चित्रेसाहेबांचा प्रतिसाद आवडला.
जास्ती काही लिहण्याची गरज नाही.
>>सुदैवाने तुमचं वय तुमच्या बाजूने आहे. आत्महत्या वगैरेचे विचारही सोडून द्या.
+१, इतकेच म्हणतो.
संदीप हे माहीत नव्हतं. तुमच्या अप्पांबद्दल आदर वाटतो. इतकी प्रबळ इच्छाशक्ती आणि पॉझीटिव मानसिकता कौतुकास्पद आहे.
स्पा, मला वाटते ह्यापेक्षा जास्त काही सांगायची आवश्यकता नसावी! अरे रोज मिसळपाववर येत राहिलास तरी पुरे आहे, एकेक धागे वाचून हसून हसून आपोआप वजन वाढेल, काय बोलतो? ;)
(वजन कमी कसे करावे ह्याचा धागा काढावा का?)चतुरंग ढोले पाटील
संदीप, सह्ही लिहिलं आहेस! आजूबाजूला खरोखर इतके जेन्यूईन प्रॉब्लेम्स घेऊन आयुष्याशी झगडणारी माणसं असतात! शेवटी आपला दृष्टीकोन महत्वाचा. तात्कालिक नैराश्य कोणालाही येऊ शकते, पण त्यातच बुडून, कुढत आणि स्वतःबद्दल कीव बाळगत जगायचे की त्यावरही मात करुन, आनंदाने जगायचे हे ज्याचे त्यालाच कळायला हवे!
स्पा, तुम्ही दासबोध वाचा एकदा, खरच. तुमचे नैराश्य निघून जाईल काही प्रमाणात तरी.
>>>स्पा, तुम्ही दासबोध वाचा एकदा, खरच. तुमचे नैराश्य निघून जाईल काही प्रमाणात तरी.
+१.
आणि त्यातच मुर्खांची लक्षणे दिली आहेत ती पण वाचा! म्हणजे तुम्ही जो मुर्खपणा करायच्या विचारात आहात ना, त्याऐवजी जरा बरा विचार कराल!
--असुर
स्पा, तुम्ही चांगल्या वैद्यांकडे जाणार का?
आयुर्वेदीक औषधानं गुण यायला वेळ लागतो पण गुण नक्की येतो.
आणि ४२ किलो आहे ना वजन मग काही फार कमी नाही.
संदीपनं इतका छान प्रतिसाद लिहिलाय त्यावरून मनस्थिती आनंदी ठेवणे हे एकच काम करा.
संदीप, तुझा प्रतिसाद खूप चांगला आहे. तुझ्या वडीलांना अल्सरेटीव्ह कोलायटीस झाला होता हे सांगितलस पण त्याच बरोबर महत्वाचं सांगितलस म्हणजे त्यांना अजून कोणतेही विकार झाले नव्हते. साधेपणानं राहणे म्हणजे हळवेपणा वगैरेची लेबलं मलाही नेहमी लावली जातात पण मी माझ्या मनाच्या तब्येतीसाठी जाणिवपूर्वक निवडलेला पर्याय आहे तो. लहान वयात काही दुखण्यांनी मला झलक दाखवली. आजकाल सर्रास आढळणारे विकार "हाय!" म्हणून गेले आणि ठरवले कि यापासून लांब रहायचे. अजून तरी त्याचे चांगले परिणाम दिसताहेत.
वर्षभर रजा घ्या.
जे आवडेल तेच काम करा.
जेव्हढे जमेल ते करा.
भूक लागेपर्यंत वाट बघा.
जर फिरतीवर गेलात तर जास्तच चांगले.
कावीळ का झाली होती याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा.
प्रेमात पडा. (म्हणजे तुम्हाला स्वतःचा विसर पडेल.)
सारखा सारखा आपलाच विचार करणं टाळा.
स्वतःची किव करू नका.
पोट अजिबात साफ होत नाही ..
ही समस्या कदाचित बर्याच वेळा रोगांना निमंत्रण देते.
जंत झालेत का ?
आमांश आहे का ?
असे विचारण्याचे कारण असे की पाण्याच्या वाटेने येणार्या या आजारांनी भारतात बरेच जण त्रस्त असतात आणि आजाराने उग्र रुप धारण केल्याशिवाय ते लक्षात येत नाही.
तुमची समस्या इरीटेटींग असेल पण आत्महत्येसाठी क्वालीफाईड नाही.
आपल्या भावना व वेदना पोहोचल्या व आपणास सहानुभुति.
पुण्यात खरे म्हणुन खुन्या मुरलीधर जवळ एक जण आहेत ते काविळी वर औशध देतात..
वेदना असह्य झाल्या कि असे विचार मनात येतात..पण धिर सोडु नका....
त्याने दर्द दिला तो दवा हि देइल..काहि मदत लागली तर अव्श्य कळवा..
आमच्या परीने जी होईल ति नक्किच करु...
आपणास शुभेच्छ्या ..
लवकर बरे होताल ..
मला प्रस्तावकर्त्याबद्दल सहानुभूती वाटते. अशा समस्यांचे निराकरण सोपे नाही. अशा व्यक्तींच्या परिस्थितीला हलके मानण्याची चूक तरी आपण टाळू शकतो.
मला सुचलेल्या काही गोष्टी मांडतो.
आपल्या अपेक्षांचे कॅलिब्रेशन (मराठी शब्द ?) बदलण्याचा प्रयत्न करणे. आपली परिस्थिती इतरांपेक्षा थोडी वेगळी आहे, सामान्य आयुष्याच्या फूटपट्ट्या काही काळ बाजूला ठेवणे आवश्यक आहे हे स्वीकारणे गरजेचे आहे. कुठल्याही व्यक्तीला - मग ती कुठल्याही वयाची, आर्थिक स्तरातली, धर्माची, लिंगाची असो, तिला काम न करता राहाणे कधीच पसंत पडणार नाही. परंतु प्रकृतीला उतार पडेस्तोवर पूर्णवेळ विश्रांती घ्यावी हा एक उपाय आहे. नोकरी गेली तर परत मिळेल, परंतु आजारी अवस्थेत शरीराला-मनाला जीवघेण्या वाटेल अशा परिस्थितीतून घालत राहाणे हे सर्वाधिक धोक्याचे असू शकते. तुम्हाला काही काळ तुमच्या कुटुंबीय/मित्र मंडळींच्या मदतीवर राहावे लागेल, परंतु या काळात प्रकृतीत सुधारणा घडवून आणून परिस्थितीवर मात करणे हा एक उपाय आहे. जर का हे शक्य असेल तर या नोकरीशिवायच्या काळात पूर्णवेळ विश्रांती घेणे , आहाराविहारावर नियंत्रण ठेवणे , शरीर-मनाची हेळसांड होवू न देणे ही तुमची जबाबदारी राहील.
व्यायम , योग्य आहार , विश्रांती याशिवाय नवे छंद जोडण्याचा प्रयत्न करणे हा एक उत्तम उपाय आहे.
वरील सर्व बाबींकरता , काही काळ तुम्हाला नोकरीशिवाय जगता येईल अशी "सपोर्ट सिस्टीम" असणे मी अध्याहृत धरतो आहे. ती बिलकुलच नसेल तर... तुम्हाला हिम्मत एकवटावीच लागेल.
माझ्या मित्राच्या मुलाच्या सर्व अंगाला एक विचीत्र एक्जीमा झाला होता .
लहानपणी दम्यावर दिलेल्या औषधानी तो झाला असावा असे डॉक्टरांचे मत .
दिवसभर अंग खाजवायचा .
रात्रभरात सेकंडरी इन्फेक्शन व्हायचे मग त्यातून रक्तस्त्राव .
दिवसभर गुरासारखा रडा ओरडायचा .
अंगावर कपडे घालता येत नव्हते.बायका वापरतात तसा निळा गाऊन घालून बसावे लागायचे.(बिन बटनाचा)
रात्री झोपेत खाजवू नये म्हणून हात बांधून ठेवावे लागायचे.
त्यात भरीतभर म्हणून डॉक्टरांनी दिलेल्या औषधांनी त्याला स्त्री सारखे स्तन आले.
कॉलेजला जाता ये ईना. वर्गातली मुले त्याच्या बाजूला बसायची नाहीत.मग त्याचे ऑपरेशन .
दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला .त्याच्या पालकांनी उपचार आणि प्रार्थना यावर विश्वास ठेवला.
रोग आला तसा गेला. मुलगा आता फायनल इंजीनिअरींगला आहे .
तेव्हा डॉक्टरांनी त्याला हेच सांगीतले होते .
यस.इरीटेटींग बट नॉट इनफ फॉर सेल्फ डिस्ट्रक्शन.
माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
“किती जगलो” याऐवजी “कसे जगलो”?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..
संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय झाले?
कधीतरी सामान्यातले असामान्य होण्याची जिद्द दाखवून तर बघा!
चिमणीसारखा जन्म मिळाला असला तर काय झाले?
आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..
आयुष्य रोजच वेगवेगळे रंग उधळते
त्या रंगांमधे आनंदाने रंगून तर बघा!
तसे जगायला काय?कुत्रे-मांजरीही जगतात हो
कधीतरी माणूस म्हणुन स्वतःच्या जगण्याचा उद्देश शोधून तर बघा!
कधी असेही जगून बघा…..
कविता माझि नाहि पन तुमच्या आरोग्यासाटीं
इथे येत रहा. तुमचं मन मोकळं करत रहा. काय वाटते ते सांगत रहा. तुमच्या लिखाणावर क्वचित विचित्र प्रतिक्रिया आल्या तरी येणे थांबवू नका, लिहिणे थांबवू नका. आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष बघू शकत नसलो तरी मिसळपाव ही एक फार मोठी ताकद आहे यावर विश्वास असूदेत, हे वेळोवेळी दिसून आले आहे.
मिसळपावचे सदस्य हे तुमचे मित्रमैत्रिणी आहेत ते तुमच्या दु:खात आणि आनंदात सामिल आहेत. संवाद साधत राहिलात की उपाय सुचत जातात, वाटा दिसायला लागतात, प्रश्न सुटायला लागतात.
तुम्हाला ह्या निराश मनस्थितीतून बाहेर येण्यासाठी शुभेच्छा! :)
---------------------------------------------------
आता तुमच्या काविळीबद्दल. मला स्वतःला १० व्या वर्षी आणि पुन्हा १३-१४ व्या वर्षी अशी दोन वेळा कावीळ झाली होती. काविळीने लिवरवर परिणाम होतात आणि ते दूरगामी असतात. मला स्वतःला पोटाचे वेगवेगळे छोटेमोठे विकार पुढे बरीच वर्षे होत राहिले. हळूहळू त्यातून बाहेर पडलो. आहारावरील नियंत्रण आणि मुख्यतः पाणी स्वच्छ करुन उकळून गार केलेले पिणे हे अत्यावश्यक.
सकाळी नाष्टा न करता बाहेर पडू नका. सगळ्यात साधा आणि पौष्टिक नाष्टा एक कप गरम चहा आणि एक चपाती. रोज घ्या.
दुपारचे जेवण अतिशय हलके असूदे साळीच्या लाह्या आहारात असूदेत. रात्री सूर्यास्ताच्या सुमारास जेवा. रात्रीचे जेवण आणि झोप ह्यात कमितकमी २ तासाचे अंतर असूदेत. वजनाबद्दल चिंता करु नका. चिंतेने बद्धकोष्ठ वाढते.
---------------------------------------------------
तुम्हाला वैद्यांना भेटायचे असल्यास मला व्यक्तिगत निरोप पाठवा.
(पर्यायसूचक)चतुरंग
तुमच्या बद्दल सहानुभूती आहेच तरीही वरील सर्वांनी आपणहून दिलेल्या सल्ल्यांमुळे साला आपला मन भरून आला...
संवाद हा काय काय चमत्कार घडवू शकतो...
एकेमेकाविषयी वाटणारी कळकळ हि अशी सहजी मिळत नाही हो...
मिसळपाव rocks !!! :)
मित्रा माझहि वजन ४५ होत वयाच्या २५ व्या वर्षि.
घरा शेजारि नविन जिम सुरु झालि म्हणुन मी जाउ लागलो. खायच एक रुटिन ठरवल. लगेच फरक जानवु लागलाय. नेटावर शोध वजन कस वाढवायच ते. युट्युब वर बघ skinny to muscle बरिच सापडतिल.
रोज कमित कमि ३००० calories खाव्या लागतिल. पण प्रमान काय असाव यासाठि ही साइट बघा. http://www.dietitian.com/calcbody.php . कोणत्या अन्नात हे घटक असतात ते नेटावर पाहुन घ्या.
कमि आहारामुळे पोट साफ होत नाही हा माझा अनुभव आहे.
मांसाहार करित असाल तर उत्तम. व्यायाम भरपुर आणि रोज कमित कमि एक तास करा. १ दिवस upper body, १ दिवस llower body अस रोज पहिले २ महिने न चुकता करा. (cheat on your girlfreind not your body). जिम नसलि तरि हरकत नाहि डम्बेल्स मिळतात जुन्या बाजारात. तुमच्या जवळ वेळ असेल तर p90x http://en.wikipedia.org/wiki/P90X प्रकार करुन पाहु शकता. विडिओज टोरंट वर मिळतिल.
माझ वजन सध्या ५५ आहे. सध्या तरि पुरेस वाटतय.
जाता जाता: "पाणी" लागल्याशिवाय वजन वाढत नाही अस ही ऐकुन आहे. अनुभव घेत्ल्यावर सांगेन.
तुम्ही दिलेले सल्ले उत्तम असले तरी स्पा यांनी वर्णन केलेल्या आत्ताच्या स्थितीत त्यांना व्यायामापेक्षा योग्य आहार, औषधोपचार आणि विरंगुळा ह्यांची जास्त गरज आहे असे दिसते. एकदा तब्बेतीच्या तक्रारी दूर झाल्या/कमी झाल्या की व्यायाम करता येऊ शकेल असे वाटते.
(सावध)चतुरंग
वेळ वाया घालवु नये हेच मत आहे. मी सुद्दा हिच चुक केलि होती.सुरु करता करता ४-५ वर्षे वाया घालवली. व्यायामा नंतर तब्येतिच्या तक्रारी आपोआप दुर झाल्यात.
पुण्या-मुंबई मधे असाल आणि महागडि जिम लावलि तर, एक वेळ वजन नाही वाढणार पण विरंगुळा ;) चांगला होतो.
नसेल जमत व्यायाम तर Art of living वाले आहेतच.
श्री.स्पा ~~ ज्या अचूकतेने (टायपिंग मिस्टेक एकही नाही) तुम्ही हा प्रस्ताव मांडला आहे, तो वाचल्यानंतर एक गोष्ट मानली पाहिजे की त्या तथाकथित वजनव्यथेने तुम्ही त्रस्त झाला असला तरी तुमची मानसिक स्थिती अजून मजबूत आहे. आत्महत्या करावी की ना करावी असा सल्ला ज्यावेळी एखादी व्यक्ती खुल्या मंचावर मांडते त्यावेळी ती ९९% न करावी याच मताची असते (आणि देव करो तुम्ही याच मताचे असावे). आत्महत्या हे शूरपणाचे नसून भेकडपणाचे लक्षण आहे हे लक्षात ठेवा. आयुष्याच्या प्रवासात आतापर्यंत वजनाशिवाय अनेक टक्केटोणपे तुम्ही पचविले असतील (रोजच्या लोकल प्रवासात तर घडीघडीला अनुभव घेत असालच) त्यामुळे वजनाची डोकेदुखी - जी केवळ योग्य क्वालिफाईड डॉक्टरच सोडवू शकतो, बाकीचे केवळ उपाय सुचवू शकतात - हा एक मानसिक खेळ आहे असे समजून या किचकट रायडरकडे पाहाल तर गणित सुटायला वेळ लागणार नाही.
नाझीच्या छ्ळछावण्यातून केवळ अस्थिपिंजर (फक्त २२ ते ३२ किलो वजन) राहून वाचलेल्या हजारो ज्यू कैद्यांनी युद्धसमाप्तीनंतर पुढील आयुष्य किती यशस्वीरित्या जगले आणि स्वतःचाच नव्हे तर देशाचाही उत्कर्ष कसा साधला यासंदर्भातील अनुबोधपट "फॉक्स हिस्ट्री" चॅनेलवर सातत्याने दाखवित असतात, त्याची एकादी झलक पाहायला मिळाली तर तुम्हास समजून चुकेल की, "अरे वा ! मी तर यांच्यापेक्षा जास्त नशीबवान आहे. किमान मी मोकळा श्वास तरी घेवू शकतो..."
जगण्याचा मर्क्युरी कितीही वरखाली होवू दे ~~ "तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे ?" हा प्रश्न सतत मनात ठेवा.
इन्द्रा
जरा आजुबाजुला डोळे उघडे ठेवुन पहा. बरेच रंजले गांजलेले दिसतील जे त्या परिस्थितीतही हसत जगत असतात.
त्यांच्या कडे पाहुन देवाचे आभार माना. वर एक व्हिडियो दिला आहेच. जमल्यास तो ही पहा.
आवो द्येवा, आयुष्य सुंदरच असतंय. तुमी कोणता चष्मा वापरता त्यावर लै गोष्टी अवलंबून असतात. आयुष्य सुंदर दिसेल असा चष्मा आधी घालायला लागेल, मग सगळं ऑपॉप (धमु धन्स!) सुंदर दिसायला लागतं!
बाकी आपल्याला स्वतःचं आयुष्य नेहेमीच सुंदर दिसत आलंय, विदाउट मार्गदर्शन! प्रयत्न केलात तर तुम्हाला पण दिसेल. त्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!!
लग्न झालेलं नसेल तर एकटे आई बाबांची परवानगी घेऊन या.
आणि झालेलं असेल तर बायकोला घेऊन सपत्निक या.
सांगा एका मैत्रिणीने रहायला बोलावले आहे.जाऊन येतो...
जॉब राहु द्या बाजुला महिनाभर..
टेन्शन्,ताण्तणाव जाउ द्या बोंबलत!
आणि हे जर शक्य नसेल तर
एकच सांगते..
जे आहे ते आपलं म्हणुन स्विकारा..
आहे ना बारीक तब्येत ...that is how i am..! (अर्थात मेडिकली unfit असाल तर get yourself treated to a good consultant)
समोर आलेला प्रोब्लेम आप्ल्यापर्यन्त खुप कमी होउन आलेला आहे असा विचार करत चला..
आप्ल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण / प्रत्येक घटना ही destined असते..यावर माझा तरी नितांत विश्वास आहे.
जे येइल ते स्विकारायचं तर असतं च आप्ल्याला..
मग चिंता...आत्म्क्लेष करुन का स्विकारायचं...
आयुष्याबद्दलचा एक स्ट्राँग acceptance तयार करा मनामध्ये..!
...अरे आहे काय यार....
....be by yourself....BE YOU!
पक्की कोल्हापुरी पचनशक्ती (तना-मनाची) बनवूनच पाठवते त्यांना..
खाणच काय पण आयुष्यातले कोणतेही अनुभव पचवतील ते
त्यांच्या मध्ये आत्त्ताही आहे ती ताकद...फक्त जरा पॉलीस मारावे लागेल इतकेच...!
:)
(नंतर आपल्याला कोणाचे तरी हात पाय तोडायसाठी /जर्रा माल मस्साला द्यायसाठी 'स्पा भाय' ला व्य. नि. टाकावा लागेल!)
चल काहीतरीच काय.. वजन कमी आहे म्हणून आत्महत्या.... च्यामारी मी इथे वजन कमी करण्यासाठी व्यायामाला जुंपून घेतलय...
चल तुला माझ्या एका मित्राची गोष्ट सांगतो.. तुझ्याच वयाचा असताना तो आजारी पडला होता आणि तब्बल ६ महिने इस्पितळात पडून होता. त्या अवधीत त्याचे २५ किलो वजन घटले होते.. आजारपणातून उठल्यावर त्याचे वजन होते ४० किलो... पण तो काही हार मानणारा पठ्ठ्या नव्हता.. त्याने लगेच भरपूर खाणे आणि व्यायाम सुरु केला आणि पुढील ६ महिन्यांत २१ किलो वजन वाढवून तंदुरुस्त झाला..
तुम्हीपण वैद्यकीय सल्ला घेउन पुढील पायर्या चढाव्यात आणि आत्महत्येच रडगाण सोडून द्यावे...
- (बॉडी बिल्डरप्रेमी) पिंगू
काय तिच्यायला रड गाणं लावलंय...जगात असाध्य रोग असलेले लोक असतात, प्रचंड समस्या असलेले लोक असतात... आणि तुम्ही वजन जरा कमी म्हणून आत्महत्या करायला निघाले...खरं तर मला विश्वास नाही कि एवढ्या टोकाचा विचार करण्याची वेळ आली असेल तर कोणी असे धागे टाकेल म्हणून...खरं खोटं तुमचा तुम्हाला माहिती...
तुमचे सर्व वैद्यकीय रिपोर्ट्स ठीक आहेत ही खूप दिलासा देणारी गोष्ट आहे. मलाही दोन वेळा काविळ होउन गेलीय. पहिल्यांदा तर काविळ झालीय हे काळायलाच फार उशीर झाला होता आणि शेवटच्या स्टेजला पोहोचली होती. रस्त्यावर चक्कर येउन पडले होते. नंतर बरेच दिवस आजूबाजूचे सगळे मला 'पाप्याचं पितर ' असंच म्हणायचे .
माझ्यामते तुम्ही खूप कंटाळला ( बोअर झाला )आहात . थोडे दिवस वजनाबद्द्ल विचार करणं सोडून द्या.
तुम्हांला काय करायला आवडतं / आवडेल याची एक यादी तयार करा आणि एक रूटिन चालू करा ( संगीत, वाचन, खेळ, व्यायाम, नविन भाषा शिका इ.). एखादा ट्रेकिंग, हायकिंग चा ग्रुप जॉइन करा.
स्वतः एखादा पदार्थ सुट्टीच्या दिवशी बनवून खा ( इथे पाकॄ टाकायला विसरू नका ).
तुमचा पेशन्स वाढवा , लगेच टोकाचा निर्णय डोक्यात आणू नका ( आत्महत्या करतो, धागा डिलिट करतो इ. ) .
५ तासाचा प्रवासाच्या वेळात काही करता येउ शकेल काय ?
मित्रा स्पा,
बुंद बुंद से सागर बने हे लक्षात ठेव. तुला सगळ्यात जास्त गरज आहे ति सकारात्मक विचारांची. बाकी सगळं मगोमाग येइल. तु रोज २/३ पोळ्या खातोस ना. मग आज पासुन चौतकर पोळी वाढव. दोन(च) घास सकाळी आणि दोन(च) घास संध्याकाळी जास्तीचे खा. अस आठवडा, दहा दिवस कर. तुप/लोणी/तेल, जे काहि पचत असेल ते पोळीला लाव. मग आणखी चौतकर पोळी वाढव. अस करुन येत्या दोन महिन्यात आपला आहार डबल कर. तुला एकदा अंदाज आला कि तु किती वेगाने आहार वाढवु शकतोस कि मग तुला आहार आणि व्यायामाच गणित बसवता येइल... आणि या दोन गोष्टी साध्य झाल्या कि बाकी काहि कराव लागत नाहि...
(लट्ठ) अर्धवटराव
बाकि सर्वांनी खुप छान उपाय सांगितले आहेत, त्यात ल्या त्यात 'संदीप चित्रे' नी तर जवळ जवळ तुमच्याच सारखी केस उदाहरण म्हउन दिलेली आहे.
माझ्या कडुन थोडीशी भर, लोकलचा प्रवास खुप वाटतो ना?
मग त्या लोकल मध्ये जी 'धमाल भजनी मंडळ' असतात ना ? ती जॉइन करा. बघा त्याच प्रवासाची वाट पाहु लागाल. काय एकेक विडंबन असत प्रत्येक गाण्याच ! व्वा ! उदाहरण ' हो..निले गगन के तले ...पटरी की ओर चले । हाथ मे लोटा लोटे मे पानी.."
आणी कोणी या प्रकाराला भंपक वगैरे म्हणत असेल तर लक्ष देउ नका. मस्त जिथ भरपुर हसु येइल मन ओझ्यातुन मुक्त हओइल अशी कुठलीही गोष्ट बिन्धास्त करा. आपल्याला कोणी मदत करायला येत नाही पण शहाणपण मात्र शिकवायला बरेच जण येतात तेंव्हा एका कानान ऐकणे अन सोडुन देणे.
तुम्ही मनापासुन लिहिल आहे अन आम्हा सर्वांना तुम्हाला काय सांगायच आहे ते कळतय्...धिर सोडु नको लेका..याच्या पेक्षा जन्म अन जगण वाईट असु शकत.
थोडा वेळ देवासमोर पण बसत जा !
तुमची समस्या फक्त वजनाची नाहिये (हे बर्याच प्रतिसादकर्त्यांच्या लक्षात आलेले नाहिये.) तुमची पचनशक्ती क्षीण झालेली आहे असे लेखनावरून वाटत आहे. त्यामुळे खाल्लेले पचत नाही. अन्न नीट न पचल्याने कोठा नीट साफ राहात नाही. जर कोठा साफ नसेल तर पूर्ण दिवसभर निरूत्साह जाणवत रहातो, भूक नीट लागत नाही. लागली तरी खाण्याची इच्छा नसते. न खाल्ल्याने शौचास होत नाही, कोन्स्टीपेशन वाढू लागते. असे हे चक्र चालूच रहाते.
एकदम आहार वाढवण्यापेक्षा आणि अचानक मोठ्या प्रमाणावर व्यायाम करण्यापेक्षा तुम्ही पचनशक्ती सुधारण्याकडे लक्ष द्या. माफक व्यायाम चालु शकेल ..जसे की नियमीत चालणे .
माझ्या एका जवळच्या मित्राला पोटाची समस्या आहे, कित्येक पदार्थ त्याला पचत नाही. ..पोट दुखू लागते. मळमळ होते. मग खाण्याची इच्छा होत नाही. असे सकाळी सुरु झाले तर संध्याकाळ पर्यत हा मित्र काहीच खात नाही कारण खावेसेच वाटत नसते. तो ही अंगाने बारीक आहे. मध्यंतरी असे अपचन आणि पोट दुखणे खूप वाढले असतना तो पार वैतागून गेला होता. आणि तब्येत ही खूप उतरली . अशातच ऑफिसमधील कामाचा मोठा डोंगर समोर असायचा. काम करणे तर भाग होते. मग काही औषध उपाय योजना केली. आयुर्वेदिक औषधे सुरू केली. त्याचा सख्खा भाऊ डॉक्टर असल्याने त्याचे ही मार्गदर्शन लाभले. आर्ट ऑफ लिव्हिंग चे कोर्सेस लावले. आता बरा आहे . समस्या पूर्णपणे सुटली नाही , अपचन होत रहाते कधी कधी. पण दोन वर्षापूर्वी ज्या त्रासातुन त्याला जाताना पाहिले त्या मानाने आता बरा आहे. वजनही वाढले आहे. (वाढले म्हणजे आधी पेक्षा..मी जाड या अर्थी म्हणत नाहिये.)
त्याची समस्या मी जवळून पाहिली असल्याने तुमची समस्या थोडीफार का होईना मला समजू शकते.
तुम्ही वजनाकडे थोडे दुर्लक्ष करा आणि पचनशक्ती कशी सुधारता येईल हे पहा. डॉक्टरांचा सल्ला घ्याच ह्या बाबतीत. पण जेवणाची काही पथ्ये आवश्यक पाळा.
जेवण शक्यतो ताजे आणि गरम घ्या. आहारात पचायला जड , तिखट, त़ळलेले , खूप तेल , तूप घातलेले (मिठाया वगैरे) पदार्थ टाळा. आहारात तंतूमय पदार्थांचा समावेश करा. जेणेकरून कॉन्स्टिपेशन होणार नाही. डॉक्टर ही ह्यावर काही औषध सांगू शकतील. जेवणाच्या वेळा पाळा. दोन जेवणाच्या मध्ये खूप मोठे अंतर ठेवू नका. एकदम खूप खाण्यापेक्षा थोडे थोडे काही ठराविक वेळाने खा. प्रवासात पचतील असे काही कोरडे पदार्थ , पाण्याची बाटली जवळ ठेवा. पाणी भरपूर प्या. कामाच्या ठिकाणी पाणी कमी प्यायले जाते.
नोकरी सोडणे अवघड असेल तर कधीतरी रजा घेऊन घरी थोडाफार आराम करा. कामाच्या स्ट्रेसनेही शरिरावर परीणाम होतो. जागरण टाळा आणी ८ तास झोप आवश्यक.
मऊ भात , मुगाचे वरण , पातळ तूप लावलेली पोळी हे पचायला हलके पदार्थ आहेत. तुम्हाला काय काय पचते ते पहा आणि तसे ते जेवणात घेत चला.
सर्वात महत्वाचे म्हणजे सकारात्मक दृष्टी ठेवा.
पचनशक्ती सुधारतीये असे वाटले की मग आहार ही वाढवा. व्यायामही भरपूर करा.
पक्या....... अगदी बरोबर ....
वजन कमी आहे म्हणून मी असा विचार करत नाहीये...
तर.. ते का कमी होतंय ..... यावर डॉक्टर सुधा काही स्पष्टीकरण देऊ शकत नाहीये ...
शत्रू कोण आहे ते कळलं, तर सावध राहता येत .. पण इथे काय चाललंय ते कोणालाच काळात नाहीये ..
परत नमूद करतो, वजन कमी असल्याने मी depression मध्ये गेलेलो नाहीये तर .. तर तो आजार detect होत नाहीये ....
पण तुम्ही वाढवलेल्या मनोधैर्याने खरच तुम्हा सर्वांचा शतश: ऋणी ......
मिसळपाव वर आता नियमित येणार एवढा मात्र नक्की ....
कोणीतरी नमूद केलं कि typing मध्ये चूक नाहीये ... त्यांच्या साठी ..
esakal .com वर जा .... कुठल्याही बातमीवर click करून प्रतिक्रियेच्या column मध्ये typing करा .. खूप सोप्पं जाईल .... तेच copy करा..
Nick Vujicic from razener on Vimeo.