पाकव्याप्त काश्मीरमधील कांहीं भागावर चिनी नियंत्रण?
💬 प्रतिसाद
(104)
स
सुधीर काळे
Sun, 04/10/2011 - 08:20
नवीन
कांहीं महिन्यापूर्वी मी "पाकव्याप्त काश्मीरमधील कांहीं भागावर चिनी नियंत्रण?" हा धागा सुरू केला होता (http://www.misalpav.com/node/14126) त्याला १०० प्रतिसादही आले होते.
त्यावेळी आलेल्या बातमीत आता भर इतकीच कीं हे सैन्य आता नियंत्रणरेषेवर (LoC) आले आहे आणि ही बातमी स्वतंत्रपणे अमेरिकन गुप्तहेर खात्याने confirm सुद्धा केला आहे. पूर्वी हे सैन्य रेल्वे व रस्ते बांधत होते पण आता LoC वर का आले आहे हे समजत नाहीं.
खालील दुवे उघडून वाचावेत.
http://tinyurl.com/4yaefca किंवा http://timesofindia.indiatimes.com/india/US-agencies-confirm-presence-of-Chinese-troops-along-LoC-in-PoK/articleshow/7930199.cms
कधी-कधी वाटते कीं पाकिस्तानी सरकारने आपला (पाकिस्तानचा) दुबळेपणा ओळखून चीनला प्रदेश देऊन दोस्ती व इतरही अनेक गोष्टी मिळविल्या. आपणही प्रदेश गमावला (अक्साईचीन) पण मिळविले मात्र कांहीं माहीं. आपण दुर्बळ आहोत तर कुणा बलाढ्य राष्ट्राशी करार केला पाहिजे किंवा तडजोड केली पाहिजे.
पण सरकारला सर्व माहिती असेलच! आपले पंतप्रधान १२ एप्रिलला चीनला जाणार आहेत त्यावेळी हू जिंतावना याबद्दल सांगणार आहेत असेही टाइम्सने लिहिले आहे.
पण चीनशी व्यापार वाढविण्याचे अलीकडेच केलेले करार आपण का केले?
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sun, 04/10/2011 - 08:29
नवीन
पूर्वी हे सैन्य रेल्वे व रस्ते बांधत होते पण आता LoC वर का आले आहे हे समजत नाहीं.
माझा तर्क,चीन त्यांचा मिसाईल बेस इथे बनवेल ज्यामुळे हिंदुस्थानातील प्रत्य्हेक महत्वाचे शहर त्यांच्या मार्याच्या टप्प्यात येईल. :(
चीनशी व्यापार वाढविण्याचे अलीकडेच केलेले करार आपण का केले?
फेंगशुई शास्त्रात याचे बहुधा विवेचन सापडावे !!!
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Sun, 04/10/2011 - 17:29
नवीन
खरंच आपण हा व्यापारवृद्धीचा करार कां केला? चीन आपला एक नंबरचा शत्रू आहे. आपल्या दुबळेपणामुळे आपण त्याला ठोकू शकत नाहीं इथपर्यंत ठीक आहे, पण out of the way जाऊन त्याचेच भले करायचे म्हणजे कुणी आपल्या एका गालावर थप्पड मारल्यास दुसरा गाल पुढे करण्यासारखे नाहीं का?
कारण या व्यापारवृद्धीत भारताच्या हाती कांहींच लागणार नाहीं, सगळे फायदे चीनचेच आहेत!
शिवाय WTO सारख्या करारांमुळे आपण त्या देशातील मालावर बंदी घालू शकत नसू, पण सरकारने सर्व प्रथम आपल्या उद्योगपतींना विश्वासात घेऊन चीनमधून होणार्या आयातीमुळे देशाचे सर्वांगीण नुकसान कसे होणार आहे याबद्दल माहिती, ती न पुरल्यास 'समज' देऊन तरीही परिस्थितीत सुधारणा न झाल्यास इतर कांहीं मार्गांनी त्याना सवलती नाकारून किंवा त्यांच्या धंद्यात तत्सम अडचणी आणण्याचे तंत्र वापरून ;सरळ' करता येणार नाहीं का?
शिवाय सामान्य जनतेला चिनी वस्तू न घेण्याबद्दल आवाहन करावे व त्याचा प्रचार वारंवार करत रहावे. तेही होताना दिसत नाहीं.
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Mon, 04/18/2011 - 07:22
नवीन
जम्मू आणि काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीर यांच्यामधील "प्रत्यक्ष नियंत्रणरेषे"वर (Actual Line of Control) चिनी सैनिक असल्याच्या बातम्या या महिन्याच्या सुरुवातीपासून मी वाचत आलो आहे.
http://www.zeenews.com/news697908.html
http://www.zeenews.com/news698875.html
http://www.internationalopinion.com/id356.html
झी न्यूजवरील बातम्यांत त्या रेषेवर असलेले चीनचे सैनिक खालील चित्रांत दाखविले आहेत!
याबद्दल आपले पंप्र श्री म.मो. सिंग BRIC च्या बैठकीसाठी चीनला जातील तेंव्हां याबद्दल चिनी नेतृत्वाबरोबर चर्चा करतील असेही वाचले होते.
पण तिथे झालेल्या चर्चेत याबद्दल कांहींही उल्लेख माझ्या वाचनात आलेला नाहीं. कुणी वाचले असल्यास इथे त्याबद्दलचा दुवा द्यावा.
याउलट http://m.timesofindia.com/PDATOI/articleshow/8002654.cms या दुव्यावर एक वेगळीच बातमी वाचायला मिळाली. ती म्हणजे भारत व चीन दरम्यान लष्करी शिष्टमंडळाच्या परस्पर भेटी पुन्हा सुरू करण्याबाबतची. पण त्यात बरेच उलट-सुलट मुद्दे दिसले. त्यात असे म्हटले आहे कीं
According to government sources, the Army delegation to be led by Maj-Gen Singh will comprise representatives of the Army’s Central and Eastern Commands as well as the Army Headquarters. The Sino-Indian border is guarded by Indian Army units under the Northern, Central and Eastern Commands.
पुढे असे म्हटले आहे कीं:
Sources here said it was the Chinese side that suggested the compromise of a divisional commander from the Udhampur-based Northern Command leading the Indian Army delegation, because it was concerned about loss of face if they went back on their refusal to give visa to the Northern Army Commander.
पण आपल्या शिष्टमंडळात Northern Command चा प्रतिनिधी नाहींच. म्हणजे इथेही आपन माघार घेतली आहे काय? खरे तर ज्या आपल्या अधिकार्याला आधी चीनने व्हिसा नाकारला त्यांनाच (ले.ज. जस्वाल यांनाच) पुन्हा पाठविण्याबद्दल आपण आग्रह धरायला हवा होता कारण face savingची गरज चीनपेक्षा आपल्याला होती.
(ले. ज. बलजीत जस्वाल)
मग आपण झालेला अपमान का गिळला? या परस्पर भेटीत आपला कांहीं तरी फायदा होतो कां?
यावर जाणकार जरा प्रकाश टाकतील काय?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3