आनंदात जगा
💬 प्रतिसाद
(131)
श
शांताराम इंगळे
Fri, 08/27/2010 - 05:40
नवीन
मराठी टाईप करण्यासाठी बेस्ट साईट
http://www.google.com/transliterate/indic/Marathi
|| मजा करा आणि आनंदी राहा ||
- Log in or register to post comments
द
दीपक साकुरे
Wed, 09/01/2010 - 07:59
नवीन
हे खरच मस्त आहे ..
याच लिंक वर जाऊन टंकल आणि इथे आणून पेस्टल :)
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Fri, 08/27/2010 - 05:54
नवीन
काय 'खावे' ते सान्गु का?
१. रोजच्या जेवणात पुदिन्याची चटणी ठेवा. ( त्यात खोबरे नको.(जड असते) फक्त पुदिना कोथिंबीर, आले, लिम्बू, काले मीठ, साखर). हे पचन सुधरण्यसाथी एक चविष्ट आनि उत्तम औशध आहे.
२. रात्री गरम पाण्यात ७-८ काळ्या मनुका भिजवा. सकाळी ते पाणी प्या ( मस्त लागते- सरबतासारखे), आणी मनुका चावून चावून खा. ( यामूळे लोह वाढेल, लिव्हर फन्क्शन सुधारेल)
३. काविळीमुळे तुमचे लिव्हर मन्दावले आहे, त्यासाठी अॅक्युप्रेशर्चा एक पॉइण्ट आहे.
उजव्या तळहातावर करण्गळीच्या खाली ( नेमके हार्ट लाइनवर) अर्धे मिनिट दाब द्या, रोज २ वेळा.
४. सध्या तरी तेल-तुप बन्द करा.
५. उकडलेल्या भाज्या एकत्र करुन खाव्यात, म्हणजे छान लागतात.
एकच भाजी उकडली तर खूप बोअर होते.
६. या भाज्यांमध्ये मिरपूड, ओरिगनो बेसिल पार्सले इ. हर्ब्स वापरावेत, मस्त लागतात.
....वेळ मिळाला की अजुन लिहिते...
- Log in or register to post comments
स
स्पा
Fri, 08/27/2010 - 05:59
नवीन
माउ.....खूप खूप आभार
- Log in or register to post comments
स
सहज
Fri, 08/27/2010 - 06:12
नवीन
अहो आता मिपाची सवय लावा. जेव्हा कधी वाटेल तेव्हा समस्या लिहा. मदत करायला इथे लोक आहेतच.
आणि हो, पदार्पणात शतकी धाग्याबद्दल शुभेच्छा!
- Log in or register to post comments
अ
अर्धवट
Fri, 08/27/2010 - 06:20
नवीन
हल्ली टॅलेंट कसं वरती यायला लागलय नै.
पदार्पणात शतक द्विशतक म्हणजे हॅ हॅ हॅ..
- Log in or register to post comments
व
वेताळ
Fri, 08/27/2010 - 06:52
नवीन
आत्महत्या करायला सल्ल्यासाठी मिपाचा वापर प्रथमच होत आहे.बाकी आत्महत्या करण्या अगोदर आपल्या शरीरातील चांगले अवयव योग्य हॉस्पिटलात दान करा निदान जगण्यासाठी धडपडणार्याना अंपगाना ते उपयोगी येतील.
नोकरीचा व प्रवासाच्या दगदगीतुन त्रास होत असेल तर लेका सोप्पा उपाय ती नोकरी सोड ना. जीवा पेक्षा का ती नोकरी महत्वाची आहे तुला?आसपास कुठे चांगल्या कमाईची एक दोन वर्षाकरीता नोकरी शोध घे. नंतर मिळालेला रिकामा वेळ तुला तुझी तब्येत सुधारायला वापर .सतत आनंदी राहयचा प्रयत्न कर. जगात तुच एकटा दु:खी आहेत हा तुझा गैरसमज आहे तो प्रथम मनातुन काढुन टाक.पण मी आजारी आहे व दु:खी आहे म्हणुन सर्वजण आत्महत्या करत नाहीत.तुला २४ वाढवायला ज्यानी कष्ट घेतले व आताच्या काळात तुझी काळजी करतात त्या आईवडीलाचा विचार कर.जर शहरी वातावरण सुट होत नसेल तर इतर ठिकाणी जॉब साठी प्रयत्न कर.लग्न झाले नसेल तर लग्न लगेच न करता प्रथम स्वःताला कणखर बनवण्याचा प्रयत्न कर.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Fri, 08/27/2010 - 08:10
नवीन
अहो आत्महत्येची भाषा काय करताय. किती नशीबवान आहात तुम्ही आमच्या मानाने. मि पा वर २ वर्षे ८ आठवडे काढल्यावर आमच्या सगळ्या लेखांना मिळुन १०० प्रतिसाद नाही आलेले. तुम्ही पहिल्याच धाग्यावर शतक ठोकले. तुम्ही कमनशिबी कसे काय असु शकत ब्वॉ? खा प्या मजा करा.
- Log in or register to post comments
स
सातबारा
Fri, 08/27/2010 - 11:41
नवीन
तुमच्या अग्नी मध्ये दोष वाटतो आहे.
सकाळ संध्याकाळ तडागी मुद्रा करा. तडागी मुद्रा करून फरक वाटला की अग्नीसार क्रिया करा .. बघा महीन्याभरात गुण येईल. हे कसे करायचे याबद्दल शंका असतील तर व्य. नी. करा.
- Log in or register to post comments
स
स्पा
Fri, 08/27/2010 - 12:09
नवीन
"व्य. नी. करा" म्हणजे काय?
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Fri, 08/27/2010 - 12:25
नवीन
चतुरंग
- Log in or register to post comments
अ
अनिल २७
Fri, 08/27/2010 - 12:35
नवीन
स्पा भाऊ.. तुझा लेख वाचला लेका.. स्वानुभव सांगतो.. आज माझं वय २५ आहे, ऊंची ५ फूट ९ ईंच.. पण जानेवारी २००९ पर्यंत माझं वजन ५० कि. च्या पुढे जात नव्हतच.. सगळे काडी म्हणायचे.. गाल खपाटीला गेले होते.. अक्षरशः वैताग आला होता.. लोकांपासून लपून रहायचो.. पण लेका हार नाही मानली, खरोखर टेंशन घेणं बंद केलं, जिमला जाऊ लागलो.. सकाळी ५ ते ७.. अन जेंव्हा जेव्हा शक्य झाले तेंव्हा बीयर ढोसू लागलो..(बीयरच्या आहारी गेलो नाही).. अरे मस्तपैकी जगू लागलो. डिसेंबर २००९ मधे माझं वजन ७३ कि. झालं होतं, ते मी आता ७० कि. वर मेंटेन ठेवलय.. तब्येत अशी आहे कि ३-४ जणांना एकटा भिडू शकतो.. तुला विश्वास नसेल तर मी तुला माझे तेंव्हाचे अन आताचे फोटो दाखवतो, साल्या तरूण आपण, काय करू शकत नाही? मनावर घे अन जिम जॉईन कर.. एंजॉय कर लाईफ, घाबरून पळू नकोस.. अन २ पैसे कमी मिळाले तर चालतील, पण तो १७ तासांचा फकिर जॉब सोडून दे..
- Log in or register to post comments
प
पक्या
Fri, 08/27/2010 - 17:13
नवीन
वजन वाढवण्यासाठी बियर? ग्रेट आहात.
- Log in or register to post comments
अ
अनिल २७
Wed, 09/01/2010 - 07:45
नवीन
धन्यवाद...
- Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र
Fri, 08/27/2010 - 14:19
नवीन
शरीर आणि मन एकमेकांवर अवलंबून असतात; मग यापैकी काय आधी बिघडते? आणि नक्की काय बिघडले आहे ते कसे कळते??
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Fri, 08/27/2010 - 18:03
नवीन
पहा आपले हितचिंतक किती आहेत मिपावर. आपल्या मनातील विचार नाहीसे होतील. सगळे दिवस सारखे नसतात. हे ही दिवस जातील. दु:ख हे शेअर केल्याने विभाजित होत तर आनंद हा गुणीत होतो. स्वतःवर वेगळे प्रयोग करुन पहा. ज्याने कमी त्रास होईल अशी जीवन शैली अनुसरा.
प्रत्येकाला काही ना काही त्रास असतात. आत्ता नसतील तर भविष्यात निर्माण होउ शकतात नव्हे होतातच. जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुची शोधोनी पाहे|
काही प्रतिक्रिया कदाचित आपल्याला खोचक व दिलास न देणार्या वाटल्या ही असतील पण त्यामागील हेतु हा हितचिंतन हाच आहे.
- Log in or register to post comments
स
सचिनमिसलप्रेमी
Fri, 08/27/2010 - 19:34
नवीन
हा मानसिक प्रॉब्लेम आहे. क्रुपया मानसोपचार तज्ञाला भेटा.
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Sat, 08/28/2010 - 04:59
नवीन
हा मानसिक प्रोब्लेम नाही!
आयर्न आणी विटॅमिन डेफिशिअन्सी मध्ये डिप्रेशन येतच.
..( अहाहा, काय सुन्दर 'मराठी वाक्य आहे'!)
त्यासाठी सोपे उपाय आहेतच..
२ मिनिटानी लिहिते...
- Log in or register to post comments
व
विसुनाना
Sat, 08/28/2010 - 08:10
नवीन
-आपण सर्व प्रयत्न केलेच असतील. तरीही एक प्रयत्न म्हणून (हा प्रयत्न जर केला नसेल तर-) हैद्राबाद येथील 'एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टरॉलॉजी' (http://www.aigindia.net/) या संस्थेत उपचार करून पहावेत.
वय वर्षे २४ हे उपचारांच्या दृष्टीने खूपच योग्य वय आहे. Hepatology & Nutrition या विभागात तुमचे औषधोपचार होण्याची दाट शक्यता वाटते.
निराशा टाळावी.
...तू शाहीन है परवाझ है काम तेरा
तेरे सामने आसमां औरभी है |
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 09/01/2010 - 08:10
नवीन
पंचकर्म म्हणजे नक्की काय करतात?
त्याने काही फायदा होऊ शकेल काय?
- Log in or register to post comments
प
प्रभाकर कुळ्कर्णी
Tue, 09/07/2010 - 22:08
नवीन
डीप्रेशन आलेल्याला सल्ला देवू नये म्हनुन वाचले आहे. पन " काय करावे ते समजत नाही?" असा प्रश्न विचारला आहे. तर मी ही जे
माहीत आहे ते सांगतो. स्पा. नीगेटीव विचार सोडुन दे. वजन एका महिन्यात वाढते. वजन वाढनारे अन्न भरपुर खा. जेवनच जात नाही. रोज एक बीयर पी. नन्तर भरपुर फ्याटी जेवन जेव. औषध समजुन त्या जेवनात चोथा असलेल्या कच्च्या भाज्या खा. स्वछ्च
धुतलेलच अन्न खा. नाहीतर अजुन दुसरेच रोग होतील. जे मनाला चांगले वाटत असेल ते कर. गाव बदलता आले तर ताबडतोब बदल. आर्थिक बाजु नीट असेल तर लवकरात लवकर लग्न कर. लग्न कोनत्या मुली शी करायचं ते " धोंडोपंत उवाच" " मराठी ब्लागस्पाट. नेट" वर वाच. मानसाच्या आयुष्यातील ९०% ह्याप्पीनेस हा त्याच्या बायकोवर अवलंबून असतो. जगातल्या ५०% लोकांना तू काय करतोस काय नाही ह्याचं काहीही देनं घेनं नाही. तू काहीही का करेनास. कोनीही विचारत नाही. उरलेल्या ५०% ना तुझं वाईट झालेल फार चांगलं वाटत असते( यु क्यान वीन - शीव खेरा). आत्म विश्वास वाढेल ह्या साठी जे ज्ञान घेता येइल ते घे.सावरकरांची "माझी जन्म ठेप" वाचली काय? मी वाचलं आहे की जो कुनी ते पुस्तक वाचतं तो कधीच आत्महत्या करत नाही. सायकियाट्रीस्ट कढे गेलास तर ते तुझी जवाबदारी नातेवाईकावर टाकतात. तू जाळ्यावर प्रश्न विचारत आहेस म्हनजे तुला विचारनारं कुनी नाही असं दिसत आहे. एकटा पडू नकोस. हिम्मतीने योग्य योजना करुन कामं कर. तू जगशील पन यशस्वी पन होशील. मला
रोग झालाय म्हनत रहाशील तर खरोखरच रोग होतो. डाक्टर म्हनाले तुला काहीच झाले नाहीतर तू आता पाझीटीवच विचार करायला लाग. मला काहीच झाले नाही. मी सगळं करू शकतो. आरे आहेच काय त्यात? जे आवडत नाही ते करु नकोस. जे आवडते ते कर. जे जरूरी आहे ते कर. ज्ञान वाढव. आल द बेस्ट!
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 09/08/2010 - 05:57
नवीन
एक चांगला विचार मनात रोवल्याबद्दल.. मनापासून आभार.....
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Wed, 09/08/2010 - 07:36
नवीन
हं. मित्रा तुला जे योग्य वाटेल ते कर. मला तर 'गाढव, मुलगा आणि त्याचा म्हातारा बाप' वाली गोष्ट आठवली.
अवांतर - स्पा चा अर्थ काय? डोंबिवलीत एक 'पाटील हेल्थ स्पा' नावाची व्यायामशाळा आहे. अन्य कुठेही हा शब्द ऐकला नाही.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Wed, 09/08/2010 - 08:05
नवीन
स्पा साहेबांच्या ह्या धाग्यावर आलेल्या इतक्या प्रतिसादांमुळे त्यांच्या अंगावर मूठभरच काय तर मणभर मांस चढले असेल.
आता पुन्हा एकदा वजन करा पाहु स्पा भाऊ!
ते नक्कीच वाढले असणार!
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 09/08/2010 - 09:28
नवीन
"स्पा" या नावाचा १ विशिष्ट "fullform " आहे.........( S.P.A)
"पाटील हेंल्थ स्पा" शी याचा काहीही संबंध नाही....
- Log in or register to post comments
व
विकाल
Mon, 05/02/2011 - 14:56
नवीन
स्पा...
याला काय अर्थ नै...! मस्त खावाव बे...प्याव... अन दुन्या काळजी करू नै ...!!!
निम्मी जिन्गी तर काळ्जी खाती बघ बे...!
आम्च्या सोलापूर च्या लोकांच एक लै भारी वाक्य आहे.... जाउ दे सोड...(उच्चारः जाउ सोस्स्ड)...!!
टेंशन आलं की असं करून बघ....!!
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 05/02/2011 - 15:54
नवीन
अंयऽऽऽ विकाल, आरं आगष्टात धागा टाकलाय आन आजून त्ये स्पा धडधाकट हे. काय जीव बिव द्येत न्हाय गडी.
- Log in or register to post comments
स
स्पा
Mon, 05/02/2011 - 17:31
नवीन
मिसळपाव.कॉम नामक .. steroid खाल्ल्या गेल्या मुळे बाडी लय वाढली हाय... :D
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 07/15/2011 - 10:42
नवीन
आता वय २५,वजन किती???
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 07/15/2011 - 10:53
नवीन
खिक्क् !!
:D
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 07/15/2011 - 11:16
नवीन
मिपा वर होणाऱ्या स्तुतीमुळे अंगावर किमान मुठभर मास नक्की चढले असेल. त्यामुळे वजन ४२ पेक्षा जास्त धरायला हरकत नाही. ;-) काय स्पा ?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3