नेमाडे, खरेतर तुमच्यासारखे लेखक हीच एक मोठी अडगळ आहे, जी बाहेर पडली तरी काही हानी होणार नाही.
=D> =D> =D> =D>
या विधानाचे स्वागत आहे! :)
|| जय परशुराम ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
बा विनायका, तूच असा हताश झालास तर त्यांची मुलाखत कोण घेणार? त्यांच्यासोबत एक तास असा लेख कोण लिहिणार?
अवांतर : नेमाड्यांना खुले पत्र असा लेख पुढच्या साधनात येणार बहुतेक
माझ्या एकट्याच्या जीवावर सगळे कसे चालणार..लिहिल की दुसरे कोणी ... ;) ;) ;) ;) ;)
बाकी मी काही कोसला वाचलेली नाही ..आणि हिंदु वाचेन असे वाटत नाही ...
कोसलातली भाषा वेगळी होती असे समजते .मात्र आजकाल तीच भाषा कॉमन तर झालेली नाही ना ???
विनायक पाचलग
वाँट टु टॉक
कृष्ण हा व्यभिचारी होता आणि तो सामान्य `ड्रायव्हर' होता.
स्तंभित झालो आहे. डोळ्यासमोर एक तारवटलेला, दाढीचे खुंट वाढलेला, बाहेररख्याली ड्रायव्हर समोर आला - त्याने नितीश भारद्वाज सरखे हसायला पाहिले तर ते भलतेच विचित्र दिसले. असो!
हिंदू धर्मात फतवे निघत नाही, उलट पुस्तकाचा खपा वाढतो म्हणून प्रकाशक निर्धास्त असावेत, हेच दुसर्या धर्मात असते तर नेमाडे कदाचित जिवंत नसते. परवाच पेपरात एका शिक्षकाचे हात कापल्याची बातमी वाचली - कारण त्याने परीक्षेत एक विवादास्पद उतार्यावर प्रश्न विचारले होते.
http://news.yahoo.com/s/afp/20100705/wl_sthasia_afp/indiaeducationcrimereligion
ह्या(ही) पुस्तकावर बंदी वगैरे नकोच, पण अशा बेताल वक्तव्यांचा/लिखाणाचा सविस्तर समाचार घ्यायला हवा असे वाटते, म्हणजे असे लिखाण हे संदर्भपुर्ण साहित्य असण्यापेक्षा लेखकाच्या (पुर्वग्रह किंवा इतर कारणाने) दुषित दृष्टीकोनातून आलेले आहे हे सिध्द होईल. त्यांची credibility ही वैचारीक विरोधाने/लिखाणानेच शंकास्पद ठरवावी, असे वाटते.
राम आणि कृष्ण हे मांसाहारी क्षत्रिय होते. त्यांना ब्राह्मण कोणी बनवले ?
राम आणि/किंवा कृष्ण यांच्या आहाराच्या आवडीनिवडींबद्दल आणि/किंवा त्यांच्या वर्ण किंवा जातींबद्दल मला कल्पना नाही. (दोघेही क्षत्रिय असण्याबद्दल लहानपणापासून ऐकत आलेलो आहे, परंतु ही बाब व्यक्तिशः पडताळून पाहिलेली नाही.) मात्र, त्यांना कोणी 'ब्राह्मण बनवले' याची मला कल्पना नव्हती. निदान मी तरी कोणाला त्यांचा उल्लेख 'ब्राह्मण' असा करताना ऐकलेले किंवा पाहिलेले नाही.
राम किंवा कृष्ण यांना कोणीतरी 'ब्राह्मण बनवले' असे श्री. नेमाडे नेमक्या कशाच्या आधारावर म्हणतात याबद्दल काही संदर्भ मिळू शकेल काय? मुळात असे विधान त्यांनी ज्या मुलाखतीत केले असे वर म्हटलेले आहे, त्या मुलाखतीच्या ट्रान्स्क्रिप्टचा अधिकृत दुवा पडताळणीकरिता अधिक संदर्भाच्या (context) तपासणीकरिता मिळू शकेल काय?
धन्यवाद.
- पंडित गागाभट्ट.
हा हा हा
गेली चाळिस वर्ष हा माणुस एका कादंबरीच्या जीवावर मिशीला तुप लावुन फिरत होता, आता उरलेले आयुष्य (जीवेत शरदः शतम् ) विचारवंत म्हणुन फिरेल.
--अवलिया
जबरा प्रतिसाद णाणा... साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त टीकास्वयंवर आणि तुकाराम. देखणी आणि मेलडी हे कवितासंग्रह, बिढार, हूल, जरीला, झूल, निवडक तुकाराम गाथा, साहित्याची भाषा हे सगळं लेखन मिशा भादरुन केलेलं दिसतंय नेमाड्याने. अर्थात तुला याची कल्पना असेलंच म्हणा.
अमेरिकेत जुने काहीच ठेवत नाहीत. फर्निचर सगळे बदलतात आणि त्यासोबत कपडेही नवे घेतात. आता तर घर आणि कपडे बदलताना बायकोदेखील नवी करतात. कारण दोघांनाही नोकरी आणि आपली जागा सोडायची नसते. हे उद्योग आपण अजून सुरू केलेले नाहीत.
इथवर वरवर वाचले. एकंदरीत लक्षात आले. गंमत आहे. छान आहे. :D
- पंडित गागाभट्ट.
>> गेली चाळिस वर्ष हा माणुस एका कादंबरीच्या जीवावर मिशीला तुप लावुन फिरत होता,
तुप संपल म्हनुन हे संम्द....
त्याला कळल कि आता हे अस लिहिल्याव तेल, तुप, धुपाटण आणि तो स्वता सम्द गायब होइल
कोसला वाचली तेव्हाही ती फार ग्रेट आहे असे वाटले नव्हते. वेगळी भाषा मांडणी आहे एवढेच जाणवले होते.
असो पण आपल्याला साहित्यातलं काय कळतंय म्हणा.
नितिन थत्ते
काय नेमाडे आवडत नाहीत... अरेरे उच्चभ्रु कसे होणार तुम्ही...
गेला बाजार मसंवर पुर्वोत्तर उत्तरोत्तरच्या गलितगात्र मर्णोन्मुख साहित्याला नवसंजीव्नी प्राप्त करुन देवु शकणा-या महान लेखकांच्या प्रगल्भ शैलीच्या आयामांच्या परिणामांचे दैनंदिन तसेच राजकीय, सामाजिक, आर्थिक, झालंच तर लैंगिक पडसादांमधुन उमटणा-या आक्रोशाच्या अर्कोत्तरी चर्चांमधे भाग घेण्यापासुन वंचित रहाणार बघा तुम्ही.
--अवलिया
कथानक म्हणून कोसला फार ग्रेट वगैरे नाही . पण त्यातल्या भाषाशैलीमुळे अनेकजण कोलमडले होते. मराठी भाषेला शैलीदारपणाच्या बुरख्यातून बाहेर काढणार्यांपैकी कोसला एक महत्वाचा टप्पा आहे.
तुम्ही कोसला कोणत्या काळात आणि वयात वाचली यावर ती तुम्हाला कशी भावली हे ठरते.
समकालीनांमध्ये फडके खांडेकर काकोडकर हे होते...या सार्यात भाऊ पाध्यांचा एक मोठा अपवाद होता
समकालीनांमध्ये फडके खांडेकर काकोडकर हे होते...या सार्यात भाऊ पाध्यांचा एक मोठा अपवाद होता
मला आठवते त्यानुसार कोसला ६० च्या उत्तरार्धात अथवा ७० च्या पूर्वार्धात प्रसिद्ध झाली. त्यावेळी फडके- खांडेकरांचा जमाना संपलेला होता. तत्कालिन प्रमुख प्रवाहातील कादंबरीकार म्हणजे श्री. ना. पेंडसे, शिवाजी सावंत, रणजित देसाई, ना. सं. इनामदार हे होत. दळवी पण त्याच काळातील पण 'प्रमुख प्रवाहा'तील नव्हेत.
हा ग्रंथराज नेमाड्यानी नक्की कुणाकुणाची कुरापत काढायला लिहिला आहे ते कळत नाहीये.
त्यांचा विविध स्तरातील लोकांकडून 'सत्कार' होवो हीच प्रार्थना
( अर्थातच कृष्णाकडे!)
============
( अडगळप्रिय)माउ
'हिंन्दुत्व म्हणजे ब्राह्मणत्व' हे सत्य कुणीही नाकारु शकत नाही.
@) @) @) @) @) @) @)
भावश्या...
अरे बापरे!! केवढी ही वैचारिक दिवाळखोरी!!!! :-? :-? :-?
वैचारिक दारिद्र्याची सीमा पार करून रसातळ गाठलं!!!!!!!! =))
_________
तुम्हीदेखील त्या दुर्जनांच्याच ओळीत बसलेले वाटता.... मुक्तीची वाट बघत!!!!! :SS :|
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
हे पुस्तक प्रकशित होणार याचा गाजावाजा एक महिन्यापुर्वीच्या लोकसत्तेत आला होता. काही लेखांश सुद्धा होता.
बरीच वर्ष हे पुस्तक प्रकाशित झाल नव्ह्त अस लिहिलेल.
आत कळतय कोणताच प्रकाशक तयार झाला नसेल :P
बाकी यांनी कलेचे जे काही तारे तोडले आहेत यावरुन किव येते नेमाड्यांची.
"व्यभिचारी", "सामान्य" आणि "ड्रायव्हर"
यापैकी कृष्णाला व्यभिचारी म्हणू शकत नाही कारण त्या काळी जे नियम होते त्या नियमांत बसेल असं वर्तन त्याचं असावं. आताच्या निकषांवर तेव्हाचं वर्तन पडताळून पहाता येत नाही.
सामान्य का बरं? इतकी मुत्सद्दी, हुषार, राजकारणी व्यक्ती सामान्य कशी ठरू शकते?
ड्रायव्हर? जरूर अतिशय उत्तम सारथी तो जरूर होता.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
कोसलाकार म्हणून उदाहरणार्थ नेमाडेंचा आदर होता पण आता हे सगळे वाचून फक्त कोसलाकार नेमाडे म्हणूनच आदर राहील. उगाचच उदाहरणार्थ अकलेचे तारे तोडणे म्हणजे संशोधन नव्हे. हे बाकी मस्तच. इतिहातकालीन कादंबरी लिहीणे अन इतिहास लिहीणे वेगळे. फारच भंकस. त्यात त्यांनी जे काही उदाहरणार्थ म्हटले आहे ते "पुराव्यानिशी शाबीत" केले आहे काय?
मी जे पेप्रात वाचलेय त्यानुसार एक नायक असतो तो टाईममशीन प्रमाणे मागे पुढच्या कालखंडात वावरतो. मोहंजोदारो ला भेट देतो. असे काहीतरी आहे. त्याचे स्वातंत्र घेवून कादंबरी (हो कादंबरीच) लिहीली आहे. त्यास तितकेच अन तेवढेच महत्व राहू देणे. उगाचच इतिहास संशोधन वैगेरे नावे दिलेली पटत नाहीत.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
कृष्ण हा व्यभिचारी होता आणि तो सामान्य `ड्रायव्हर' होता
वाक्य मूळ मुलाखतीच्या संदर्भात अजून वाचलेले नाही. यथावकाश वाचेन. परंतु हे उद्धृतीकरण जर योग्य असेल, तर एक शंका अजून विचारावीशी वाटते.
कृष्णाच्या वैयक्तिक चारित्र्याबद्दल मला फारशी कल्पना नसल्यामुळे तो 'व्यभिचारी' वगैरे असण्याबाबत कोणत्याही बाजूने चर्चा करू इच्छीत नाही. (तशा गोकुळातील स्त्रियांबरोबरच्या त्याच्या वर्तनाबद्दलच्या काही किंवदंता लोककथांतून, तसेच लावण्यांतूनसुद्धा, कानावर आलेल्या आहेत. परंतु त्या मी व्यक्तिशः पडताळून पाहिलेल्या नाहीत, किंवा कृष्णाने किंवा संबंधित स्त्रियांनीही त्याबद्दल मला येऊन काही सांगितलेले नाही. त्यामुळे, नो कमेंट्स.) त्यामुळे तो मुद्दा सोडून देऊ.
मात्र, 'तो एक सामान्य ड्रायव्हर होता' या वाक्यातील (मला जो जाणवला तो) condescending (मराठी? 'खाली पाहण्याचा'?) सूर खटकला. एखादी व्यक्ती 'ड्रायव्हर' आहे, म्हणजे ती आपोआपच 'सामान्य' (ज्या पद्धतीने हा शब्द वापरलेला आहे, त्यावरून हे 'यःकश्चित' किंवा 'फालतू'करिता euphemism आहे, असे वाटले.) आहे, थोडक्यात 'दखल घेण्याच्या लायकीचा नाही', हा निष्कर्ष कसा निघू शकतो, हे कळले नाही.
ज्या तथाकथित 'ब्राह्मण्य', 'ब्राह्मणी वृत्ती'च्या नावाने आजतागायत खडे फोडले जातत, खुद्द नेमाड्यांनी फोडले आहेत असे कळते (मी नेमाड्यांचे काहीच वाचलेले किंवा ऐकलेले नसल्यामुळे प्रत्यक्ष पडताळून पाहिलेले नाही.), त्याहून हे नेमके वेगळे कसे?
(नेमाडॅ गाडी आणि ड्रायव्हर बाळगून आहेत की नाही, याची कल्पना नाही, परंतु बाळगत असल्यास) नेमाड्यांच्या आपल्या ड्रायव्हरबद्दलच्या (आणि गाडी-ड्रायव्हर बाळगून असोत-नसोत, एकंदरीतच "ड्रायव्हर" या व्यक्तिविशेषाबद्दलच्या) नेमक्या भावना जाणून घेता आल्यास ते रोचक ठरावे.
- पंडित गागाभट्ट.
ती मुलाखत पाहण्याचा योग आलेला नसला तरी 'कृष्ण हा सामान्य ड्रायव्हर होता' या वाक्याचा अर्थ कृष्णाचे ड्रायविंग स्किल हे लिमिटेड होते असा होतो. थोडक्यात या वाक्यातून कृष्णाच्या ड्रायविंग स्किलबद्दल टिप्पणी असून, ड्रायविंग या व्यवसायाबाबतची टिप्पणी नाही हे लक्षात घ्यावे. त्यामुळे ड्रायविंग हा सामान्य व्यवसाय आहे हे यातून ध्वनित होत नाही असे वाटते.
'कृष्णाचे ड्रायविंग स्किल हे लिमिटेड होते' असे सूचित करण्यासाठी 'कृष्ण हा एक सामान्य 'ड्रायवर' होता' या वाक्यातील 'ड्रायवर' हा शब्द सामान्यतः अवतरणांत दिला जात नाही. तसा तो दिल्यास त्यातून वेगळ अर्थ सूचित होतो, असे सूचित करावेसे वाटते.
त्यामुळे ही अवतरणे मूळ मुलाखतीतील*, की मुलाखतकाराच्या पदरची, की मुलाखत येथे (किंवा अन्यत्र) उद्धृत करणार्याची ती करामत आहे, या प्रश्नास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते.
याची निश्चिती करण्याकरिता मूळ मुलाखत वाचावी लागेल आणि या विधानाच्या आग्यापीछ्याचा धांडोळा घ्यावा लागेल. 'कृष्णाचे ड्रायविंग स्किल हे लिमिटेड होते' अशा अर्थाने हे विधान केलेले असल्यास त्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ कोणते दाखले दिले आहेत (किंवा नाहीत), हेही तपासावे लागेल.
(*'मूळ बोली मुलाखतीत अवतरणे कशी देता येतील' या पुढील शंकेची आगाऊ अपेक्षा करून असे उत्तर द्यावेसे वाटते, की बोली मुलाखतीत अर्थातच अवतरणे येऊ शकत नाहीत. परंतु अशी मुलाखत लेखीत उतरवताना, आवाजातील चढउतारावरून, तसेच मुलाखतीतील मागल्यापुढल्या संदर्भांवरून, त्या शब्दांचा नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे याचे निदान निश्चितच करता यावे, आणि त्यावरून तेथे अवतरणे देणे अपेक्षित किंवा योग्य आहे की नाही, याचा निर्णय करता यावा. धन्यवाद.)
- पंडित गागाभट्ट.
सदर विषयांवरील चर्चा मिपावर वर्जित आहे. मिपाच्या नव्या अधिकारिक धोरणातही त्याबाबत काही वाचनात आले नाही. त्यामुळे सदस्यत्त्व शाबूत ठेवण्यासाठी या विषयावर यापेक्षा जास्त काही लिहीत नाही.
>>अर्थ कृष्णाचे ड्रायविंग स्किल हे लिमिटेड होत>>>>
तर काय मधीच गाडी सोडून गीता बीता सांगत बसायचा.मागं १०-१२ अक्षौहिणी ट्रॉपीक जाम.
वर एकदा भीष्माच्या अंगावर चक्र घेवुन गेला होता, रथ सोडुन .त्यावेळी रथ नो पार्कींग मध्ये होता.
ब्राह्मण्य किंवा ब्राह्मणी वृत्तीचा जो अधिक्षेप आंबेडकर, फुले, तुकाराम किंवा नेमाडे यांनी केला आहे तो जन्माधिष्ठित वर्णश्रेष्ठता किंवा उच्चनीचतेच्या कल्पनांवर आधारित आहे. जर कृष्ण जन्माने डायवर असता आणि नेमाड्यांनी त्यावर टीका केली असती तर इथे शंका घेण्यास वाव होता. मात्र कृष्ण हा जन्माने (ग्रामपंचायतीचे दाखल्यानुसार) गवळी होता आणि नेमाड्यांनी 'सामान्य गवळी' अशी टीका त्यावर केली नसल्याने नेमाडे नेहमीप्रमाणे आरोपांतून बा-इज्जत मुक्त होत आहेत असे वाटते.
कोणत्याही समाजात कौशल्याची उतरंड असणारच आणि त्यामध्ये एखाद्याच्या क्षमतेनुसार - जन्मानुसार नव्हे - योग्य ते स्थान मिळते तेव्हा उतरंडीतील वरील घटकांनी खालच्या घटकांना त्यांची पायरी दाखवून देणे योग्यच व्हावे.
थोडक्यात, कृष्णाचा पगार किती, पण तो बोलला केवढे हे नेमाड्यांना सांगायचे असावे.
थोडक्यात, कृष्णाचा पगार किती, पण तो बोलला केवढे हे नेमाड्यांना सांगायचे असावे.
कृष्ण हा 'ड्रायवर' होता, सबब त्याचे वेतन जेमतेमच असणार, आणि एका विशिष्ट प्राप्तिमर्यादेखालील लोकांवर बोलण्यास बंदी असावी, या गृहीतकसंचाबद्दल आक्षेप आहे.
अशी बंधने ही लोकशाहीच्या आदर्शांविरुद्ध जातात. 'एक व्यक्ती, एक मत' (किंवा 'प्रत्येकास एकएक (तरी) असते') या तत्त्वाचे अशी गृहीतके उल्लंघन करतात.
'कृष्णाच्या काळी भारतवर्षात लोकशाही होती का' या प्रश्नास यामुळे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. (पर्यायाने, 'महाभारतकालीन ड्रायवरांची वेतनश्रेणी काय होती?' किंवा 'ड्रायवरांची वेतनमर्यादा किती असावी असे तत्कालीन धर्मशास्त्राचे मत होते? मनुस्मृतीत (तोपर्यंत अस्तित्वात आलेली असल्यास - किंवा नसल्यास त्या काळी बहुजनांस नाडण्याच्या एकमेव उद्देशाने जो कुठला दुसरा धर्मग्रंथ कार्यरत होता, त्या ग्रंथात) याबद्दल नेमके काय विचार मांडलेले आहेत?')
- पंडित गागाभट्ट.
मोठा उद्योगपती समजा त्याच्या कुटूंबासोबत फिरायला गेला अन तो स्व:ता गाडी चालवत असेल तर तो डायवर ठरतो का? तेच कृष्णाने केले. तुम्ही जर गाडी चालवत ऑफीसात गेले तर तुम्ही डायवर असता का?
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
विचारवंत
विचारजंत