निषेध निषेध तीव्र निषेध...
💬 प्रतिसाद
(119)
श
शुचि
Wed, 07/07/2010 - 18:56
नवीन
पूर्ण बातमी काय आहे?
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Wed, 07/07/2010 - 18:56
नवीन
ह्यात नवीन ते काय? मराठी काँग्रेसजन जोवर दिल्लीश्वरांचे मिंधे आहेत आणि त्यांची चाटूगिरी करण्यातच धन्यता मानताहेत तोवर हे असंच चालायचं..!

- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Wed, 07/07/2010 - 18:57
नवीन
बातमीचा दुवा द्या. आम्हालाही कळेल.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 07/07/2010 - 18:59
नवीन
या बातमीबद्दल ते बहुदा बोलत असावेत. असो. काय फरक पडतो बेळगाव महाराष्ट्रात राहिलं काय आणि कर्नाटकात? भारतात आहे तोपर्यंत पर्वा इल्ले, फिकीर नॉट!!
(कन्नडीगा भीमसेन आणि त्यांच्याबरोबर सुरेल सवाई गंधर्व महोत्सव तर पुण्यात आले ना ...!)
अदिती
- Log in or register to post comments
प
प्रशु
Wed, 07/07/2010 - 19:27
नवीन
तुमच्या सारख्यांना नसेल पडत पण आम्हाला पडतो. तुमच्या लेखी संयुक्त महारष्ट्राचे आंदोलनही गे॑रवाजवी असेल....
- Log in or register to post comments
I
II विकास II
Wed, 07/07/2010 - 19:56
नवीन
>>तुमच्या लेखी संयुक्त महारष्ट्राचे आंदोलनही गे॑रवाजवी असेल....
चालायचेच हो, कोणीतरी ज्याची त्याची जाण, समज म्हणुन गेलेच आहे.
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
- Log in or register to post comments
N
Nile
Wed, 07/07/2010 - 19:58
नवीन
तुम्हाला लै जाण असेल तर तुम्ही लिहा बरं एक सविस्तर लेख. बेळगाव महाराष्ट्रात का यावे यावर.
-Nile
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 07/08/2010 - 12:39
नवीन
मोठा लेख का बरं लिहायला पाहीजे. सरकारने हा अर्ज फेटाळण्यासाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे केवळ भाषिक बहुसंख्या हा निकष होऊ शकत नाही एखादा प्रदेश एखाद्या राज्यात सामिल करायला. बरं.
मग भाषावार प्रांतरचना पूर्णच रद्दबातल केली पाहीजे. अर्थात ती सर्वत्र केली (म्हणजे तामिळनाडू, उ.प्र., बंगाल, पंजाब) सर्वत्रच आणि प्रशासनाच्या सोयीसाठी चौकोनी अथवा अन्य कुठल्या चांगल्या आकाराची राज्ये केलीत तरी चालेल.
त्यापुढचा हलकटपणा सरकारने हा केला आहे की या याचिकेसाठी याचिकाकर्त्यालाच दंड करावा अशी शिफारस केली आहे.
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
- Log in or register to post comments
N
Nile
गुरुवार, 07/08/2010 - 18:13
नवीन
खाली ह्यावर वाद करणारे पान भर प्रतिसाद आहेत, त्यामुळे विषयाची व्याप्ती काही एका लेखापेक्षा लहान नसावी. दुसरं म्हणजे सदर प्रतिसादकाने यावर दुसर्या व्यक्तीला जाण नाही असे वक्तव्य केले आहे. म्हणजे स्वत:स जाण आहे असे होते. तसे असल्यास इतरांना काय जाण नाही आहे ते त्यांनी दाखवुन द्यावे. बाकी तुमच्या मुद्यांना खाली उत्तरे आली आहेत.
-Nile
- Log in or register to post comments
स
सागर
गुरुवार, 07/08/2010 - 18:20
नवीन
त्यापुढचा हलकटपणा सरकारने हा केला आहे की या याचिकेसाठी याचिकाकर्त्यालाच दंड करावा अशी शिफारस केली आहे.
केंद्र सरकार हाच निकष तेलंगणा वाल्यांना लावणार का? X( X-(
हे तर ताजे भाषावार प्रदेशनिर्मितीचे उदाहरण आहे.
- Log in or register to post comments
N
Nile
Wed, 07/07/2010 - 19:56
नवीन
काय फरक पडतो हे सविस्तर सांगावे ही विनंती.
-Nile
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Wed, 07/07/2010 - 20:06
नवीन
हम्म...बरोबर आहे..काय फरक पडतो? मुंबई केंद्रशासित करावी आणि महाराष्ट्र आजूबाजूच्या राज्यात विलीन करून टाकावा...आहे काय नि नाही काय...काय फरक पडणार आहे?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
- Log in or register to post comments
ट
टारझन
Wed, 07/07/2010 - 20:13
नवीन
=)) हा शब्द काळजाला भिडला ... णविणंच दिसतोय ;)
च्यायला काष्मिरप्रश्ण आहे का हा बेळगाव म्हणजे ? भौगोलिक स्थाण आहे तेच रहाणार आहे , राजकीय स्थान कुठेही असल्याने काय फरक पडणार आहे (भारतात आशेपर्यंत ?) ? की ते बेळगाव म्हणजे मुंबै आहे ? आपला वैयक्तिक काय संबंध आलाय बेळगाव शी ? बेळगाव महाराष्ट्रात आल्यावर आपण प्रत्येक कुटुंबाला दरमहा काही ठरावीक रक्कम देणार आहात का ? तिथल्या लोकांना शांतता मिळाली म्हणजे झालं .. बाकी बोला ... काय म्हणताय ? जेवणात काय होतं आज ? :)
- पशु
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Wed, 07/07/2010 - 20:44
नवीन
तुमच्या मुद्द्याशी असहमत...भौगोलिक स्थान जरी तेच राहणार असले तरी राजकीय स्थान महत्वाचे आहेच...त्या त्या राज्याचे कायदे, विकासाची धोरणे वगैरे गोष्टी निरर्थक आहेत का? उदा. केरळ या राज्याने पर्यटनाचा मोठा उद्योग उभा केला...कितीतरी लोकांना रोजगार मिळाला, राज्यात पैसा आला...१००% साक्षरता आहे...समजा आजूबाजूच्या एखाद्या राज्याचा थोडा भाग केरळात असता तर त्याचाही तसाच विकास झाला असता..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Wed, 07/07/2010 - 19:02
नवीन
<<<भाषा हा सीमा ठरवण्यासाठी एकमेव निकष असू शकत नसल्याने त्यांना महाराष्ट्रात सामील करता येणार नाही अशी भूमिका केंद्र सरकारने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात मांडली.
असं त्या बातमीत म्हंटल आहे...पण देशात राज्यरचना तर भाषावारच झाली होती त्याचे काय?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Wed, 07/07/2010 - 19:16
नवीन
'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' ह्या अग्रलेखाच्या शिर्षकाचीही आता अब्रु पार धुळीला मिळावी इतका बेअक्कलपणा, आपमतलबी नोकरशाहीच्या उंटाच्या चालींमुळं चालला आहे! नोकरशाही देईल ते सल्ले आणि त्यावर अंगठे उठवणारे 'यत्ता चऊथी णापास' असे पंचवार्षिक रबरी शिक्के! काय बोलायचं?
सरकारला माझी येक णम्र इनंती, उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावर आता महाराष्ट्राचा नकाशा कोरावा आणि आम्हा मराठीमंडळींना तिकडंच धाडुन द्यावं म्हणजे कोणालाच आमचा कसलाच त्रास होणार नाही. आमचं आम्ही जगु आणि आमचं आम्ही मरु!
असो!
बाकी, आता असा धागा निघालाच आहे, तर मराठी मातीच्या अस्तनीतले मराठीविरोधी विषवल्लींचे फुत्कार वाचायला बसावं म्हणतो.
- Log in or register to post comments
उ
उपास
Wed, 07/07/2010 - 19:31
नवीन
आज चिंतामणराव देशमुखांसारखा असता तर दिल्लीश्वरांच्या श्रीमुखात राजीनामा फेकून आला असता.. सगळे सोनिया दरबारी लोटांगण घालण्यात आणि एकमेकाला पायात पाय घालून पाडण्यात धन्यता मानणारे..
नशीब आधीची पिढी स्वाभिमानी निघाली आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला, नाहीतर काय फरक पडतो, भारतात आहोत ना.. असं म्हटलं असतं तर मराठी माणसाच्या डोक्यावर मिर्या वाटल्या असत्या मर्डरजीने.. आणि आज मराठी माणसाचे जे काही आहे ते सुद्धा राहिलं नसतं..
बेळगावतल्या मराठी बांधवांची काळजी वाटतेच पण मराठी राज्यकर्त्यांच्या षंढ पणाची कीव येते.. केंद्र सरकारने मात्र नेहरूंपासूनचे महाराष्ट्रद्वेषाचे धोरण व्यवस्थित चालू ठेवलेय.. कुठे फेडाल ही पापं..
(विमनस्क) उपास
उपास मार आणि उपासमार
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Wed, 07/07/2010 - 19:52
नवीन
हल्लीच्या महाराष्ट्रातले कोन्ग्रेजी षंढ आहेत हे नवीन नाही...फारसा विरोध झाला नाही तर मुंबई अजूनही केंद्रशासित करतील.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
- Log in or register to post comments
प
पंगा
Wed, 07/07/2010 - 20:28
नवीन
श्रीमुखात राजीनामा कसा फेकतात? दिल्लीश्वरांचे श्रीमुख (मुंबईत पाहिलेल्या काही कचरापेट्यांसारखे) शेजारी 'मला खाऊ द्या' अशी पाटी लावून सदैव आ वासलेले असते काय?
यावरून एक किस्सा आठवला. आणीबाणीनंतर ज्या निवडणुका झाल्या, त्यावेळी दक्षिण महाराष्ट्रात (नक्की आठवत नाही, पण बहुधा सांगलीला) जनता पक्षाच्या एका प्रचारसभेसाठी मोरारजी देसाई (तेच ते आपले मर्डरजी!) भाषणास व्यासपीठावर उभे राहिले. त्यावेळी कोणीतरी त्यांना 'त्या' एकशेपाचांबद्दल विचारले. त्यावर मोरारजींनी 'ते एकशेपाच नव्हतेच मुळी, ते फक्त ऐशी होते, आणि ते गुंड होते' अशा काहीशा शब्दांत आपल्या 'कृत्या'चे समर्थन केले.
प्रचारसभेच्या (बहुधा) अध्यक्षस्थानी विराजमान असलेल्या (किंवा किमानपक्षी व्यासपीठावर निश्चित उपस्थित असलेल्या - नेमके तपशील आता आठवत नाहीत.) एस.एम.जोशींनी (होय, तेच ते संयुक्त महाराष्ट्र समितीचे आघाडीचे नेते!) हूं की चूं केले नाही, किंवा एका अक्षराने आक्षेप घेतला नाही.
पुढे मोरारजी (तेच ते तुमचे मर्डरजी!) सत्तेवर आल्यावर एके काळच्या संयुक्त महाराष्ट्र समितीच्याच आणखी एका आघाडीच्या नेत्याची - ना. ग. गोर्यांची - लंडनच्या दूतावासात राजदूत या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली होती, आणि ती त्यांनी स्वीकारलीही होती, असे आठवते.
तेव्हा कृपा करून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची कौतुके वगैरे सांगू नका - सामान्य माणसाला मूर्ख बनवण्याचा प्रकार होता तो. Politics makes strange bedfellows हेच शेवटी खरे.
(नाही म्हणायला पुढे अनेक वर्षांनी अधूनमधून बेळगावच्या प्रश्नावरून राजकारण्यांनी काही ना काही खुसपट काढले, की आमच्या पुण्याची आख्खीच्या आख्खी टिनपाट महानगरपालिका - झाडून सगळे कॉर्पोरेटर - कामधंदे नसल्यासारखी - किंवा असलेले कामधंदे सोडून - बेळगावला 'अटक करून घ्यायला' जात असे, ते आठवते. पुण्यात काय महानगरपालिकेने लक्ष घालण्यासारख्या समस्या नाहीत? पुण्यातल्या समस्त रस्त्यांतले खड्डे एका रात्रीत आणि कायमचे बुजले काय? पण तेवढेच आपले पेपरात नाव छापून यायला बरे!)
- पंडित गागाभट्ट.
- Log in or register to post comments
उ
उपास
Wed, 07/07/2010 - 22:42
नवीन
पंगा, शब्दच्छल करण्यात मला स्वारस्य नाही.. 'मला खाऊ द्या' अशा बालीश विधानांशी दखलही घ्यायची नाही..
>>तेव्हा कृपा करून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची कौतुके वगैरे सांगू नका - सामान्य माणसाला मूर्ख बनवण्याचा प्रकार होता तो
तुमची मत तुमच्यापाशी.. मला त्यांचा आदर आहे पण मी पाहिलेल्या, अनुभवलेल्या वस्तुस्थितीशी ती जुळत नाहीत.. आमच्या इथला बंडू गोखले त्यातला पहिला बळी. . तेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली नसती.. मराठी माणसांनी रस्त्यावर उतरून एकजूट दाखवली नसती तर कदाचित मी ह्या साईटवर नसतोही. . गुजरातेत पडलो असतो किंवा केंद्रशासित..
अजून एक म्हणजे, एखादी व्यक्ति चुकीची, लबाड, वाईट वागली तर तिच्या कृत्याचे समर्थन करता येणार नाहीच.. पण तिच व्यक्ती चांगले वागली तर तिच्या कृत्याचे समर्थन करता येईलच, आदर्श घेता येईलच.. वरील उदाहरणात (एस. एम. जोशी/ ना.ग्.गोरे) ह्यांच्याविरुद्ध गळे काढण्यात काही अर्थ नाही उलट त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत केलेल्या कामाची यादी कुणीही देऊ शकेल.. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीबद्दल एक साईटही काढण्यात आली होती (लि़क मिळत नाहीये..) , मायबोलीच्या दिवाळी अंकात केदार जोशी यांनी चांगला धांडोळा घेतला आहे..
असो!
उपास मार आणि उपासमार
- Log in or register to post comments
प
पंगा
गुरुवार, 07/08/2010 - 01:00
नवीन
आणि त्याच्या बळी जाण्याला कारणीभूत कोण?
१. त्याच्यावर गोळी घालण्याचा आदेश देणारे मोरारजी? (तुमच्या भाषेत मर्डरजी?)
२. त्याला मरायला पाठवणारे (आणि पुढे राजकीय परिस्थिती बदलल्यावर गोळ्या घालणाचा आदेश देणार्याने केलेल्या त्याच्या हत्येच्या समर्थनाचा साधा निषेधही न करणारे) संयुक्त महाराष्ट्र समितीचे थोर पुढारी?
माझ्या मते दोघेही! गोळ्या घालण्याचा आदेश देणार्या मोरारजींचा दोष अर्थात आहेच. त्यांची मग्रूरी, अगदी हलकटपणाचा आरोप जरी त्यांच्यावर केलात तरी तो मान्य आहे. त्याबद्दल प्रश्न नाही. पण एकदा बंडू गोखल्याला सत्याग्रहासाठी पाठवल्यावर त्याच्यावर जर सरकारकडून गोळ्या घालण्यात आल्या, आणि पुढे वीसएक वर्षांनंतर राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर त्याचे मारेकरी आणि त्याला सत्याग्रहाला पाठवणारे पुढारी राजकीय लाभासाठी एकत्र आले, आणि तेव्हा त्याच्या मारेकर्याने त्याच जुन्या मग्रूरीने त्या हत्येचे निर्लज्ज समर्थन केले, तर तेथेच उपस्थित असलेल्या त्याला मुळात सत्याग्रहाला पाठवणार्या नेत्यांची अशा वक्तव्याचा निषेध करण्याची किमान नैतिक जबाबदारी मानावी की नाही? आणि (कदाचित राजकीय कारणांसाठी) तेच जर का अशा वेळी मूग गिळून गप्प बसले, तर बंडू गोखल्याची सर्वात मोठी प्रतारणा कोणी केली? मोरारजींनी निश्चितच नाही. मोरारजी एवीतेवी पडले राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री. त्यांच्यावर नाही म्हटले तरी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी म्हटल्यावर वेळप्रसंगी गोळ्या घालण्याचा आदेश देणेही त्यांच्या अखत्यारीत आलेच. आता प्रसंग तितका टोकाचा नव्हता, गोळ्या घालण्याचा आदेश देण्याइतकी परिस्थिती नव्हती आणि म्हणून गोळ्या घालण्याचा आदेश देणे हे अतिरेकी कृत्य होते, ते मोरारजींनी केले आणि म्हणून त्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच, हे सर्व मान्य. मोरारजींच्या कृत्याचे समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. पण निषेध करायचा कोंणी? ज्यांच्याकडे या आंदोलनाचे नेतृत्व होते आणि ज्यांनी बंडू गोखल्याला तेथे मरायला पाठवले, त्यांनीच जर निषेध केला नाही, आणि राजकीय परिस्थिती बदलून मारेकर्याबरोबर एकाच मंचावर आल्यावर त्याच मारेकर्याने पुन्हा एकदा आपल्या कृत्याचे मग्रूरपणे समर्थन केले असता त्याविरुद्ध (राजकीय फायद्याकरिता) एक चकार शब्दही काढला नाही, तर त्या समर्थनास त्यांची मूकसंमती जाहीर होत नाही काय? आंणि त्या परिस्थितीत बंडू गोखल्याच्या हत्येचे पातक काही अंशी तरी (माझ्या मते बर्याच अंशी!) या नेत्यांच्या माथी येत नाही काय? तेव्हा कोठे गेली होती या महान नेत्यांची संयुक्त महाराष्ट्राबद्दलची आस्था? की नवीन राजकीय परिस्थितीत संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास, त्याकरिता एकशेपाचांना मोजावी लागलेली प्राणांची किंमत वगैरे या नेत्यांना महत्त्वाची नव्हती?
आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या थोर नेत्यांनाच जर मुळात आज (बदललेल्या राजकीय परिस्थितीत) त्या चळवळीचे महत्त्व राहिलेले नसेल, त्याकरिता लोकांनी मोजलेल्या प्राणांच्या किमतीचे मोल राहिलेले नसेल, तर मग आमच्याकडून तरी त्या चळवळीचे महत्त्व वाटण्याची, त्याकरिता गेलेल्या प्राणांच्या किमतीचे मोल ठेवण्याची अपेक्षा कोणी का करावी? इतिहासात आणि राजकारणात हे चालतच असते, कोणीतरी कोणालातरी मारतच असते आणि कोणीतरी कोणाच्यातरी हातून मरतच असते. ते आम्ही आज काय म्हणून उगाळत बसावे? त्यांना मरू घालणार्यांना जर तो कालचा इतिहास उगाळण्यात रस नसेल, फक्त आजच्या परिस्थितीकडे आणि येणार्या उद्याकडे पाहायचे असेल, तर आम्ही तरी याहून वेगळे काही का करावे?
बंडू गोखल्याच्या (आणि इतर एकशेचारांच्या) तळमळीविषयी शंका नाही. मात्र त्यांना मूर्ख बनवून त्यांचा तोफेचे खाद्य म्हणून वापर करण्यात आलेला आहे या मताशी कायम आहे. (बंडू गोखल्याच्या बलिदानाचे त्याला लढायला पाठवणार्या नेत्यांना त्यानंतर वीस वर्षांनंतर सोयरसुतक नव्हते. असते, तर त्याच्या मारेकर्याच्या वीस वर्षांनंतरच्या त्याच्या हत्येचे समर्थन करणार्या मग्रूरीच्या वक्तव्याचा त्यांनी किमान निषेध केला असता. निदान त्याच मंचावर बसले असता राजकीय फायद्याकरिता गप्प राहिले नसते. बंडू गोखल्याची याहून मोठी फसवणूक कोणी केली नसेल.) बाकी महाराष्ट्राचे म्हणाल, तर 'बाँबे बिगर बायलिंग्वल' जाऊन आता वेगळ्या महाराष्ट्र राज्याची स्थापना कधीच झालेली आहे. (माझा जन्म महाराष्ट्रातच झाला, मुंबई राज्यात नव्हे.) आणि ही स्थापना टिकाऊ आहे. मराठीभाषकांकरिता वेगळ्या ("संयुक्त") महाराष्ट्र राज्याची मागणी योग्य होती किंवा नाही, मुळात भाषावार प्रांतरचनेचे तत्त्व बरोबर होते की नाही, या मुद्द्यांवर मतांतरे असतील, पण आता महाराष्ट्र जाऊन पुन्हा जुने 'बाँबे बिगर बायलिंग्वल' येणे नाही. कोणीही काहीही म्हणो, परंतु हे चक्र आता पुन्हा उलटे फिरणे नाही, कोणी फिरवू शकत नाही. (उद्या जनतेच्या सोयीसाठी जनतेच्या मागणीनुसार नवी पुनर्रचना किंवा रचनेत थोडाफार फेरफार झाल्यास गोष्ट वेगळी. पण ती नवी घटना असेल, जुन्याशी त्याचा संबंध नाही. आणि अशा एखाद्या पुनर्रचनेकरिता जनतेने जर एखादे आंदोलन केले, तर तेही नवे आंदोलन असेल, जुन्याशी त्याचा संबंध लावता येणार नाही.)
तेव्हा आता बंडू गोखल्याच्या, इतर एकशेचारांच्या आणि एकंदरीतच संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या नावाने गळे काढण्याचे (सर्वांनीच) थांबवावे, हे उत्तम. बेळगावची जर काही समस्या असेलच, तर ती बेळगावच्या आजच्या रहिवाश्यांच्या आजच्या प्रश्नांच्या संदर्भात सोडवण्याचा प्रयत्न करावा, गरज पडल्यास त्यासाठी न्यायालयात जावे किंवा आंदोलनही करावे, पण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी किंवा त्यामागच्या तथाकथित तत्त्वांशी त्याचा संबंध जोडू नये, हे उत्तम. जुन्याच्या उगाळण्याने आणि जुन्या गोष्टींच्या नावाने गळा काढण्याने फक्त आग जळती ठेवून त्यावर आपली पोळी भाजू पाहणार्या राजकारण्यांचा फायदा होतो, अन्य कोणाचाही नाही.
हे पटले नाही.
१. मुंबई द्वैभाषिक राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्ये झाली हे लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य जर अस्तित्वात आले नसते, तर गुजरात राज्यही अस्तित्वात आले नसते, हे सयुक्तिक आहे. तेव्हा मराठी माणसांनी जर रस्त्यावर उतरून एकजूट दाखवली नसती, तर आपण गुजरातेत पडण्याची भीती आपल्याला जरूर असू शकेल, पण तशी शक्यता अजिबात नव्हती.
२. मुंबई राज्याच्या विभाजनानंतरसुद्धा मुंबई शहर हे गुजरातीभाषक मुख्यभूमीशी भौगोलिकदृष्ट्या संलग्न नसल्यामुळे गुजरात राज्यात गेले असते ही शक्यता धूसर वाटते. (किंबहुना तसे झाले असते, तर त्याच तत्त्वाने बेळगावबद्दलच्या महाराष्ट्राच्या भूमिकेस त्याने पुष्टीच मिळाली असती असे वाटते. आणि तशीही मुंबईतील मराठीभाषकांची संख्या मुंबईतील गुजरातीभाषकांच्या संख्येपेक्षा बरीच अधिक असावी. तेव्हाही आणि आजही.)
३. पण तरीही 'मुंबईत कोणत्याही एका भाषिक समूहाची टक्केवारी पन्नास किंवा अधिक नाही' या कारणास्तव यदाकदाचित मुंबई महाराष्ट्रास मिळाली नसतीच, तर त्याच न्यायाने ती इतर कोणत्याही राज्यास मिळण्याचेही काही कारण नव्हते.
४. याचा अर्थ, मुंबई जर महाराष्ट्रास मिळाली नसती, तर फार फार तर केंद्रशासित होऊ शकली असती.
५. यदाकदाचित मुंबई केंद्रशासित झाली असती, तरी त्यामुळे आपल्याला या साइटवर येता न येण्याचे काहीच कारण नव्हते.
५अ. केंद्रशासित प्रदेशांत मराठी सायटी काढू नयेत असा कोणताही नियम अस्तित्वात असल्याचे ऐकिवात नाही.
५ब. तसेही या सायटीचा सर्वर मुंबईत असण्याबद्दल साशंक आहे.
५क. या सायटीचे मूळ संस्थापक हे ठाण्याचे एक सद्गृहस्थ आहेत, असे ऐकलेले आहे. माझ्या आजवरच्या माहितीनुसार ठाणे हे बृहन्मुंबईच्या हद्दीत कधीही नव्हते. सबब, मुंबई केंद्रशासित झाली असती तरी ठाणे हे महाराष्ट्रातच राहिले असते, आणि त्यामुळे मुंबईच्या केंद्रशासित होण्याचा या सायटीच्या स्थापनेवर काहीही फरक पडला नसता.
५ड. केंद्रशासित प्रदेशांच्या रहिवाशांनी मराठी सायटींवर वावरू नये, अशाही स्वरूपाचा कोणता नियम असण्याबद्दल ऐकलेले नाही.
५ई. मुंबई शहर महाराष्ट्रात नसतानासुद्धा (पक्षी: महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलेले नसताना) मुंबईत मराठी वृत्तपत्रे आणि इतर मराठी प्रकाशने अस्तित्वात होती, आणि मुंबईतील मराठीभाषक ती वाचत होतेच. इंटरनेटचे माध्यम आल्यावर मुंबई केंद्रशासित झाली असतासुद्धा या परिस्थितीत फरक पडण्याचे काही कारण नसते.
५फ. महाराष्ट्राबाहेर गुजरातेत वडोदरा येथे, मध्यप्रदेशात इंदौर आणि ग्वालियर येथे, तसेच गोव्यात मराठीभाषकांच्या किंवा मराठी जाणणार्यांच्या वस्त्या आहेत. इतर ठिकाणीही असतील. या ठिकाणी मराठी वृत्तपत्रे किंवा अन्य प्रकाशने प्रकाशित करण्यास बंदी असावी असे वाटत नाही. यांपैकी काही ठिकाणी मराठी वृत्तपत्रे प्रकाशित होतही असतील. निदान गोव्यात तरी होतात असे वाटते. खुद्द बेळगावातसुद्धा होतात. जेथे वृत्तपत्रे प्रकाशित होऊ शकतात, तेथे आंतरजाल आल्यावर मराठी सायटी यावयास काहीच अडथळा असू नये.
सबब, 'मराठी माणसांनी रस्त्यावर उतरून एकजूट दाखवली नसती तर कदाचित मी ह्या साईटवर नसतोही' हे आपले विधान (किंवा ही आपली भीती) निराधार वाटते.
- पंडित गागाभट्ट.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
गुरुवार, 07/08/2010 - 02:25
नवीन
पंगा, तुम्ही वकील एत काय हो?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
- Log in or register to post comments
आ
आण्णा चिंबोरी
Sat, 07/10/2010 - 11:54
नवीन
श्री. पंगा यांना उगीच टग्यासारखे प्रश्न विचारु नका.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Sat, 07/10/2010 - 19:15
नवीन
का हो ? त्यांना नाही पण तुम्हालाच का एवढा प्रोब्लेम आहे?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
- Log in or register to post comments
प
पुष्करिणी
Sat, 07/10/2010 - 20:26
नवीन
शिल्पाताई नाव थोडं बदलून घ्या आणि मग वाट्टेल ते विचारा असं म्हणताय अण्णा....(ह. घ्या )
पुष्करिणी
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Sat, 07/10/2010 - 20:35
नवीन
असं होय !!! =))
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
- Log in or register to post comments
उ
उपास
गुरुवार, 07/08/2010 - 03:54
नवीन
पंगा तुमचा विस्तृत आणि मुद्देसूद प्रतिसाद आवडला.. पण त्यांच्यातील मताशी मी सहमत होऊ शकत नाही, दिलगीर आहे.
सुरुवातीला तुम्ही बंडू गोखले (आणि इतर १०४) ना मारल्याबद्दल आणि मरायला प्रवृत्त केल्याबद्दल दोन्ही बाजूंना दोषी धरता, शिवाय संयुक्त महाराष्ट्रातल्या अग्रणींना कृतघ्न मापता पण लगेचच 'गेलेल्या प्राणांच्या किमतीचे मोल ठेवण्याची अपेक्षा कोणी का करावी? इतिहासात आणि राजकारणात हे चालतच असते, कोणीतरी कोणालातरी मारतच असते आणि कोणीतरी कोणाच्यातरी हातून मरतच असत'' असे देखील म्हणता. म्हणजेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अशा कृतघ्न लोकांनी केले तेच तुम्ही करता. माझ्या दृष्टीने हे पटत नाही. बंडू गोखले ला ह्या स्वतंत्र भारतात मारले गेले ही जखम मराठी माणूस म्हणून माझ्या ठायी ओली राहीलच, ती विसरता येणार नाही . हा भाषिक प्रांतरचनेचाच वाद असल्याने, बेळगाव प्रश्नाशी हे निश्चित जवळचे आहे.
तुम्ही कितीही विपर्यास केलात तरी माझा मुद्दा साधा आहे, मुंबईत लहानपणापासून जे मराठमोळे वातावरण मला लाभले ते कदाचित लाभले नसते त्यामुळे मी (आणि माझ्यासारखे अनेक) मराठी भाषेविषयी आपुलकी, जवळीक साधू शकलो नसतो, त्या अर्थाने मी ह्या साईटवर रमलो नसतो.
पुन्हा एकदा तुमचा प्रतिसाद आवडलाच पण त्यातले सगळे विचार पटले असे नाहीच. असो चालायचच.
उपास मार आणि उपासमार
- Log in or register to post comments
प
पंगा
गुरुवार, 07/08/2010 - 07:00
नवीन
आपले एकमत झाले(च) पाहिजे (संयुक्त महाराष्ट्रासारखे), असा कोठला नियम आहेसे वाटत नाही. किमान माझे तसे मागणे नाही.
असो. बाकी सविस्तर जमल्यास नंतर.
- पंडित गागाभट्ट.
- Log in or register to post comments
स
सागर
गुरुवार, 07/08/2010 - 07:43
नवीन
आंध्रचे विभाजन करुन तेलंगणा राज्य निर्माण करण्यामागे काय कारणे आहेत :(
फक्त तेलुगु भाषिकांच्या हक्काचे वेगळे राज्य असा हेतू या राज्याच्या निर्मितीमागे असेन तर भाषावार विभाजनाची गोष्ट आजही घडते आहे हे सिद्ध होते. एकाला एक न्याय आणि दुसर्याला दुसरा असे किमान लोकशाहीत तरी नियमबाह्य व कायद्याची पायमल्ली करणारे आहे.
मला माहिती नाही मूळ मुद्दा काय आहे तेलंगणाच्या मागे. पण जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा... ह्या चळवळीबाबत तेलुगुंचे हक्काचे तेलंगणा असे अंधुकसे आठवते आहे... :(
- Log in or register to post comments
न
निस्का
गुरुवार, 07/08/2010 - 15:34
नवीन
---मुंबईत लहानपणापासून जे मराठमोळे वातावरण मला लाभले ते कदाचित लाभले नसते त्यामुळे मी (आणि माझ्यासारखे अनेक) मराठी भाषेविषयी आपुलकी, जवळीक साधू शकलो नसतो, त्या अर्थाने मी ह्या साईटवर रमलो नसतो.---
मुंबईत 'मराठमोळे' वातावरण आहे/होते?
मी बहुधा कुठलीतरी parallel universe मुंबई पाहिली असावी.
नि...
- Log in or register to post comments
श
शानबा५१२
Fri, 07/09/2010 - 07:23
नवीन
पुण्यात ठीक आहे पण मुंबैत ते कधी नव्हतच........बरोबर बोललात.
_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

- Log in or register to post comments
प
प्रदीप
Fri, 07/09/2010 - 08:12
नवीन
पन्नाशीच्या, साठीच्या दशकांत मुंबईत बर्यापैकी मराठमोळे वातावरण होते. बाजारात मराठी सर्रास बोलली/ समजली जायची, दैनंदिन व्यवहारासाठी मराठीचा वापर व्हायचा. पुण्या अथवा इतर शहरांच्या बाबतीत मला माहिती नाही, तेव्हा मी तुलनात्मक सांगू शकत नाही.
- Log in or register to post comments
प
पंगा
Sat, 07/10/2010 - 01:56
नवीन
पन्नाशीच्या, साठीच्याच कशाला, मी तर म्हणतो सत्तरीच्या दशकात किंवा अगदी ऐशीच्या दशकाच्या मध्यापर्यंतसुद्धा मुंबईत (निदान ज्या भागांशी माझा संबंध आला तेथे) बहुधा बर्यापैकी मराठमोळे वातावरण असावे.
माझे आजोळ गिरगाव-ठाकूरद्वार भागातले. ते ऐशीच्या दशकाच्या उत्तरार्धात तेथून हलेपर्यंत तेथे बर्यापैकी जाणेयेणे असे. छान मराठमोळे वातावरण होते. शेजारीपाजारी सगळे मराठी, बोलणेचालणे मराठी, अगदी किराणा अने भुसार मालाचे वेपारी जरी गुजराती असले, तरी गिर्हाइकाशी मराठीतच बोलत. त्याशिवाय नातेवाइकांच्या निमित्ताने ग्रांट रोड (शास्त्री हॉल), दादर, विलेपार्ले, किंवा इतर उपनगरांतसुद्धा जेथेजेथे जाण्याचा संबंध आला, तेथे याहून वेगळी परिस्थिती निदान जाणवली तरी नाही. हिंदी आवर्जून जेथे वापरावी लागे, असे फार थोडे व्यवहार म्हणजे (१) टॅक्सीवाल्याशी बोलताना (गरजेपोटी), (२) बसचे तिकीट मागताना (केवळ सगळे हिंदीत बोलत म्हणून, नाहीतर बेस्टच्या कंडक्टरला सहसा छान मराठी कळत असे, आणि बहुतकरून मराठी बोलणाराच निघे), आणि (३) लोकलचे तिकीट काढताना (येथेही कदाचित मराठी चालू शकली असती, असे वाटते, पण खात्री नाही. तसाही गिरगावकरांचा लोकलशी संबंध कमीच. निदान त्या काळी आणि आमच्या आईच्या पिढीपर्यंत तरी.). कदाचित दूधवाल्या भय्याशी हिंदी बोलावे लागत असल्यास कल्पना नाही. (आमच्या आजोळी दूधकेंद्राचे दूध आणि तेही बहुधा चाळीतल्या रामागड्याला पिटाळून येत असल्याकारणाने भय्याशी संबंध नव्हता.)
अर्थात, तेव्हासुद्धा मुंबईत सर्वत्र अशी परिस्थिती असेलच, असे नाही. मराठमोळे वातावरण नसलेले विभाग मुंबईत तेव्हाही असावेतच. माटुंगा-किंग्ज़ सर्कल, नेपियन सी रोड, वांद्रे (पश्चिम), भायखळा, हाजीअली वगैरे विभागांत तेव्हाही मराठी सर्रास वापरली किंवा किमान सरसकटपणे समजली जात असेलच असे सांगता येत नाही. माझा फारसा संबंध न आल्यामुळे मला नक्की माहीत नाही. पण तेथे ही परिस्थिती बहुधा पूर्वापार असावी, अलीकडची नसावी. आणि तसाही मराठी माणसाचा या विभागांशी रोजच्या व्यवहारांकरिता कितपत संबंध येत असावा? (क्वचित आलाच तर बंबैया हिंदीत - हा हिंदीवरचा मराठी माणसाचा सूड आहे असे माझे प्रामाणिक मत आहे, पण ते असो - काम चालून जात असावे.)
(फोर्ट, नरीमन पॉइंट वगैरेंसारख्या ठिकाणी जेथे मराठी माणसाचा निदान नोकरीपुरता तरी रोजचा संबंध येऊ शकतो, तेथे मराठमोळे वातावरण आहे असे निश्चितच म्हणता येणार नाही, पण मग तेथे ते तसे कधी(पर्यंत) होते, याबद्दल साशंक आहे.)
ऐशीच्या दशकाच्या उत्तरार्धात माझे आजोळ गिरगाव-ठाकूरद्वार भागातून कायमचे हलल्यावर त्या भागाशी नंतर माझा संबंध आलेला नाही. पण ऐशीच्या दशकात एक गोष्ट जाणवू लागली होती. ती म्हणजे, चाळीत हळूहळू वाढू लागलेला गुजराती-मारवाडी टक्का. याला कारण, गुजराती-मारवाडी मंडळींना धंद्याच्या दृष्टीने ठिकाण सोयिस्कर असल्याकारणाने, जागा मिळवण्यासाठी ते वाटेल ती किंमत मोजायला राजी असत, आणि चाळमालकाबरोबरच मराठी भाडेकरूंनासुद्धा (जागा सोडण्याकरिता) किंमत देऊ केली जात असल्याकारणाने, मराठी भाडेकरूसुद्धा चाळीतली जुनी आणि अडचणीची जागा सोडून उपनगरांत जायला राजी होऊ लागली. त्यापूर्वी चाळीतून स्थलांतरे होत नसतच, असे नाही; बोरिवली, मुलुंड, डोंबिवली, अगदी बदलापूरपर्यंतही लोक चाळ सोडून गेलेली पाहिलेली आहेत, पण अशी स्थलांतरे ही सहसा (१) घरातल्या मुलीचे त्या-त्या ठिकाणच्या घरात लग्न झाल्याकारणाने, किंवा (२) विस्तृत कुटुंब चाळीतल्या छोट्याशा खोलीत राहत असता त्यापैकी एखाद्या भावंडाने लग्न झाल्यावर दाटी कमी करण्यासाठी जमेल तसा स्वतंत्र संसार थाटल्यामुळे, यांपैकी एखाद्या कारणाकरिता होत असत. चाळीतली जागा सोडावयास मंडळी सहसा राजी नसत, आणि एखादवेळेस अशा कारणाकरिता सोडलीच, तरी कुटुंबातला एखादा सदस्य तरी मूळ जागी टिकून राहत असे. ऐशीच्या दशकात ही परिस्थिती हळूहळू बदलू लागल्याचे जाणवू लागले, आणि अलीकडे त्या भागात अनेक वर्षांत गेलेलो नसलो, तरी आज खूपच बदललेली आहे असे ऐकून आहे. (अर्थात हे होणे स्वाभाविक होते.)
तर सांगण्याचा उद्देश, त्या वेळपर्यंत तरी मराठीची परिस्थिती (निदान मराठी माणसाचा जेथे रोजच्या व्यवहारांकरिता संबंध येत असे अशा ठिकाणी) तितकीशी वाईट असावी असे वाटत नाही.
त्यानंतर माझा मुंबईत राहण्याचा संबंध जेमतेम वर्ष ते दीड वर्षापुरता आला असावा. तोही सलग नाही. दोन वेगवेगळ्या वेळेला. राहण्याची ठिकाणे: गोरेगाव (हायवेच्या पल्याड), अंधेरी (पश्चिमेस स्टेशनालगत) आणि सहार. गोरेगाव (हायवेच्या पल्याड)चे वातावरण निश्चितपणे मराठमोळे म्हणू शकणार नाही, परंतु अगदीच अमराठी वाटले नाही. (हायवेच्या अल्याड मुख्य गावात कदाचित अधिक बरी परिस्थिती असावी; मला कल्पना नाही.) अंधेरी (पश्चिम)चा (किमानपक्षी स्टेशन ते एस व्ही रोडपर्यंतच्या पट्ट्याचा - त्यापलीकडची फारशी कल्पना नाही.) दूरान्वयानेही मराठमोळेपणाशी संबंध जाणवला नाही. सहार-चकाला भागात (निदान मी जेथे राहिलो त्याच्या जवळपास) पुन्हा मराठमोळेपणाचा अभाव तरी जाणवला नाही.
१९९३पासून मात्र माझा मुंबईशी संबंध (दोनतीन वर्षांआड एखाददुसर्या दिवसाची धावती भेट - तीही दिली तर - देण्यापलीकडे) फारसा आलेला नाही.
मधल्या काळात मुंबईच्या डेमोग्राफिक्समध्ये झालेल्या फेरफारांची मला फारशी कल्पना नाही. मात्र अलीकडे खूप बोंबाबोंब वर्तमानपत्रांतून ऐकू येते, त्यावरून मधल्या काळात बहुधा आकाश कोसळले असावे असे वाटते.
मात्र एक शंका आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली १९६० साली. ऐशीच्या दशकाचा उत्तरार्ध काय किंवा १९९३ काय, ही त्याच्या बर्याच नंतरची गोष्ट झाली. म्हणजे मग (मुंबईसकट संयुक्त) महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा मुंबईतल्या मराठी माणसाला नेमका फायदा झाला, की तोटा? (की मुंबईसकट संयुक्त महाराष्ट्राचा आणि मुंबईतल्या मराठी माणसाच्या बर्यावाईटाचा काहीही अनोन्य संबंध नाही? पण मग ते १०५ नेमके कशासाठी मेले?)
- पंडित गागाभट्ट.
- Log in or register to post comments
प
पंगा
Sat, 07/10/2010 - 01:56
नवीन
१९९२ साली मी पुणे कायमचे सोडले असे म्हणायला हरकत नाही. त्या वेळेपर्यंत तरी पुणे हे त्या मानाने खूपच अधिक मराठमोळे होते असे वाटते. म्हणजे ४११०३०च्या तीन पेठांतच नव्हेत, तर इतरत्रही.
अर्थात तेव्हाही पुण्याचे सर्वच विभाग मराठमोळे होते, अशातला भाग नाही. कँप विभाग हा (नामदेव शिंपी समाजाची बर्यापैकी वस्ती वगळता) खूपसा मुसलमान-ख्रिस्ती-पारशी-सिंधी (आणि एकंदरीतच बहुतकरून अमराठीभाषक) असावा. तसेच औंध, सिंध सोसायटी वगैरे भागही मोठ्या प्रमाणात अमराठी असावेत. एक (आता नेमकी कोणती पेठ ते आठवत नाही, पण) दाक्षिणात्य (बहुधा बहुतकरून 'शेट्टी' हे उपनाम धारण करणार्या - बहुधा घरी तुळूभाषक(?), पण घराबाहेर तितकीच अस्खलित मराठी बोलणार्या - मंडळींचा) विभाग असल्याचेही आठवते. इतरही अमराठी भाग असावेत. पण असे काही थोडे पारंपरिक अमराठी भाग वगळल्यास बहुतकरून मराठीची परिस्थिती खूपच चांगली असल्याचे आठवते.
१९९२नंतर पुण्याशी दर दोनतीन वर्षांआड दोनतीन आठवड्यांकरिता भेट देण्यापलीकडे फारसा प्रत्यक्ष संबंध आलेला नाही, त्यामुळे सद्यपरिस्थितीची नीटशी कल्पना नाही. अलीकडे उत्तरेहून येणार्या लोकांचे प्रमाण नको तितके वाढलेले आहे अशी बोंब तेथूनही ऐकू येते, पण माझ्या भेटींत मला असे जाणवलेले नाही. अर्थात माझा संबंध मर्यादित काळापुरता आणि त्यातही मर्यादित भागांशी येत असल्याकारणाने तसे असू शकेल. तशीही पुण्याची व्याप्ती (आणि त्यामुळे व्याख्या) हीसुद्धा अलीकडे खूपच बदललेली आहे. त्यात आयटीमुळे स्थलांतरितांचे प्रमाण - त्यातही इतर राज्यांतून येणार्या स्थलांतरितांचे प्रमाण - खूपच वाढलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझ्या डोळ्यांत ती आलेली नाही, इतकेच.
आयटीमुळे पुण्याची जी वाढ झाली, आणि मुख्य म्हणजे ती ज्या भागांत झाली, त्यातील बर्याच भागांबद्दल मी पुणे सोडायच्या वेळेस 'अशा नावाची गावे पुण्यात किंवा पुण्याजवळ आहेत' याचीही कल्पना नव्हती. आज त्या 'हॅपनिंग' जागा आहेत, आणि तेथील जागांचे भाव अवाच्या सवा झालेले आहेत, असे कळते. कदाचित आजकाल तेथे (आणि पुण्याच्या आजूबाजूच्या बाह्यविभागांत - आउटलायिंग एरियाज़मध्ये) या 'बाहेरच्या लोकांच्या' इन्फ्लक्समुळे मराठमोळे वातावरण राहिलेले नसूही शकेल. याबद्दल थोडेफार उडतउडत आणि अर्धवट ऐकलेले आहे, प्रत्यक्ष अनुभवलेले नाही. कदाचित पुण्याचे सद्यरहिवासी याबद्दल खात्रीलायकरीत्या सांगू शकतील; सद्यपरिस्थितीची मला नीटशी कल्पना नाही.
- पंडित गागाभट्ट.
- Log in or register to post comments
उ
उपास
Fri, 07/09/2010 - 23:56
नवीन
मी ज्या मुंबईत वाढलो त्या मुंबईत गणपती, गोविंदा, दिवाळीच्या रांगोळ्या, नवरात्री सगळे सगळे सणवार झाडून व्हायचे.. उद्यान, लोकमान्य, टोपीवाला, वसंत अशा अनेकानेक व्याख्यानमालांची मेजवानी असायची... गिरगाव, दादर भागात बालपण गेल्याने (त्यातही चाळीत वाढल्याने) असेल पण मला मुंबई दिसली ती अशी.. तांबे, वेलणकर, गोविंदाश्रम, अनंताश्रम, माधवाश्रम, पणशीकर, सांडू, कोना, प्रकाश, विनय अशी अनेकानेक मराठीपणा मिरवणारी हॉटेल एक्मेकाला खेटून, तशीच देवळे, मठ, त्यातली किर्तने वगैरे...
आणि हा काल १९८० ते १९९५. असो!
उपास मार आणि उपासमार
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Fri, 07/09/2010 - 07:50
नवीन
शेवटचे निटपिकींग अनावश्यक होते, ते सोडून प्रतिसाद आवडला.
मात्र ज्या उमाळ्याने तुम्ही एसेम. जोशींना धारेवर धरले आहे, त्यामागील भावनेचा आदर राखूनही, त्याविषयी माझा मतभेद आहे. बंडू गोखले व इतर १०४ हुतात्म्यांना 'मूर्ख बनवून त्यांचा तोफेचे खाद्य म्हणून वापर करण्यात आलेला आहे', असे तुम्ही म्हणत आहात. असे काही समितीच्या नेत्यांनी केलेले नाही. त्या चळवळीचे सर्वच नेते लढ्याच्या प्रत्यक्ष अग्रणी होते. 'तुम्ही व्हा पुढे, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी', असली कसलीही चलाखी त्यांनी केलेली नव्हती. त्यांनी सर्वांनीच लाठीमार खाल्लाय, तुरुंगवास भोगलाय. आणि सर्व काही करायचे ते करून, अलिकडच्या तथाकथित 'पोलादी ' नेतृत्वाप्रमाणे केलेल्या कृत्यांची ओनरशिपही त्यांनी कधीचा नाकारली नव्हती. तेव्हा तुम्ही तीव्र शव्ब्दांत केलेली त्या नेत्यांची निर्भत्सना गैरलागू आहे.
पण तुमचा आक्षेप, ह्या घटनांनंतर जेमतेम २० वर्षांनंतर वेगळ्या व्यापीठावर एकत्र आल्यावर एस्सेम ह्यांनी , मोरारजींच्या उद्धट उद्गारांचा निषेध का केला नाही, ह्याविषयी आहे. तुम्ही जो किस्सा लिहीला आहे, तो तसाच घडला असेल तर, एस्सेम ह्यांनी निषेध नोंदवणे जरूरीचे होते हे खरे आहे. पण एक वेगळा झंझावात तेव्हा राष्ट्रात आलेला होता, त्यावेळी मागील काही बाबी विसरणे व पुढे जाणे हे देशाच्या भवितव्यासाठी शहाणपणाचे आहे, असा सूज्ञ विचार एसेम ह्यांनी केला असेल तर त्यात मला गैर वाटत नाही (आणि त्याचबरोबर मी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा उदोउदो करणेही तितकेच रास्त वाटते). काळ बदलत रहातो, संदर्भ बदलत रहातात, आपले दृष्टिकोन बदलत रहातात आणि नवी गणिते तयार होतात, ह्यात गैर काही नाही. तेव्हा एसेम ह्यांनी थोडाफार विवेक दाखवला असावा. तसा त्यांनी दाखवला हेच मलातरी कौतुकाचे वाटते. अन्यथा तत्कालिन प्रजा समाजवादी पक्षाच्या 'इतर काहीही होवो, आमचे तत्व आम्हास सर्वात प्रिय' ह्या आत्मघातकी संवयीनुसार (आठवा: नॉर्वे येथील एका पुढार्याच्या हत्येच्या प्रश्नावरून तत्कलिन ६० च्या दशकात प्र. स. पक्षाने चक्क मुंबई महानगरपालिकेतील आपलेच बिगर काँग्रेस सरकार खाली खेचले होते) -- नुकत्याच जन्मास आलेल्या जनता पक्षाची वासलात (त्याच एस्सेमच्या) पक्षाच्या काही नेत्यांनी लावण्याचे कार्य उत्साहाने केले तेव्हाच केले असते.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Fri, 07/09/2010 - 08:13
नवीन
अगदी बरोबर.
असाच विवेक आता कोणीही दाखवायला तयार नाहि. पन्नास वर्षांपूर्वीचे प्रश्न कुरवाळत बसण्यापेक्षा पुढे चलायला मंड्ळी तयारच नाहीत.
ज्या चळवळीच्या मुख्य नेत्यांनीही सुज्ञपणा दाखवला त्या चळवळीचे फक्त निमित्त करून अजूनही राजकारण केले जाते व भावना भडकवल्या जाऊ शकतात हेच कीती बरोबर आहे?
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Fri, 07/09/2010 - 09:21
नवीन
आता खरे तर निव्वळ राजकारणी लोक ह्याचा वापर करून घेत आहेत.
- Log in or register to post comments
प
पंगा
Sat, 07/10/2010 - 05:01
नवीन
असेलही कदाचित. ही चळवळ घडली तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता, त्यामुळे मला अर्थातच फर्स्ट-हँड माहिती नाही. आपण ही चळवळ आपल्या हयातीत बघितलेली असल्याकारणाने अधोरेखित तपशिलांची अधिक खात्रीलायक माहिती आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे असूही शकेल.
मात्रः
मोरारजींनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यालाच तात्त्विक विरोध दाखवला असता, किंवा 'राज्याचा मुख्यमंत्री म्हणून त्या वेळी त्या परिस्थितीत मला जे योग्य वाटले, ते मी केले' अशा स्वरूपाचे विधान केले असते, आणि एसेम 'मागील काही बाबी विसरून पुढे जाण्याकरिता' 'बदललेल्या काळात आणि बदललेल्या संदर्भांना अनुसरून' गप्प राहिले असते, तर ते कदाचित 'नवीन परिस्थितीत विवेकी' ठरूही शकले असते. कारण ते बहुधा 'मोरारजींच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून तत्कालीन परिस्थितीचे आकलन' म्हणून (त्याच्याशी व्यक्तिशः सहमत न होता) सोडून देण्यासारखे विधान ठरते. मात्र, 'ते (म्हणजे मेलेले) १०५ नव्हतेच, ते ८०च होते, आणि ते गुंड होते' अशा स्वरूपाच्या मोरारजींच्या विधानास त्याच मंचावर असताना साधा आक्षेपही न घेतल्यास 'याचा अर्थ (१) ते १०५ नव्हते, ८०च होते, आणि (२) ते गुंड होते ही मोरारजींची विधाने यांना मान्य आहेत काय?' असा प्रश्न पडतो. त्यापुढे 'ते गुंड होते हे मान्य असल्यास, मग ते 'गुंड' यांनीच धाडले होते ना? हेही यांस मान्य आहे काय?' हा पुढचा प्रश्न आपोआपच उद्भवतो. (आणि 'बंडू गोखले आणि इतर १०४ हे आम्हीच पाठवलेले गुंड होते' हे खुद्द त्या चळवळीच्या अग्रणींनी मूकसंमतीने अप्रत्यक्षपणे मान्य करणे, हा त्या चळवळीचा एक वेळ सोडा, खुद्द बंडू गोखल्याचा अपमान नव्हे काय? तेही त्याच्याच नेत्यांकडून? याचा अर्थ '१९७७मध्ये तात्कालिक राजकीय गरजेसाठी बंडू गोखले हा 'गुंड' म्हणून संबोधून फेकून देण्यासारखा डिस्पोज़ेबल झाला होता' असा का घेऊ नये? म्हणजेच त्याचा केवळ तोफेचे खाद्य म्हणून, एक प्यादे म्हणून वापर झाला नाही काय?)
आक्षेप संयुक्त महाराष्ट्र चळवळीला व्यापक राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने विवेकाने विसरण्याला नाही. आक्षेप आहे तो आपल्याच कार्यकर्त्यांवरील वाटेल त्या आरोपांना (तसे नाही हे माहीत असून) मूकसंमती देण्याला. (या अग्रणी नेत्यांना पश्चात्बुद्धीने आपल्याच कार्यकर्त्यांच्या चारित्र्याबद्दल नव्याने संशय निर्माण झाला असल्यास गोष्ट वेगळी.)
'मेलेले १०५ नव्हते, ८०च होते' यामुळे परिस्थिती कमी आक्षेपार्ह किंवा अधिक स्वीकारार्ह नेमकी कशी होते, हा आणखी एक पूर्णपणे वेगळा मुद्दा.
देशाच्या भवितव्यासाठी विवेकाने मागील काही बाबी विसरणे ही एक गोष्ट, आणि (मान्य नसताना किंवा मान्य करण्यासारखे नसताना) वाटेल ते आरोप डोक्यावर घेणे ही पूर्णपणे वेगळी गोष्ट.
एक उपप्रश्नः याचा अर्थ, बदललेल्या परिस्थितीत संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही त्या चळवळीच्या अग्रणींच्या लेखी 'देशाच्या भवितव्याकरिता विसरून जाण्यासारखी एक बाब होती' असा घ्यावा काय? तसे असल्यास (हत्येच्या समर्थनाचे आणि गुंड धाडल्याच्या आरोपाचे न केलेले खंडन वगळता) त्यात निश्चितपणे काही गैर आहेच, असे नाही. पण मग जर चळवळीच्या अग्रणी नेत्यांकरितासुद्धा जर ही राष्ट्रहितार्थ विसरून जाण्यायोग्य जुनी बाब असेल, तर मग आज आपण तरी ती वारंवार उगाळत का बसावी?
इतरत्र आधी म्हटल्याप्रमाणे, कोणाचीही काहीही मते असोत, वेगळ्या महाराष्ट्र राज्याची स्थापना ही आता घडून गेलेली घटना (fait accompli) आहे. कोणीही काहीही म्हटले, तरी आता काळाची चाके उलटी फिरवून ही बाब कोणी अघटित करू शकत नाही. मग प्रश्न आला कोठे?
राहता राहिला प्रश्न बेळगावचा. हा दोन राज्यांमधला प्रश्न आहे हे लक्षात घेता, संबंधित राज्यसरकारे आणि केंद्रसरकार न्यायालयात वर्षानुवर्षे जो काही गोंधळ घालायचा तो परस्पर घालत बसूदेत. हे आवश्यक आहे किंवा योग्य आहे असे मला व्यक्तिशः वाटत नाही, परंतु संबंधित सरकारांचे दृष्टिकोन याहून वेगळे असू शकतात, त्यात मी ढवळाढवळ करू किंवा ते बदलू शकत नाही आणि इच्छीतही नाही. त्यामुळे ते जे काही परस्पर दृष्टिआड चालले आहे ते चालू द्या. असे मला वाटते. त्यातून जे काय निष्पन्न व्हायचे ते कधी ना कधीतरी होईल. नाहीतर होणारही नाही. पण मध्यंतरी राजकीय पक्षांनी आणि सामान्य जनतेने याबाबत आंदोलने करण्याची आणि रस्त्यावर उतरून गोंधळ घालण्याची नेमकी काय गरज आहे?
किस्सा आणीबाणीनंतरच्या निवडणुकांआधीच्या प्रचारमोहिमेतला आहे. तत्कालीन वृत्तपत्रांत त्या काळी जे वाचले, त्याच्या आठवणींतून लिहिलेला आहे. तपशिलांची अचूकता पडताळण्यासाठी जालावर या घटनेबद्दलच्या माहितीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या मर्यादित प्रयत्नांना दुर्दैवाने अपयश आले. तत्कालीन वृत्तपत्रांतून शोध घेणे मला व्यक्तिशः शक्य नसल्याकारणाने केवळ आठवणींवर विसंबून राहणे मला भाग आहे.
किस्सा आठवणींतून उतरवलेला असल्याकारणाने मोरारजींच्या वक्तव्यातील नेमक्या शब्दांबाबतच्या माझ्या आठवणींत (इतक्या वर्षांनंतर आणि नेमका संदर्भ डोळ्यांसमोर नसताना) थोडा फेरफार होण्याची शक्यता गृहीत धरूनसुद्धा, त्या वक्तव्यातील मुद्द्यांबद्दलच्या आणि नेमक्या आशयाबद्दलच्या माझ्या आठवणीबद्दल माझ्या मनात शंका नाही.
अर्थात, या घटनेच्या तपशिलांबद्दलचा एखादा दुवा जालावर कोणाला सापडू शकल्यास, किंवा अन्य कोणत्याही प्रकारे या घटनेबद्दल कोणी काही खात्रीलायक तपशील (जाहीरपणे) पुरवू शकल्यास, त्याचे स्वागतच आहे.
'मराठी माणसांनी रस्त्यावर उतरून एकजूट दाखवली नसती तर कदाचित मी ह्या साईटवर नसतोही' हे विधान कोणत्याही कोनातून पाहिले, तरी निराधार वाटते, हे दाखवून देण्यासाठी ते निटपिकिंग (मला) आवश्यक वाटले. धन्यवाद.
अतिअवांतरः या विषयी जालावर थोडा शोध घेत असताना (वरकरणी मराठी आडनाव असलेल्या एका गृहस्थाच्या ब्लॉगवरील एक दुवा सापडला. दुव्यावरील मजकुरातून, तसेच मजकुरातील 'टाइम' मासिकामधील वृत्ताच्या दुव्यावरील मजकुरातून, आंदोलनकालीन घटनांबद्दल एक वेगळा पर्स्पेक्टिव मिळतो, असे वाटते.
अर्थात, दोन्ही दुव्यांवरील माहितीच्या विश्वसनीयतेबद्दल वैयक्तिक खात्री नसल्याकारणाने, नो कमेंट.
- पंडित गागाभट्ट.
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Sat, 07/10/2010 - 17:06
नवीन
तुम्ही आठवणीतून सांगितलेल्या घटनेविषयी काही वाद घालायचा नाही. जालावर सगळेच दुवे सापडवून दर्शवण्याचा अटटाहास मीतरी करीत नाही. तेव्हा ती घटना तशीच घडली असे मानून, तुम्ही म्हणता तशी मोरारजीच्या आरोपास प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या मूक संमति देणे हे चूक आहे. पण तरीही मला वाटते त्या क्षणी एस्सेम ह्यांनी (बहुधा) आपल्याच सहकार्यांच्या हाती कोलित देण्याचे मनोमनी नाकारले असावे. ते एक ज्येष्ठ नेते होते, व त्यांनी मोरारजीच्या वक्तव्याचा थोडाजरी जाहीर पुनरुल्लेख केला असता तर जनता पक्षाच्या नरड्याला, जन्मापूर्वीच नख लागले असते-- होय, मधू लिमये इ. त्यांच्या काही तर्ककर्कश सहकार्यांमधे ही क्षमता जरूर होती (तुमच्याच प्रमाणे मीही एक उल्लेख केवळ आठवणीच्या आधारे केला आहे, तो नॉर्वेच्या तत्कालिन राष्ट्राध्याक्षाच्या हत्येचा. त्या घटनेवरून (प्रजा?) समाजवादी पक्षाने तेव्हाच्या आपल्याच मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेची वासलात लावली होती. ह्यातील तपशिल आता आठवत नाहीत).
गिरीश शहाणे ह्यांच्या ब्लॉगचा दुवा पाहिला. त्यात काही खास नवी माहिती मिळाली नाही. सलमान रश्दी/आफ्टरनून ह्यांचे संदर्भ वापरणार्याबद्दल काय विशेष बोलणार? 'टाईम'चा संदर्भ आहे खरा, पण त्यात लिहील्याप्रमाणे मुंबईत अत्यंत अनागोंदीची परिस्थिती होती व अगदी नाईलाजाने सरकारने शेवटी गोळीबार केला, हा सूर चुकिचा व खोडसाळ वाटतो. कारण असले काही खरोखरीच घडले असेल व अगदी बेधुंद जमावास आटोक्यात आणण्याकरीता नाईलाजाने गोळीबार केला गेला असेल, असे जर असते, तर शहाणे म्हणतात ती 'मिथ' पसरवणे व ती अनेक वर्षे जनमानसात तशीच रुजू ठेवणे ही अगदी कठीण बाब झाली असती. अगदी त्यावेळीही समितीच्या 'मराठा' ह्या मुखपत्राने खोडसाळपणे असली सर्वथा चूक बातमी पसरवली असती तर केवळ त्याच कारणास्तव आ. अत्रेंना सरकार तुरुंगात टाकू शकले असते. अगदी ६८च्या शिवसेना दंगलींच्या संदर्भातही अशा प्रकारची होलसेल दिशाभूल कुणी केलेली नाही. दुर्दैवाने त्या चळवळीत प्रत्यक्ष सहभागी झालेल्या व मला जवळून माहिती असलेल्या व्यक्ति आता हयात नाहीत. दै. मराठ्याचे तेव्हाचे अंक कुठे पहाता आले, तर 'दुसरी' बाजू कळू शकेल.
आता हा प्रश्न केवळ काही राजकीय नेत्यांच्या हातातील हमखास बाहुले बनलेला आहे, ह्याविषयी काहीही वाद नाही.
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
गुरुवार, 07/08/2010 - 04:50
नवीन
आपल्याला संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांविषयी आदर वाटतो आणि आपल्या या भावनेचा मला नक्कीच आदर वाटतो. पण कदाचित आपण गुजरात मध्ये असतो किंवा केंद्रशासित प्रदेशात असतो तर या साईटवर नसतो (याचा व्यापक अर्थ आपण आज मराठी बोलत नसतो असा मी घेतो) या म्हणण्याला काय आधार आहे? मी या क्षणी हे गुजरातच्या हृदयातून- अहमदाबादेतून लिहित आहे.मी महाराष्ट्रात राहात नाही म्हणून मराठी बोलू शकत नाही या म्हणण्याला आधार काय? अहो अहमदाबादेतूनच काय मी अमेरिकेत काही वर्षे होतो आणि तिथूनही मी या साईटीवर येतच होतो. तेव्हा आपण आपली भाषा बोलायची की पुलंच्या भाषेत वर्षभरातच ’मराठी वर्ड रिमेंबर करायला डिफिकल्ट जाते’ ही परिस्थिती उद्भवू द्यायची हे आपण ठरवायचे. त्याचा आपण कुठे राहतो याच्याशी काहीही संबंध नाही. इतकेच काय अगदी मुंबईत डॉन बॉस्को सारख्या शाळांमध्ये शिकणारे मराठी विद्यार्थी सुध्दा ’मराठी वर्ड रिमेंबर करायला डिफिकल्ट जाते’ याच ’कॅटेगरीमध्ये काऊंट’ होतात त्याचे काय?
बाकी चालू द्या.
- Log in or register to post comments
उ
उपास
गुरुवार, 07/08/2010 - 15:32
नवीन
क्लिंटन, माझी मुद्दा मांडण्यात गल्लत झालेय की काय..
तुम्ही सद्ध्या/ गेले काही वर्षे मुंबईच्या बाहेर असलात (उदा. अहमदाबादेत, अमेरिकेत) तर मराठीशी नाळ तुटली असे मला मुळीच म्हणायचे नाही, पण तुम्ही २०-२५ वर्षे अमराठी ठिकाणी वाढला असता तर तुमची मराठी विषयीची आपुलकी राहिली असती का हा मुद्दा आहे.. म्हणजे मुंबई केंद्रशासित राहिली असती किंवा गुजरातेत गेली असती तर मुंबईत वाढलेले बहुसंख्य, मराठी भाषेपासून लांब गेलो असतो (ती राजभाषा/ व्यवहारातली भाषा न राहिल्याने). गेले काही वर्षे देशापासून लांब राहूनही मराठीशी जुळलेल्या नाळेमुळेच मिपा सारख्या साईट शोधून व्यसनेषु सख्यं असलेल्यांशी बोलता येण्याचे समाधान आहे ह्याचे मूळ मराठी वातावरणात वाढलो ह्यातच आहे असे वाटते. ह्या जर्-तर ला काही अर्थ नसतो त्यामुळे झाले ते बरेच झाले, सयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून मुंबई महाराष्ट्राला मिळाली ह्याचा मला यथार्थ आनंद. अभिमान आहे.
अवांतरः
तुमचे डोनबॉस्कोचे उदाहरण बरोबर आहे, ज्याक्षणी सर्वसामान्य माणसावर ’"मराठी वर्ड रिमेंबर करायला डिफिकल्ट जाते’" अशीवेळ येईल त्यावेळी मराठी प्राकृतासारखी केवळ पुस्तकातच राहील. असो भाषा प्रवाही असतेच आणि हा ह्या चर्चेचा मुद्दा नाही.
उपास मार आणि उपासमार
- Log in or register to post comments
स
सुनील
गुरुवार, 07/08/2010 - 16:16
नवीन
म्हणजे मुंबई केंद्रशासित राहिली असती किंवा गुजरातेत गेली असती तर
मुंबई गुजरातेत जाण्याची शक्यता कधीच नव्हती. हे पंगा यांनी विशद केलेलेच आहे. केन्द्रशासित राहू शकली असती. तरीही, ती मराठीपासून दूर गेली असती, ही शक्यता नव्हतीच. कारण ती तशीही सर्व बाजूंनी महाराष्ट्राशी जोडली होतीच. (यापुढे मुंबई केन्द्रशासित होण्याची शक्यता नसली तरी, बृहन्मुंबईचे (ठाणे आणि रायगड जिल्ह्याचा काही भाग धरून) एक वेगळे राज्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि यात फार काही वावगे होईल असेही नाही).
मराठी प्राकृतासारखी केवळ पुस्तकातच राहील
तुम्हाला प्रा॑कृतऐवजी संस्कृत म्हणायचे आहे काय?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
- Log in or register to post comments
उ
उपास
गुरुवार, 07/08/2010 - 20:04
नवीन
तुमच्या तसेच पंगा यांच्या काही विधानांवरुन, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आवश्यकताच नव्हती, मुंबई महाराष्ट्रात राहीली नसती तरी मराठीपण टिकवून राहिली असती अथवा त्याचीही गरज नव्हती... असा आशय निघतो (बरोबर ना, तसे नसल्यास क्षमस्व), आणि इथेच आपली मतभिन्नता आहे.
काँग्रेसने पद्धतशीरपणे संयुक्त महाराष्ट्राचा लढाच इतिहासातून इतका व्यवस्थित डावलला आहे/ दडपला आहे की तुमच्या आमच्यासारख्या सामान्याना त्याविषयी नेमकी माहिती मिळण्याचे ठिकाण नाही. सेनापती बापट, आचार्य अत्रे सारख्या दिग्गजांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे नेतृत्व केले ते यथोचित आणि आवश्यकच होते, आपली पिढी त्याची फळे चाखत आहे हे नक्की, ते कबूल करायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न.
उपास मार आणि उपासमार
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
गुरुवार, 07/08/2010 - 22:47
नवीन
मागे सातारकर यांनी ’भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा लेख मिपावर लिहिला होता. त्यावर मी दिलेल्या प्रतिसादाचा काही भाग इथे जसाच्या तसा चिकटवत आहे.
"मला वाटते की स्वातंत्र्योत्तर काळात सरकारला मोठ्या प्रमाणावर समतोल आर्थिक विकास घडवता आला असता तर भाषावार प्रांतरचना यासारख्या मुद्यांना फारसे महत्व मिळाले नसते.अर्थात सरकारपुढे मोठ्या प्रमाणावर अडचणी होत्याच पण आपले जीवनमान भरभर उंचावत आहे असे लोकांना जाणवले असते तर अशा वेगवेगळ्या मागण्यांना समर्थन मिळाले नसते. एक उदाहरण द्यायचे झाले तर युरोपचे उदाहरण घेता येईल.वरकरणी युरोपात भाषेच्या आधारावर राष्ट्रे आहेत असे वाटू शकते.पण ते १००% बरोबर नाही.स्वित्झर्लंडमध्ये अर्ध्या भागात जर्मन तर उरलेल्या अर्ध्या भागात फ्रेंच भाषा बोलली जाते.बेल्जियममध्ये तर डच,फ्रेंच आणि जर्मन या तीन भाषा बोलल्या जातात.युरोपात जर भाषा हा एकच घटक देशांच्या सीमा ठरविण्यात असता तर स्वित्झर्लंड, बेल्जियम यासारख्या देशांचे अस्तित्व राहिले नसते आणि स्वित्झर्लंडचा फ्रेंच भाषिक प्रदेश फ्रान्सला आणि जर्मनभाषिक प्रदेश जर्मनीला जोडला गेला असता.पूर्वीच्या काळी ज्या कोणत्या कारणामुळे त्या देशांच्या सीमा ठरविल्या गेल्या त्या त्यांनी तशाच ठेवल्या.आज फ्रान्स,जर्मनी,स्वित्झर्लंड या तीनही देशांचा आर्थिक विकास चांगलाच झाला आहे.तेव्हा स्वित्झर्लंडमधील लोकांना आपण स्वीस नागरीक असलो काय आणि फ्रेंच/जर्मन नागरीक असलो काय त्याचा काहीही फरक पडणार नाही म्हणून आहे ती रचना मुद्दाम बदलण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. आता भारताच्या प्रश्नाकडे बघितले तर असे लक्षात येते की स्वातंत्र्य मिळाले तेव्हा लोकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावर होत्या.लगेच आपल्याला महालात राहायला मिळेल अशी अपेक्षा कोणी केली नसेल पण दोन वेळचे अन्न,प्यायला पुरेसे पाणी,डोक्यावर घराचे छत्र आणि घालायला पुरेशी वस्त्रे आणि या सगळ्या गोष्टींसाठी हाताला काम एवढी माफक अपेक्षाही दुर्दैवाने पूर्ण होऊ शकलेली नाही.तेव्हा अशा पार्श्वभूमीवर लोकांना ’अरे तू मराठी किंवा इतर भाषिक, तू अमक्या जातीचा किंवा अमक्या धर्माचा म्हणून तुझ्यावर अन्याय होतो आहे आणि म्हणूनच सरकार तुझ्या माफक अपेक्षाही पूर्ण करत नाही’ असे सांगून आकर्षित करणे खूप सोपे असते.लोकांच्या अपेक्षा वेळीच पूर्ण झाल्या असत्या आणि त्यांचे जीवनमान भरभर उंचावत गेले असते तर स्वतंत्र राज्यासाठी आंदोलने,इतर आंदोलने यासारख्या गोष्टींना लोकांचे समर्थन आज मिळते तितक्या प्रमाणात मिळाले नसते.आणि आजही राजकारणी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या मागे न लागता विविध आंदोलनांच्या आगीत तेल घालतात, वातावरण तापवून आपली पोळी भाजून घेतात हेच दुर्दैव."
तुम्ही म्हणता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेत्यांच्या त्यागामुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली आणि त्याची फळे आपली पिढी भोगत आहे. यातला भावनिक मुद्दा बाजूला ठेवला तर मुंबईपासून महाराष्ट्राला फायदा होतो आहे यामागची कारणे कोणती? मुंबई हे नैसर्गिक बंदर आहे आणि त्याचा ब्रिटिशांनी चांगला वापर केला. स्वत:च्या फायद्यासाठी का होईना ब्रिटिशांनी मुंबईलगत रस्ते आणि रेल्वेचा विकास केला. भारतातील इतर प्रांतांच्या मानाने १९४७ मध्ये तो नक्कीच जास्त होता. अगदी ब्रिटिश काळापासून मुंबई हे प्रथम कापड गिरण्यांचे आणि काही प्रमाणात इतर उद्योगांचे केंद्र बनले होते. देश स्वतंत्र झाल्यानंतर या गोष्टीचा फायदा मुंबईला आपसूकच मिळाला. मुंबई हे अनेक उद्योगांचे मुख्यालय बनले. त्यामुळे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर महसुल सरकारला मिळू लागला. अनेक उद्योगांचे मुख्य केंद्र मुंबईत असल्यामुळे नंतरच्या काळात मुंबई ही आर्थिक राजधानी बनली. आणि या सगळ्याचा फायदा मुंबईला आणि मुंबई महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्राला मिळत गेला.
आता या सगळ्या घडामोडींमध्ये मराठी माणसाचा वाटा किती? त्यापैकी किती उद्योग मराठी माणसाने सुरू केले? मराठी माणूस हा कायम नोकरदारच राहिला.नवीन व्यवसाय सुरू करायला लागणारी ’रिस्क’ घ्यायची नाही ही प्रवृत्ती. मी सध्या फायनान्स शिकत आहे आणि फायनान्सचा पहिला धडा असतो जेवढी ’रिस्क’ जास्त तेवढे ’रिटर्न’ जास्त. रिस्क कमी घेतल्यामुळे मराठी माणसाला आपोआपच रिटर्न कमी मिळाले.रिस्क घ्यायची तर नाहीच आणि कष्टाची कामेपण करायची नाहीत.यातूनच अगदी टॅक्सी चालविणे, इस्त्री करणे यासारख्या व्यवसायांमध्येही मराठी माणूस मागे पडून ’भय्यांचा’ शिरकाव झाला.हे जग आर्थिक ताकदीवर चालते आणि पैसेवाल्यापुढेच दुनिया झुकते हे एक कटू सत्य आहे. अशी आर्थिक ताकद किती प्रमाणात मुंबईतल्या मराठी माणसाकडे आहे? आणि हे सर्व मराठी समाजातील काही दुर्गुण आहेत (रिस्क न घेणे वगैरे) हे मान्य न करता बिझनेसमध्ये कराव्या लागणाऱ्या लांड्यालबाड्या आम्हाला करता येणार नाहीत म्हणून आम्ही बिझनेसमध्ये नाही अशी मल्लीनाथी करायची! आणि या सगळ्यावर ताण म्हणजे कमालीची मराठी अस्मिता बाळगायची! ’हाती नाही आणा आणि बाजीराव म्हणा’ असा दृष्टीकोन ठेवला तर ते कसे चालेल?
आपल्या समाजातील या प्रवृत्तीला राज ठाकरे या धूर्त राजकारण्याने अगदी व्यवस्थित हेरले आणि ’तुम्ही मराठी म्हणून तुमच्यावर अन्याय होतो’, ’हे सगळे भय्यांमुळे होत आहे’ वगैरे भडकाऊ भाषणे देऊन स्वत:च्या राजकिय स्वार्थासाठी पुरेपुर वापर केला/करत आहे.अपयशी माणूस नेहमीच इतरांना दोष देत असतो. आणि अपयशाचे रुपांतर यशात करू पाहणाऱ्या माणसाकडे इतरांना दोष द्यायला वेळ नसतो.मुंबईत मराठी समाज मागे असेल तर त्याची कारणे काय हे कोणी शोधून काढायचा प्रयत्न केला आहे का? ती कारणे शोधून काढून मराठी माणसाकडे या जगात मान मिळविण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी (मुख्यत: पैसा, त्यासाठी लागणारे शिक्षण, त्यासाठी करावे लागणारे कष्ट) कशा आणता येतील असा विधायक प्रयत्न करायचे सोडून हे धन्यता मानणार फुकाच्या अभिमानात आणि दगड मारण्यात आणि जाळपोळ करण्यात.
या सर्व पार्श्वभूमीवर माझा प्रश्न हा: मुंबईतून मिळणाऱ्या फायद्यासाठी मूळ कारणांसाठी मराठी माणसाचे योगदान फार जास्त नाही. तरीही मुंबई महाराष्ट्रात राहिली म्हणून अभिमान बाळगणे आणि त्यावर सगळ्या जगाने आपल्याला मान द्यावा अशी अपेक्षा ठेवणे याला काय अर्थ आहे? सगळ्या जगाने आपल्याला मान का द्यावा? कारण असा मान देण्यासाठी आपण काय भव्यदिव्य काम केले आहे? आणि हे मुद्दे मांडले तर ते मांडणारे मराठीद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही ठरतात. ते का?
- Log in or register to post comments
उ
उपास
गुरुवार, 07/08/2010 - 23:56
नवीन
क्लिंटन, मुंबईत मिळणार्या फायद्यासाठी मराठी माणसाचे योगदान फार जास्त नाही हे विधान ढोबळ वाटते. सगळ्यांनी येऊन मुंबई उभारली हे खरे असले तरी सगळ्यांनी येऊन मुंबईला ओरबडले हे सुद्धा मान्य करावेच लागेल (उदा. बांगलादेशी घुसखोरांचे मदनपुर्यातले अड्डे आणि बेसुमार झोपडपट्टी). मुद्दा हा आहे की, स्वतः पोटापाण्यासाठी बाहेरील राज्यातून येऊन, स्थानिकांचा रोजगार हिसकावून, तुमची मुंबई आहे हे आधी पटवून द्या, तुम्ही काय मुंबईसाठी केलेत हे सांगा असं उलट स्थानिकांना विचारणार्यांची चीड येणं स्वाभाविक आहे. (हे म्हणजे तुमच्या घरात कामानिमित्त आलेली व्यक्ती तुम्हाला एक दिवस बाहेरची दिशा दाखवते आणि हे घर तुमच आहे हेच मान्य नाही असा गळा काढते तसं झालं)
राज ठाकरेंच म्हणाल तर तापल्या तव्यावर पोळी भाजणच नव्हे तर पोळी साठी तवा तापवण्याचं काम एक राजकारणी म्हणून चोख करतोय. पण केवळ ह्या मुद्द्यावर तरी तो मराठी भाषिक अस्मिता उचलून धरतोय हे चांगलेच, इतर षंढ राजकारणांच्या पार्श्वभूंमीवर तर अधिकच चांगले म्हणायचे.
मराठी माणसाचे योगदान मुंबईच्या प्रगतित किती हा तुमचा प्रश्न अगदी मार्मिक आहे पण त्याचे योगदान तौलनिक दृष्ट्या कमी आहे असे मान्य केले तरी जे त्याचे आहे ते त्याचेच आहे आणि असायलाच हवे. मुंबई मराठी माणसाची होती, आहे आणि राहील हे आधी मनापासून स्वीकारुन मग त्यासाठी मराठी माणसास काय करता येईल जेणे करुन असा अभिमान पुढाच्या पिढ्यास मिरवता येईल, असा प्रश्न पुढे येणे आवश्यक आहे (न की मराठी माणसाने मुंबईसाठी काय केले म्हणून त्याने हक्क सांगावा अशा वादात अडकणे...). मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे आधीच्या पिढीने प्रसंगी प्राणांचे मोल देऊन मुंबई महाराष्ट्रात आणली.. आपण म्हणजे आपली पिढी पुढे काय करते हे महत्त्वाचे. 'काय फरक पडतो, मुंबई महाराष्ट्रात नसती तर काय बिघडले असते?' अशा विचारधारेने एक तर आपण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा, विचारांचा, नेत्यांच्या त्यागाचा अवमान करतो आणि मुंबई व मराठी माणसातली दरी वाढवण्याचेच काम करतो.
अवांतरः
क्लिंटन, तुमच्या वैचारीक लेखनाचा, त्यात तुम्ही जे संदर्भ देता ह्याचा मी पंखा आहे. बरेचदा प्रतिवादास वेळ मिळत नसला तरी तुमच्या प्रतिसादांच्या नुसत्या वाचनातून बरेच शिकायला मिळते. धन्यवाद!
उपास मार आणि उपासमार
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/09/2010 - 06:12
नवीन
स्थानिक नक्की कोणाला म्हणणार? इंग्रज आले तर भारतीय स्थानिक, भय्ये आले तर मराठी लोकं स्थानिक, विदर्भ-कोकणातून लोकं आले तर मूळचे आगरी, कोळी स्थानिक ...
आपण भारताचे नागरीक आहोत का महाराष्ट्राचे?
अदिती
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Fri, 07/09/2010 - 06:31
नवीन
बाडिस
क्रोनोलॉगिकल सिक्वेन्सप्रमाणे पहायचे तर आगरी कोळी यांच्या नंतर ब्रिटिश मग पारशी मग गुजराती मग मराठी असा क्रम लागेल.
नितिन थत्ते
- Log in or register to post comments
प
पंगा
Sat, 07/10/2010 - 05:04
नवीन
डोंगरीतले मुसलमान हे मुंबईतल्या तथाकथित 'मराठी माणसा'च्या बर्याच पिढ्या आधीपासूनचे मुंबईचे रहिवासी आहेत असे कळते.
- पंडित गागाभट्ट.
- Log in or register to post comments
उ
उपास
Sat, 07/10/2010 - 16:46
नवीन
पंगा, अहो कितीही निटपिकींग केलत तरी काय उपयोग.. ;)
मी स्वतः कित्येक डोंगरीतल्या मुसलमानाकडूम पतंग/ मांजे विकत घेतो.. कित्येक व्यवस्थित मराठी बोलणारे आणि इथे आपले पणाने राहाणारे मुसलमान माहितीत आहेतच. आता ह्या भाषेच्या मुद्द्यात धर्म घुसवल्याने ही दिशाभूलच वाटते... मी खाली 'स्थानिक' म्हणजे काय हे स्पष्ट केले आहेच.. आणि भारतीय राज्यघटनेत सुद्धा स्थानिकांचे हक्क, अधिकार मान्य आहेतच.. इतर राज्यात विशेषतः दक्षिणेत ते राबवले जातात, महाराष्ट्रात त्यामानाने कमी हाच काय तो फरक. असो! :)
उपास मार आणि उपासमार
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »