Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कॉर्पोरेट / कॉलेज पार्ट्या, ग्रामस्थ आणि तारतम्य ...

छ
छोटा डॉन
Mon, 08/02/2010 - 13:55
🗣 101 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
23938 वाचन

💬 प्रतिसाद (101)
अ
अवलिया Mon, 08/02/2010 - 13:58 नवीन
चर्चा वाचण्यास उत्सुक. :)
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Mon, 08/02/2010 - 20:06 नवीन
आम्ही येईपर्यंत इथल्या ग्रामस्थांनी ही चर्चा-पार्टी संपवलेली दिसते. बाकी, थेऊर की येऊर ? थेऊरला अष्टविनायक असल्याने दारूची पार्टी करू नये, असे गणेशपुराणात लिहिले आहे. येऊरला तसे काही ही बंधन नाही. तसेही पश्चिम महाराष्ट्राची नैतिक अधोन्नती झालीच आहे, आणखी काय फरक पडणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ग
गणपा Wed, 08/04/2010 - 13:18 नवीन
नबाद १०० अभिनंदन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
प
परिकथेतील राजकुमार Mon, 08/02/2010 - 14:11 नवीन
नक्की नक्की सगळे परप्रांतीयच असणार ! साला पुणेरी माणुस कधी 'टाकुन' आला ते घरच्यांनापण कळत नाही ;) विनोदाचा भाग सोडुन देउ... पण बर्‍याचदा २/४ पेगनंतर आपल्याला बारमध्ये देखील आवाज चढवणारी लोक दिसायला लागतात. कदाचीत ह्या पार्टीत देखील २/४ पेग नंतर धांगडधिंगा वाढला असावा असे वाटते. ह्यावरच परवा आलेला एक समस आठवला. दारु पिणार्‍या भारतीय आणि परदेशी लोकांमध्ये फरक काय ? दोन पेग नंतर परदेशी व्यक्ती म्हणते "ओक्के, बाय. गुडनाईट !" भारतीय म्हणतो "आता कोणाची आ* **यची बोल !!"
  • Log in or register to post comments
A
Arun Powar Wed, 09/15/2010 - 17:18 नवीन
साला पुणेरी माणुस कधी 'टाकुन' आला ते घरच्यांनापण कळत नाही खूपच मजेशीर..!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
M
mamuvinod Mon, 08/02/2010 - 14:13 नवीन
स्वतःच्या घरात कराना मग पार्टी कशाला दुसर्याका त्रास मुद्दामुन 'परप्रातिंय' आणि 'मोठ्ठ्या संख्येने मुली' असा उल्लेख करणे प्रसारमाध्यमांना शोभत नाही. अहो या मुलिची थेर याची देही याची डोळा पाहिलीत हो, दारु सगळेच पितात पण ह्या पिल्या कि याना आपण काय करतोय याच तरी भान असत का ?????? काय तर म्हणे टेन्शन घालवायला याना पार्टी करावी लागते वाया गेलेले सगळे मामु
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 08/02/2010 - 14:29 नवीन
>>स्वतःच्या घरात कराना मग पार्टी कशाला दुसर्याका त्रास अहो मी कॉलेजच्या किंवा कॉर्पोरेट पार्ट्या म्हणतो आहे. त्या 'स्वतःच्या घरात' कशा करता येतील ? किमान ३००-४०० जण येतात, घरी कशी करता येईल ? >>अहो या मुलिची थेर याची देही याची डोळा पाहिलीत हो, दारु सगळेच पितात पण ह्या पिल्या कि याना आपण काय करतोय याच तरी भान असत का ?????? तुमची बहुतेक "कॉलेज / कॉर्पोरेट पार्ट्या" आणि "नवश्रीमंताम्च्या पेड उच्चभ्रु पार्ट्या" ह्यात गल्लत होत आहे. त्यामुळे मी ह्यापेक्षा जास्त प्रतिक्रिया देउ इच्छित नाही. >>काय तर म्हणे टेन्शन घालवायला याना पार्टी करावी लागते मुद्दा गैरलागु, अशा प्रकारच्या कुठल्याही पार्टीविषयी मी चकार शब्दही काढला नाही. सध्या आपण फक्त कॉलेज / कॉर्पोरेट पार्ट्यांचे बोलुयात, ओके ? >>वाया गेलेले सगळे नक्की कोण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mamuvinod
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 08/02/2010 - 14:40 नवीन
अहो या मुलिची थेर याची देही याची डोळा पाहिलीत हो, दारु सगळेच पितात पण ह्या पिल्या कि याना आपण काय करतोय याच तरी भान असत का ??????
मुलांची थेरं चालतात का? म्हणजे, मुलींनी केली तरच ती निषिद्ध आहेत का? बाकी अशा पार्ट्या खाजगी घरातून, बंगल्यातून वगैरे चालत असतील आणि कोणालाही त्रास होत नसेल, आणि अवैध पदार्थांचे सेवन होत नसेल तर काय हरकत आहे? शिवाय, अशा खाजगी पार्ट्यांना दारूचा परवाना लागतो की नाही ते माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mamuvinod
छ
छोटा डॉन Mon, 08/02/2010 - 14:49 नवीन
बिकांशी सहमत ... बाकी "त्रास" ह्या शब्दाबाबत माझाच जरा गोंधळ आहे. नक्की कसला हो त्रास ? पार्टीच्या जागी बिस्लेरी, सिगारेट्सची पाकिटे, अन्य काही चिल्लर मटेरियल अव्वाच्या सव्वा किमतीत विकताना होणारा त्रास का ? का आपल्या गावात आलेले हे हेल्पलेस लोक आहेत म्हणुन त्याचा गैरफायदा घेऊन त्यांना टोमणे मारताना, अचकट विचकट शेरा मारताना, पोरींकडे पाहुन वेडेवाकडे हातवारे करताना होणारा त्रास का ? का त्यांच्या गाड्यांची ' पार्किंग कॉस्ट' म्हणुन फुक्कटचा पैसा लाटताना होणारा त्रास ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Mon, 08/02/2010 - 14:54 नवीन
४०० % आवड्लं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
मिसळभोक्ता Mon, 08/02/2010 - 20:00 नवीन
मुलांची थेरं चालतात का? म्हणजे, मुलींनी केली तरच ती निषिद्ध आहेत का? निषिद्ध ? छे ! पण थेरं करायच्या वेळात, कुकर लावणे शिकता आले असते, असे कुठे तरी वाटून गेले :-) (साला आपण सुजय कुलकर्णीचा फ्यान झालो कालपासून) बाकी, ग्रामस्थांनी ह्या पार्ट्यांकडे इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटी म्हणून बघावे. इव्हेंट म्यानेजमेंट ग्रामस्थांकडेच द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
सोम्यागोम्या Wed, 08/04/2010 - 06:47 नवीन
बिका, दारू पिण्यास परवान्याची आवश्यकता असते हेच पिणा-यांना माहित नसते. कॉलेजचे पोरं पोरी ऑफिसच्या पार्ट्यांत पिणारे यांना दारू पिणं एवढ सहज वाटतं की त्यासाठीच्या कायदेशीर बाबी लागतात याची माहितीच नाही. विनापरवाना दारू पिणे कुठेही आणि केव्हाही गुन्हाच ठरतो. त्यामुळे केलेली कारवाई योग्य आहे. बाकीच्यांनी काय बिघडलं वगैरे म्हणताना आपण एका बेकायदेशीर गोष्टीला प्रोत्साहन देतो आहोत याचे भान ठेवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
अ
अप्पा जोगळेकर Tue, 08/03/2010 - 05:13 नवीन
अहो या मुलिची थेर याची देही याची डोळा पाहिलीत हो, दारु सगळेच पितात पण ह्या पिल्या कि याना आपण काय करतोय याच तरी भान असत का ?????? त्यांना काय करायचं ते करु दे की ? आपुण मजा घ्यावी. आणि नैतिकता आड येत असेल तर गुमान तिथून कल्टी मारावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mamuvinod
क
कार्लोस Mon, 08/02/2010 - 14:30 नवीन
मि तर अनन्दित झालो
  • Log in or register to post comments
ब
बद्दु Tue, 08/03/2010 - 08:58 नवीन
तुमचा पाथिबा पाहुन्/वाचुन डोले पानावले... उगाच गुळांबा/साखरांबा ची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कार्लोस
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 08/02/2010 - 14:48 नवीन
१. आजकाल शहरातील गजबटापासुन जरा लांब व शांत म्हणुन कंपन्या किंवा कॉलेजेस मुद्दामुन अशा लांबच्या खेडेगावातील ठिकाणाची निवड करतात. पण आजकाल त्या 'सिंहगडाखाली पकडलेल्या रेव्ह पार्टी' नंतर अनेक गावातील अनेक ग्रामस्थांना उगाच स्वतःच पोलिसगिरी करायची सवय वाढत आहे. गाव ग्रामस्थांचे आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने गावाने ठरवले कि त्यांच्या गावात असली पार्टी होऊ नये तर होऊ दिली जाऊ नये. त्यावर कोणी काही म्हणो. बातमी पाहता येऊर येथील बंगल्यात ३००-४०० विद्यार्थी पकडले जातात याचे वाईट वाटते. एखाद्या गावात ३००-४०० लोक एकदम आले तर गोंगाट वाढत नाही का? आणि गावातल्या लोकांनी तिथे जाऊन दगड मारले नाहीयेत. रितसर पोलिस कारवाई करविली आहे. २. अशा पार्ट्या म्हणजे दारु वगैरे आलीच. अर्थात कोण ह्यात टुल्ल होऊन झिंगत असेल असे वाटत नाही, बरोबर कलिग्स असतात, कॉलेजचे मित्र आणि प्राध्यापक असतात, कॉपोरेट असेल तर वरिष्ठ अधिकारी असतात मग असे 'झिंगेल' कोण ? ओ मालक आमच्या कंपनीच्या पार्टीत फुकट मिळते म्हणून पिऊन आऊट होणारे अनेक पाहीले आहेत. आणि कार्पोरेट पार्ट्यात काय फक्त वरिष्ठ अधिकारीच असतात काय? ३. मुळात अशा पार्ट्या ठेवणे हाच गुन्हा आहे का ? तसे असेल तर सर्व गावकरी मिळुन आपल्या गावातील जागा न देण्याचा ठराव का करत नाहीत ? बातमीत वाचा, विनापरवाना पार्टीवर म्हटले आहे. दारू सर्व्ह करण्यासाठी परवाना लागतो. ४. अशातल्या बहुतेक तक्रारी ह्या एक तर राजकिय / सामाजिक / आर्थिक स्वार्थामधुन होतात किंवा जळजळीमधुन होतात असे आम्हाला ठामपणे वाटते. इनफॅक्ट मी तर असे म्हणतो की कित्येकवेळा अशा पार्टीसाठी आलेल्या निमंत्रितांना ह्या गावातल्यातल्याच 'टवाळ' टोळक्याकडुन त्रास होतो पण उगाच बोभाटा नको म्हणुन शक्यतो हे आलेले आमंत्रित असा त्रास सहन करत असतात. याच्यातल्या पहिल्या वाक्याशी सहमत. ५. ह्या पार्टीत आलेल्यांनी झिंगुन रात्री आख्खे गाव तर डोक्यावर घेतले नाही ना ? का चौकात जमुन उगाच उतमात घातला ? ३००-४०० लोक झिंगून एखाद्या मैदानात जरी उतमात घालत असतील तर बाहेरच्यांना त्रास होतो कि नाही? होतोच. बाकी पार्टीच्या लाऊडस्पीकरबद्दल बातमीत काही दिसत नाहीये. इथे मला पार्टीचे १००% समर्थन करायचे नाही पण उगाच उठसुठ तक्रारी करुन दुसर्‍याच्या सेलेब्रेशनमध्ये धोंडा फेकण्यार्‍या प्रवृत्तीचा निषेध करायचा आहे. मग गणपतीउत्सव हे देखील सेलिब्रेशनच असते विशिष्ठ वर्गाचे. मग त्यातल्या हिडीसपणाला नावे ठेवता ना? मग यातल्या हिडीसपणाला कसं कुरवाळता. ह्या लोकांनी पार्ट्या करुच नये का ? करा ना आपापल्या कॉलेजांमधे किंवा कंपन्यांच्या लॉनवर वगैरे. झालंच तर एखादा कोरीन्थियन सारखा भिंतबंद क्लब घ्या भाड्यानं आणि करा. म्हणजे आजूबाजूच्याना त्रास नको. मुद्दामुन 'परप्रातिंय' आणि 'मोठ्ठ्या संख्येने मुली' असा उल्लेख करणे प्रसारमाध्यमांना शोभत नाही. तुम्हाला म्हणून सांगतो अजूनही सिंबायोसिसच्या संस्थांमधील विद्यार्थ्यांमधे किती स्थानिक किती परप्रांतीय असतात ते बघा. आणि परप्रांतीय आणि मुली हाच गावकर्‍यांच्या उद्रेकाचं कारण असेल तर? किंबहुना असतंच. शेवटी सांस्कृतिक फरक हाच अशा उद्रेकांना कारणीभूत असतो. ह्या पार्ट्या जर कॉर्पोरेट किंवा कॉलेजेसच्या असतील तर त्यात 'प्रांतिक' मतभेद कधीच नसतो, आतल्या आत जे काही प्रांतिय राजकारण चालत असेल तो भाग वेगळा पण हे असे उल्लेख हे तद्दन मसालेदार धंदेवाईक वृत्ती आहे असे आम्हाला वाटते. असहमत. स्थानिक परप्रांतीय हा भेद असतोच. शक्यतो स्थानिक मुली नंतर घरी जायचं असतं म्हणून पीत नाहीत.
  • Log in or register to post comments
स
संजा Mon, 08/02/2010 - 15:02 नवीन
अगदी मनातल. + १०० च्यायच एकतर दारु प्यायची न लोकांना त्रास द्यायचा आणि लोकांनी तक्रारही करायची नाही ? हे तर शेण खायच आणि तोंडाला लागलेल दाखवणार्‍याची तक्रार करण्यासारख आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
P
Pain Tue, 08/03/2010 - 07:33 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मन Tue, 08/03/2010 - 14:58 नवीन
शिवाय गावातील रस्ते लांब रुंद नस्तात. गावात असते ती गल्ली किंवा अळी.(सदर घटनेतील ठिकाणाची नक्की माहिती नाहि अजुन.) कल्पना करा, तुमच्या स्वतःच्या घरासमोरचा पाच सात फुटी रस्ता ओलांडताच एक बंगला आहे(गावात उंच इमारती आणि फ्लॅट नस्तात फारशे, "घरं"(किंवा वाडा/बंगले) असतात.) , तिथं नाचं गाणी सुरु आहेत.(ती नसली तरी पिउन टल्ली झालेले तरुण आणि तरुणी आहेतच.) बर्‍यापैकी गोंगाट आहे.(भले ती माणसं तुम्चं दार बडवुन तुमच्या छाताडावर बसत नाहियेत.पण हेड्याक होतोच ना?) आवडेल हे दृश्य तुम्हाला? आवडत असेल तर खुश्शाल करा बुवा पार्टी अशी "बंगल्यात" जाउन.आणि आपापल्या घरासमोरच्या जागा जाउन स्वतः सुचवा ह्या सत्शिल पब्लिक ला... मद्य प्राशनाला दमड्या जमवता ना? मग तेच तुम्हला अजुन जरा रक्कम जमवुन एखाद्या "रिसोर्ट" मध्ये जाउन, कायदेशीर रित्या,दुसर्‍याला त्रास होणार नाही असं नाही करता येत? बाकी सिंबी चा विद्यार्थी म्हटल्यावर डोळ्यासमोर येणारी प्रतिमा ही माध्यमांपेक्षा खूपच मोठ्या परमाणावर स्वतः विद्यार्थ्यांनी "स्वपरक्रमाने" पसरवली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मदनबाण Mon, 08/02/2010 - 14:48 नवीन
मुद्दामुन 'परप्रातिंय' आणि 'मोठ्ठ्या संख्येने मुली' असा उल्लेख करणे प्रसारमाध्यमांना शोभत नाही. हीच प्रसारमाध्यमं फिर राज ठाकरे ने उगला जहर असं म्हणुन ब्रेकिंग न्युज सुद्धा देतात डॉनराव... ;) आता मोठ्या संख्येने परप्रांतिय महाराष्ट्रात आहेत हे नाकाराता येणे आजच्या घडीला शक्य आहे ? बाकी चालु द्या... ;) (ओल्या पार्ट्यां पासुन नेहमीच लांब राहणारा)
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Mon, 08/02/2010 - 14:49 नवीन
.... आपल्या लोकांना काय वाचण्यात जास्त इंटरेस्ट असतो ते पत्रकार जातीला व्यवस्थित महिती असते... त्यात त्यांना नतद्र्ष्ट गावकर्‍याकडून मिळणारी माहिती . .... आणि आपल्या लोकांचा असल्या बातम्या वाचण्यातला रस या सर्वाचे अतिरंजित द्रूश्य म्हणजे आपल्यापर्यंत येणारी बातमी. ... कॉर्पोरेट पार्टी असु दे,फ्रेंडशिप डे असु दे ...किंवा अन्य कोणताही डे असु दे .....तो साजरा करायचा कि नाही....कसा करायचा ...दारू प्यायची कि नाही हा ज्याचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.. उगाचच दारू प्यायली नाही म्हणजे दारू न पिणारेच संस्क्रूती टिकवणारे असतात किंवा त्याने संस्क्रूती जपली जाते हा एक अतिशय फोल्..तथ्य नसलेला विचार आहे... .....गावकरी : यांना काय त्रास होणार आहे?वास्तविक हे सो कॉल्ड संस्क्रुतीऱक्षक गावकरी स्वतः रोज देशी /थर्रा लाऊन गाव भलेही डोक्यावर घेत असेनात पण, दुसरे करताहेत ना मग यांचं डोकं फिरतं. मला त्या ग्रूप च्या वागण्याचं समर्थन नक्किच कराय्च नाहीये..कदाचित त्यांच्या कडुन काही प्रमाणात उल्लंघन झालेही असेल...जर त्यांनी तारतम्य सोडुन वर्तन केले असेल तर त्याची दखल घ्यायलाच लागेल. पण सहसा गावगुंडाचा बेसिक उद्देश "विघ्नसंतोषी पणा" हाच असतो. * त्या ३०० लोकांमध्ये बरेच जण दारू न पिणारे असु शकतात... आप्ल्या कलिग्ज बरोबर मित्र मैत्रिणींबरोबर काही वेळ मजेत घालवाय्ला आलेले हि असु शकतात्....पण आपल्याकडे ही मानसिकता तयार व्हायला युगं जावी लागतील. *परप्रांतियांचा सहभाग : हे मात्र्..उगाचच सध्या चर्चेत असलेल्या वादांना नवे खाद्य पुरवाय्च्या उद्देशाने उग्गाच्चच अधोरेलिखित केले गेले असावे.. ..असो.....
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Mon, 08/02/2010 - 17:30 नवीन
>>.....गावकरी : यांना काय त्रास होणार आहे?वास्तविक हे सो कॉल्ड संस्क्रुतीऱक्षक गावकरी स्वतः रोज देशी /थर्रा लाऊन गाव भलेही डोक्यावर घेत असेनात पण, दुसरे करताहेत ना मग यांचं डोकं फिरतं. आयला तुम्च्या शेजारच्या रिकाम्या घरात रोज नविन नविन लोक येउन जर धिंगाना घालाया लागले त चालल का ताई? आनि गाववाले देशि / ठर्रा लावतात वो पन 'तुम्च्या' घरा फुड येउन 'तमाशा' नाय करत. तुमि शहरात रहाता म्हनुन काय लै शाने झाले का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Tue, 08/03/2010 - 06:22 नवीन
भाऊ, शहरात राहुन शानपना येण्यच्या गोष्टी बाजुला ठेवूया,...पण खरंच अनेक गावात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत किंवा इतर काही समाजिक्/धार्मिक कार्यक्रमांमध्ये बर्‍याच प्रमाणात हे होतं........प्रत्येकाच्या अनुभवाचा भाग आहे हा... आणखी एक गोष्ट..... वाईट प्रवृत्ती ही वाईटच असते.....त्यामध्ये शहर - गाव्,ठर्रा का व्हिस्की हा भाग येतच नाही... ज्यांना धिंगाणा घालायचा आहे ते कुठेही घालू शकतात... मी मागे म्हटलेच आहे....जर त्यांच्याकडुन ग्रामस्थांना त्रास झाला असेल तर त्याची दखल घ्यायलाच हवी...या पार्टीमध्ये झालेही असेल तसे.... पण मी मांडलेला मुद्दा हा गावात राहुनच अनुभवलेला आहे... पाहिलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे
स
स्वछंदी-पाखरु Tue, 08/03/2010 - 14:20 नवीन
हम्म्म्म,....... याले म्हणतात नाद खुळा... गणपती पुळा.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
न
नावातकायआहे Tue, 08/03/2010 - 18:41 नवीन
जाई ताई, दारु पिने हि काय लै भारि गोष्ट नाय ह्यात काय वाद नाय. >>पण खरंच अनेक गावात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत शहरातल्या गनपति मिरवनुकित कधि गेलात का? गनपतिच्या ट्रक मंदि माग काय चालत ते बगितलत का?? >>किंवा इतर काही समाजिक्/धार्मिक कार्यक्रमांमध्ये बर्‍याच प्रमाणात हे होतं सवाईला स्टॉल्च्या माग संगित ऐकायला आलेले 'शहरि रसिक' काय काय करतात म्हैतिय का? >>त्यात त्यांना नतद्र्ष्ट गावकर्‍याकडून मिळणारी माहिती ह्या वाक्यातच तुम्हाला काय म्हनायच ते कळतय गाववाल्यांबद्दल तुम्च्या मनात जि आढि हाय ना ति तुमच्यकडच ठेवा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
प
परिकथेतील राजकुमार Mon, 08/02/2010 - 14:51 नवीन
डॉन्रावांनीच आता पुढाकार घेउन गावकर्‍यांना इनो वाटावे असा ठराव मी मांडत आहे.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 08/02/2010 - 14:55 नवीन
सहमत आहे. आणि थोडं स्वतःही घ्यावं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
प्रसन्न केसकर Mon, 08/02/2010 - 14:55 नवीन
जस्ट टु कीप रेकॉर्डस स्ट्रेटः १) पार्टी संस्थेची नव्हती. विद्यार्थ्यांनी स्वतःच पार्टी आयोजित केली होती. असे कळते की काहीजणांनी होस्टेलवर रात्री उशीरा परतण्यासाठी परवानगी काढली होती पण पार्टी आहे असे सांगीतले नव्हते. पार्टी एका खाजगी व्यक्तीच्या फार्महाऊसमधे होती. तेथे तब्बल ४०० मुले-मुली जमली होती. बीयर, दारु क्रेट भरभरुन आणली होती म्हणे. अ‍ॅम्प्लीफायरवर संगीत तर होतेच. कारवाई मध्यरात्री नंतर झाली तेव्हा संस्थेला कळले म्हणे. २) तिथे सुरु असलेल्या गोंगाट व आवाजाबाबत स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्यामुळे पोलिस तेथे गेले. त्यानंतर पार्टी करण्यासाठी आवश्यक ते परवाने घेतलेले नाहीत, कोणतीही शासकीय परवानगी घेतलेली नाही असे कळल्यामुळे त्यांनी पार्टीत असलेल्यांना ताब्यात घेतले असे कळते. त्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली व त्यानंतर विनापरवाना मद्यप्राशन करणे, प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करणे याबाबत मुंबई पोलिस कायदा, प्रोहिबिशन अ‍ॅक्ट या कायद्यांनुसार खटला भरण्यात आला. ३) याबाबत कायदेशीर तरतुदी पुरेश्या स्पष्ट आहेत. कोणतीही ओली पार्टी करताना पोलिस, एक्साईज डिपार्टमेंट इत्यादी खात्यांच्या परवानग्या घेणे अनिवार्य आहे. परवाना नसताना दारुचे सेवन करणे हा देखील गुन्हा आहे. दारुच्या अंमलाखाली वा अन्यथा गोंगाट-गडबड्-गोंधळ करणे, विनाकारण शांतताभंग करणे हा देखील गुन्हा आहे. ध्वनिक्षेपक यंत्रणेच्या वापरासाठी देखील पोलिसांची परवानगी अनिवार्य आहे. जरी अशी परवानगी असली तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे रात्री १० ते सकाळी ६ या वेळात वर्षातील शासनाने स्पष्ट केलेले १५ दिवस वगळता अन्य दिवशी ध्वनिक्षेपक वापरण्यावर बंदी आहे. बंदी नियम शिथिल असेल त्या पंधरा दिवसांमधेही ध्वनिक्षेपकांचा वापर रात्री १२ नंतर करता येत नाही. ४) यासंदर्भात ग्रामस्थांना दोष देण्यात मला अर्थ दिसत नाही. अश्या पार्ट्यांचा त्रास ग्रामस्थांना बर्‍याचदा होत असतो. शहरामधे रहाणार्‍यांना जर त्रास होतो तर ग्रामस्थांनाच तो होणार नाही असे नाही. सर्वच पार्ट्यांबाबत अश्या तक्रारी होतात, कारवाई होते असेही नाही. जेव्हा त्रास असह्य होतो तेव्हा ग्रामस्थ तक्रारी करतात, क्वच्चित कायदाही हातात घेतात हे नाकारता येत नाही. कायदा हातात घेणे हे सर्वथा अस्मर्थनीय असले तरीही असे उद्रेक पार्टी करणार्‍यांनीच संयमाने वागले तर होणार नाहीत हे देखील खरे आहे.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 08/02/2010 - 14:59 नवीन
मस्त. आता जाणकार (खरी बातमी व त्या बद्दलच्या कायद्याचे जाणकार ह्याअर्थी) मैदानात उतरु लागल्याने चर्चा वाचायला मजा येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
म
मदनबाण Mon, 08/02/2010 - 15:01 नवीन
सहमत... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
छ
छोटा डॉन Mon, 08/02/2010 - 15:22 नवीन
प्रसनदाच्या माहितीपुर्ण आणि सत्य सांगणार्‍या प्रतिसादानंतर आमचे बरेच आक्षेप मागे घेत आहोत ... पार्टी ही त्या संस्थने 'आयोजीत केली नव्हती' हे जर सत्य असेल तर मग त्या ओघाने आम्ही मांडलेले सगळे मुद्दे बाद ठरत आहेत. प्रायव्हेट किंवा नुसत्या पैशाच्या जोरावर केलेल्या स्वैराचाराचे कसलेही समर्थन करण्याचा आमचा हेतु किंवा इच्छा नाही. वरील प्रतिसादात अनेकांनी मांडलेल्या अनेक मुद्द्यांशी आता "सहमती" दर्शवतो ... आम्ही केवळ एका मुद्द्यासाठी भांडत होतो व तो म्हणजे "जर आयोजक एखादी संस्था किंवा कॉर्पोरेट कंपनी असेल " तर इतके सगळे नियम धायावर बसवले जात नाहीत ( बहुतेक केसेसमध्ये, १००% असे नाही ) व म्हणुनच प्रामथिक माहितीत ( संदर्भ : मटा ) एक नावाजलेली शिक्षण संस्था त्याची आयोजक असल्याच्या उल्लेखावरुन आम्ही सदर काथ्याकुट मांडला. असो, प्रसनदाच्या प्रतिसादाशी सहमत आहे. :) स्वैराचाराचे अजिबात समर्थन नाही. मात्र कायद्याची आणि सामाजिक बंधने ह्यांची योग्य नोंद घेऊन केल्या जात असणार्‍या अनेक कॉर्पोरेट / कॉलेज पार्ट्यांना आमचा अजुनही पाठिंबा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
आ
आमोद शिंदे Tue, 08/03/2010 - 01:36 नवीन
>>पार्टी एका खाजगी व्यक्तीच्या फार्महाऊसमधे होती. खाजगी जागेत प्यायला कधी पासून परमिटे लागायला लागली? दर शनिवारी घरी बसून दोन पेग घेताना प्रत्येकजण परमिट आणतो की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
प
प्रसन्न केसकर Tue, 08/03/2010 - 10:08 नवीन
खाजगी जागेत प्यायला कधी पासून परमिटे लागायला लागली? दर शनिवारी घरी बसून दोन पेग घेताना प्रत्येकजण परमिट आणतो की काय? यातला पहिला भाग संपुर्णपणे चुकीच्या माहितीवर आधारीत आहे. मद्याची खरेदी किंवा कोणत्याही प्रकारे विक्री करणे, मद्य बाळगणे, मद्य सेवन करणे या प्रत्येक गोष्टीसाठी परवाना/ लायसेन्स घेणे अनिवार्य आहे. हे निर्बंध आजचे नाहीत तर अगदी १९४९ पासुनचे आहेत. याबाबतची माहिती हवीच असेल तर THE BOMBAY PROHIBITION ACT, 1949 किंवा Bombay Foreign Liquor Rules, 1953 पहा. कायद्याची अंमलबजाबणी कितपत होते हा वादाचा मुद्दा नक्कीच आहे. ती केली किंवा नाही केली तरी टीका होतेच. पण मुळात कायदा आहे म्हणल्यावर एकतर त्याचे पालन झाले पाहिजे किंवा तो चुकीचा असेल तर बदलला पाहिजे. कायद्याचे अधिराज्य यालाच म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे
आ
आमोद शिंदे Tue, 08/03/2010 - 15:03 नवीन
मद्य खरेदीला\विक्रीला परमीट लागते. ते माहित आहे. घरी बसून प्यायला लागत नाही. खरेदीचे\सेवनाचे परमीट असलेली व्यक्ती कुठल्याही खाजगी जागेत मद्यसेवन करु शकते. थोडक्यात परमीट हे व्यक्तिचे असते. जागेचे* नाही. *येथे खाजगी जागा अपेक्षीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
प
प्रसन्न केसकर Tue, 08/03/2010 - 15:44 नवीन
वाचुन पहा जरा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे
आ
आमोद शिंदे Tue, 08/03/2010 - 19:15 नवीन
पिण्यासाठी घरच्या जागेचे पिण्यासाठी परमीट काढावे लागते असे मला वाटत नाही. खरेदी करण्याचे परमीट असले म्हणजे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
इ
इन्द्र्राज पवार Mon, 08/02/2010 - 15:34 नवीन
अशा धाडीतून केवळ पोलिस हात धुवून घेत असतात. टाईम्सच्या त्या बातमीचा पुढील मागोवा संबंधित पत्रकार कधीच घेणार नाही कारण त्याचे लक्ष आता दुसर्‍याच असल्या "सनसनाटी" कॉर्नरकडे; तसेच म.टा. काय किंवा लोकसत्ता, सकाळ काय एकदोन दिवसात स्फुटाखाली दोनचार पॅर्‍याचे कानोसा अशा सदरात "काय होणार या पिढीचे ?" ठरलेले अश्रू ढाळणार आणि पुढील फ्रेंडशिप डे पर्यंत सारे काही शांत शांत ! ग्लोबलायझेशनचे फायदेतोटे काही असू देत पण उच्च शिक्षणाच्या नावाखाली सध्याचे विद्यार्थी (दोन्ही गट) मोकळेपणाने वावरत असतात. बातमीत फ्रेंडशिपचा उल्लेख केला आहे पण जर तुम्ही शनिवार-रविवार महाबळेश्वर, पन्हाळा अशा ठिकाणी याच गटातील 'युवा' ची गर्दी पाहिली की जाणाल, अशा रितीच्या पार्ट्या यांना अजिबात नवीन नाहीत. पालकांना बोलावून पोलिस काय दम देणार आहेत? आणि पालक तरी काय यात सामील असलेल्या आपल्या मुलीला "हो घराबाहेर" म्हणतील? फक्त "गांधीबाबा" च्या हिरव्या/लाल नोटांच्या देवाणघेवाणीसाठी हा सारा मामला. श्री.डॉन यांनी केलेले निरिक्षण अचूक आहे ("कित्येकवेळा अशा पार्टीसाठी आलेल्या निमंत्रितांना ह्या गावातल्यातल्याच 'टवाळ' टोळक्याकडुन त्रास होतो"). बातमीत ज्या थेऊरच्या बंगल्याचा उल्लेख केला आहे तो पाहता "फ्रेंडशिप डे" संपूर्ण राज्यात फक्त याच बंगल्यात झाला असे मानायचे का? अशा पार्ट्या शेकडो ठिकाणी होत असतात पण आयोजक इतके हुशार असतात की अगोदरच त्या त्या गावातील "दादां"ची अन्यत्र सोय करून देतात व आपली पार्टी सहजगत्या यशस्वी करतात. थेऊरमध्ये ते झाले नाही इतकाच बोध. "दारूच्या नशेत धुंद होऊन बेहोश धिंगाणा घालत होते." पटत नाही. बेहोश होण्यासाठी ४००-५०० मुलामुलींना दारूच लागते असे नाही. मोकळे वातावरण, झिंग आणणारी ऑन म्युझिक सीस्टिम, घरापासून दूर दूर मित्रांसमवेत, चित्रपटात आमीर, सलमान, शाहरूख, काजोल, माधुरी, करीना करीत असलेल्या अशा पद्धतीच्या पार्ट्या यांची आठवण, शिवाय यामध्ये खर्च करणारे तीनचार बडे बाप के बेटे, त्यामुळे खास मध्यमवर्गीय "कॉमन कॉन्ट्रिब्युशन"ची दगदग नाही हा विचार आदींचे मिश्रणही नशा आणण्यास पुरेसे आहे. (याला दुजोरा म्हणजे उद्या त्या वार्ताहराने या ४००+ मुलामुलींची पोलिसांनी घेतलेली अधिकृत मेडिकल टेस्ट मिळवावी. निम्म्यापेक्षा जास्त मुले "निगेटीव्ह" असतील. शिवाय ड्रग घेतलेले कुणी नव्हते हे पोलिसांनीच मान्य केले आहे.) कॉलेजच्या अंतीम वर्षात असताना मी स्वतः असल्या पार्टीत सामील झालो होतो. किमान १०० तरी होतो (३०-३५ मुलीसह). पार्टी पन्हाळ्यावर होती. सायंकाळी ५ ला तिथे जमा झालो. ८ वाजेपर्यंत जेवण तयार होते, त्यानंतर जसे सर्वसाधारणपणे होत असते तसे हास्य, विनोद, कवितावाचन, गाणी म्हणणे, नृत्य करणे, ज्यांना बीअर घ्यायची होती ते बाजूला जाऊन घेत होते, पण जे घेणार नव्हते त्यांना आगाऊपणा करून घेण्यास कुणी भाग पाडत नव्हते. बरे हे सर्व गडाच्या तीन दरवाजा या भागात "ओपन टू स्काय". मध्यंतरी एक पोलिस व्हॅनदेखील येऊन "जास्त आरडाओरडा करू नका" अशी मैत्रीपूर्ण "ताकीद" देऊन गेलीसुद्धा. जेवणासाठी लागणार्‍या सार्‍या वस्तुंची खरेदी खुद्द पन्हाळ्यातच केली असल्याने (सर्वच करतात) बाजारपेठेतूनदेखील काही विरोध होण्याचे कारण नव्हते. शिवाय शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस अशा पद्धतीच्या गेट टुगेदरची ग्रामस्थांना माहिती आणि सवय असतेच. पार्टी ११.०० वाजता संपली आणि संयोजक लीडर्सनी (त्यात मी देखील होतो) सर्व काही व्यवस्थित आहे हे पाहुनच पन्हाळा सोडला आणि प्रत्येकाला अगदी घराच्या दारापर्यन्त सोडले. अशाच रितीने या पार्ट्यांचे नियोजन असते. एमबीएची मुले मोकळापणा घेतात म्हणून त्यांना परप्रांतीय हे लेबल लावायचे ही सोयिस्कर पत्रकारिता. बातमी तर अशी रंगवली आहे की, ती मुले म्हणजे "आर्य मदिरा मंडळा"चे लाईफ मेंबर.
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर Mon, 08/02/2010 - 16:30 नवीन
श्री पवारसाहेब! एव्हढा `सखोल' अभ्यास केल्याबद्दल मुजराच केला पाहिजे तुम्हाला! अशा धाडीतून केवळ पोलिस हात धुवून घेत असतात. असे होत असणे नक्कीच शक्य आहे. पण शक्यता ही सार्वत्रिक असतेच असे नाही ना? कदाचित एखाद्या धाडीत हात धुऊन घेतलेले नसतील पण! की हे अशक्य आहे. टाईम्सच्या त्या बातमीचा पुढील मागोवा संबंधित पत्रकार कधीच घेणार नाही कारण त्याचे लक्ष आता दुसर्‍याच असल्या "सनसनाटी" कॉर्नरकडे हम्म्म! कुठला पेपर वाचता म्हणे तुम्ही? आमचा साप्ताहिक बोंबाबोंक की काय? बहुतेक सर्व प्रतिष्ठित वृत्तपत्रात त्याला जिव्हाळ्याचे वाटतात त्या विषयांचा अगदी खोलात जाऊन पाठपुरावा करतात. जेसिका लाल प्रकरण, आरुषी प्रकरण, सत्येंद्र दुबे प्रकरण, तेलगी केस, अगदी २६/११ केस सगळीकडे ते झालेय. अनेक प्रकरणात तर वृत्तपत्रांच्या बातम्याच लिटीगेशन म्हणुन वापरल्यात. ज्या टाईम्सचं तुम्ही नांव घेतलय ना, त्या टाईम्समधेच अन या महाराष्ट्रातच शबनम मीनावाला, पी साईनाथ, अंबरिष मिश्र यांची बातमीदारी गाजलीये. पालकांना बोलावून पोलिस काय दम देणार आहेत? मी तर अश्या अनेक प्रसंगी पालकांनीच पोलिसांना दम दिलेलं पाहिलय. "दारूच्या नशेत धुंद होऊन बेहोश धिंगाणा घालत होते." पटत नाही.... याला दुजोरा म्हणजे उद्या त्या वार्ताहराने या ४००+ मुलामुलींची पोलिसांनी घेतलेली अधिकृत मेडिकल टेस्ट मिळवावी. निम्म्यापेक्षा जास्त मुले "निगेटीव्ह" असतील. शिवाय ड्रग घेतलेले कुणी नव्हते हे पोलिसांनीच मान्य केले आहे. ड्रगचा मुद्दा कुठुन आला बुवा? अन जर पोलिसांच्या धाडींवर विश्वास नसेल तर टेस्टचे निकाल कसे विश्वासार्ह ठरतात हो? कॉलेजच्या अंतीम वर्षात असताना मी स्वतः असल्या पार्टीत सामील झालो होतो. किमान १०० तरी होतो (३०-३५ मुलीसह). पार्टी पन्हाळ्यावर होती. सायंकाळी ५ ला तिथे जमा झालो. ८ वाजेपर्यंत जेवण तयार होते, त्यानंतर जसे सर्वसाधारणपणे होत असते तसे हास्य, विनोद, कवितावाचन, गाणी म्हणणे, नृत्य करणे, ज्यांना बीअर घ्यायची होती ते बाजूला जाऊन घेत होते, पण जे घेणार नव्हते त्यांना आगाऊपणा करून घेण्यास कुणी भाग पाडत नव्हते. बरे हे सर्व गडाच्या तीन दरवाजा या भागात "ओपन टू स्काय". मध्यंतरी एक पोलिस व्हॅनदेखील येऊन "जास्त आरडाओरडा करू नका" अशी मैत्रीपूर्ण "ताकीद" देऊन गेलीसुद्धा. जेवणासाठी लागणार्‍या सार्‍या वस्तुंची खरेदी खुद्द पन्हाळ्यातच केली असल्याने (सर्वच करतात) बाजारपेठेतूनदेखील काही विरोध होण्याचे कारण नव्हते. शिवाय शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस अशा पद्धतीच्या गेट टुगेदरची ग्रामस्थांना माहिती आणि सवय असतेच. पार्टी ११.०० वाजता संपली आणि संयोजक लीडर्सनी (त्यात मी देखील होतो) सर्व काही व्यवस्थित आहे हे पाहुनच पन्हाळा सोडला आणि प्रत्येकाला अगदी घराच्या दारापर्यन्त सोडले. बीयर घेणारे बाजुला जाऊन घेत होते, ११ वाजता पार्टी संपवली, संयोजकांनी प्रत्येकाला घराच्या दारात नेऊन सोडले यातच बरेच काही आले. असे करणारे व्यावसायिक संयोजक असतील तर पत्ते कळवा कृपया. पोलिस पण त्यांची जाहिरात करतील नक्की, अगदी बर्गलर्स अलार्मची करतात तशी. ते पत्ते पोलिसांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी. वाटल्यास त्या सगळ्यांचा जाहिर सत्कार पण आयोजित करुन देतो. अशाच रितीने या पार्ट्यांचे नियोजन असते. एमबीएची मुले मोकळापणा घेतात म्हणून त्यांना परप्रांतीय हे लेबल लावायचे ही सोयिस्कर पत्रकारिता. आता तुम्हीच `अश्या' पार्ट्या आयोजित करता म्हणजे तुमचेच बरोबर असेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
इ
इन्द्र्राज पवार Mon, 08/02/2010 - 18:03 नवीन
श्री.पुनेरी, मला मुजरा करायची काही गरज नाही. मी पत्रकारिता न करताही काही गोष्टी पाहिलेल्या आहेत, अनुभवल्या आहेत. कॉलेज, वा विद्यापीठात शिकणारी मुलेमुली पिकनिक स्वरूपाच्या पार्ट्या अजिबातच करीत नाहीत असे तुम्हाला म्हणायचे असेल तर प्रश्नच मिटला. पोलिसांनी थेऊरच्या त्या बंगल्यावर धाड टाकली ती तिथे दंगा चालला आहे असा ग्रामस्थांचा फोन आल्यानंतर. म्हणजेच "दंगा" नावाचा प्रकार झाला नसता (किंवा प्रमाणात झाला असता) तर पार्टीला आपल्या पाल्याने हजर राहिले ते मग क्षम्य मानायचे का? आणि मी प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे तुम्ही असे म्हणू शकता का की, राज्यात त्या दिवशी अन्यत्र कुठेही पार्ट्या झाल्या नसतील? टाईम्सच्या ज्या वार्ताहरांची नावे तुम्ही लिहिली आहेत ती मलाही माहित आहेतच. पण आज सरसकट ज्या पद्धतीने पत्रकारराज चालले आहे तीवरून ती परंपरा योग्य दिशेने चालली आहे असे मी मानत नाही. (अर्थात हे वैयक्तिक मत आहे.) व्यावसायिक संयोजक असतील तर पत्ते कळवा कृपया. आम्हाला अशा व्यावसायिक संयोजकाची कधी गरज भासली नाही. सहलीचे आयोजन आम्ही करीत असू आणि सामील झालेल्या सर्वांना व्यवस्थित घरी पोच करून मगच आमच्या रूमकडे जात असू. अशा पद्धतींचे नियोजन सर्वच करत असतात. असो. माझ्यापुरता हा विषय संपला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
प
प्रसन्न केसकर Mon, 08/02/2010 - 20:27 नवीन
मी ज्यांची नावे घेतली ते आजही पत्रकारितेतच आहेत आणि ज्यांची नावे घेतली नाहीत असे शेकडो प्रामाणिक पत्रकार मला माहिती आहेत. अर्थातच `साप्ताहिक बोंबाबोंब' एव्हढेच फक्त वाचुन आपल्याला बरेच कळते असा समज करुन घेण्याचे अन काहीही तर्कटे लढवण्याचे अन जाहिर भाष्य करण्याचा `वकुब' अन `धाडस' त्यांच्यामधे नसल्याने ते आंतरजालावरच्या विद्वानांच्या तुलनेत छटाक-नवटाकच! पत्रकारराज म्हणजे काय असते, ते कुठे चालते हे मला माहिती नाही. पण आपल्या घरी बसुन शेकडो मैलांवर घडलेल्या घटनेबाबत कोणतीही माहिती नसतानाही ठाम मते व्यक्त करणारे जालीय विद्वान हे खरेच घटनास्थळी जाऊन, स्वतः परिस्थिती पाहुन, सर्व संबंधितांशी बोलुन दोन ओळी खरडणार्‍या पत्रकारांपेक्षा थोरच! त्यामुळेच सर्व जालीय विद्वानांना मुजरा करणे क्रमप्राप्त ठरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
आ
आमोद शिंदे Tue, 08/03/2010 - 15:05 नवीन
पत्रकारही काही धुतल्या तांदळाचे नाहीत. उगाचच परप्रांतिय, दारू पिणार्‍या मुली वगैरे उल्लेख बातम्यांमधून हायलाईट करणार्‍या पत्रकारां विषयी तुमचे काय मत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
प
प्रसन्न केसकर Tue, 08/03/2010 - 15:47 नवीन
उगीचच कै च्या कै! अन आमची पत्रकारांबद्दलची मतं मिपावर परत परत सांगत बसण्याची गरज नसावी. काल परवा आलेल्या लोकांनी जरा अभ्यास पण करावा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे
आ
आमोद शिंदे Tue, 08/03/2010 - 19:17 नवीन
तुमची मते मला खरंच माहित नाहीत. तुमच्या इथल्या प्रतिसादावरुन तुम्ही पत्रकारांना पाठीशी घालू आहात असे वाटले म्हणून. पत्रकार प्रत्यक्षात हजर असतो म्हणून जालावर मत मांडणार्‍यांपेक्षा तो श्रेष्ठ वगैरे युक्तिवाद मला पटला नाही. बरं ते जाऊ दे. सदर बातमी छापणार्‍या पत्रकाराविषयी आपले मत काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
स
सुहास.. Mon, 08/02/2010 - 19:08 नवीन
अशा धाडीतून केवळ पोलिस हात धुवून घेत असतात. >>> केवळ ह्याच वाक्याच ऊत्तर देतो ....आशा आहे की पुढील सर्व चर्चेला मला ऊत्तर देण्याची गरज भासणार नाही ... नेमक पोलीसांनी काय करायच अस आपणास वाटत.कचर्‍यातल्या डब्यातली,ईकडे तिकडे,आख्ख्या गावात मोकळ्या ठिकाणी,पोरांच्या खिशातली,पोरींच्या पर्समधली, युज्ड कंडोम/अनयुज्ड कंडोमची पाकिटे मोजायची.त्याची बातमी पत्रकारांना द्यायची आणी पत्रकारांनी ती छापुन आणायची.दुसर्‍या दिवशी पंचनामा करण्यार्‍या, हवालदाराचा शाळेत जाणारा मुलगा,सकाळी-सकाळी पेपर वाचतो अन आईला विचारतो.......नाही म्हणजे लिहु का पुढे .....असो ....संपादकांची परवानगी असली तरी मला स्वताला काही लेखन-सीमा आहेत........ गावकर्‍यांना जे पोलीसांना कळविले ते योग्यच होतं....बस पुढे काही लिहीत नाही........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
इ
इन्द्र्राज पवार Mon, 08/02/2010 - 20:06 नवीन
सुहासराव.... मी पोलिसांनी अमुक एक केले नाही, किंवा का केले, अथवा काय काय करावे लागले याबद्दल प्रतिसादात कुठेही लिहिलेले नाही. 'पोलिस पंचनामा' हा बेवारशी प्रेताचादेखील इन-डिटेल करावाच लागतो; आणि थेऊरची तर धाड होती, तेव्हा तुम्ही ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्यापेक्षा जास्त लिखाण त्या हवालदारांनी त्या ठिकाणी केले असणार. माझा मुद्दा ~~ हात धुवून घेतात, आणि तो आहेच आहे. कुणाकडून, कसा, किती या गोष्टी अगदी दुय्यम आहेत. (मी अशा प्रकरणातून फार वेळा गेला आहे ~ अशा म्हणजे 'पार्ट्यांच्या" नव्हे, तर पोलिस पंचनामे आणि त्यापुढील कारवाया, त्यामुळे विश्वास ठेवा की माझे अनुभवाचे बोल आहेत.) अहो, जे पोलिस आणि संबंधित अधिकारी राज्याच्या गृहमंत्र्याला "अमुक एका कैद्याच्या कोठडीत जाऊ नका" असा रोखठोक सल्ला देतात, इतकी बडदास्त त्या कैद्याची त्यांनी ठेवलेली आहे, ते पोलिस अशा एकगठ्ठा ४००-५०० पोरांच्या बापांना धुतल्याशिवाय सोडतील असे कुणीही मानत नसेल. इन्द्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
स
सुहास.. Tue, 08/03/2010 - 06:07 नवीन
कॉलेजच्या अंतीम वर्षात असताना मी स्वतः असल्या पार्टीत सामील झालो होतो. किमान १०० तरी होतो (३०-३५ मुलीसह). पार्टी पन्हाळ्यावर होती. सायंकाळी ५ ला तिथे जमा झालो. ८ वाजेपर्यंत जेवण तयार होते, त्यानंतर जसे सर्वसाधारणपणे होत असते तसे हास्य, विनोद, कवितावाचन, गाणी म्हणणे, नृत्य करणे, ज्यांना बीअर घ्यायची होती ते बाजूला जाऊन घेत होते, पण जे घेणार नव्हते त्यांना आगाऊपणा करून घेण्यास कुणी भाग पाडत नव्हते. >>>> बघ रे डॉन्या, तुला बोललो होतो ना ? चुक आपल्या पिढीची नाही ....आपल्या आधीच्या पिढीने हे दिलय आपल्याला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
इ
इन्द्र्राज पवार Tue, 08/03/2010 - 07:37 नवीन
बघ रे डॉन्या, तुला बोललो होतो ना ? चुक आपल्या पिढीची नाही ....आपल्या आधीच्या पिढीने हे दिलय आपल्याला... आपल्या आणि आधीच्या पिढीची व्याख्या काय आहे हे मला माहित नाही. मी ज्या पार्टीचे आयोजन केले होते ती २००४ मधील होती (मी अजून तिशी ओलांडलेली नाही, सुहासराव....) आणि आता व्यवसायानिमित्ताने अनेकविध गटातील लोक एकत्र येत असल्यानेदेखील खाजगी पातळीवर का होईना पार्टीचे आयोजन करावे लागतेच. आणि हे सर्व सहजगत्या शांततेनेच चाललेले असते. सर्वच थरावर अशा पद्धतीच्या 'गेट टूगेदर' घटना होत असतात. त्यामुळे "चुक" कुठल्या पिढीची अशी शंका अप्रस्तुत ठरावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
ग
गणपा Mon, 08/02/2010 - 15:51 नवीन
आर्तिच्या आयला आमी येइस्तो शो खपला :( आता हे चणे फुटाणे घेउन कुठल थेटार गाठाव रं?
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Mon, 08/02/2010 - 16:59 नवीन
पार्टीमध्ये परप्रांतीय विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये तरूण विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय आहे. त्याही दारूच्या नशेत झिंगत असल्याचे पोलिसांना आढळले.
डानरावांनी जाता जाता केलेल्या निरीक्षणाशी सहमत. वरील वाक्य प्रसारमाध्यमांना खरंच शोभत नाही. या ओळींत बिटवीन द लाईन्स बरंच काही वाचता येतं. ते वाचता यावं अशा प्रकारेच ते लिहिलेलं वाटतं. 'हे ** *** साले ** (परप्रांतीय) इथे येतात आणि गोंधळ करतात, त्यांना चांगला धडा शिकवला पाहिजे' 'होना, आणि त्यात मुलीही होत्या म्हणे' 'आपल्या मुलींना दारू पाजतात...' (किंवा) 'त्यांच्या पोरीही तसल्याच उठवळ, दारू पिऊन नसती थेरं करतात' 'तेच तर. मुलांनी दंगा केला दारू प्यायली तर ठीक आहे, बॉइज विल बी बॉईज. पण मुली दारू पितात?' 'समाजाची नीतीमत्ताच भ्रष्ट होणार नाही का?' अशी वाक्यं लपलेली आहेत हे जाणवतं. IT WIFE निमित्ताने स्त्रियांविषयीच्या बुरसटलेल्या अपेक्षा किती खोलवर रुजलेल्या आहेत हे दिसून आलं. प्रसारमाध्यमांनी त्या उचलून धरणं शोभत नाही.
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar Mon, 08/02/2010 - 18:40 नवीन
+ १ राजेशशी सहमत. मुलीने दारु प्यायली तर जगबुडी झाल्याचा कांगावा का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा