Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हिंदीतून मराठीकडे

व — विश्नापा, Tue, 08/24/2010 - 18:45

प्रतिक्रिया द्या
15095 वाचन

💬 प्रतिसाद (90)
ध
धनंजय Tue, 08/24/2010 - 19:08 नवीन
१. आपणासारखा कोणी माझ्या आयुष्यात आले तर बात होऊन जाईल - तर बा-आ-आत होऊन जाईल. - - - २. जूलीऽऽ आय लव्ह यूऽऽ - - -
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Tue, 08/24/2010 - 19:20 नवीन
बा आत होऊन जाईल? हाहाहा! असे आहे काय? हल्ली मला झक्कत हिंदी सिरिअल्स बघाव्या लागतात. त्यांना मी मराठीत भाषांतरीत करते तारक मेहताचा उलटा चष्मा थोडे आहे थोड्याची गरज आहे सासर झेंडूचे फूल वगैरे वगैरे चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
अ
अनामिक Tue, 08/24/2010 - 22:26 नवीन
ह्यावरून तुम्ही मागे एकदा मराठीचं हिंदी केलेलं आठवलं... "बुगडी मेरी सांड गई, जाते सातारेकू..जाते सातारेकू" :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Tue, 08/24/2010 - 22:29 नवीन
मिपावर असे आठवते पण लिंक मिळत नाही; घाईत आहे. मिभो मदत करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
म
मिसळभोक्ता Tue, 08/24/2010 - 22:37 नवीन
हे बघा, काय सापडले: http://misalpav.com/node/3582
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
N
Nile Tue, 08/24/2010 - 22:42 नवीन
उपरोल्लेखित लिंकेत "कित्ती कित्ती हुश्शार तुम्ही!!" पाहुन मन वढाय वढाय झाले. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
प
प्रियाली Tue, 08/24/2010 - 23:41 नवीन
हाहाहाहा! धन्यवाद. हाच तो धागा. पुन्हा वाचून नव्याने करमणूक झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
व
विकास Wed, 08/25/2010 - 16:50 नवीन
>>>आपणासारखा कोणी माझ्या आयुष्यात आले<<< या वरून आठवले लीला मी लीला अश्शी मी लीला जर भेटावेसे वाटले भेटा एकटीला --------------------- दुसरे आता जुने पण त्यामानाने नवीन गाणे एकदम आठवले... प्रियतमा प्रियतमा आपुली तू आपण तुझा तुझ्झ्या प्रेमात पडूंदेंत माझे कुटूंब वाढूंदेत हा एव्हढाच विचार आहे आता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/26/2010 - 09:19 नवीन
प्रियतमा प्रियतमा आपुली तू यावरून धुमधडाका या आमच्या आवडत्या चित्रपटातील 'प्रियतम्मा प्रियतम्मा दे मला तू चुम्मा' हे गाणं आठवून गेलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
भ
भारी समर्थ Fri, 08/27/2010 - 17:47 नवीन
गाण्याच्या शब्दांचे भाषांतर समजू शकते, पण नावांचेही करणे म्हणजे कहरच...मानलं बुवा! आता काही गाण्यांचं (त्यातल्या नावासह) भाषांतर आमच्या आग्रहाखातर करता का जरा? 'तय्यब अली प्यार का दुश्मन' 'अमर अकबर एंथनी' 'जॉनी मेरा नाम' इ. स्थळाचही करत असाल तर सांगा, तो ही ष्टॉक आहे मंडळाकडे.... भारी समर्थ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
स
सुनील Tue, 08/24/2010 - 19:23 नवीन
पूर्वी इथे एक काका होते, ते हिंदी गाण्यांचे चालीबरहुकुम मराठीकरण करायचे! कुठे गेले ते आता?
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 08/24/2010 - 20:21 नवीन
अजून नाही आले साजण ग, श्रावण जाई निघून हाय रे, श्रावण जाई निघून.
  • Log in or register to post comments
N
Nile Tue, 08/24/2010 - 20:27 नवीन
तसे आमचे मराठी (अन हिंदी) कच्चेच. त्यामुळे आम्ही फार काही मदत करु शकत नाही. (म्हणुन दुसर्‍यांनी केलेली मदत इथे देण्याचा प्रयत्न करतो) हे घ्या एक गाणे मराठीत, अदिती! http://www.youtube.com/watch?v=RHFa3eVdMrc&NR=1 पण जाता जाता, हे फ्रेंड्स मराठीत. http://www.youtube.com/watch?v=2J5vaI2DGYo बाकी चुकुनही पर्‍याला विचारु नका म्हणजे झालं!
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 08/24/2010 - 20:36 नवीन
अदिती चांगले म्हटले आहे. थोडेसे भाषांतर करताना गडबड आहे, पण त्या सगळ्या वाद्यवृंदात काही कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/25/2010 - 19:05 नवीन
नामाची करामत का काय? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
N
Nile गुरुवार, 08/26/2010 - 09:59 नवीन
नामाची करामत का काय?
अगदी बरोबर ओळखलीस भाषांतरातील गडबड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ब
बेसनलाडू Tue, 08/24/2010 - 20:30 नवीन
जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया चे भाषांतर - जिथे फांदीफांदीवर सोन्याच्या चिमण्या करतात निवारा तो भारत देश आहे माझा (भारतीय)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Wed, 08/25/2010 - 00:27 नवीन
बेलाशेट, अहो त्याला काही यमक, प्रास? समोरच्या कोनाड्यातील व्हीन्दमातेची आठवण झाली. (पहिल्या वाक्याची courtesy पुलं ) ह. घ्या (किंवा घेऊ नका, कसेही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
क
कानडाऊ योगेशु Wed, 08/25/2010 - 14:39 नवीन
पण चालीत अगदी व्यवस्थित म्हणता येतेय.!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
ब
बेसनलाडू Wed, 08/25/2010 - 18:55 नवीन
निवारा आणि माझा यांत 'आ' हे आकारान्त स्वरयमक आहेच. शिवाय योगेशनी म्हटल्याप्रमाणे चालीत म्हणता येतेच आहे. (तंत्रशुद्ध)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
म
मिसळभोक्ता Tue, 08/24/2010 - 21:54 नवीन
ह्या धाग्याची खफक्षमता खूप आहे, हा धोका पत्करून (कधी नव्हे ते) गंभीर प्रतिसाद देतोय. हिंदी गाण्यांचे मराठीकरण डोंबिवलीपासून सॅन होजे पर्यंत बर्‍याच लोकांनी करून हसे करून घेतले आहे. भाषांतर कसे असावे ? जे भाषांतर वाटत नाही, ते. "सारे जहांसे अच्छा" चे भाषांतर शांताराम नांदगावकरांनी केलेले आहे: "सार्‍या जगी सुरम्य, हा हिंददेश अमुचा". तसे.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Tue, 08/24/2010 - 22:05 नवीन
हिंदी गाण्यांचे मराठीकरण डोंबिवलीपासून सॅन होजे पर्यंत बर्‍याच लोकांनी करून हसे करून घेतले आहे.
डोंबिवलीपासून सॅन होजे की मनोगतापासून मिपापर्यंत? मनोगतावर "ओह रे ताल मिले नदी के जलसे" गाण्यातील "है रे" या बैलांना हाकारण्याच्या आवाजाचे मराठी भाषांतर "खैर रे खैर रे" असे झाल्याने गो. रा. खैरनार आणि बाकीचे समस्त खैरे स्वप्नात एकत्र झिम्मा फुगडी घालताना दिसले होते त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Tue, 08/24/2010 - 22:14 नवीन
डोंबिवले ते सॅन होजे, म्हणजेच गोळे ते सामंत असे लिहायला हवे होते. शब्दशः भाषांतराची ही खुमखुमी वाढत्या वयानुसार तेज होते की काय, ह्यावर कुणीतरी संशोधन करायला हवे. असो. सध्या : आम्ही होऊ स फ ल आम्ही होऊ स फ ल आम्ही होऊ स फ ल एक दिवस हो हो हो मनात आहे विश्वास पूर्ण आहे विश्वास आम्ही होऊ स फ ल एक दिवस एवढेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Tue, 08/24/2010 - 22:19 नवीन
भाषांतराची ही खुमखुमी वाढत्या वयानुसार तेज होते की काय, ह्यावर कुणीतरी संशोधन करायला हवे.
असावे. पुरावा: आम्ही होऊ स फ ल* * मी पहिल्यांदा आम्ही हाऊसफुल असे वाचले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Tue, 08/24/2010 - 22:22 नवीन
मी पहिल्यांदा आम्ही हाऊसफुल असे वाचले. टॉप २५ चा अंमल अजून उतरला नाही वाट्ट !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
ध
धनंजय Tue, 08/24/2010 - 22:28 नवीन
"वुई शाल ओव्हरकम"... हे मूळ गाणे आहे. मूळ हिंदी गाण्याचे डोंबिवली-सानहोसे भाषांतर अपेक्षित आहे. (कायद्याचे पत्र नव्हे, तर कायद्याचा मद्यार्क पाळा!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Tue, 08/24/2010 - 23:05 नवीन
रडत रडत येती सगळे हसत हसत जो जाईल तो नशीबाचा सम्राट प्रिये म्हणवला जाईल पुढे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ध
धनंजय Tue, 08/24/2010 - 23:15 नवीन
तो शिकंदर काय होता ज्याने जुलूम करून जिंकले जिथे (जहाँ) प्रेमाने जिंकतो हृदयांना तो झुकवेल आकाशाला जो सतारींवर कहाणी प्रेमाची लिहून जाईल तो नशिबाचा शिकंदर जाणतो, मन म्हणवला जाईल. (अथवा : तो नशीबाचा सम्राट प्रिये म्हणवला जाईल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
च
चतुरंग Tue, 08/24/2010 - 23:29 नवीन
बेईमान हे जीवन ठोकरेल एके दिवशी मृत्यू जणू प्रेयसीच माझी सोबत नेईल खाशी मरणातुन जगण्याची अदा जो शिकवी ह्या दुनिये तोच शिकंदर म्हणवे अपुल्या नशिबाचाच प्रिये चतुरंग बक्षी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
म
मिसळभोक्ता Tue, 08/24/2010 - 23:32 नवीन
काही ज्येष्ठ सदस्य इथून आता कायमचेच गेल्याची रुख रुख लागून राहिली होती. ती गेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Tue, 08/24/2010 - 23:34 नवीन
नसलो तरी तुमचे कौतुक सन्मानपूर्वक स्वीकारतो! ;) (कौतिकराव)चतुरंग पाटील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
ध
धनंजय Wed, 08/25/2010 - 01:11 नवीन
ज्येष्ठ म्हणजे डॉन ब्रॅडमन, विरेंदर सेहवाग, ब्रायन लारा... आपल्यातुपल्यासारख्या सटरफटर वयोमानाबद्दल नाही बोलत आहेत मिसळभोक्ते... आपल्यातुपल्यासारख्यांच्या घाईगर्दीचा वाहातुक मुरंबा होऊ दे, पण तशा खर्‍या ज्येष्ठत्वाची सर नाही यायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
म
मिसळभोक्ता Tue, 08/24/2010 - 23:34 नवीन
चोता दोन ने सदस्य परिचयाचा चान चान धागा काढला होता. त्यात आम्ही काही लिहिले नाही, पण लिहायचेच असते, तरः मी भोक्ता, मिसळ भोक्ता. चांगल्या सर्जनशील लोकांकडून वाट्टेल ते करवून घेण्यात हातखंडा. असे लिहिले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
सुनील Tue, 08/24/2010 - 22:18 नवीन
पूर्वी शेमारूच्या विडियो कॅसेटवर येणार्‍या इंग्लिश सबटायटलची आठवण आली!
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Tue, 08/24/2010 - 22:21 नवीन
ही बघा: http://misalpav.com/node/9775 http://misalpav.com/node/9560 http://misalpav.com/node/8699 http://misalpav.com/node/5724 आमची एकेक श्रद्धास्थळे जणू मोडकळीला आणण्याचा चंगच बांधला होता आजोबांनी.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 08/24/2010 - 23:02 नवीन
मागे एकदा हिंदीचं इंग्रजी केलं होतं सहजच... You are the love of someone else, someone else likes you You are the choise of someone else, someone else wants you :)
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 08/24/2010 - 23:34 नवीन
अरे देवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
व
विकास Wed, 08/25/2010 - 03:32 नवीन
मागे एकदा हिंदीचं इंग्रजी केलं होतं सहजच... असेच अजून एक... On the seashore, my heart hears if you are not near, I am nowhere
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
ग
गांधीवादी Wed, 08/25/2010 - 02:55 नवीन
समुद्रात आंघोळ केल्यानी .... अजून खारट झालीयेस........ (समंदर में नहाके और भी नमकीन हो गयी हो )
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 08/25/2010 - 03:14 नवीन
ह्या माझ्याकडून ;) माझे कुठलेसे सामान तुझ्या घरी पडून आहे अरे, पावसाचे काही ओले दिवस ठेवलेत रे... हो अजून माझ्या पत्रात लपवलेली एक रात्र आहे ती रात्र विसर, माझे सामान परत दे रे --------------------- क्षण क्षण हृदयाजवळ तू राहतेस गं जगणे म्हणजे गोड तहान असे (काहीसे) म्हणतेस गं ----------------------- बहुतेक माझ्या लग्नाचा विचार डोक्यात आला आहे म्हणून की काय माझ्या आईने तुला आज चहाला बोलावले आहे असो. :-)
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Wed, 08/25/2010 - 03:35 नवीन
>> बहुतेक माझ्या लग्नाचा विचार डोक्यात आला आहे म्हणून की काय माझ्या आईने तुला आज चहाला बोलावले आहे नव्हे तर चहापाण्याला असे योग्य वाटले असते. तोडपाण्याला तर अजून संयुक्तिक वाटले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Wed, 08/25/2010 - 03:49 नवीन
चांगले आहे. तसे चहापोह्याला बोलावले आहे असे पण होऊ शकेल. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
च
चतुरंग Wed, 08/25/2010 - 06:09 नवीन
माझं काही सामान तुझ्याजवळ पडून आहे... ह्या भाषांतराने खुद्द गुलजार हे हताश होऊन पुढल्या सगळ्या कविता स्वतःच फाडून टाकतील! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ध
धमाल मुलगा Wed, 08/25/2010 - 15:40 नवीन
आपण संपलो! ठार मेलो राव... अरे काय उतमात चाललाय? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
विकास Wed, 08/25/2010 - 16:17 नवीन
हे गाणे (वास्तवीक आवडते आहे पण) ऐकताना मला गुलजार पेक्षा दादा कोंडक्यांचा "बोट लावीन तिथे गुदगुल्या" आठवतो. ;) आणि त्यांना काही प्रश्न येईल असे वाटत नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
अ
अनामिक Wed, 08/25/2010 - 03:50 नवीन
माझे कुठलेसे सामान तुझ्या घरी पडून आहे अरे, पावसाचे काही ओले दिवस ठेवलेत रे... हो अजून माझ्या पत्रात लपवलेली एक रात्र आहे ती रात्र विसर, माझे सामान परत दे रे या पुढे... एका एकट्या छत्रीमधे अर्धे अर्धे भिजत होतो... अर्धे ओले, अर्धे सुकले सुकलेले घेऊन आले... ओले मन बहुतेक पलंगाशेजारी पडलेय ते पाठव रे.. माझे सामान परत दे रे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
र
राजेश घासकडवी Wed, 08/25/2010 - 07:03 नवीन
ठो देऊन ज्या साऱ्या समाजाला बनून जाईल जो आपला निशाना कारण की, सगळीच्या सगळी ही दुनिया माझ्या खीशात... प्रियाली के पाससे बुगडीपेसे प्रेरणा लेकर.... अडगुला मडगुला सोने का कडगुला रुपे का वाला नन्हे बच्चे को टीका लगाऊ.... ले जा मुझको लेजा वापिस मातृभूमी को ओ सागर मेरा प्राण तलमल्या, तलमल्या, ओ सागर एक खास प्रियालींसाठी (त्या नाराज असताना त्यांना मनवण्यासाठी) लिहिलेलं, मराठी भाषांतर (ओळखणं कठीण करण्यासाठी शब्द थोडे बदललेलं...) अंदाज माझा मस्ताना नेहमीच अचूक निशाणा जरा समजून भीडव डोळे कोणासमोर तुझे हे चाळे? कारण मी इथे आहे आणि मी तिथे आहे मग नको असं म्हणूस माझा आय्डी कुठे आहे? माझा आय्डी कुठे आहे? उड्लानाSSSS!
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Wed, 08/25/2010 - 08:12 नवीन
>> ओ सागर मेरा प्राण तलमल्या, तलमल्या, ओ सागर फु... ट.... लो.... हसून गडबडा लोळलो ठार मेलो शेजारी धावत आले, काय झाले ते बघायला.... अजून येऊ द्या गुर्जी..................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
प
प्रियाली Wed, 08/25/2010 - 11:40 नवीन
उड्लानाSSSS!
सर्वांना क्रमवार लावले आहे. तुमचा नं. पहिला. ;) आता याला कुणी संपादकीय धमकी म्हटले तर तो गैरसमज आहे. मराठीचे हिंदी रुपांतर करायला अधिक मजा येते मेरेकु लगी किसिकी हिचकी किसकी किसकी? इस्की या उस्की! शर्माना नै! शर्मांना नै! शर्माना नै|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
च
चतुरंग Wed, 08/25/2010 - 13:54 नवीन
ह्या गाण्यावर ओरीजिनल नटीचा नाच सुरु आहे असे डोळ्यांसमोर आले आणि पडालो!! =)) =)) =)) (हिचकिचणारा)रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा