलेच्या 'उत्पादना'साठी सृजनशील (किंवा सर्जनशील - योग्य तो शब्द निवडा) काही करत नसून आपल्या मनांतील कल्पना प्रतिमा आठवून हस्तमैथुन करतात असं कवीला म्हणायचं आहे.
लेखकाचे लेखनात व्यक्त केलेले मत हा समस्त कलाकारांवर आरोप आहे. हा आरोप लेखक (प्रस्तुत लेखन करून) स्वत:वरही करत आहे. तेव्हा लेखकाच्या लेखनाला 'आत्ममैथुन' किंवा धनंजयने वापरलेला 'स्वमैथुन' हा शब्द लागू पडतो. सिमॅन्टिक्समध्ये न शिरता लेखकाचाच 'हस्तमैथुन' हा शब्दही लागू होतो. मग या लेखनाला कितपत किंमत द्यावी हा प्रश्न पडतो. हे म्हणजे 'सर्व जग खोटे बोलते' असा आरोप करून मी एकटाच खरे बोलतो असे म्हणण्यासारखे आहे. येथे सोयीस्करपणे मीही जगाचाच भाग आहे या सत्याला विसरले जाते. अशा लेखनातून 'मोठे व्हा' असा निष्कर्ष काढता येणे मलातरी जमणार नाही.
बलात्कार शब्दही खटकला. या अनुभवातली आक्रमकता कवीला अधोरेखित करायची नसून त्या अनुभवाची तीव्रता ही खर्‍या संभोगाप्रमाणे आहे असं सूचित करायचं आहे. त्या तीव्रतेची तुलना हस्तमैथुनाशी करायची आहे.
तसे असल्यास तुमच्या प्रतिसादातील 'खरं आयुष्य तुम्हाला जेव्हा तुम्हाला पाठीवर पाडून *वून जाईल तेव्हाच तुम्हाला यातला फोलपणा जाणवेल.' या वाक्याकडे कसे पाहावे? खरे जग बलवान आहे, तुम्ही-आम्ही नीट पाहिलेले नाही पण सध्याच या बलवान जगाने माझी इच्छा नसतांना माझे डोळे उघडून माझ्या असहायतेची, अशक्तपणाची जाणीव करून दिली आहे. यास बलात्कार का म्हणू नये. बलात्कारात इच्छेविरुद्ध बलाचा वापर करून मिळेल ते ओरबाडणे असते. येथे जगाने लेखकाचे (किंवा निवेदकाचे) कलेविषयीचा दृष्टीकोनच ओरबाडून घेतला आहे. निवेदक हतप्रभ आहे. तरीही प्रस्तुत संदेश त्याला पोचवावासा वाटतो. का? थोड्यावेळ हा संभोग हा शब्द मान्यही करू. पण पुढे जाऊन तुम्ही म्हणता
त्या तीव्रतेची तुलना हस्तमैथुनाशी करायची आहे.
तीव्रतेची तुलना कशाबरोबर का करायची आहे? हस्तमैथुनाच्या प्रतिमेलाच का आठवायचे आहे? हस्तमैथुन, संभोग या दोन संकल्पनामध्ये एकतर निवेदकाचा अथवा तुमचा गोंधळ होत आहे, असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Mon, 06/21/2010 - 17:27 नवीन
हे म्हणजे 'सर्व जग खोटे बोलते' असा आरोप करून मी एकटाच खरे बोलतो असे म्हणण्यासारखे आहे.
कलाकृती निर्माण करणं भंपक आहे, हे विधान कलाकृती ठरू शकतं, म्हणून ते भंपक होत नाही. आंधळ्यांना कळण्यासाठी कोणी डोळसाने ब्रेल लिपीत 'ब्रेल पलिकडे जग आहे' असं लिहिलं म्हणून त्यावर 'तू हे सुद्धा ब्रेल मध्येच लिहिलंस ना' असा आक्षेप घेणं योग्य नाही.
तसे असल्यास तुमच्या प्रतिसादातील 'खरं आयुष्य तुम्हाला जेव्हा तुम्हाला पाठीवर पाडून *वून जाईल तेव्हाच तुम्हाला यातला फोलपणा जाणवेल.' या वाक्याकडे कसे पाहावे?
- प्रतिक्रिया संपादित. सभासदांचे नाव घेऊन लैंगिक उल्लेख टाळावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
अ
अक्षय पुर्णपात्रे Mon, 06/21/2010 - 17:42 नवीन
कलाकृती निर्माण करणं भंपक आहे, हे विधान कलाकृती ठरू शकतं, म्हणून ते भंपक होत नाही.
एकतर 'कलाकृती निर्माण करणं भंपक आहे' हे विधान अर्थशून्य आहे नाहीतर असे विधान कलाकृती नाही. या दोन्हीतील एक घडू शकते. अर्थशून्य विधान कलाकृती असू शकते. त्यादृष्टीने प्रस्तुत लिखानाकडे पाहीले जावे. किंबहूना अनेकांनी तसेच पाहीले आहे. त्यातून काहींना प्रस्तुत लिखाण भडक, ढोंगी किंवा डोळे उघडणारे वाटले आहे. ..... - प्रतिक्रिया संपादित. सभासदांचे नाव घेऊन लैंगिक उल्लेख टाळावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Mon, 06/21/2010 - 18:18 नवीन
एकतर 'कलाकृती निर्माण करणं भंपक आहे' हे विधान अर्थशून्य आहे नाहीतर असे विधान कलाकृती नाही.
कलाकृतींना गणिती, तर्कशास्त्रीय व्याख्या लावू नका. आणि अगदी गणित आणायचंच असेल तर 'हे विधान सत्य असलं तरी सिद्ध करता येण्यासारखं नाही' या ग्योडेलच्या विधानाला काय म्हणाल? - प्रतिक्रिया संपादित. सभासदांचे नाव घेऊन लैंगिक उल्लेख टाळावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
अ
अक्षय पुर्णपात्रे Mon, 06/21/2010 - 18:48 नवीन
हस्तमैथुनासाठी लागणार्‍या प्रतिमांमध्ये संभोगाची प्रतिमाही असावी.
कलाकृतींना गणिती, तर्कशास्त्रीय व्याख्या लावू नका. आणि अगदी गणित आणायचंच असेल तर 'हे विधान सत्य असलं तरी सिद्ध करता येण्यासारखं नाही' या ग्योडेलच्या विधानाला काय म्हणाल?
कलेला कलेच्या कलाने घ्या. असे मोजू नका, तसे मोजू नका. अशी बंधने असण्याची आवश्यकता नसावी. ग्योडेलचे विधान 'हे विधान सत्य असलं उपलब्ध प्रणालीतील प्रमेये वापरून सिद्ध करता येत नाही' असे असावे.
हस्तमैथुन व प्रत्यक्ष संभोग यातलाच फरक कवी अधोरेखित करत असताना तो फरक नाहीच...
फरक नाही असे म्हटलेले आढळले नाही. हमै व प्रसं यातील फरक स्पष्ट करतांना हमैचेच कंटाळवाणे डेमॉन्स्ट्रेशन निवेदकाने वाचकांसमोर मांडले आहे, हेच आधीपासूनचे म्हणणे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Mon, 06/21/2010 - 19:06 नवीन
- प्रतिक्रिया संपादित. सभासदांचे नाव घेऊन लैंगिक उल्लेख टाळावेत.
सभासदांनी आपलं नाव स्वीकारताना असे लैंगिक उल्लेख होऊ शकतील का याचा विचार करायला हवा होता. जर कोणी मेनका असं नाव घेतलं आणि दुसर्‍या कोणी विश्वामित्र मेनकेविषयी लिहिलं तर ती कोणाची चूक? माझ्या प्रतिसादांत टारझन या आयडीविषयी एक अक्षरही नव्हतं. टारझन या कॅरेक्टरविषयी ते लेखन होतं. मी जो मुद्दा मांडत होतो त्याला ते उदाहरण चपखल बसत होतं ते संपादित करणं हे मिपाला शोभत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
अ
अक्षय पुर्णपात्रे Mon, 06/21/2010 - 19:13 नवीन
सदस्यांच्या नावाच्या आधीपासून ही नावे आहेत. मानव न पाहीलेल्या माणसाचा पौगंडावस्था ते प्रौढावस्था हा प्रवास प्रस्तुत चर्चेत चपखल उदाहरण होते. सदस्यांचे नाव प्रतिसादात आल्यास या नावाचा व सदस्याचा कुठलाही संबंध नाही असे डिस्क्लेमर घालता आले असते. ज्या सदस्यांचे नाव आले ते माझे मित्र आहेत, त्यांच्या नावाचा वापर करून विपर्यास करणे हा माझा हेतू अजिबात नव्हता. श्री घासकडवी यांचाही तसा हेतू नसावा असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ध
धनंजय Mon, 06/21/2010 - 19:28 नवीन
उल्लेख आयडींबद्दल वैयक्तिक नव्हता, तर कुमारसाहित्यातील/चित्रपटांतील पात्रांबाबत होता. प्रतिसादांची साखळी वाचता हे अगदी स्पष्टच होते. वेळेअभावी संपादकाने पूर्ण संदर्भ वाचला नसेल, तर ते (थोडेसेच) क्षम्य आहे. संपादक सर्व सेवाभावी आहेत, आणि मिपाची रहदारी खूपच वेगवान आहे. एखाद्या सदस्याच्या (व्यक्तिगत अपमान न-करणार्‍या) संयमित लिखाणाबद्दल इतिहास माहीत असेल, तर कात्री लावायची घाई करू नये, अशी संपादकांना विनंती. सदस्यास स्पष्टीकरण विचारावे, वाटल्यास उत्तर मिळेपर्यंत उपप्रतिसाद थोड्या काळासाठी अप्रकाशित करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
N
Nile Mon, 06/21/2010 - 19:39 नवीन
संयमित लिखाणाबद्दल इतिहास माहीत असेल, तर कात्री लावायची घाई करू नये, अशी संपादकांना विनंती. सदस्यास स्पष्टीकरण विचारावे, वाटल्यास उत्तर मिळेपर्यंत उपप्रतिसाद थोड्या काळासाठी अप्रकाशित करावा. »
दुजोरा देतो. -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
प
पांथस्थ Tue, 06/22/2010 - 18:59 नवीन
सहमत आहे. - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
र
राजेश घासकडवी Mon, 06/21/2010 - 19:26 नवीन
तसे असल्यास तुमच्या प्रतिसादातील 'खरं आयुष्य तुम्हाला जेव्हा तुम्हाला पाठीवर पाडून *वून जाईल तेव्हाच तुम्हाला यातला फोलपणा जाणवेल.' या वाक्याकडे कसे पाहावे?
प्रत्यक्ष नाव लिहिल्याने प्रतिसाद संपादित झाला, म्हणून तुम्हाला एका काल्पनिक व्यक्तिरेखेचं उदाहरण देतो. समजा कोणी मनुष्याचा मुलगा केवळ वानरांनी जंगलात वाढवला. तो मोठा झाला, शक्तिमान पुरुष झाला. पण त्याची प्रत्यक्ष स्त्रीशी गाठ वयाच्या बावीसाव्या वर्षी झाली. त्याआधी अर्थातच त्याला संभोग म्हणजे काय हे माहीत नाही. त्याआधी त्याने हस्तमैथुन केलेच नसेल काय? पण जेव्हा त्याला प्रत्यक्ष स्त्री भेटते, व आपण गृहित धरू की ती आक्रमक आहे व पुढाकार घेते. जेव्हा ते प्रत्यक्ष संभोग करतात तेव्हा या काल्पनिक पुरुषाला आत्तापर्यंतच्या हस्तमैथुनातला फोलपणा जाणवणार नाही काय? संभोग व हस्तमैथुन यांच्या अनुभवातील तीव्रतेचा फरक आहे. कवी हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
अ
अक्षय पुर्णपात्रे Mon, 06/21/2010 - 19:40 नवीन
त्याआधी अर्थातच त्याला संभोग म्हणजे काय हे माहीत नाही. त्याआधी त्याने हस्तमैथुन केलेच नसेल काय?
केले असावे. पण प्राण्यांमध्ये नर व मादी असे दोन प्रकार असतात. ते एकत्र येतात व त्यांना त्यातून काही एक आनंद मिळतो. हे ज्ञान त्यास किमानपक्षी असावे. फरकाची जाणीव असूनही दुधाची तहान ताकावर भागवणार्‍या व्यक्तिची तहान शमतच नाही, असा निष्कर्ष काढला जाऊ नये. पण तो वेग़ळाच मुद्दा आहे. संभोगाचा अनुभव हा हमैपेक्षा निर्विवादपणे आनंददायी असू शकेल पण ते दर्शवण्यासाठी पुन्हा हमैचे प्रात्यक्षिक आवश्यक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Mon, 06/21/2010 - 19:56 नवीन
केले असावे. पण प्राण्यांमध्ये नर व मादी असे दोन प्रकार असतात. ते एकत्र येतात व त्यांना त्यातून काही एक आनंद मिळतो. हे ज्ञान त्यास किमानपक्षी असावे.
वा. थोडी प्रगती आहे. कवीने जी कल्पना मांडली आहे त्यात हे बाह्य ज्ञानच गृहित धरलेलं आहे. बाह्य निरिक्षण व हमै यांच्या बेरजेतून प्रत्यक्ष संभोगाचा अनुभव येतो का? हे म्हणजे दहावीतल्या मुलाला कुत्र्याचं झेंगट पाहून व स्वतःचा हमैचा अनुभव यावरून संभोग म्हणजे काय हे कळण्यासारखं आहे.
...पण ते दर्शवण्यासाठी पुन्हा हमैचे प्रात्यक्षिक आवश्यक नाही.
प्रात्यक्षिक नाहीच. जे आहे ते असं आहे हेच कवीने म्हटलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
अ
अक्षय पुर्णपात्रे Mon, 06/21/2010 - 20:45 नवीन
कवीने जी कल्पना मांडली आहे त्यात हे बाह्य ज्ञानच गृहित धरलेलं आहे.
इतर लेखकांनी लिहिलेले, कलाकारांची कला पाहणे हेही बाह्यज्ञान आहे याचा मात्र निवेदकास विसर पडला आहे. प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर उड्या मारण्यापुर्वी इतर अनेकांनी असा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे व ते त्यांच्या अनुभवासंबंधीच भाष्य करत आहेत याचे भान विसरल्याचे उतावीळ शीघ्रपतन प्रस्तुत लेखनात आढळते, हे मान्य व्हावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
म
मुक्तसुनीत Mon, 06/21/2010 - 18:52 नवीन
पूर्णपात्रे-घासकडवी यांच्यातली जुगलबंदी पाहून एकछत्री अमलात प्रसिद्ध असलेला (आणि छत्रचामरधारीनीच वापरायचा असलेला ) वाक्प्रचार आठवला : "बावरला टेंपोत !"
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 06/21/2010 - 19:03 नवीन
अहो हे तर 'भेटवला गण्गोत' असं झालं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 06/21/2010 - 19:08 नवीन
पूर्णपात्रे-घासकडवी यांच्यातली जुगलबंदी पाहून एकछत्री अमलात प्रसिद्ध असलेला (आणि छत्रचामरधारीनीच वापरायचा असलेला ) वाक्प्रचार आठवला : "बावरला टेंपोत !" मग त्या दिवशी आमची काय अवस्था झाली असेल कल्पना करा. त्यात परत अजून एक गुरूजी होते तिथे यज्ञात तूप ओतायला. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
च
चतुरंग Mon, 06/21/2010 - 19:16 नवीन
भिजवला किंचित!! ;) (टाकीन यज्ञापुर्ते)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
N
Nile Mon, 06/21/2010 - 19:38 नवीन
वरील सर्व (खुल्या व छुप्या) संपादकांचा कडकडीत निषेध. उगाच मध्ये येउन मजा खराब करु नका.;) यांचे प्रतिसाद संपादित करा रे कुणीतरी. ;) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
श
श्रावण मोडक Tue, 06/22/2010 - 18:16 नवीन
मग त्या दिवशी आमची काय अवस्था झाली असेल कल्पना करा. त्यात परत अजून एक गुरूजी होते तिथे यज्ञात तूप ओतायला.
च्यायला, भेट. सगळा हिशेब चुकता करतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
मारवा Wed, 10/28/2015 - 12:27 नवीन
मिपा क्लासिक- २
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 10/28/2015 - 12:50 नवीन
हे असं काही वाचलं की लिहायची खुमखुमी येते ! आता काहीतरी जिलेबी पाडलीच पाहिजे !
  • Log in or register to post comments
आ
आनंद कांबीकर Wed, 10/28/2015 - 13:05 नवीन
लिहिलय भाउ..........
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 10/28/2015 - 13:19 नवीन
ऑ अच्चं जाल्लं तल!
  • Log in or register to post comments
M
mystic man Wed, 10/28/2015 - 16:09 नवीन
आणि मग थकून जमिनीवर पडाल जेंव्हा डोळे मिटून आकाशात एकच मोठा डोळा उघडावा तसं विक्राळ गगनभेदी आयुष्य दिसेल क्षणभर आपल्या कोट्यावधी रक्ताळलेल्या हातांनी तुम्हाआम्हांला कुस्करणारं, कुरवाळणारं आणि तुमच्या अजरामर वगैरे साहित्याच्या छाताडवर चिखलतुडव नाचत खदाखदा हसणारं मग स्वतः कशाला लिहायला साहित्याचाच आसरा घेतलात? आणि जीवन काही असं तोंड मुस्कटून बसत नाही. जिथे संधी मिळेल तिथे फुलायलाच बघतं. अगदी रस्त्यावर भीक मागणार्याला पण ढीगभर पोरं असतात. ते जीवनाचं फुलणं नाही काय?
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Wed, 10/28/2015 - 16:19 नवीन
खतराटच आहे हे!
  • Log in or register to post comments
द
दिवाकर कुलकर्णी Wed, 10/28/2015 - 19:11 नवीन
हे मुक्तक बिकतक प्रतिक्रिया बित्तीक्रीया आमच्या टक्कुरिच्या बाहेरच आहे मर्हाटीला उदंड आयुष्य ,जगाच्या अंतापर्यंत आहे एवडं निछीत
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा