Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाकव्याप्त काश्मीरमधील कांहीं भागावर चिनी नियंत्रण?

स
सुधीर काळे
Sun, 08/29/2010 - 12:16
🗣 104 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
22926 वाचन

💬 प्रतिसाद (104)
स
सुधीर काळे Mon, 08/30/2010 - 07:38 नवीन
नीलकांत-जी, विकास-जी, अनवधानाने राहिलेला 'पाकव्याप्त' हा शब्द 'मुख्य शीर्षका'त घातल्याबद्दल धन्यवाद. हाच शब्द मूळ लेखाच्या विभागातील उपशीर्षकातही घालाल काय? ("हा दुवा उघडा" यावरील ओळ) धन्यवाद. सुधीर काळे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 08/30/2010 - 07:52 नवीन
आपल्या सरकारला याची संपूर्ण माहिती असेलच व या घटनेवर ते सखोल विचारही करत असेलच.
गॉड नोज..! तात्या.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Mon, 08/30/2010 - 07:59 नवीन
>>गॉड नोज..! हे योग्य वाक्य म्हणता येईल. ते नेहमीच्या* 'सरकार झोपलेले आहे- नेभळट/पुचाट आहे - पैसे खाण्यात मग्न आहे - मतांच्या लांगूलचालनासाठी गप्प बसणारे आहे' इत्यादि ठासून केलेल्या विधानांपेक्षा खात्रीलायकपणे वस्तुस्थितीच्या अधिक जवळ जाणारे आहे. *नेहमीची विधाने विसोबा खेचर करतात असे म्हणायचे नसून एकूणात अनेक प्रतिसादक करीत असतात असे म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ग
गांधीवादी Mon, 08/30/2010 - 08:27 नवीन
१) एकतर 'देव आहे कि नाही?' हाच जगातला सगळ्यात मोठा संभ्रम आहे. २) असलातरी, २अ) देवाला सगळे माहित असून सुद्धा सैनिकांना/सरकारला/सामान्य माणसाला त्याचा काय उपयोग ? देव काय कोणाच्या स्वप्नांत येऊन काही सांगत नाही ना. कि 'बाबांनो सावध राहा, शत्रू येत आहे.' किव्वा 'काळजी करू नका, सरकार खंबीर/सक्षम आहे.' देव कधीच कोणाला काहीच सांगत नाही. २ब) देवाला काय माहित असेल ? मागची ३० वर्षांचा जरी नीट अभ्यास केला तरी देवाला काय माहित असेल ह्याची पूर्वकल्पना करता येऊ शकते. तीच पूर्वकल्पना काही लोक लेखित स्वरुपात मांडतात. ३) देवच जर का नसेल तर, मग देश कोणाच्या हवाली ? >>खात्रीलायकपणे वस्तुस्थितीच्या अधिक जवळ जाणारे आहे. हे जर का खरोखरीच असे असेल तर मिसळपाव वरच्या अनेक लेखांना, अनेक प्रश्नांना, करोडो लोकांच्या समस्यांना हेच उत्तर लागू पडेल. प्रयत्नवादी लोकांच्या शब्द कोशात 'गॉड नोज..!' हा शब्द असतो का ? अवांतर : महान शास्त्रज्ञ न्यूटनने जेव्हा एक फळ खाली पडताना पहिले तेव्हा ते फळ खाली का पडते ह्याचे उत्तर 'गॉड नोज..!' असे दिले असते तर तर ते चालले असते का ? तात्याचे प्रतिसाद हे आमच्या सारख्या लोकांसाठी बेंचमार्क असतात. ते असं दैवावर टाकू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Mon, 08/30/2010 - 09:29 नवीन
ओ, तो गांधीवादी हा आयडी बदला हो !! तुमच्या सारख्या निर्बुद्ध माणसाला* शोभत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
श
श्रावण मोडक Mon, 08/30/2010 - 12:25 नवीन
थत्तेरेकी... ;) (हे ह घ्या). गांधी आज असते तर असे म्हणाले असते की, असा आयडी घेण्याचे स्वातंत्र्य तुला आहे आणि त्याचा मी आदर करतो. जाऊ द्या ना राव. असा आयडी घेतल्यानं गांधींचं, गांधीवादाचं काही बिघडत नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ग
गांधीवादी Tue, 08/31/2010 - 03:20 नवीन
थत्ते काका, माझे विचार, माझी प्रतिक्रिया हे तुम्हाला केवळ माझा ID गांधीवादी आहे म्हणून जास्त बोचत आहे का ? माझे वर नमूद केलेले विचार कसे चुकीचे आहेत ते जर दाखवून दिले तर मी नक्कीच त्यात सुधारणा करीन, माझी चूक विचारांनी दाखवून दिलीत तर मला नक्कीच आनंद होईल. बाकी माझी, गांधीवादी सदस्यनाम घेण्यामागची प्रेरणा हि घ्या (ह्यात तुम्हाला काही पांढरे दहशतवादी दिसण्याची दाट शक्यता आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
व
वेताळ Tue, 08/31/2010 - 14:40 नवीन
मुळात गांधीवादी हे ह्या आयडी वरुन हिंसक व मुलतत्ववादी लिखाण खुप करतात.त्यामुळे गांधीजीच्या बद्दल काळजी वाटते. त्यानी गांधीवादी म्हणजे महात्मा गांधीवादी कि सोनिया गांधीवादी हे प्रथम स्पष्ट करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
ग
गांधीवादी Wed, 09/01/2010 - 04:08 नवीन
आपल्या अति नम्रपणे केलेल्या विनंतीला मान देऊन मी स्पष्टीकरण देईल, अगोदर आपण महात्मा गांधीवादी आनि सोनिया गांधीवादी ह्यात काय फरक आहे हे सांगा. बाकी माझे लेखन आपल्याला हिंसक व मुलतत्ववादी वाटते, त्याबद्दल मी काही करू शकतं नाही. ('काट्यानेच काटा निघतो' अशी गावाकडं म्हण आहे.) बाकी संपादकांना विनंती, कि हे असे कोणाच्याही id बद्दल भाष्य, मिसळ पावच्या धोरणाप्रमाणे आहे काय ? नसेल तर, माझ्या ID बद्दल बोलण्यास लिहण्यास कोणासही अधिकार नाही. (असेल तर, मग रानच मोकळे ) माझ्या विधानांमुळे/लेखनामुळे तुम्हाला गांधीजींची काळजी वाटते, म्हणजे गांधीजी इतके तकलादू होते कि काय ? का तुमची गांधीभक्ती तकलादू आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
व
वेताळ Wed, 09/01/2010 - 06:29 नवीन
म्हणजे गांधीजी इतके तकलादू होते कि काय ? का तुमची गांधीभक्ती तकलादू आहे ? होय तुमचे लिखाण वाचले कि वाटते कि गांधीजीचे तत्वे खुपच तकलादु होती. दुसरे वाक्य म्हणजे माझी गांधी भक्ती तकलादु आहे. मुळातच मी गांधीजीचा अजिबात भक्त नाही.फक्त त्याचे नाव घेवुन त्याच्या विचाराच्या विपरित वागणे खटकते. बाकी तुम्हाला संपादक मंडळाने रान मोकळे दिले तरी आम्हाला काही देणे घेणे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
न
नितिन थत्ते Wed, 09/01/2010 - 04:33 नवीन
>>माझा ID गांधीवादी आहे म्हणून जास्त बोचत आहे का ? नाही. थोडा फरक आहे. गांधीवादी हा आय डी तुम्ही घेतला आहे म्हणून बोचत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
व
विलासराव Mon, 08/30/2010 - 10:09 नवीन
एकुनच भयंकर परिस्थीती दिसतेय. सर्व जाणकारांचे प्रतिसाद वाचुन या गंभीर विषयाची महत्वपुर्ण माहीती मिळाली. त्याबद्दल सर्व प्रतिसादकर्त्यांना मनापासुन धन्यवाद. पण एक सामान्य माणूस म्हणून कुठलीही चिनी वस्तू विकत न घेणे अशी सोपी पण खूप परिणामकारक कृती आपल्यातील प्रत्येक माणूस आपल्यापुरती करू शकतो व करावी. आपापल्या घरच्यांना व मित्रांनाही तसे करायला उद्युक्त करू शकतो. ती कृती करायला सरकारकडून कांहींही मदत लागत नाहीं. हा उपाय नक्किच आपल्या हातात आहे.
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Mon, 08/30/2010 - 12:20 नवीन
दुसर्‍या एका संस्थळावरचा ’आर्य चाणक्यां’चा आगळा प्रतिसाद! भारतीय उपखंडावर चीनचे नियंत्रण आले तर चांगले की वाईट? मला वाटते चिनी नेत्यांची दुरदृष्टी फारच चांगली आहे. आपल्या सरकार बद्दल काय बोलणार? ते आम्हाला आपले वाटतच नाही. ते एका घराण्याच्या आणि काँग्रेसमधल्या काही हौशी नेत्यांच्या नेतृत्व गुणांना वाव देण्यासाठी आहे.
  • Log in or register to post comments
स
समंजस Mon, 08/30/2010 - 16:50 नवीन
छान बातमी म्हणायची ही तर :) मुंबईवर केव्हा पुर्ण नियंत्रण मिळवतात ही लोकं तीच वाट बघतोय केव्हापासून. या जन्मात मुंबईला शांघाई झालेलं बघायचं एकदा तरी ;)
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Mon, 08/30/2010 - 16:52 नवीन
काळेकाका कळवळून सांगतायत आणि तुम्ही थट्टेवारी नेताय. शोभतं का हे? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस
स
समंजस Mon, 08/30/2010 - 17:24 नवीन
नाहीय हो :) मुंबईचं शांघाई झालेलं खरंच बघायचं आहे मला. कारण मुंबईचं शांघाई होणं किंवा शांघाई सारखं होणं हे माझ्या दृष्टीने एक चमत्कार असेल. हा चमत्कार करणे तत्कालीन नेत्यांना किंवा सरकारला शक्य नाही असं मला वाटतं, त्यांची तेवढी कुवतच नाही असं मला वाटतं [उदा. लवकरच होणारे कॉमनवेल्थ खेळ आणि या करता करण्यात येत असलेली तयारी या बद्दलच्या वाचण्यात/बघण्यात येत असलेल्या बातम्या आपल्या सध्याच्या नेत्यांची कुवत स्पष्ट करतात. खरंतर या वरून मला काळे काकांचं म्हणण पटतयं की शास्त्री आणि ईंदिरा बाई यांच्या नंतर देशाला खरा नेता लाभलाच नाही. १९८२ च्या काळात जेव्हा उपलब्ध तंत्रज्ञान आतापेक्षा कमी प्रगत होतं अशा वेळेस ईंदिरा बाईंनी आशियाड खेळ व्यवस्थीत आयोजित केलेत, माझ्या आठवणीनुसार]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
स
सुधीर काळे Tue, 08/31/2010 - 05:36 नवीन
नितिन, तुझी माझ्यावरील माया पाहून डोळे ओलावले हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
अ
अवलिया Tue, 08/31/2010 - 08:29 नवीन
डोळे पाणावतात. भलतंच काही ओलावलं असेल ज्याला तुम्ही डोळे म्हणत आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
स
सुधीर काळे Tue, 08/31/2010 - 08:56 नवीन
नाहीं हो! ओला होणारा अवयव बरोबर लिहिला आहे. काळजी नसावी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
म
मिसळभोक्ता Mon, 08/30/2010 - 18:42 नवीन
अफगाणिस्तान मध्ये मोठ्याप्रमाणात "नवीन युगाची खनिजे" आहेत. लिथियम, तांबे वगैरे. जगातले ६०% पेक्षा जास्त तांबे दरवर्षी चीन आयात करते. विजेवर चालणार्‍या वाहनांतील विजेर्‍यांसाठी लिथियम ची खूप गरज भासणार आहे, आणि खूप टंचाई आहे. अफगाणिस्तानमधली पहिली तांब्याची खाण खोदण्याचे कंत्राट चीनला मिळालेले आहे. अफगाणिस्तान मधून चीन मध्ये जाण्यासाठी चांगल्या रस्त्याची गरज आहे. आता हा रस्ता करण्यासाठी चीनला जागा कोण देणार ? भारत की पाकिस्तान ? एवढाच प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Tue, 08/31/2010 - 08:53 नवीन
ही खनिजे खरोखर आहेत कीं अमेरिकेचे सैन्य तिथे ठामपणे जास्त ठेवण्याच्या समर्थनार्थ हे प्रचाराचे पडघम वाजविले जात आहेत हे कसे कळणार? इराकवर हल्ला करायच्या आधी अशाच तर्‍हेच्या बातम्या 'पेरल्या' जात!
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Tue, 08/31/2010 - 23:28 नवीन
इराकमध्ये तेलाव्यतिरीक्त कोणती खनिजे आहेत असा प्रचार झाला होता ? अफगाणिस्तान मध्ये चिन्यांनी खोदायलासुद्धा सुरुवात केली आहे. आहात कुठे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
स
सुधीर काळे Wed, 09/01/2010 - 05:23 नवीन
इराकमध्ये अमेरिकेने स्वारी करावी म्हणून काय-काय (अप)प्रचार केला गेला याच्यावर "The Fall of the House of Bush: The Untold Story of How a Band of True Believers Seized the Executive Branch, Started the Iraq War, and Still Imperils America's Future" हे Craig Unger लिखित पुस्तक वाचल्यास कळेल. अमेरिकेचे कांहीं राष्ट्रपती आपल्याला जे हवे आहे त्या बाजूला लोकमत वळविण्यासाठी असा मीडियाचा दुरुपयोगही करतात! तरी अशा प्रचारावर विश्वास ठेवण्याआधी तो पडताळणे हितावह असते. चिनी लोक अफगाणिस्तानात(ही) पोचल्याचे मात्र वाचनात आलेले नाहीं. लिंक दिल्यास वाचायला आवडेल!
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Wed, 09/01/2010 - 06:39 नवीन
चिनी लोक अफगाणिस्तानात(ही) पोचल्याचे मात्र वाचनात आलेले नाहीं. लिंक दिल्यास वाचायला आवडेल!
मिभोंचे म्हणणे बरोबर आहे, मीही चिनी अफगाणिस्तानात खनिजांसाठी गेले आहेत असे वाचलेले आहे, तूर्तास हा दुवा बघा. तसेच हाही. आणि हाही. चिनी लोक तेल, गॅस व खनिजे ह्यांच्यासाठी कुठे पोहोचले नाहीत अद्याप, हे खरे तर थोडक्यात सांगता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
स
सुधीर काळे Wed, 09/01/2010 - 07:52 नवीन
धन्यवाद! वाचल्यावर परत कांहीं लिहिण्यासार वाटले तर पुन्हा लिहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
स
सुनील Wed, 09/01/2010 - 10:09 नवीन
वाचल्यावर परत कांहीं लिहिण्यासार वाटले तर पुन्हा लिहीन अगदी जरूर लिहा. परंतु, लिहिण्यापूर्वी खालील दुवेदेखिल नजरेखालून घाला म्हणजे लेख एकांगी होणार नाही. १ २ ३ ४ ५ ६ ७ धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
स
सुधीर काळे Wed, 09/01/2010 - 13:29 नवीन
मी शक्यतो एकांगी लिहीत नाहीं! तरी काळजी नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुधीर काळे Wed, 09/01/2010 - 13:30 नवीन
मी शक्यतो एकांगी लिहीत नाहीं! तरी काळजी नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
प
प्रदीप Wed, 09/01/2010 - 14:35 नवीन
चिनी अफगाणिस्तानात गेले खनिजांचे अ‍ॅसेट्स उभारण्यासाठी, ज्याचा त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीत उपयोग व्हावा. आपण तिथे मोठ्या प्रमाणात गेलो आहोत, ते राजकिय हेतूने. आपल्या तेथील कार्यामुळे पाकिस्तानला पाचर बसणार आहे, हे अत्यंत चांगले व ठोस पाउल आपल्या सरकारने उचलले आहे. पण इथे पहा. सदर लेखक श्री. मायकेल शूयर हा सी. आय. ए. चा वरीष्ठ अधिकारी होता. ही व अशाच प्रकारची कोल्हेकुई गेले आठ-दहा महिने अमेरिकन व ब्रिट तथाकथित 'थिंक टँक्स', तेथील 'राजकीय निरीक्षक' ह्यांच्याकडून सातत्याने ऐकू येते आहे. त्यांच्या म्हणण्याचा सारांश असा की भारत जोपर्यत अफगाणीस्तानात कार्यरत आहे, तोपर्यंत पाकिस्तानी सरकारला अस्वस्थ वाटत राहील, त्यामुळे तिथे व काश्मिरमधे अशांतता राहील. तेव्हा 'सब लफडों का अक्सीर इलाज--': भारताने अफगाणिस्तानातून काढता पाय घ्यावा ज्यायोगे पाकिस्तान खूष होईल, मग भारताचे व पाकिस्तानचे काश्मिर इ. प्रश्न चुटकीसरशी सुटतील. ह्या रीतसर (orchestreted) म्हणावी अशा कोल्हेकुईमागे काही पाश्चिमात्य सरकारे असावीत काय? हे असे दडपण आपल्या सरकारवर ह्यापुढे येत राहील, व सुरूवातीस अगदी तुरळक म्हणावी अशी ही थियरी ही राष्ट्रे आपल्या गळी उतरवण्याचा प्रयत्न आज ना उद्या करतील. तेव्हा आपण खंबीर राहणे जरूरी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुधीर काळे Wed, 09/01/2010 - 16:28 नवीन
मागे एका तरुण मित्राने फारच छान मुद्दा मांडला होता. तो म्हणाला होता कीं भारतीय लोकांना एक तर्‍हेचा न्यूनगंड आहे. त्यामुळे त्यांच्या मनात त्यांनी केलेल्या प्रत्येक कृतीला जगाने-विशेषतः गोर्‍या लोकांनी-पसंतीची मान डोलवावी अशी एक सुप्त इच्छा असते. हे आपण नकळत करत असतो असेही त्याचे मत होते! मला त्याचे म्हणणे पटते. कारण मी १९६२पासून चीनच्या अनेक कृत्यांकडे पहात आलो आहे. ते त्यांना जे करायचे असते ते करतात बाकीच्यांच्या मतांना "फाट्यावर मारतात"! अगदी पहिली आठवण आहे ती चीनने अण्वस्त्रचांचणी करू नये म्हणून त्यांना समजावून सांगायला गेलेल्या शिष्टमंडळाची! त्यांचं म्हणणं चीननं शांतपणे ऐकून घेतलं आणि स्वतःला जे हवं होतं ते (आणि तेच) केलं! संयुक्त राष्ट्रसंघटनेबद्दलही तेच. या संघटनेत आधी चीन आलाच नाहीं. पण त्याने बाहेरून उच्छाद मांडल्यावर तो बाहेर रहाण्यापेक्षा आत आलेला बरा या विचाराने सगळ्यांनी मिळून त्याला बोलावल्यावर आला, पण आपल्या अटींवर.,सुरक्षा समितीचे कायमचे सभासदत्व व व्हेटोचा अधिकार घेऊनच आला! भारतानेही असे करायला हवे होते (व आहे) असे माझे 'अज्ञ' मत आहे! जगातल्या लोकसंख्येचा चीन इतकाच मोठ्ठा हिस्सा जिथे रहातो त्या देशाला असे कमीपणाने कां वागविले जाते हे कधी कळलंच नाहीं. आपण जर बाहेर पडलो तर आपलं काय नुकसान आहे? फारसं नाहीं, कदाचित थोडे पैसे वाचतीलच. पण आपण बाहेर पडलो तर संयुक्त राष्ट्रसंघटनेला नक्कीच फरक पडेल. चीनने कुठल्याही मुद्द्यावर एक इंचसुद्धा पाऊल मागे घेतले नाहीं, मग तो तैवानचा प्रश्न असो, तिबेटचा असो, अक्साईचीनचा असो वा उद्या अरुणाचलचा असो. चीनचा निर्णय ठाम असतो व त्या निर्णयाला ते बरे-वाईट कांहींही झाले तरी चिकटून असतात! आज चीन भरभराटीला आलाय्, पण गरीब होता तेंव्हांही त्याची वागणूक वेगळी होती अशी आठवण मला तरी नाहीं. तेंव्हा आपण अफगाणिस्तानात गेलो आहोत ते आपल्या उद्दिष्टांसाठी! म्हणून त्याबाबतीत जगाचे मत आपल्याला अनुकूल आहे कीं नाहीं याच्याकडे लक्ष न देता जे ठरविले आहे तसे करावे हेच उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
स
सुधीर काळे Sat, 09/04/2010 - 07:22 नवीन
सुनील-जी, वरील सर्व लेख मी डाऊनलोड केले आहेत, पण सध्या दिवाळी अंकासाठी मी जे लिखाण करीत आहे त्याची अंतिम तारीख जवळ येत असल्याने २० सप्टेंबरनंतरच वाचू शकेन व त्यावर मत देऊ शकेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुधीर काळे Fri, 09/03/2010 - 10:10 नवीन
हा दुवा उघडा आणि वाचा आपल्या लोकसभेतील चर्चा. न्यूयॉर्क टाइम्समध्ये ही बातमी आली नसती तर आपल्या सरकारला कळली असती कीं नाहीं हे समजत नाहीं! कारण ही बातमी लोकसभेत चर्चेला आणली तेंव्हा सरकारने पडताळून पहाण्याची (verificationची) गरज सांगितली! http://tinyurl.com/23otqcm
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 09/03/2010 - 10:46 नवीन
दुवा चुकला आहे का? दुव्यात कुठे लोकसभेतल्या चर्चेविषयी काही दिसले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
स
सुधीर काळे Fri, 09/03/2010 - 13:43 नवीन
लोकसभेत देण्यात आलेले खालील निवेदन मी वाचले होते. पण मुख्य मुद्दा उरतोच कीं आपल्या गुप्तहेरखात्याला ही माहिती मिळाली नव्हती कीं मिळाली होती पण मुद्दाम जनतेत Panic होऊ नये म्हणून त्यांनी कुणालाही सांगितली नव्हती! पण वरील टाइम्समधील बातमी लोकसभेच्या चर्चेबद्दल नाहीं हे तुझे observation बरोबर आहे व त्याबद्दल धन्यवाद. २-३ दिवसांपूर्वी याबद्दल चर्चा लोकसभेत झाली होती. दुवा सापडतो का ते पहातो व सापडला तर इथे देईन. तुला सापडला तर तूही इथे दिलास तर चालेल. कारण ही बातमी लोकसभेत चर्चेला आणली तेंव्हा सरकारने पडताळून पहाण्याची (verificationची) गरज सांगितली!
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 09/03/2010 - 13:54 नवीन
अशीही एक बातमी वाचनात आली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
न
नितिन थत्ते Fri, 09/03/2010 - 13:57 नवीन
ह्म्म्म्म. The Indian Army brass has taken note of the deployment of 1,000 troops at Khunjerab Pass but is not unduly alarmed about the build-up. असे त्या बातमीत म्हटले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
स
सुधीर काळे Fri, 09/03/2010 - 16:06 नवीन
हा दुवा राज्यसभेतील चर्चेबद्दलचा आहे. लोकसभेबद्दलचा दुवाही दिसतोय् (gilgit - Interceder: real time news feed - [ Terjemahkan laman ini ] 30 Aug 2010... today chided the government in the Lok Sabha for its casual approach and silence ... Chinese troops in Gilgit result of UPA's weak foreign policy: Sinha ... China deploys 11000 troops in Gilgit area in Occupied Kashmir - Express .... Time to tell Pakistan to return Kashmir areas: Farooq Abdullah ... interceder.net/list/gilgit - Tembolok) पण "Server is too busy" असा शेरा येऊन तो दुवा उघडत नाहींय्. http://tinyurl.com/34xsyg2
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Fri, 09/03/2010 - 16:47 नवीन
या दुव्यात सदस्यांनी सरकार काय उपाय करीत आहे हे जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारल्याचे म्हटले आहे. सरकारने "काय कल्पना नाही ब्बॉ....माहिती काढावी लागेल" असे उत्तर दिल्याचे दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
स
सुधीर काळे Fri, 09/03/2010 - 17:40 नवीन
आधी दिलेल्या प्रतिसादात मी "कारण ही बातमी लोकसभेत चर्चेला आणली तेंव्हा सरकारने पडताळून पहाण्याची (verificationची) गरज सांगितली!" हे वाक्य आहे ना! तेही वृत्तपत्रातलेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
म
मदनबाण Fri, 09/03/2010 - 17:25 नवीन
२००९ सालचा डिफेन्स रिपोर्ट मिळाला होता, तरी सुद्धा त्यावर कारवाई झालेली दिसत नाही.चीन रस्ते बांधेल असा अंदाज व्यक्त केलेला या व्हिडीयोत पाहिला मिळतो. मिडीया रिपोर्ट खरे असतील तर खरचं भारत सरकार काही ठोस पावले उचलताना दिसेल काय ? खरचं किती चीनी सैन्य तिथपर्यंत पोहचले आहे ? इतक्या मोठ्या संख्येनी सैन्य जमा होण्याचे कारण काय असु शकेल ?
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 09/03/2010 - 17:54 नवीन
भारत सरकारने आपले अत्यंत कुचकामी गुप्तहेर खाते लवकरात लवकर बंद करून त्याऐवजी एक अत्यंत आटोपशीर असे खाते निर्माण करावे, जे सर्व मराठी संस्थळावर नजर ठेवण्याचे काम करील. याचे फायदे - १) सध्याच्या गुप्तहेर खात्यावर होणार्‍या अफाट खर्चात बचत २) शत्रूच्या कारनाम्यांसंबंधी अत्यंत वक्तशीर आणि खात्रीलायक अपडेट्स ३) चार मराठी माणसांना नोकर्‍या वरील आशयाचे पत्र (क्रमांक ३ चा फायदा दडवून) मी लवकरच राष्ट्रपती, पंतप्रधान, तीनही सैन्यदलाचे प्रमुख, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पाठवणार आहे. आपणही पाठवावे ही विनंती!
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Sun, 09/05/2010 - 06:52 नवीन
लयी छान आईडिया, पण एक प्रोब्लेम, चिन्यांनी मराठी शिकून इथेच मिपावार सदस्यत्व घेतले तर ? आपण मेहनत करून माहिती मिळवायच्या आणि त्यांना फुकट एकदम पदरात, (मी एक चीनी/चीनचा गुप्तहेर नाही हे कशावरून ?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुधीर काळे Sat, 09/04/2010 - 05:00 नवीन
पहिली गोष्ट म्हणजे मी आतापर्यंत पंतप्रधानांच्या कार्यालयाला ५ किंवा ६ पत्रे लिहिली त्यापैकी दोन पत्रांना त्यांच्या OSD कडून मला उत्तरेही आली. म्हणजे PMO हा एक bottomless pit नक्कीच नाहीं. तरी अशा कुत्सित किंवा sarcastic टोमण्यांची गरज नाहीं असे वाटते. एक जागरुक नागरिक या नात्याने अशी पत्रे लिहावीत असे माझे मत आहे. ज्यांचे याबद्दल दुमत आहे किंवा असे न लिहिणे जास्त योग्य वाटत असेल त्यांनी लिहू नयेत. आग्रह कसलाच नाहीं. (मी ई-मेलने पाठवतो. हो! पोस्टाला त्याचा ताप नको!) दुसरे असे कीं प्रत्येक सरकारात एकापेक्षा जास्त हेरखाती असतात. फसवणूकमध्ये CIA, Pentagon, State Deptt वगैरेंची हेरखाती होती असा उल्लेख येतो. आपली किती आहेत ते मला माहीत नाहीं. फक्त 'रॉ' हे एक आहे एवढेच ऐकीवात आहे. फसवणूक या पुस्तकाचा अनुवाद करताना मला ज्या कांहीं आधी माहीत नसलेल्या नव्या गोष्टी कळल्या त्यातच ही एक गोष्ट होती. पण 'रॉ'बद्दल मी स्वत: तरी कांहीं अनुदार उद्गार काढल्याचे मला आठवत नाहीं. पण असे प्रतिसाद इथे व इतरत्र आले आहेत. इथेही मी त्यांना माहीत होते कां व माहीत असूनही panic निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी ते उघड केले नसेल काय असेच विचारले आहे. कधी कधी एकापेक्षा जास्त खाती असल्यास व त्यात समन्वय नसल्यासही असे होऊ शकते. ओबामांनी ख्रिसमसबाँबरच्या बाबतीत म्हटलेले "We failed to connect the dots" हे विधान त्याचेच निदर्शक आहे. तसेच फसवणूक या पुस्तकात हेरखात्यांकडून माहिती असूनही सरकारने ती कशी दडपली याची कितीतरी उदाहरणे माझ्या अनुवादात आलेली आहेत. पण जेंव्हां सरकारच म्हणते की आम्हाला पडताळावे लागेल तेंव्हां शंका येते पण ती सरकारी अधिकार्‍यांची अकार्यक्षमताही असू शकते, 'रॉ'ची किंवा इतर गुप्तहेरखात्यांची नाहीं. 'मिपा'करांपैकी कांहीं जण दिल्लीच्या केंद्रीय सचिवालयात सचीवांना/उपसचीवांना भेटले असतीलच. मलाही दोन-तीन वेळा जावे लागले होते. 'ब्लास्ट फर्नेस' असलेल्या कंपनीचा अध्यक्ष (CEO) या नात्याने मी metallurgical cokeसाठी तिथे गेलो होतो. तेंव्हां त्या विभागाचे सचीव किती अज्ञानी होते, त्यांचे ज्ञान कसे अद्ययावत् नव्हते याचा मी प्रथम-पुरुषी-एक-वचनी अनुभव घेतला आहे! पण याचा अर्थ सगळेच सचीव असे असतात असाही नव्हे किंवा त्यांना माहिती पुरवली जात नव्हती असाही नव्हे. दिलेली माहिती वाचायची तसदी त्यांनी घेतली नव्हती अशीही शक्यता असू शकते. एकाद्याला जर कुणाबद्दल पूर्वग्रह झाला असेल तर असे होऊ शकते. पण मला तरी भारतीय गुप्तहेरखात्याबद्दल पूर्वग्रह नाहीं कारण या विषयावरची पुस्तके माझ्या वाचनात अद्यापी आलेली नाहींत. असो. माझे भारताच्या राजकीय नेतृत्वाबद्दल अजीबात चांगले मत नाहीं-भाजपा असो वा सध्याचे सरकार असो- पण तिथेही माझे चुकत असेल. पण माझे मत चांगले नाहीं यात शंका नाहीं. पण मी इथे जो मुद्दा मांडला तो हा कीं चीनचे लष्कर पाकव्याप्त काश्मीरमध्ये आले आहे काय, आले असल्यास कां आले आहे, त्याने आपल्याला धोका संभवतो कां, व याबाबतीत सरकारला माहिती आहे कां, असल्यास आपल्याला प्रतिनिधींना ती माहिती मिळत आहे कां, देत नसल्यास ती देणे देशहिताचे नाहीं म्हणून देत नाहीं आहे कां वगैरे. त्याच्यावर भाष्य करावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 09/04/2010 - 06:44 नवीन
गौतम बुध्दावरची कथा वाचली नाहीत का?तो धागा परत काल वर आला होता.तुम्ही जे करताय ते योग्य करताय. लोकाना टिका करु दे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 09/05/2010 - 05:45 नवीन
चीनने जमीन हडपली आहे... लडाखचा बराच भाग चीनच्या ताब्यात. :(
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 09/07/2010 - 21:55 नवीन
आजची टाईम्स ऑफ इंडीया मधील बातमी पहा: Willing to work with India for peace in South Asia: China तेंव्हा आता निर्धास्त होऊया ;) आणि मस्तपैकी कौल काढूया, स्त्रीया वाईट की पुरूष वगैरे सारख्या महत्वांच्या विषयांवर चर्चा करायला लागूया. :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/08/2010 - 06:11 नवीन
चीन शांततेसाठी तयार! छ्या, आपण उगाच ब्राम्होसचे परिक्षण वगरै करत बसतो... ;) http://economictimes.indiatimes.com/news/politics/nation/BrahMos-cruise-missile-successfully-test-fired/articleshow/6503136.cms (अग्नी ५ ची वाट पाहणारा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
स
सुधीर काळे Sat, 09/11/2010 - 04:18 नवीन
विकास-जींनी पाठविलेला दुवा मी वाचला होता, पण मला ही बातमी आपल्याला 'बेसावध' ठेवण्यासाठी योजलेली क्लृप्तीच वाटली होती. त्यानंतर मी खालील दुवा पाहिला आणि मग जुनेच विचार पुन्हा मनात आले. http://timesofindia.indiatimes.com/world/china/China-hands-out-map-licenses-to-foreign-firms-like-Nokia-move-might-exclude-Arunachal-from-India/articleshow/6525858.cms म्हणजे आता अरुणाचल आपण संभाळणार कीं नाहीं हे विचार मनात येऊ लागले. त्यात एका प्रदर्शनात आपल्या सरकारी स्टॉलवरचे भारताचे नकाशे चिनी अधिकार्‍यांनी काढून टाकले होते कारण त्यात अरुणाचल हा (अर्थातच) भारताचा भाग दाखविला होता. त्यानंतर आपण निषेधार्थ तो स्टॉल बंद करून परत येण्याचा बणेदारपणा दाखविला कीं प्रदर्शन पूर्ण होईपर्यंत (मुकाट्याने) स्टॉल चालू ठेवला याबद्दल वाचनात आले नाहीं. 'मिपा'करांनी याबाबत लिहावे ही विनंती. आता नोकिया भारतातील बाजारपेठेकडे पाहून अशा तर्‍हेने अरुणाचल चीनचा भाग दाखवायला नकार देतो कीं चिनी बाजारपेठेकडे पहात मुकाट्याने चीनचे ऐकतो आणि अरुणाचल चीनचा भाग दाखविल्यास भारतीय जनता काय करेल वगैरेबद्दल विचार आतापासूनच करायला हवा. तसेच भारतीय सरकारनेसुद्धा नोकियावर दबाव आणायला हवा. (हेलसिंकीला मी गेलेलो असताना अनेक भारतीय उपहारगृहे दिसल्याने मी चकित झालो होतो. चौकशी करता कळले कीं नोकियात खूप भारतीय आहेत. त्यांच्यावरसुद्धा याचा परिणाम होईल का हेही मनात आले!) (याशिवाय आधीची हिंदूमधील बातमी आता इतर ठिकाणीही पोस्ट झालेली दिसली: http://www.ndtv.com/article/world/pakistan-handing-over-control-of-pok-to-china-48051) आपण असल्या क्लृप्तींवर विश्वास ठेऊन निष्काळजी रहाणे ही घोडचूकच ठरेल. जय हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ग
गांधीवादी Sat, 09/11/2010 - 04:41 नवीन
हे मागेच वाचले आहे, Beijing removed Indian maps from Expo, back in July आणि हेही वाचत आहे. 'No Chinese interference in Indian pavilion' काय खरे, काय खोटे, देव जाने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
स
सुधीर काळे Sun, 09/12/2010 - 16:56 नवीन
आपण आपल्या परराष्ट्रमंत्र्यांना याबद्दल खरे-खोटे विचारू शकता. नव्हे विचाराच. त्यांचा ई-मेलचा पत्त आहे: eam@mea.gov.in मी आत्ताच त्यांना खरे-खोटे स्पष्ट करण्याची विनंती केली आहे. उत्तर येईलच असे नाहीं, पण आले तर नक्कीच इथे पोस्ट करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा