पुतळे हटवा! इतिहास घडवा !!
💬 प्रतिसाद
(106)
इ
इन्द्र्राज पवार
Fri, 08/27/2010 - 19:31
नवीन
सर्वश्री जयंत कुलकर्णी (ज्यांच्या 'मराठा लाईट इन्फंट्री' मालेचे मी मित्रांत जाहीर वाचन केले होते), , क्लिंटन, मृत्युंजय आणि धागाप्रवर्तक कापूसकोंडा.... या चौघांच्या समतोल प्रतिक्रियांचे कुणीही सारासार विवेकबुद्धी व्यक्ती स्वागतच करेल कारण त्यांच्या शब्दात ते प्रतीत झाले आहे ती खरी काळाची गरज आहे. काही मुद्यांचे निराकरण किंवा अधिक स्पष्टीकरण या संदर्भात आवश्यक आहे आणि ज्या अर्थी हा विषय आता वैचारिक पातळीवर घेतला गेला आहे त्याचे स्वरूप रुंदावण्याची काळजी घेत आहे.
चांगले असो वा वाईट, पण भारतीय समाजरचनेतील अनन्यसाधारण वैशिष्ट्यांमुळे लोकशाहीतील 'जनतेच्या सहभागाचे' रुपांतर 'जातींच्या सहभागात' झाले व जातीय पातळीवर उभे केलेले राजकीय पक्ष एकमेकांशी आपल्या जातीला अधिक प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी भांडू लागले. हिंदु महासभा आणि रा.से.संघ जसे जन्माला आले तसेच मुस्लिम लीग आणि जमाते इस्लामीही जन्मल्या. आरक्षणाच्या नावाने द्रमुकने मिळविलेले राजकीय यश अन्य राज्यातील एस.सी.,एस.टी.ना हुरूप देवून गेले. आता हे जातीचे राजकारण नेत्यांनी जनतेच्या "हिता"साठी केले की जनतेने "आम्हाला असे जातिनिहाय उन्नतीसाठी वागवा" म्हणून नेत्यांना निवडून दिले हा वादाचा जरी नसला तर तार्किक मुद्दा होऊ शकतो.
आजची कोणतीही निवडणुक (अगदी टिनपाट ग्रामपंचायतीपासून ते दिल्लीपर्यंत) प्राधान्याने जातीच्या ढालीवर लढविली जाते हे नाकारण्यात अर्थ नाही (मी दिल्लीत आहे आणि पुढील दोन महिन्यात कोल्हापूर महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक आहे. सहज आमच्या भागातील मतदार संघाचा कानोसा घेण्यासाठी तेथील दोनचार मित्रांना ई-मेलद्वारे विचारले, त्यापैकी एकाने मला लिहिले, "तू काय आता इकडे येऊ नकोस. आपला मतदार संघ रिझर्व्ह झाला". त्याला मी पत्रातून झाडले, तर हा माझ्यावरच वैतागला आणि वर "तुझ्यासारखी दोनचार टाळकी मराठ्यांत आहेत म्हणून आपली प्रगती होईना" हा शेरा. काय बोलायचे या युक्तीवादावर? म्युनिसिपालिटीच्या निवडणुकीवर जर 'मराठा' समाजाची प्रगती अवलंबून आहे तर ती कशा प्रकारची प्रगती असेल हे सांगण्यास कुठल्या रमलज्ञाची गरज भासणार नाही. फासेच काय लायकीचे खुळखुळणार आहे हे त्याच्या वाक्यातच आहे.). कॉलेजच्या वर्ग प्रतिनिधीच्या निवडणुकीतदेखील तो किंवा ती "आपल्या" जातीतीलच आहे का हे विद्यार्थीच नव्हे तर संबंधित "मॅनेजमेन्ट" देखील पाहते. हे कटू असले तरी सत्य आहे. ही लागण (दुर्दैवाने) कलाक्षेत्रालाही लागली आहे. अमुक एका स्पर्धकालाच "एसएमएस करा" असा कुठल्यातरी गडावरून हुकूम सुटतो आणि साखर कारखान्यांचे चेअरमन आणि त्यांचे बगलबच्चे शेअरहोल्डर शेतकर्यांना तसे आदेश देतात. फार विचित्र स्थितीत आलो आहोत आपण या क्षणी.
दादोजी कोंडदेवांचा धडा क्रमिक पुस्तकातून काढून टाकणे किंवा त्या नावाने दिला जाणारा पुरस्कार रद्द करणे ह्या घटना वा निर्णय एका गटाने "इतिहासाला विरोध" केला म्हणून नव्हे तर बहुजन समाजाच्या "फिक्स्ड व्होट बँके" ला नजरेसमोर ठेऊन घेतलेल्या बाबी आहेत हे समजणारा वर्ग आज इथे या क्षणी मिपावरही आहे, पण जसे सुभाषित आहे 'कावळ्यांच्या कलकलाटापुढे राजहंसही मानससरोवर सोडून जातो'.... नेमकी हीच हतबलता नेमस्त विचारांच्या झाडाखाली वाढलेल्या तुम्हाआम्हामध्ये आली आहे. त्यामुळे एक सच्चा लोकशाहीप्रेमी म्हणून नियत मार्गाने जितके करता येईल तितके आपण करीत आहोतच.
ज्या लोकप्रतिनिधींकडे आपण आशेने पाहतो तेदेखील एकाच टांकसाळीत तयार झाल्याचे चित्र समोर येत आहे. संभाजी ब्रिगेङच्या कृत्याचा निषेध करणार्यामध्ये बीजेपीचे आमदार होतेच. पण वेळ आली तर "आपणही अशा मनगटगिरीमध्ये मागे नाही" हे दाखविण्याची संधी ही मंडळी सोडत नाही. जामनेर (जि.जळगांव) चे बीजेपीचे आमदार श्री.गिरिश महाजन, ही एक अभ्यासू आणि संतुलित भूमिका मांडणारी सुशिक्षित अशी व्यक्ती मानली जाते. पण मिडियाच्या कॅमेरे आपल्यावर रोखले जाणार आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ब्रिगेडच्याच आवेशात आज जळगांव सिव्हील सर्जनच्या इमारतीवर हल्ला बोल केला आणि 'हॉस्पिटलची मॅनेजमेंट व्यवस्थित नाही" म्हणून सर्वासमक्ष सर्जनना बांगड्यांचा आहेर दिला. त्यावर कडी म्हणजे "स्टार माझा" सारखे एकेकाळी सारासार विचार करून बातम्या देणारे चॅनेलही "स्टार माझाच्या बातमीचा दणका. सिव्हील सर्जनला बांगड्या भरल्या..." असा ब्रेकिंग न्यूजचा फ्लॅश देत राहिले. का? तर, आदल्या दिवशी लोकमत "आमच्या बातमीचा दणका" असा दिवसभर थयथयाट करीत होते. ही रॅट रेस आज नागरी जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे.
अशिक्षित, निमशिक्षित, उच्चशिक्षित आमदार हे जर अशाच तराजूच्या पारड्यात (एकत्रीत) बसून अशा मार्गाने आपल्या मतदारांना वारा घालणार असतील तर झाली महाराष्ट्र राज्याची सर्वांगाने प्रगती !
संत रामदासांनी करुणाष्टके लिहिताना हीच अगतिकता व्यक्त केली आहे :
"स्व-जन-जन-धनाचा कोण संतोष आहे |
रघुपतिविण आता चित्त कोठे न राहे ||
जिवलग जीव घेती प्रेत सांडोनि देती |"
~~ हे जीव घेणारे जिवलग आपलेच आणि आपल्यातच आहेत.
इन्द्रा
- Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी
Sat, 08/28/2010 - 05:42
नवीन
जाहीर वाचना बद्दल आभार ! आता कोल्हापूरला येतो फी वसूल करायला. फार काही नाही..... १/२ बीअर आणि तांबडा पांढरा रस्सा व गप्पा. :-)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 09/04/2010 - 15:27
नवीन
चर्चा आणि प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. धन्यु...!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
क
कापूसकोन्ड्या
Fri, 05/11/2012 - 19:34
नवीन
सर्व चर्वीत चर्वण झाले पण तो पुतळा सध्या कुठे आहे?
पुण्यातील लोकांनी खुलासा करावा. कुठे तरी धूळ खात पडण्या पेक्षा त्याचे विसर्जन करावे.(ज.कु.भा.दु.न.त.)
- Log in or register to post comments
क
कापूसकोन्ड्या
Tue, 01/03/2017 - 08:11
नवीन
सर्व चर्वीत चर्वण झाले पण तो पुतळा सध्या कुठे आहे?
पुण्यातील लोकांनी खुलासा करावा. कुठे तरी धूळ खात पडण्या पेक्षा त्याचे विसर्जन करावे.(ज.कु.भा.दु.न.त.)
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Wed, 01/04/2017 - 07:34
नवीन
जेव्हा हलवण्यात आला होता तेव्हा पु.ल. देशपांडे उद्यानात ठेवण्यात आला होता. त्यानंतरहि तो पुतळा पुण्याच्या बाहेरच हलवा (किंवा त्यांच्या मूळ गावी हलवा) अशा मागण्या करण्यात आल्याचं ऐकिवात आहे (खरं कि खोटं ते माहित नाही )! पुढे काय झालं माहित नाही.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3