Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुतळे हटवा! इतिहास घडवा !!

क
कापूसकोन्ड्या
Wed, 08/25/2010 - 17:49
🗣 106 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
27454 वाचन

💬 प्रतिसाद (106)
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/26/2010 - 15:01 नवीन
अहो तुमच्या सारखे अनेक लोक जेऊन गेले की हो पंगती मधे. किती वेळेला गाव जेवणावळी झाल्या होत्या तेव्हाही. भुरके मारून मारून बासुंदी ओरपायचात विसरलात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मृत्युन्जय गुरुवार, 08/26/2010 - 15:10 नवीन
फक्त बासुंदी नाही काही. रावण पिठलं सुद्धा. पण काय आहे तेव्हा यांचे लक्ष सगळे मस्तानीकडे असायचे. त्यामुळे बाकी काही लक्षात नाही राहिले त्याला आता काय करणार. त्यामुळे आजही ते मस्तानी शिवाय काहीही पीत नाहीत बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
ज
जयंत कुलकर्णी गुरुवार, 08/26/2010 - 16:10 नवीन
ब्राह्मणांनी मराठी दौलतीची ईभ्रत घालवली ! खरंच घालवली का ? माझ्या मते मराठी दौलतीची खरी इभ्रत ज्यांनी घालवली त्या मराठा सरदारांची ही पहा खाली यादी. या सर्व सरदारांनी महाराजांच्या विरुध्द कटे कारस्थाने करण्यात व त्यांच्या (महाराजांच्या) विरूध्द मोगलांना व मुसलमानांना मिळून लढण्यात धन्यता मानली. यात एकही महार, मांग, माळी इ. नाही. सर्व ९६ कुळीच आहेत. आता प्रवीण गायकवाड यांच्या सध्याच्या वंशजांच्या घरादारावरून गाढवाचा नांगर फिरवणार का ? आहे का त्यांच्यात एवढी ताकद ? फटके बसतील. ज्या दादोजी कोंडदेवांनी आपली हयात महाराजांची सेवा करण्यात घालविली त्यांचे चांगलेच पांग फेडतोय आपण. यांच्या डोक्यात हे शिरत नाही आहे की ते त्यांचा पुतळा काढून जेम्स लेनच्या म्हणण्यालाच पुष्टी देत आहेत. हा पुतळा का काढला असे जर भविष्यात विचारले तर काय सांगणार गायकवाड ? असो वाचूया............. १ जावळीचे मोरे २ यशवंतराव वाड्वे ३ मुधोळचे घोरपडे ४ सिधोजी पवार ५ मंबाजी भोसले ६ मालोजी पवार ७ तुळोजी पवार ८ मनाजीराजे घाट्गे ९ बाळाजी हैबतराव १० बजाजी राजे नाईक निंबाळकर ( महाराजांचे सख्खे मेव्हणे) ११ माने ( विजापूर) १२ संभाजी मोहिते ( सावत्र मामा) १३ नाईकराजे पांढरे १४ खंडोजी खोपडे ( मावळ) १५ जगदाळे देशमूख ( मसूरचे) १६ शंकराजी मोहिते १७ नाईकजी खराटे १८ कल्याणजी यादव १९ सरदार सर्जेराव घाटगे २० सूर्यराव सूर्वे ( श्रूंगारपूर) २१ पालवणीचे जसवंतराव २२ संवतवाडीचे राजे भोसले २३ गोंदाजी पासलकर २४ केदारजी देशमूख खोपडे २५ सुरजी गायकवाड २६ दिनकरराव काकडे २७ संभाजीराव पवार २८ कमळोजीराव कोकटे २९ त्रंबकराव खंडागळे ३० कमळोजीराव गाडे ३१ अंताजीराव खंडागळे ३२ त्रंबक्जीराजे भोसले ( भाऊबंद) ३३ जिवाजीराजे भोसले ( भाऊबंद) ३४ बाळाजीराजे भोसले ( भाऊबंद) ३५ परसोजीराजे भोसले ( भाऊबंद) ३६ माहूरचे उदाराम भोसले ३७ सिंदखेडचे दत्ताजीराजे जाधवराव ३८ रुस्तूमरावराजे जाधवराव ३९ संभाजीराजे स्वतः ( दिलेरखान) अजून्ही बरेच् आहेत, पण जाऊदेत.... हे सर्व त्या काळातील मोठे सरदार होते. हे नुसते स्वार्थासाठी महाराजांविरूध्द लढले नाहीत तर त्यांनी आपल्या सैन्यातल्या सर्व मराठ्यांना महाराजांविरुध्द लढायला लावले. महाराजंची मला वाटते निम्म्याच्या वर शक्ती यांच्याशी लढण्यातच खर्ची पडली असणार. महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत ब्राह्मणांचा असा इतिहास नाही आणि पुढेही नाही. शाहूमहाराजांच्या काळात तर त्यांच्या विरूध्द असंख्य मराठा सरदार होते. त्यांची यादी तर आपल्याला अचंबितच करेल. उरला प्रश्न पेशव्यांचा. शाहू महाराजांना पेशवे पदाच्या लायक दुर्दैवाने एकही मराठा सरदार सापडला नाही हे सत्य आहे. दुसरे म्हणजे शाहू महाराजांचा त्यांच्या एकाही सरदारावर विश्वास नव्हता. पुढे शाहूमहाराजांचे सर्व सरदार केव्हा ना केव्हा तरी कुठल्या तरी कारणाने शाहू महाराजांशी लढले पण पेशवे शेवट पर्यंत त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले. त्या मुळेच पेशव्यांचे संस्थान नाही. इंदूर नाही, ग्वाल्हेर नाही आणि बडोदाही नाही. पेशवे सारखे कर्जबाजारी रहायचे त्याचे मूख्य कारण म्हणजे त्यांनी भारतभर चालवलेल्या मोहिमा. त्या मोहिमेसाठी शाहूमहाराज त्यांना पैसे देत नसत. उलट मोहिमेवरून आल्यावर त्यांना ठराविक खंडणी शाहूराजांना द्यावी लागे. त्यामुळे त्यांनी शनिवार वाड्याला पैसे दिले हा दावा हास्यास्पद आहे. असो. त्या काळात या लोकांना जसे वागावे लागले तसे ते वागले त्या बद्दल त्यांना दोष देता येणार नाही. ज्या प्रमाणे आपण हा विचार या महाराजांच्या विरूध्द कारस्थाने करण्यार्‍या सरदारांबाबत आणि त्यांच्या जातीतल्या सध्याच्या समाजाबाबत करतो, तर एका मूर्ख माणसाने महाराजांबद्द्ल काहिही घाणेरडे लिहिले म्हणून ज्या माणसाने आपले आयूष्य महाराजांना वाहिले आणि ज्या माणसाबद्द्ल प्रत्यक्ष महाराजांना आदर होता त्यांच्या बद्द्ल अशी वागणूक आपल्याला शोभा देत नाही. आणि ते सुध्दा का ? या मूठ्भर क्षुद्र राजकारण्यांसाठी आणि त्यांच्या स्वार्थासाठी. उद्या कोणीही उठेल आणि काहिही लिहील मग काय करणार................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
व
विसोबा खेचर गुरुवार, 08/26/2010 - 17:54 नवीन
महाराजंची मला वाटते निम्म्याच्या वर शक्ती यांच्याशी लढण्यातच खर्ची पडली असणार.
सहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ट
टग्या टवाळ Fri, 08/27/2010 - 09:22 नवीन
जयंत कुलकर्णी मी आपल्या लेखनाशी पुर्ण सहमत आहे. मोहिमेवरून आल्यावर ठराविक खंडणी शाहूराजांना द्यावी लागे हे आपण सांगितले त्या व्यतिरीक्त शाहूराजांना अजुन काय द्यावे लागे ह्याचा उल्लेख झाला असता तर बरे झाले असते. असो पुठे कधी तरि ह्याचा उल्लेख आमच्याच लेखनांत होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
म
मृत्युन्जय Fri, 08/27/2010 - 09:28 नवीन
अजुन काय द्यावे लागे म्हणजे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या टवाळ
म
मालोजीराव Fri, 08/27/2010 - 12:34 नवीन
१५ जगदाळे देशमूख ( मसूरचे)
सहमत ! कुलकर्णी काका आमचं नाव टाकल्याबद्दल धन्यवाद, चला कुणीतरी आमचा उल्लेख केला ! तुम्ही दिलेली यादी सुद्धा बरोबर आहे, पण यातील बहुसंख्य सरदारांनी समोरासमोर शत्रुत्व पत्करला होता (आम्हीपण ) तुम्ही यादी देताना फक्त स्वराज्यात राहून गद्दारी आणि फसवणूक करणाऱ्यांची द्यायला हवी होती. (उदा. शिर्के ,खोपडे ई. ) कारण नंतर याच जाधवराव ,निंबाळकर ,गायकवाड ,पवार ई. नि स्वराज्यासाठी नंतर च्या काळात अफाट पराक्रम केला होता. आणि आमचं शत्रुत्व प्रतापगड युद्धानंतर संपुष्टात आलेला होतं (प्रतापगड युद्धात भाग घेतल्याबद्दल मी पूर्वजांकडून दिलगिरी व्यक्त करतो :) ) पण तुमच्या गोष्टीशी सहमत आहे कि बरेच मराठे महाराजां विरुद्ध लढले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ज
जयंत कुलकर्णी Fri, 08/27/2010 - 16:09 नवीन
सरदार मालोजीराजे जगदाळे, मराठ्यांविषयी मला वाटणारा आदर माझ्या सर्व लेखनात आपल्याला आढळून येईल. मला असा आदर का वाटतो याची कारणेही मी त्या त्या वेळी माझ्या प्रतिसादात दिलीच आहेत. यातले एक प्रमूख कारण म्हणजे या महाराष्ट्राचे जे काही चांगले वाईट व्हायचे आहे ते मराठ्यांच्या हातूनच व्हायचे आहे. वरच्या यादीतले सरदार समोरासमोर लढत होतेच पण वाईट म्हणजे कट कारस्थानात मोगलांना सामील होते. खरे तर त्यात त्यांची काहीच चूक नव्हती. हे सर्वजण महाराजांइतकेच शूर होते. ( तुम्हाला खूष करण्यासाठी हे म्हणत नाही आहे) आणि त्यांचे स्पर्धकही होतेच. महाराजांचे वडील जर मुसलमानांचे सरदार होते तर बाकिचे पण असल्यास कुणाला काही म्हणता येईल असे वाटत नाही. माझा प्रतिसाद ब्राह्मणांचा उल्लेख ज्याप्रमाणे करण्यात आला त्याला उद्देशून होता. अर्थात शेवटी मला जे नेहमी म्हणायचे होते ते मी म्ह्टले होतेच. मला आशा आहे आपण माझे मराठा लाईट इन्फ़ंट्रीवरची लेखमाला वाचली असेल. नसेल तर ती येथे आहे. तसेच मी पवारांच्या लेखावर दिलेली एक प्रतिक्रियाही जरूर वाचा. ती येथे आहे. पुढचे भाग माझ्या ब्लॉगवर आहेत. (www.jayantpune.wordpress.com ) मुद्दा असा आहे की इतिहासात घडून गेलेल्या गोष्टींकडून आपण फक्त शिकायचे असते नाहीतर माझे नेहमीचे वाक्य आहेच - History is a Dangerous Past. राहिला प्रश्न दिलगिरीचा. :-) त्याची खरंच आवश्यकता नाही, का, ते कारण मी वरच्या प्रतिसादात ( link) दिले आहे. ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
म
मितभाषी Sun, 08/29/2010 - 07:51 नवीन
माझ्या मते मराठी दौलतीची खरी इभ्रत ज्यांनी घालवली त्या मराठा सरदारांची ही पहा खाली यादी. या सर्व सरदारांनी महाराजांच्या विरुध्द कटे कारस्थाने करण्यात व त्यांच्या (महाराजांच्या) विरूध्द मोगलांना व मुसलमानांना मिळून लढण्यात धन्यता मानली. बहुजनसमाज जे कॄत्य करतो ते अज्ञानामुळे करतो. ब्राह्मण प्रत्येक गोष्ट जाणिवपूर्वक करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
म
मृण्मयी दीक्षित Fri, 09/03/2010 - 07:37 नवीन
जयंतजी तुमच्याशी पूर्णतः सहमत. मी पानिपत हि वाचले आहे आणि त्या एकाकी लढ्यात देखील पेशव्यांना न मराठी कामी आले न प्रतिबद्ध जाट व राजपूत.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
V
vinitraje Mon, 10/04/2010 - 10:04 नवीन
१) कृष्णा भास्कर कुलकर्णी २) राज्याभिषेकाला विरोध करणारे ब्राम्हण ३) दिलेरखान जिंकावा म्हणून यज्ञ करणारे ब्राम्हण ४) आदिलशहा विरोधात पुंडाई करू नये म्हणून पत्र लिहिणारा कोंडदेव ५) नेताजी पालकर ला हिंदू धर्मात पुनःप्रवेश देण्यास विरोध करणारे ब्राम्हण ६) शुद्राच्या हाताखाली काम करतोय असे म्हणणारा मोरोपंत पिंगळे ७) शाहिस्तेखानाकडून लढणारी रायबाघीन ८) मिर्झाराजे जयसिंगाचा सचिव उदयराज ९) औरंजेबाचा प्रधान रघुनाथदास १०) औरंगजेबाचा शिवनेरीवरचा किल्लेदार आबाभट ११) सिद्दीला मदत करणारा मुरुड-नांदगाव येथील जोशी १२) बापूखानाला मदत करणारा नागोजी पंडित १३) राज्याभिषेक प्रसंगी स्वराज्याचा पैसा लुटणारा गागाभट्ट १४) शिवाजी-व्यंकोजी यांच्यात भांडणे लावणारा रघुनाथपंत हणमंते १५) हैदराबादचे बादशहाचे अधिकारी मादन्ना-आकन्ना १६) संभाजीराजांना मुगलांच्या ताब्यात देणारा कवी कुलेश १७) शिवशक बंद करून फसली शक सुरु करणारे पेशवे आणि आताचे latest शिवद्रोही: १) तारीख तिथीचा वाद निर्माण करणारे पुरंदरे आणि साळगावकर २) खोटा इतिहास, कादंबर्‍या लिहिणारे य.दि.फडके ३) जेम्स लेनला मदत करणारे भांडारकरी ब्राम्हण ४) संभाजीराजांविषयी कथा, कादंबर्‍या, चित्रपट यातून चुकीचा इतिहास पसरवणारे ब्राम्हण ५) शिवरायांचा मृत्यू अन्थ्रेक्स ने झाला असं पसरवणारा निनाद बेडेकर ह्याचं नावही जोडायला पाहिजे… हि लिस्ट अत्यंत मोठी आहे स्थलाअभावी पूर्ण देता येत नाही…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ज
जयंत कुलकर्णी Mon, 10/04/2010 - 10:56 नवीन
मी इथे दिलेला प्रतिसाद स्वतःहून काढत आहे. कारण यावर कोणी उत्तर देऊ नये असे मी सुचवले होते आणि मीच लिहीले हा विरोधाभास नको. स्त्याशोधक, फक्त एकच गोष्ट लक्षात असू द्या. ब्राह्मणांनी कोणाचेही पुतळे काढा असा आग्रह धरलेला नाही. :-) असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vinitraje
अ
अर्धवटराव Tue, 10/05/2010 - 22:49 नवीन
थोडं करेक्शन... १४) शिवाजी-व्यंकोजी यांच्यात भांडणे लावणारा रघुनाथपंत हणमंते -- व्यंकोजी नेहमी आदिलशहाशी इमानी राहिला. हणमंते इतका हुशार नक्कीच नव्हता कि ज्यामुळे भावा-भावात, तेही शिवाजी सारख्या राजाच्या मनात कलह निर्माण करेल १५) हैदराबादचे बादशहाचे अधिकारी मादन्ना-आकन्ना -- शिवाजी आणि संभाजीला शिवशाही + आदिलशाही + कुतुबशाही अशी मुघलांविरुद्ध आघाडी करायला मादण्णा-आक्कांणांनीच मदत केली. त्यांचा खुन झाला आणि कुतुबशाही पडली. परिणामी स्वराज्याच्या गळ्याला नख लागलं १६) संभाजीराजांना मुगलांच्या ताब्यात देणारा कवी कुलेश -- संभाजीला गणोजी शिर्केनि पकडुन दिले. कवी कलश संभाजी सोबत मृत्युच्या उंबरठ्यापर्यंत सावलीसारखा होता. बाकी चालु द्या (इतीहासप्रेमी) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vinitraje
ट
टग्या टवाळ गुरुवार, 08/26/2010 - 13:14 नवीन
प्रथम मि तुम्हाला सांगतो प्रत्येक माणुस हा स्व कक्तुत्वाने मोठा होत असतो. आता नेत्याच म्हणाल तर.............................. १) मायावती - ज्या आपलेच पुतळे उभारण्यात गुंग आहेत (ब.स.प मध्ये आजही मायावती नंतर सतीश मिश्रां च वजन जास्त आहे ) २) आठवले सैब - ते काय बोलतात हे कुणालाच कळत नाही.(सोनीया गांधी च्या मागे फोटोत दिसण्या साठी धडपड करण्यात धण्यता मानणारे ) ३) काशीराम :- ० तुन पक्श उभारणारे अतभुत व्यक्तिमत्व. ( मात्र त्यांच्या मागे कीति बहुजन उभे राहिले हे तुम्हीच सांगा) ४) छगनभौ - तळ्यात मळ्यात असलेले नेते (शिवसेना सोड्ल्या पासुन ते अशेच आहेत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
य
येडबंबू गुरुवार, 08/26/2010 - 12:03 नवीन
आत्ताच हाती आलेल्या बातमी प्रमाणे ... 'तो' पुतळा हलवू नये म्हणून संभाजी ब्रिगेड च्या लोकान्नी लय राडा केला आहे म्हणे. आणी आता समीती स्थापन करून निर्णय घेणार आहेत. लोकशाही जिंदाबाद :) ---
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी गुरुवार, 08/26/2010 - 12:29 नवीन
हा हा हा! "अम्हा घरी धन" यांनी इथे प्रतिसाद दिल्यापासून सध्याच्या स्थितीला मिपावरील "पाहुण्यां"ची संख्या वाढतच चाललीये! ... सध्या १३९ पाहुणे "कार्यरत" आहेत हो! ..वाढूही शकतो हा आकडा! अर्ध्या तासापूर्वी ७५-८० पाहुणे होते! बरंच फास्ट नेटवर्किन्ग दिसतंय !!! ;) ;) ;) (लाल महाल सोडून सगळे इकडे काय करत आहेत बरं!! ... की "पाहुणे" मुम्बै'चे आहेत ? "भैय्या पाटलां"नी पाठवलेले) ;) ;) ;) मिपा- जोरात आहे!!! आज! ! !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: येडबंबू
आ
आम्हाघरीधन गुरुवार, 08/26/2010 - 12:57 नवीन
=) निरर्थक उक्तिवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/26/2010 - 13:08 नवीन
=)) =)) उक्तीवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आम्हाघरीधन
न
नावातकायआहे गुरुवार, 08/26/2010 - 12:56 नवीन
>>सध्या १३९ पाहुणे "कार्यरत" आहेत हो! ..वाढूही शकतो हा आकडा! आत्ता १५६.....
  • Log in or register to post comments
ब
बेभान गुरुवार, 08/26/2010 - 13:18 नवीन
त्यातून ही बातमी हातात लागली. सरळ आहे जिथे पैसा तिथे साहेब. अरे इथल्या समस्यांच काय..? साहेबांच चप्पलफेकीपासून संरक्षण हो. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प: १०४६९८ कोटी रु. क्षेत्रफळ :३०७६९० चौ. कि.मी. लवासा : ७३००० कोटी रु. क्षेत्रफळ :१०० चौ. कि.मी. श्रीकृष्णानं अधर्म, पापाचा नाश करण्यासाठी पुन्हा अवतार घेण्याचं वचन काय दिलं. या राजकारण्यांना, राज्यकर्त्यांना त्याची घाई झालेली दिसते.
  • Log in or register to post comments
प
प्रशु गुरुवार, 08/26/2010 - 15:36 नवीन
लवासाचे प्रकरण गाजत असतानाच हे प्रकरण कसे काय सुरु झाले???
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 08/26/2010 - 15:39 नवीन
लवासाला लोकांनी विसरावे म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशु
अ
अवलिया गुरुवार, 08/26/2010 - 15:45 नवीन
आमची तर मागणी आहे की मागचा सगळा इतिहास हा खोटा असुन भारताचा खरा इतिहास हा इ.स. १९२० पासुन सुरु होतो. त्याच्या आधीच्या सर्व खुणा पुसुन टाकल्या पाहिजेत. गो-या इंग्रजांनी काळी माकडे घेवुन त्यांवर प्रयोग करुन काळी माणसे तयार केली ज्यांना लोक भारतीय असं म्हणतात. २०-२५ वर्षे झाल्यावर महात्मा गांधीजींच्या (कानाच्या पाळीला हात) प्रयत्नाने ब्रिटिश इंग्लंडमधुन भारताचा कारभार पाहु लागले. पण काही मुर्ख आणि अर्धवट लोकांना भारताला स्वातंत्र्य मिळाले असे वाटते. अहो पारतंत्र्य नव्हतेच तर स्वातंत्र्य कुठ्ले मिळणार? गप्पा नुसत्या तंमाखु खाउन पचापच थु़कणार्‍यांच्या ! तरी बरे आमच्यासारखे काही विचारवंत त्यांना शहाणे करत आहेत. येईल ! यश येईल प्रयत्नांना !! लवकरच हा खरा इतिहास आम्ही लोकांसमोर आणणार आहोत ... नक्की वाचा "भारतीय इतिहासाची चंदेरी पाने अर्थात भारत एक समृद्ध वसाहत " मागणी नोंदवा .. आज मागणी नोंदवणार्‍यास आमच्या सहीसह पहिल्या आवृत्तीची प्रत बिना पोस्टेज खर्चाची २० टक्के सवलतीत.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट गुरुवार, 08/26/2010 - 15:47 नवीन
मागणी नोंदवली आहे. त्या समीतीवर येण्यासाठी काय करावं लागेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 08/26/2010 - 15:47 नवीन
कॉम्प्लिमेंटरी कॉपीची लाईन कुठे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
छ
छोटा डॉन गुरुवार, 08/26/2010 - 16:14 नवीन
अवलियांच्या सपुर्ण प्रतिसादाशी सहमत. हे पुस्तक बाजारात यावे हीच इच्छा !!! सदर पुस्तकास आम्ही "प्रस्तावना" लिहु असे कबुल करतो, "लोकशाही म्हणजे काय?" ह्यावर आमची आणि नानाची एकदा चर्चा झाली होती, त्याचाही ह्या पुस्तकात उल्लेख येईल अशी अपेक्षा. आणि हो, प्रकाशानपुर्व मागणी नोंदवत आहे. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
म
मृत्युन्जय गुरुवार, 08/26/2010 - 16:23 नवीन
"ब्राह्माण - जगण्याची एक समृद्ध अडगळ" असा उपसंहार वाटल्यास आम्ही पण लिहु. तेवढे आमचे पण नाव समितीत टाका की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/26/2010 - 19:32 नवीन
सदर पुस्तकास आम्ही "प्रस्तावना" लिहु असे कबुल करतो,
सदर पुस्तक प्रस्तावनेशिवाय बाजारात येईल असं सरळच लिहा की! असो. डान्राव किंवा बिकांची प्रत घेऊन वाचेन मी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 08/27/2010 - 04:46 नवीन
अवलियाजी, आपल्या उपक्रमासही आमचा पाठिंबा आहे. चला तुम्हालाही एक ओसरी दिळी शनिवारवाड्याची. किंवा झालंच तर तो पुतळा काढून झाला की ती रिकामी जागा आहे तिथं राहुटी बांधून देऊ. तिथे तुमची साधना चालूदे. पाहीजेच तर सरकारातून शिधा आणि सोवळ्यात स्वैकाक करणारा आचारी देऊ. उदंड साहित्य निर्मीती करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अर्धवटराव Fri, 08/27/2010 - 00:42 नवीन
सदा सर्वकाळी एतद्देशियांनी एकमेकांचे उणे दुणे काढुन, पाय ओढुन आत्मघात करुन घेतला... स्वातंत्र्यप्राप्ती नंतर अवघा हिंदुस्तान (आणि हिंदु विशेषकरुन) एक होइल/व्हावा अशी आशा स्वा. सावरकरांसारख्याना वाटली. पण हि हजारो वर्षाची सवय आहे हो. हे वाकडे शेपुट सरळ होणे नाहि. पण शिव-समर्थ भक्त या प्रसंगाला पुरुन उरतील. तयारीला लागा. (दुरुन मजा पाहणारा) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Fri, 08/27/2010 - 01:53 नवीन
वसुंधरा माझा ग्रह आहे. सारे वसुंधरा वासी माझे बंधू भगिनी आहेत, माझ्या वसुंधरेवर माझे प्रेम आहे. माझी वसुंधरा महान. माझ्या वसुंधरेशी एकनिष्ठ राहण्याची पात्रता (लायकी) माझ्यात यावी म्हणून मी नेहमी प्रयत्नशील राहील.
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Fri, 08/27/2010 - 07:45 नवीन
पण जेम्स लेन आणि एका विकृत विनोदाची पार्श्वभूमी या वादाला आहे , म्हणून तो पुतळा याला खतपाणी घालतोय असा बर्याच लोकांच मत आहे . दादोजीन चा पुतळा तेथून काढू नयेच, पण ते शिल्प अधिक widescope करावा आणि त्यात शहाजीराजे, कान्होजी जेधे, बाजी पासलकर यांचीही शिल्पे अंतर्भूत करावीत , म्हणजे आपोआपच दोन्ही बाजूंचे वाद शमतील आणि तोडगा निघेल ! यावर तुमचे मत काय आहे !
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Fri, 08/27/2010 - 08:07 नवीन
घ्या. उद्या दुसरा कोणी जेम्स लेन त्यातुनही काही विकृत विनोद निर्माण करणार नाही किंवा कुठली राजाराम ब्रिगेड काही धुमाकुळ घालणार नाही याची काही खात्री आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
म
मालोजीराव Fri, 08/27/2010 - 08:29 नवीन
विकृत विनोद तयार करणारी माणसे पण आपलीच आणि जेम्स लेन ला माहिती पुरवणारी पण मनसे आपलीच ! हि विकृती पसरण्याच्या आतच थोपवायला हवी ! शेवटी इतिहास हा भुतकाळ असला तरी तोच भविष्य घडवतो ..! पेशवाईत कोणीही उठसुठ बखरी लिहिल्या आहेत आणि त्यावर प्रकाश टाकणे गरजेचे सुद्धा आहे असा इतिहास संशोधक आणि सरकारचाही मत आहे ! हा आपलाच इतिहास आहे , त्याला आपण नाही जपायचा तर कोणी जपायचा , सो पुढे काय होईल यावर चर्चा करण्यापेक्षा आताच्या वादावर तोडगा काढायला हवा कि नाही (दोन स्पेसिफिक जातींचा वाद बाजूला ठेवून :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Fri, 08/27/2010 - 08:38 नवीन
उठसुट म्हणजे कोणी ते कळु शकेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 08/27/2010 - 08:14 नवीन
१. हा ही उपाय चांगला आहे. मूळात दादोजी कोंडदेव शिवाजीमहाराजांचे शिक्षक होते, रामदास आणि शिवाजी यांच्यातही दृढ संबंध होते असं मानणारा मोठा समुदाय महाराष्ट्रात आहे. याची जाणीव ठेवायला हवी. २. या लोकांची जी काही संशोधनं आहे ती बहुतेक समाज मानणारच नाही म्हणून म्हणून हा दंडेलशाहीचा मार्ग अवलंबला जात आहे. दोनशे लोक रस्ता अडवून बसणार आणि म्हणणार हे काढा आणि ते पाडा हे सगळ्यात वाईट आहे. २०० लोक म्हणजे काही संपूर्ण समाज नव्हे. जर शिवगुरु दादोजींचा पुतळा काढल्याने सर्वच प्रश्न सुटणार असतील चालण्यासारखे पण ते होणार नाही. तसे होणार असेल तर मी तर म्हणेन पुण्यातले सगळेच पुतळे काढून टाका अगदी सावरकरांपासून सणसापर्यंत सगळ्यांचे. पण ते होणार नाही. लवासासारख्या मुद्यांवरून लोकांचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी चाललेला हा सारा खटाटोप आहे. कारण त्या तथाकथित आंदोलनात सहभागी असलेले लोक एकाच भागातून आणलेले वाटत होते. (आणि तसे वेष पुण्यात तरी कोणी येवढ्या मोठ्या प्रमाणात वापरत नाहीत. ते पुण्याबाहेरचे शेतकरी लोक असावेत. एकतर त्यांना फसवून आणले किंवा पैसे देऊन आणले). त्यामुळे ते २०० लोक म्हणजे समाज नव्हे. ३. पुण्यात असलेल्या पुतळ्याचं काय करायचं हे पुण्यातले लोक ठरवतील त्यावर बाहेरच्या कोणी काही दबाव आणण्याचे कारण नाही. अन्यथा हे आज पुतळा पाडणारे लोक उद्या शनिवार वाडा पाडायला निघतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
प
प्रकाश घाटपांडे Fri, 08/27/2010 - 08:40 नवीन
लवासासारख्या मुद्यांवरून लोकांचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी चाललेला हा सारा खटाटोप आहे.
सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
ब
बेभान Fri, 08/27/2010 - 09:46 नवीन
हे माहिती असेल तर "साप भी मरें और लाठी भी ना टूटे" (Disclaimer: हा साप हा मनुष्यरुपी असुन याचे काम स्वार्थासाठी समाजातल्या काही मनुष्यरुपी गुंड उंदरांना सोबत घेवुन भ्रष्टाचाराचे विष पसरविणे आहे. बाकी आम्हांस ख-या सर्पांविषयी आदर आहे.) असं काही करता येईल काय? पुतळ्याच्या राजकारणावर चर्चा करणे म्हणजे त्यांच्या विषारी रोपट्याला खतपाणी घालण्यासारखे आहे. सुशिक्षीत शहाण्या ब्राम्हण-मराठ्यांनी वेळीच सावध होवुन आपापसात न लढता यावेळी समाजकंटकांना धडा शिकवणे गरजेचे आहे. [चांगले वागणे, चांगले असणे, सुसंकृत असणे हा कुठल्याही जातीचा, धर्माचा, देशाचा मक्ता नाहीये. सर्व जातीत, धर्मात, देशात चांगली माणसे आहेत, नीचसुद्धा आहेत. गुणाला गुण म्हणताना मन मोठे करायला हवे. दोषाला दोष देतानाही हिंमत दाखवायला हवी! 'जातीसाठी माती खावी' या म्हणीसारखा आपल्या जातीच्या लोकांचा वाईटपणा झाकून ठेवण्याचा दांभीकपणा आणि हिनपणा कुठेही नसेल.] जगन्नाथ कुंटे यांच्या नर्मदे हर हर मधुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
म
मालोजीराव Fri, 08/27/2010 - 10:39 नवीन
सुशिक्षीत शहाण्या ब्राम्हण-मराठ्यांनी वेळीच सावध होवुन आपापसात न लढता यावेळी समाजकंटकांना धडा शिकवणे गरजेचे आहे.
विचारांना विचारांनीच मारल पाहिजे ! जर काही चुकीचा असेल तर सरकार इतिहास संशोधकांची समिती नेमून निर्णय घेईलच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेभान
इ
इन्द्र्राज पवार Fri, 08/27/2010 - 09:08 नवीन
"रामदास आणि शिवाजी यांच्यातही दृढ संबंध होते असं मानणारा मोठा समुदाय महाराष्ट्रात आहे." सुमारे ८० प्रतिसादामधील सर्वात शहाणपणाचा (आणि समंजसपणाचा) श्री.पु.पे. यांचा हा प्रतिसाद. मागील जनगणनेत महाराष्ट्राची लोकसंख्या ९ कोटी ६८ लाख नोंदविली गेली आणि समाजनिहाय एक निष्कर्ष असा निघाला की, या जवळपास दहा कोटीच्या लोकसंख्येत "मराठा (आणि कुणबी)" समाज ४० टक्के आहे. याचाच अर्थ अदमासे पावणेचार कोटी मराठ्यांपैकी "पुतळे काढा, फोडा, इतिहास जाळा, ग्रंथभांडारांचा विध्वंस करा" आदी नाझी परंपरा चालविण्याची खुमखुमी असणारे पाऊणहजार वेगळे केले तर बाकीचे ९९% पेक्षा जास्त मराठे "रामदास आणि दादाजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते, दैवत होते" हेच मानतात. मुंबई-पुणे वगळता अगदी कालपर्यंत लेनलागण राज्याच्या बाकीच्या ३५ जिल्ह्यांना शिवलीदेखील नव्हती. पण जातीचे कावेबाज राजकारण करण्याचे विलक्षण कसब असलेल्या मुरब्बींना महाराजांविषयी बेगडी प्रेम दाखवायला एक आयते कोलित मिळाले (ज्याला टीआरपीची खाज असलेल्या वाहिन्यांनी सुफला खत घातले), आणि त्याचे परिणाम काय होत आहेत हे आपण पाहतच आहोत. मिपावर या विषयांवर वारंवार चर्चा होत आहेत. धागे आणखीनही निघतील आणि वाभाडे काढणारेही बाह्या सरसावून आपली मराठी भाषा धारदार करीत राहतील. तेव्हा विनंती एकच की, संभाजी ब्रिगेड वा त्या प्रणालीचे समर्थन करणारे म्हणजेच "समस्त मराठा समाज" अशी गृहितके कृपया मांडू नका. शिवाजी महाराजांना मानणारा जसा ब्राह्मणवृंद आहे तसाच सावरकरांना मानणाराही मराठा वर्ग आहेच आहे. इन्द्र पवार
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Fri, 08/27/2010 - 09:47 नवीन
इन्द्र पवार यांच्याशी सहमत !
|संभाजी ब्रिगेड वा त्या प्रणालीचे समर्थन करणारे म्हणजेच "समस्त मराठा समाज" अशी गृहितके कृपया मांडू नका
कोळसे पाटील यांसारख्या माणसाने ज्यांनी enron , daw , लवासा सारख्या जिव्हाळ्याच्या आणि लोकहिताच्या प्रश्नामध्ये शांततेनी लढा दिला त्यांनी तोड फोडी ची भाषा करणं पटलं नाही. यातून काहीच सध्या होणार नाही उलट राज- युपी बिहारीन सारखे संबंध ब्राम्हण- ब्राम्हणेतर यांचे होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
ज
जयंत कुलकर्णी Fri, 08/27/2010 - 10:47 नवीन
पवार साहेबांशी एकदम सहमत. मला फक्त कळत नाही आहे हे ९९ % पेक्षा जास्त संख्येने असलेले मराठे काय करत आहेत ? त्यांना या नतद्रष्टांना आवरायला कितीसा वेळ लागणार ? का करत नाहीत ते तसे ? खोटे लाख वेळा संगितले की पुढच्या पिढीला तेच खरे वाटू लागेल. तो पर्यंत फार उशीर झालेला असेल. हिच काळजी आहे. www.jayantpune.wordpress.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
इ
इन्द्र्राज पवार Fri, 08/27/2010 - 11:52 नवीन
"मला फक्त कळत नाही आहे हे ९९ % पेक्षा जास्त संख्येने असलेले मराठे काय करत आहेत ?" श्री.जयंतराव, सहमतीबद्दल धन्यवाद. आता या तुमच्या वरील प्रश्नासाठी माझी (उत्तर नसले तरी) भूमिका अशी राहिली आहे की कोणत्याही समस्येकडे (भले ती राजकारणाशी संलग्न असो वा समाजकारणाशी) पाहताना माझ्यासारखी व्यक्ती ती घटनात्मक मर्यादांच्या बाहेर गेलेली नाही हे प्रथम पाहणे, यास प्राधान्य देते. संभाजी वा जिजाऊ ब्रिगेडच्या दृष्टीने हा कचखाऊ धोरणाचा भाग झाला, त्यांच्या या मताचे परिवर्तन त्यांच्या भाषेत वा कृतीत मी करू शकणार नाही कारण परत तेच...मी घटनेचे पावित्र्य मानतो. याच चौकटीत राहून रचनेचे कोन सांभाळण्यासाठी मला (व माझ्या विचारांशी सहमत असलेल्या अनेकाना) कोणते पाऊल उचलणे शक्य आहे याचा लेखाजोखा केल्यानंतर मी "ब्रिगेडची भूमिका किती चुकीची आहे" याबद्दल अगदी ज्ञानेश महाराव, अ.ह.साळुंखे ते पुरुषोत्तम खेडेकर यांच्याशी त्या त्या वेळी पत्रव्यवहार केला आहे. श्री.साळुंखे यांचे कोल्हापुरात ज्या ज्या वेळी व्याख्यानानिमित्ताने आगमन होते त्या त्या वेळी नेमस्त मार्गानेदेखील जटील प्रश्नांची उकल काढता येते का याबाबत सविस्तर चर्चा केल्या आहेत (अगदी ब्रिगेड सदस्यांच्या गराड्यात). असे जरी असले तर तुम्ही जाणू शकता की तुमच्यासारखी एखादी सरळमार्गी अभ्यासू व्यक्ती अशा चर्चेत कधीही "हमरीतुमरी" वर येऊ शकत नाही, किंबहुना तो तुमचा उद्देश कदापिही असू शकत नाही. निष्कर्षाप्रत जरी चर्चा आली नाही तरी अनेक "मराठ्यांचे" मी प्रतिनिधीत्व करीत होतो हे श्री.साळुंखेसारख्या नेत्यांना पटले तरी मी बरेच कमावले असे मानेन. वरील अनेक प्रतिसादात "शरद पवार" यांचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष उल्लेख आला आहे. त्यांची भूमिका ही (कोणत्याही विषयावर) कायमपणे एका राजकीय पुढार्‍याच्या प्रतिमेशी सुसंगत राहिली आहे पण म्हणून शरदराव समस्त "मराठा लॉबी" ची प्रतिमा आहे असे मानणे म्हणजे स्वतःचीच फसगत केल्यासारखे आहे. मी स्वतः "पवार" असूनही गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करण्यात पुढाकार घेतला होता कारण स्थानिक कॉन्ग्रेसच्या नेत्यांनी तथाकथीत "राजघराण्या"चे चालविलेले कोडकौतुक. आमचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाला. पण पुढे याच शिवसेना आमदाराने बेळगावच्या कन्न्ड वेदिकेच्या (सीमा प्रश्नांबाबत कोल्हापुरात चर्चेला आले होते त्यावेळी) दोघा पदाधिकार्‍यांना 'झी स्टुडिओ' मध्ये गुंडशाहीने ठोकले होते त्यावेळी आमदारांचा निषेध करण्यास पुढे मी आणि माझे मित्रच होतो. इतकेच काय पण त्या जखमी कार्यकर्त्यांना स्थानिक दवाखान्यात योग्य ते उपचार होऊन त्यांना सुखरूपपणे बेळगांवी पाठविण्याची दक्षता घेण्यार्‍यांसमवेत होतो. (इथे "दक्षता घेणारे" अनेक मराठेच होते हेदेखील सांगतो.) थोडक्यात हे जे ९९% आहेत ते सनद्शीर मार्गाने जे काही करता येण्यासारखे आहेत ते करीत असतात आणि मला वाटते ते एका सुजाण समाजातील सामंजस्याचे लक्षण आहे. धन्यवाद. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
क
कापूसकोन्ड्या Fri, 08/27/2010 - 15:00 नवीन
हे ९९% बद्दल थोडेसे माझे विचार असे आहेत. हे लोक सर्व प्रांतात आणि सर्व समाजात असतात.हे निसर्गदत्त शहाणपण येते कोठून? हा एक मोठ्ठा जगन्नाथाचा रथ आहे. कुणाचे ऐकावे आणि कुणाचे नाही हे त्यांना बरोबर समजते. भारतीय राजकिय व्यवस्थे मध्ये तीच एक समाधानकारक बाब आहे.आणि त्याचा आपणा सर्वाना आभिमान हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
ज
जयंत कुलकर्णी Fri, 08/27/2010 - 16:27 नवीन
इंद्रराज, आपल्या समंजस भुमिकेचे आणि वस्तूनीष्ट विचारांचे कौतूक मी पूर्वीही जाहीरपणे केलेले आहेच. ते परत एकदा करतो. आपण जर घटनेचा विचार केला तर आपल्याला लोकशाहीवर विश्वास ठेवावा लागेल. जर लोकशाहीवर विश्वास ठेवला तर आपण निवडून दिलेले लोकप्रतिनीधी आपले प्रतिनिधीत्व करतात यावरही विश्वास ठेवावा लागेल. म्हणजे हे लोकप्रतिनिधी जे निर्णय घेतात ते आपणच निर्णय घेतला असे मानले पाहिजे. हे जर खरे असेल तर शालेय पुस्तकातील दादाजी कोंडदेवांचा उल्लेख व त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार जर आपल्या लोकप्रतिनिधींनी रद्द केला तर काय समजायचे ? त्यावेळी किती लोकांनी यांचा विरोध केला ? (सत्तेतल्या ) कोणीही नाही. नाहीतर हा निर्णय झालाच नसता. मग बहुसंख्य जनतेचा याला पाठिंबा होता असेच म्हणावे लागेल. याचाच अर्थ हे वीष जनतेच्या मनात कालवण्यात हे नालायक यशस्वी झाले आहेत. मला हीच काळजी आहे. मला वाटते मला काय म्हणायचे आहे ते मी सांगू शकलेलो आहे. नसल्यास परत प्रयत्न करेन. माझा राजकारणाचा अभ्यास आपल्या एवढा नाही हे मी आत्ताच मान्य करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
म
मृत्युन्जय Fri, 08/27/2010 - 12:12 नवीन
कुलकर्णी साहेब मीदेखील इन्द्राज पवारांशी सहमत आहे. माझे बरेच मराठा मित्र आहेत. त्यातील काही तर अगदी जिवाभावाचे आहेत. कोणीच या संभाजी ब्रिगेड सारखे वांझोटे नाहीत. जातीपातीवरुन राजकारण कोणालाच आवडत नाही. पण त्या ब्रिगेडींच्या नादी कोण लागणार? त्यांना(ब्रिगेडींना) काहीच फरक पडत नाही. ? सामान्य माणुस त्यांना समजावयाला गेला तर ते हमरीतुमरी वर येउन मारामारी करु शकतात. सामान्य माणुस पण मारामारी करु शकतो पण त्याला सार्वजनिक जागेत तमाशा नको असतो. समाजात जसे थोडे गुन्हेगार असतातच. आपण त्यांना जाउन समजावयाचा प्रयत्न करतो का? तसेच ९९% मराठा समाज पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच पसंत करत असणार ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ज
जयंत कुलकर्णी Fri, 08/27/2010 - 16:53 नवीन
नमस्कार ! माझे सर्वच मित्र मराठा आहेत. :-) त्यांचे कुठे आणि काय चुकत आहे हे सांगणे मी माझे कर्तव्य समजतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
क
क्लिंटन Fri, 08/27/2010 - 14:44 नवीन
पवार साहेब आपल्या प्रतिसादाबद्दल आपले आभार मानावेत तेवढे थोडे आहेत.मी कधीच कोणाची जात विचारायला जात नाही पण आपल्याच समाजात लहानाचा मोठा झाल्यामुळे अमुक एक अडनाव म्हणजे अमुक एक जात हे ठोकताळे मला पण कळायची इच्छा नसूनही कळत गेले.तर सांगायचा मुद्दा म्हणजे माझे काही मराठा मित्र आहेत आणि ते विचारी आणि सज्जन असेच आहेत हे वेगळे सांगायला नकोच. संभाजी ब्रिगेड या गुंड संघटनेला जितकी मी नावे ठेवतो तितकीच ते ही ठेवतात.पण अनेक (विशेषत: पुणे २९ आणि ३० यासारख्या भागांमधील) लोकांच्या परिचयात तितक्या प्रमाणात मराठा लोक आले नसतील तर संभाजी ब्रिगेडमुळे त्यांना ’सगळे मराठा संभाजी ब्रिगेड समर्थक’ असेच वाटायचा संभव आहेच ना? यातूनच वातावरण अजून गढूळ व्हायची शक्यता आहे. आधीच जातीपाती, भाषा, पोटजाती आणि इतर अनेक अनंत मुद्द्यांवर आपला समाज विभागला गेलेलाच आहे.त्यात संभाजी ब्रिगेडसारखे महामूर्ख लोक ब्राह्मण विरूध्द मराठा या काल्पनिक वादाला नवीनच तोंड फोडत आहेत. या आणि अशा विविध फाटाफुटींमधूनच भारताच्या शत्रूंचे काम सोपे होणार आहे. त्याला आपल्या प्रतिसादाने आपण उत्तर दिले आहेत.मला वाटते की हाच प्रतिसाद वर्तमानपत्रात प्रसिध्द व्हायला हवा. आपल्या समाजात फाटाफूट पाडायच्या कोणत्याही प्रवृत्तीला असेच उत्तर दिले गेले पाहिजे. क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
क
कापूसकोन्ड्या Fri, 08/27/2010 - 09:49 नवीन
पवार साहेब अगदी बरोबर मांडलेत. उत्तम आणि शांतपणे दिलेल्या प्रतिसादाबद्दल शतशः आभारी आहे.एकूणच प्रतिक्रिया देण्यार्‍या (माझ्या सह) सर्वाना आपण ताळ्यावर आणलेत. तुमच्याविषयी असलेला पूर्वग्रह (चांगला) ध्यानात धरून तुमच्या प्रतिसादाचीच वाट पहात होतो.इतर प्रतिसाद पाहता धागा का काढला असे वाटू लागले होते. पण मग कुणीतरी काढलाच असता ना? असो. आज समाजात तुमच्या सारखे संयत विचार आणि आचार असणारे बहूसंख्य आहेतच म्हणून तर आपण टिकून आहोत. अवांतर लेनलागण हा शब्द खुप आवडला. मनाचे आरोग्य उत्तम असेल तर असल्या रोगांची लागण लवकर होउ शकत नाही.
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार Fri, 08/27/2010 - 11:50 नवीन
"लेनलागण हा शब्द खुप आवडला. मनाचे आरोग्य उत्तम असेल तर असल्या रोगांची लागण लवकर होउ शकत नाही." सहमतीबद्दल मनापासून धन्यवाद ! "स्वाईन फ्लु" किंवा "डेंग्यू" यांची लागण लागते जिच्यावर सुदैवाने मायबाप सरकार कसे का होईना औषधपाणी शोधून काढते, पण "लेन" सारख्या रोगांची लागण आपण स्वतःच लावून घेतो वा आपले बांधवच दारात तिला दावणीला बांधून ठेवून आपल्यालाच विचारतात, "दादा, आत्ता रं काय करायचं?" अशावेळी त्या रोगाची लागण वाडीत पसरू नये म्हणून चूड घेऊन जागच्याजागीच जाळून टाकावी हे उत्तम. (आत्ताच वर काही प्रतिसादात बघा....थोरल्या महाराजांपासून झालेली ही लागण शाहू महाराजांपर्यन्त आली आहे... पुढे कुठे येऊन थांबणार? आणि काय मिळविणार आपण त्यातून?) इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कापूसकोन्ड्या
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा