Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हा पहिला अनुयायी कसा मिळवायचा/मिळतो/ते?

३
३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/20/2010 - 14:24
🗣 231 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
59951 वाचन

💬 प्रतिसाद (231)
अ
अर्धवट Fri, 08/20/2010 - 16:28 नवीन
बाकी लोकांच माहीत नाही ब्वॉ.. पण रामदास स्वामींचे काही चमत्कार नाहि ऐकले कधी आपण.. आपल्याला ते आवडतात ते त्यांनी दासबोधात मुर्खांची लक्षणं, स्वदेशाविषयीची कर्तव्य आणि इतर बरंच कायकाय उपयोगी लिवल्यामुळे.. झालंच तर.. कोमलवाणी दे रे राम | मंगल करणी दे रे राम | असं सुंदर काही मागितल्यामुळे बाकी अशा तथाकथीत चमत्कारामुळे काही आम्हाला समर्थ मोठे वाटत नाहीत... त्यातुन हल्ली काही असलेच प्रसिद्ध चमत्कार तर ते बहुतेक नंतरच्या पोटभरू मंडळींनी बनवलेले असावेत.. पण त्यांच एकंदरीत सगळं लेखन वाचुन एवढा अंदाज नक्की बांधता येतो.. की आज ते असते आणि असले चमत्कार त्यांच्या कानावर गेले असते तर ते किमान खोटे आहेत एवढं नक्की सांगितलं असतं त्यांनी .. (आणि कदाचित ते चमत्कार पसरवणार्‍या भक्ताला एका कुबडीत जन्माचा कुबड्या करुन ठेवला असता.. ) बाकी हयात नसलेल्या बुवांना एक बेनिफीट ऑफ डाउट देता येइल.... हयात असलेल्या बुवांनी असं स्पष्टीकरण द्यायला काय हरकत आहे.. अवांतर - एवढी लक्षणं लिहुन अजुन बरीच शिल्लक उरलियेत म्हणा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Fri, 08/20/2010 - 19:01 नवीन
ढीगाने आहेत. पण हे मात्र खरे की ते त्यांनी मी केले म्हनून लिहुन ठेवलेले नाहीत. सज्जनगडावर डझनावारी पुस्तके मिळतील त्यांच्या चमत्कारांविषयी. त्यातील एक म्हणजे सज्जनगडावर स्वामी फिरत असताना त्याचे उपरणे वार्याने उडुन कड्यावरुन खाली पडते. स्वामी फक्त कल्याणा उपरणे असे म्हणतात आणि कल्याणस्वामी काहीही विचार न करता कड्यावरुन खाली उडी मारतात. एवढ्या उंचावरुन उडी मारुन सुद्धा ते केवळ रामदासस्वामींच्या आशिर्वादाने न खरचटता परत येत्तत. दुसरे उदाहरण असेच मुसळ्स्वांईंचे पण देत्तात. त्यांना रामदास महाराज जुलुमी कोतवालाच्या तावडीतुन वाचवतात. तिसरे उदाहरण उद्धव स्वामींचे देतात. जे केवळ रामदास स्वामींचे पांघरून ओढुन घेतात म्हणून यमदूतच काय साक्षात यम सुद्धा त्यांना हातदेखील लावु शकत नाही. उलट दीर्घायुष्याचे वरदान देउन परत जातो. एक ना अनेक. हे सगळे चमत्कार खरे का खोटे या वादात मला पडायचे नाही. तात्पुरते मानुयात की चक्क निखालस खोटे. पण म्हणुन रामदास स्वामींचे अध्यात्मिक आणि सामाजिक कार्यमहात्म्य नाकारता येते का? तीच गोष्ट शंकर महाराजांची "साद देती हिमशिखरे" मध्ये डॉ. प्रधानांनी शंकर महाराजांचे कित्येक चमत्कार दिले आहेत. मी बुवा बाजीपासुन दुर आहे. परंतु मला सरसकट सगळे चोर ढोंगी आहेत हे मात्र मान्य नाही. रामदास महाराज किंवा गोंदावलेकर महाराज यांच्यावर तर मी श्रद्धा थेवुन आहे. आज हे दोघेही हयात नाहीत. जाउन बरीच वर्षे झाली. रामदास महाराज जाउन तर शतके झाली. पण मनाचे श्लोक तर आजही वंद्यनीय आणि वाचनीय आहेत की नाही? थोडक्यात काय की श्रद्धा कोणी कोणावर ठेवावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. बाकी अजुनही कोणी मूळ प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिलेले नाही आहे की पहिला अनुयायी कसा मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट
प
प्रियाली Fri, 08/20/2010 - 19:17 नवीन
मृत्युंजय, तुम्हाला रामदास स्वामींचे सामाजिक आणि अध्यात्मिक कार्य मान्य आहे ना. सर्वांनाच असावे. त्यांना चमत्कारांची गरज होती असे का वाटते? शिवाजीला भवानी तलवार मिळते, ज्ञानेश्वर भिंत चालवतात वगैरे सर्व सांगोवांगीच्या कथा असतात. किल्लेदार यांचा फोटो पाहिलात ना. ज्याला फोटोशॉप माहित नाही त्याला तो चमत्कारच वाटतो. भक्तांना जेव्हा आपला गुरु सर्वश्रेष्ठ आहे हे ठसवून द्यायचे असते तेव्हा तो चमत्कारांचा आधार घेतो. गुरुचेही तेच; मी सर्वात श्रेष्ठ हे त्याला पटवून द्यायचे असते किंवा साक्षात ईश्वर पाठीशी आहे त्यामुळे मी म्हणतो तेच योग्य असे सांगायचे असते तेव्हा तो चमत्काराचा आधार घेतो. रामदासस्वामींना अशा चमत्कारांचा धनी बनवणे योग्य नाही. त्यांची थोरवी बरीच मोठी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Fri, 08/20/2010 - 23:03 नवीन
रामदासस्वामींना अशा चमत्कारांचा धनी बनवणे योग्य नाही. त्यांची थोरवी बरीच मोठी आहे. धनी मी नाहीच बनवत आहे. हे सगळे पुस्तकात लिहिलेले वाचुन सांगितले हो तुम्हाला. त्यांनी खरेच ते चमत्कार केले की नाहे हे नाही माहिती मला. आणि समजा नसतील हरी केले तरी त्यांची थोरवी तुम्ही पण मान्य करताच ना? मग केवळ एखादा माणुस माधू या कॅटेगरी मध्ये मोडतो म्हणुन किंवा केवळ त्याच्या नावावर काही चमत्कार जमा आहेत म्हणुन तो भोंदु होतो का? किंवा सगळेच साधू भोंदु असतात का? माझा आक्षेप सरसकट सगळ्यांना भोंदू म्हणण्याला आहे. चमत्कारांची मोजपट्टी बाकी मला पण मान्य आहे. असले चमत्कार दाखवणारे मला पण भोंदू वाटतात. पण अश्या बाबांच्या कच्छपी लागलेले सगळे लोक सरसकट मुर्ख या गटात मोडतात हे देखील मला मान्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Sat, 08/21/2010 - 13:43 नवीन
धनी मी नाहीच बनवत आहे. हे सगळे पुस्तकात लिहिलेले वाचुन सांगितले हो तुम्हाला. त्यांनी खरेच ते चमत्कार केले की नाहे हे नाही माहिती मला. आणि समजा नसतील हरी केले तरी त्यांची थोरवी तुम्ही पण मान्य करताच ना?
याचा परस्पर संबंध काय? म्हणजे थोरवी मान्य करण्याचा आणि चमत्कार करण्याचा? जे चमत्कार करतात त्यांचीच थोरवी मान्य करावी असे काही नसते. तुम्ही ज्या पुस्तकात वाचले त्यात संदर्भसूची वगैरे दिली आहे का? कारण अशी पुस्तके कोणीही लिहू शकतो आणि अशी चमत्कारांची पुस्तके लिहिल्याने आणि ती वाचून त्यावर विश्वास ठेवल्याने हात जोडणार्‍या श्रद्धावंताची त्यात फसवणूक होत असते.
सरसकट सगळ्यांना भोंदू म्हणण्याला आहे.
असे कोण म्हणाले? की साप समजून दोरी धोपटताय?
पण अश्या बाबांच्या कच्छपी लागलेले सगळे लोक सरसकट मुर्ख या गटात मोडतात हे देखील मला मान्य नाही
. कच्छपी लागणे या शब्दातच मोठी गोम आहे. कुठल्याही गोष्टीच्या कच्छपी लागणे - चहापासून - ड्रग्जपर्यंत हे वाईटच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
परिकथेतील राजकुमार Sat, 08/21/2010 - 13:53 नवीन
परमेश्वरा !!! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Fri, 08/20/2010 - 16:32 नवीन
गजानन महाराजांनी लिहून ठेवले का की ते चमत्कार करत किंवा त्यांना तशी शक्ती आहे की ही भक्तांनी पसरवलेली कथा आहे? बाकी, गण गण गणात बोते चा अर्थ माहित आहे का तुम्हाला? कारण तो नेटावर न सुटलेला आणखी एक चिरंतन प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
अ
अर्धवट Fri, 08/20/2010 - 16:38 नवीन
नक्की माहित नाही बुवा.. कसं कळणार आता.. एक प्रामाणिक शंका - त्यांनी लिहिलेलं काही साहित्य/विचार उपलब्ध आहेत का? त्यावरून कदाचित अंदाज बांधता येउ शकतो त्यांच्या विचारांच्या दिशेचा.. >>बाकी, गण गण गणात बोते चा अर्थ माहित आहे का तुम्हाला? कारण तो नेटावर न सुटलेला आणखी एक चिरंतन प्रश्न आहे. नाही, मला पण अर्थ माहीत नाही... घरातले म्हणतात हा मंत्र.. एक दोन वेळा विचारला तर फटकारलं मला... पण जिज्ञासा मलापण आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 08/20/2010 - 16:39 नवीन
गजानन महाराजांनी लिहून ठेवले का की ते चमत्कार करत किंवा त्यांना तशी शक्ती आहे की ही भक्तांनी पसरवलेली कथा आहे?
माहित नाही. पण एक प्रतिगजानन महाराज ठाण्यात बोकाळले आहेत. उगाच गर्दीच्या रस्त्यावर आणखी गर्दी वाढवून ठेवली आहे.
बाकी, गण गण गणात बोते चा अर्थ माहित आहे का तुम्हाला? कारण तो नेटावर न सुटलेला आणखी एक चिरंतन प्रश्न आहे.
मीनल किंवा यशोधरा या दोघींपैकी कोणीतरी याबद्दल लिहीलं होतं, मिपावरच! शोधायला आत्ता वेळ नाहीये. मिळालं की खरड करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
अ
असुर Fri, 08/20/2010 - 16:10 नवीन
आपल्या तीनही उदाहरणात एक समान धागा आहे तो म्हणजे आत्मविश्वास! आजीचे गुडघे दुखायचे थांबणे, दारू सुटणे, मोकळे वाटणे यात ज्यांचे दु:ख आहे त्यांनीच उपाय शोधलाय, जाणता-अजाणता त्यांनीच स्वत:त तो बदल घडवला आहे. फक्त या बदलाचे शिल्पकार आपणच आहोत याची जाणीव झाली नसेल तर त्याचे श्रेय अजून कुणाला जाऊ शकते. किंवा आपणच आपल्याला बरे करतोय ही जाणीवच नको असेल (काही गोष्टीत स्वत:वर विश्वास कमी असतो) तरीदेखील त्याचे श्रेय हे उपाय करणाऱ्याला किंवा उपायांना जाऊ शकते. वरील तीनही उदाहरणात मला हा दुसरा प्रकार जास्त वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
प्रियाली Fri, 08/20/2010 - 16:15 नवीन
यालाच प्लॅसिबो इफेक्टही म्हणता येईल. परा, बाकीचे सर्व राहू दे पण आजींना त्रास असेल तर योग्य उपचार अवश्य करा. असे त्रास पोथीवाचनाने तात्पुरते थांबले तरी वाढत जाऊन पुन्हा उफाळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
प
परिकथेतील राजकुमार Fri, 08/20/2010 - 16:20 नवीन
परा, बाकीचे सर्व राहू दे पण आजींना त्रास असेल तर योग्य उपचार अवश्य करा. असे त्रास पोथीवाचनाने तात्पुरते थांबले तरी वाढत जाऊन पुन्हा उफाळतात.
ती चार वर्षापुर्वीच उपचारांच्या पलिकडे गेली. त्यामुळे आता काय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Fri, 08/20/2010 - 16:21 नवीन
ओक्के. कळले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
असुर Fri, 08/20/2010 - 16:24 नवीन
सॉरी परा! माझा भावना दुखवायचा मुळीच हेतू नव्हता. --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Fri, 08/20/2010 - 16:25 नवीन
ओ असुरराज काय राव तुम्ही पण ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
अ
असुर Fri, 08/20/2010 - 16:36 नवीन
जाउ दे राव! आपण या चर्चेतून आउट! बाकी खव आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
आ
आमोद शिंदे Sat, 08/21/2010 - 00:36 नवीन
आमच्या आजीचे पण गुडघे दुखायला लागल्यावर तिने पोथी वाचायला घेतली. गुढघे राहीले बाजूला ते वाचून तिचे डोके भणभणायला लागले. तुम्ही गुडघेदुखीचे क्रेडिट पोथीवाचनाला दिलेत तसेच डोकेदुखीचे क्रेडीटही पोथीवाचनाला द्यावे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
सुहास.. Sat, 08/21/2010 - 07:09 नवीन
छान चर्चा !!पण चावुन चोथा झालेला विषय !!पुन्यांदा डॉन्याचा लेख आठवला !! बाकी चालु द्या, वाचतोय,पुलेशु ई. ई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
म
मृगनयनी Fri, 08/20/2010 - 15:19 नवीन
प्रतिसादासाठी जागा राखून ठेवत आहे! :) __________________ आज शुक्रवार! खाजवून खरूज काढणार्‍या पापी लोकांना सुबुद्धी देण्यासाठी जोगेश्वरीजवळ प्रार्थना करायचीये!.... उगीच उशीर नको हो व्हायला! :) || जय महिषासुरमर्दिनी ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
असुर Fri, 08/20/2010 - 15:21 नवीन
>>>उगीच ते "ऑम्लेट" कोणत्या अन्ड्याचं आहे? ते अन्डं कोणत्या कोम्बडीने दिलं आहे... ती कोम्बडी किती वर्षांची आहे.....इ. इ... विचार करू नये!!!! तो विचार करायला "दत्तगुरु" समर्थ आहेत! <<< का उगाच त्या दत्तगुरुंना असले तामसी विचार करावयास लावताय? --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
आ
आमोद शिंदे Sat, 08/21/2010 - 00:48 नवीन
चला म्हणजे जोगेश्वरीच्या कृपेने ||खाजवणार्‍याची खरुज मरणार निश्चित ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
N
Nile Fri, 08/20/2010 - 22:05 नवीन
I was an atheist till i realised i was GOD !
म्हणजे पर्‍याचे मित्र लहानपणी देवाबरोबर गोट्या खेळत होते!! मजा होती लेकांची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
आ
आमोद शिंदे Sat, 08/21/2010 - 00:40 नवीन
राजकुमार, खिल्ली उडवण्याचे वावडे तुम्हाला कधी पासून? तुमच्या सारख्यांचे खट्याळ प्रतिसाद वाचण्यासाठी तर आम्ही इथे येतो. कोण कुठल्या बापू टिपूला इतके महत्व देताय? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
प्रियाली Fri, 08/20/2010 - 14:54 नवीन
१. रस्त्यावर मारामारी सुरु झाली की गर्दी जमते. जमलेल्या गर्दीला काय चाललंय हे बर्‍याचदा माहितही नसतं आणि मागे उभे असलेल्यांना दिसतही नसतं. फक्त काहीतरी दिसेल, ऐकू येईल म्हणून गर्दी करून उभे राहण्यात त्यांना गंमत येत असते . २. आपला पुढला रस्त्यातल्या लहानशा खड्ड्यावरून उडी मारून गेला म्हणून पाठचाही उडी मारून जातो हे दृश्य पाहिले आहे का? रस्त्याला वळसा घालून जाणे शक्य असले तरी. या जगात सर्वात सोपी गोष्ट म्हणजे भक्त मिळवणे. ;) लोकांना आपल्या बुद्धीचा वापर करायचा नसला की भक्त जन्माला येतो.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 08/20/2010 - 15:09 नवीन
तुझं म्हणणं अगदी मान्य आहे, प्रियाली. तू या प्रतिसादात म्हटलं आहेस त्याप्रमाणे ही गर्दी बुद्धी न वापरणार्‍यांचीच असणार. पण पहिला बुद्धीविरोधक आणि/किंवा भक्त मिळवणार कसा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Fri, 08/20/2010 - 15:21 नवीन
खाली विकास म्हणतात पहिला प्रतिसादक मिळवणे सोपे असते. भक्त मिळायला थोडा वेळ लागतो पण मला तसा फरक दिसत नाही. ;) लोक रोजच्या कटकटींनी इतके गांजलेले असतात की मी मार्ग दाखवतो (खड्ड्यावरून उड्डाण करण्याचा) असे म्हटले की मागे जाणारे भेटतातच. पहिला भक्त हा बरेचदा घरचाच असतो. आई, बायको, मामा, आत्या वगैरे असा काही बाबा-बुवांवरून अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विकास Fri, 08/20/2010 - 17:05 नवीन
लोक रोजच्या कटकटींनी इतके गांजलेले असतात की मी मार्ग दाखवतो (खड्ड्यावरून उड्डाण करण्याचा) असे म्हटले की मागे जाणारे भेटतातच. जर एखाद्यास "बाबा" होयचे म्हणून तो प्रयत्न करत असला, पण त्याला कोणीच अनुयायी मिळत नसले म्हणून गांजलेला असेल तर दुसरा एखादा बाबा त्याला, "मार्ग दाखवतो", असे म्हणेल का? का येथे देखील "राज को राज रेहेनेदो", अर्थात ट्रेड सिक्रेट सांगितले जात नसेल? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Fri, 08/20/2010 - 17:16 नवीन
जर एखाद्यास "बाबा" होयचे म्हणून तो प्रयत्न करत असला, पण त्याला कोणीच अनुयायी मिळत नसले म्हणून गांजलेला असेल तर दुसरा एखादा बाबा त्याला, "मार्ग दाखवतो", असे म्हणेल का? का येथे देखील "राज को राज रेहेनेदो", अर्थात ट्रेड सिक्रेट सांगितले जात नसेल?
प्रश्नात गडबड आहे. असं होत नाही. मागे अभिषेक बच्चनचा एक चित्रपट आला होता. आता नाव नेमके आठवत नाही. त्यात विजयराज का अशा काहीशा नावाचा एक कॉमेडियन दिल्लीला येतो आणि नाडला जातो असा प्रसंग आहे. इतका नाडला जातो की अंगावर घालण्यास कपडे उरत नाहीत. वेड लागायची पाळी आलेल्या अवस्था झालेली असते आणि त्याला घालावयास एक परकर मिळतो. लोकांना शिव्याशाप देत फिरणार्‍या या माणसाला सर्व "परकरवाले बाबा" म्हणून नमस्कार करू लागतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
अ
अनामिक Fri, 08/20/2010 - 17:19 नवीन
तो महान चित्रपट "रन" असावा बहुतेक... आणि परकरवाले बाबा नाही काही, "पेटीकोट बाबा"... दर्शनाला येणारे लोक त्या बाबांना पेटीकोट चढवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Fri, 08/20/2010 - 17:23 नवीन
बरोबर! पेटिकोटवाले बाबा! ;) चित्रपट थोडा जुना आहे. आठवले!!!!! पांडुरंग शास्त्री नाहीत. चित्रपटाचे नाव आठवले - ब्लफमास्टर. त्यातील कव्वा बिर्यानीचा जोक पाहण्यासारखा आहे - पांचट आणि भंकस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
स
स्वप्निल.. Fri, 08/20/2010 - 19:46 नवीन
चित्रपटाचे नाव "रन"च .. एका तेलुगु/तमिल चित्रपटाचा रीमेक आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
व
विकास Fri, 08/20/2010 - 17:27 नवीन
चित्रपटाचे नाव काय? (करमणूक प्रधान असल्यास पहायला आवडेल). :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
म
मदनबाण Fri, 08/20/2010 - 15:26 नवीन
लोकांना आपल्या बुद्धीचा वापर करायचा नसला की भक्त जन्माला येतो. आम्ही उगाच भक्त प्रल्हादाच्या गोष्टी वाचण्यात वेळ वाया घालवला म्हणायचे तर !!! असो... नारायण !!! नारायण !!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
परिकथेतील राजकुमार Fri, 08/20/2010 - 15:32 नवीन
आम्ही उगाच भक्त प्रल्हादाच्या गोष्टी वाचण्यात वेळ वाया घालवला म्हणायचे तर !!!
वाचण्यात का बघण्यात रे मदना ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Fri, 08/20/2010 - 15:51 नवीन
वाचण्यात... आणि ती कथा वाचतानाच एक गोष्ट मला कळली ती म्हणजे... ॐ नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र नारदाने भक्त्त ध्रुवाला विष्णू प्राप्तीसाठी ( दर्शना साठी)दिला. वरच्या माझ्या प्रतिसादात प्रल्हादाच्या जागी ध्रुव असे वाचावे. ( भगवंताचा फुल टाईम दास)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मी ऋचा Sat, 08/21/2010 - 08:11 नवीन
>>>( भगवंताचा फुल टाईम दास) मी (भगवंताचा फुल टाईम पास) असे वाचले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
अ
अर्धवट Fri, 08/20/2010 - 14:56 नवीन
मुद्द्याला अनुसरून पण धाग्याला अवांतर एक कविता आठवली.. संत संदीप खरे यांचीच आहे... बघा पोचतय का? ;) एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना, पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची ! एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो तेव्हा होते निर्माण देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची ! एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो तेव्हा को-या नजरेने पाहत राहतो सभोवतालच्या हालचाली, भाविकाच्या जत्रा... कोणीतरी स्वत:चे ओझे , स्वत:च्याच पायावर साभाळत असल्याचे समाधान लाभते देवलाच ! म्हणून तर एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदचित ! पण मिळते आकठ समाधान एक सहकारी लाभल्याचे देऊळ बद झाल्यावर एक मस्त आळस देउन बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता देव म्हणतो, " दर्शन देत जा अधुन मधुन........ तुमचा नसेल विश्वास आमच्यावर, पण आमचा तर आहे ना ! " देवळाबाहेर थाबलेला एक खरा खुरा नास्तिक कटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारिने पाठवतो देवळात तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे....
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 08/20/2010 - 14:59 नवीन
"संत" संदीप खरे यांना नास्तिक म्हणजे काय किंवा देवावर विश्वास नाही म्हणजे काय हे कळलेलं नाही एवढंच या कवितेतून मला कळलं. पुढे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट
अ
अर्धवट Fri, 08/20/2010 - 15:08 नवीन
चुकलो बाय... पुढं काय नाय.. कविताच मागं घेतो.. बाकी चालु द्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अर्धवटराव Sun, 08/22/2010 - 20:54 नवीन
अगदी समर्पक कविता !! (देवाला गुदमरुन सोडणारा) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट
व
विकास Fri, 08/20/2010 - 15:09 नवीन
सर्वप्रथम तुमच्या या सहकारी मित्राचे नाव आणि म्हणणे ऐकून, त्याचा निषेध करायला म्हणून या बुवाबाबांनी जर, "आम्ही आमची जयंती करून देणार नाही" असा आदेश दिला, तर किती बरे होईल! ;) हा पहिला अनुयायी कसा मिळवायचा? ते कदाचीत पहीला प्रतिसादक मिळवण्यापेक्षा अवघड असावे. ;) मात्र अनुयायी केवळ अध्यात्मिक क्षेत्रातच नाही तर इतर कुठल्याही क्षेत्रात जे मिळवतात ते कितीही (अध्यात्मात) भोंदू आणि (इतर क्षेत्रात) लबाड असले तरी त्यांच्यात काहीतरी enterprising आणि marketing skills असतात असे नक्कीच वाटते. :-)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 08/20/2010 - 15:19 नवीन
जयंती स्वतःच "बाबा" बनल्यागत माझ्याकडे चक्क दुर्लक्ष करता झाला! हा बाबा नक्कीच ज्ञानी दिसतोय !!! ;) (मदन बाबा प्रेम नगरीवाले)... ;)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 08/20/2010 - 15:25 नवीन
मला वाटलं अदिती काय 'करिअर' वगैरे बदलायचा विचार करते आहे की काय? ;) पहिला अनुयायी मिळवणे हे तितकेसे अवघड नसावे. पुलंच्या भाषेत सांगायचे तर "बेंबट्या, कुंभार हो जगात गाढवांस तोटा नाहीं!" (पालथा घडा)चतुरंग
  • Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे Sat, 08/21/2010 - 00:44 नवीन
"बेंबट्या, कुंभार हो जगात गाढवांस तोटा नाहीं!" युद्ध माझा राम करणार| गाढव माझ्यात संचार करणार कुंभार जिंकणार निश्चित|| :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
म
मृगनयनी Sat, 08/21/2010 - 09:28 नवीन
पहिला अनुयायी मिळवणे हे तितकेसे अवघड नसावे. पुलंच्या भाषेत सांगायचे तर "बेंबट्या, कुंभार हो जगात गाढवांस तोटा नाहीं!" ह्म्म्म्म ! अगदी खरं आहे ! :) "प्रतिसाद" खेचण्यासाठी बाबा-बुवांच्या विषयाव्यतिरिक्त दुसरा "हुकमी एक्का" असू शकतो का? ;) नाही तर ते कुठल्या तरी स्त्री-मुक्ती चळवळीच्या की कुठल्याश्या म्हातार्‍या परदेशी "आयडॉल " बद्दल धागा काढला जातो ..... आणि धाग्याचं नाव वाचून _त्रा सुद्धा ढुन्कून बघत नाही... त्या धाग्याकडे! .. मग २ दिवस वाट पाहिली जाते....आणि मग नन्तर "बान्ध" सुटल्यावरती आपल्या कम्पूतल्या प्रत्येकाला "व्यनि" किन्वा 'फोन' करून करून हैराण केले जाते, "ए.. टाक ना प्रतिसाद माझ्या धाग्याला.. कसेही टाका.. पण टाका.. ना..... काय ** राव... काय रे **शेठ.... मी एवढं स्त्री-मुक्ती'बद्दल लिहिलय.. पर्शियन की (रशियन.. की अमेरिकन ;) ) आयडॉल' टाकलाय... लिहा ना.. काहीतरी... 'कोरम' भरलेला दिसला पाहिजे!!!!!.. तुम्ही माझ्या गोटातले ना!!!! ;) =)) =)) .. बास काय रे हुप्प्या!!! =)) =)) =)) =)) =)) इ. इ. .... मुक्तवचने उधळून "कोरम" भरवला जातो! ;) पण येवढे श्रम करण्यापेक्षा.. एखाद्या "सेन्सीटिव्ह" विषयावर काही तरी लिहिले... प्रसन्गी दुसर्‍या "सन्केतस्थळा"चा आधार घेतला... तर कुठे बिघडले ? ? ? ?? ;) "सम्पादक मन्डळा"ची परवानगी असल्यावर काय अशक्य आहे? ? ? ? ? नाही का? मग भले... या सन्केतस्थळावरील .. .. .. "श्रद्धावानां"च्या भावना दुखावल्या गेल्या तरी चालतील.. पण आपले स्वतःचे नाव "रोशन" झाले पाहिजे! नाही का? ;) ;) :| आणि मग सगळी कुम्भारा'च्या कम्पूतली शिस्तबद्ध गाढवे जमतात... आणि सुरू होतात! बाबा-बुवांना शिव्या घालता घालता... हिन्दु देवदेवतांचीही टर उडवली जाते... रामाला लाचार केले जाते... लक्ष्मणाला अपशब्द वापरले जातात.... पण त्याचं गाढवांना काय हो! ... गाढवंच ती.... बुद्धीचा काय सम्बंध?... कुम्भार स्वतःच निर्बुद्ध असल्यावर गाढवांकडून तरी काय अपेक्षा करणार ? :| आता या समूहातली कुम्भाराची गाढवे कोणती? भाड्याने आणलेली कोणती ? ... हे मात्र सांगणं.. मुश्कील होतं! ;) पण सांगायचा उद्देश इतकाच... की गाढवांना तोटा नाही हो!!....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
न
नितिन थत्ते Sat, 08/21/2010 - 11:10 नवीन
हांग आश्शी. आव्हानाचं सार्थक झालं बुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
आ
आमोद शिंदे Sat, 08/21/2010 - 14:52 नवीन
तुमच्या त्या "युद्ध कोणी दुसराच करणार। मी वानर बसून खाणार" असल्या महावाक्याने आमच्या भावना दुखावतात त्याचे काय? आम्ही घेतला का कधी आक्षेप त्यावर. प्रत्येकाला आपापल्या बुद्धीचे प्रदर्शन करण्याची समान संधी असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
अ
अनाम Fri, 08/20/2010 - 15:55 नवीन
माताय पॉपकॉर्न, चणे, दाणे, लाह्या जे काय मिळेलत ते घेउन या रे. झाडावर जागा रिझर्व करुन बसलो आहे. आवांतरः बाकी आम्हाला अ.बापुंचा फोटु पाहिला की खात्यापित्या चाळीतला गवळी भाई आठवतो. (कर्णिने नाय हो चेहर्‍या मोहर्‍याने. ;) )
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट Fri, 08/20/2010 - 16:10 नवीन
खरं हो... माझ्या एका साध्यासुध्या मित्रानं एका पानपट्टीवाल्याला विचारलं होतं.. तुम्ही अरुण गवळींचा फोटो का लावलाय दुकानात म्हणून.. बिच्चारा.. आता साधी विडी घ्यायला तो पानपट्टीवाला सोडुन पुढच्या चौकात पायपीट करत जावं लागतं बिचार्‍याला.. बाकी चालु द्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनाम
आ
आमोद शिंदे Sat, 08/21/2010 - 14:34 नवीन
माझ्या एका साध्यासुध्या मित्रानं एका पानपट्टीवाल्याला विचारलं होतं.. तुम्ही अरुण गवळींचा फोटो का लावलाय दुकानात म्हणून.. बिच्चारा.. अगायायायायायाया...खपलो वारलो हसून हसून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा