Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डबडेस्ट पुणेरी पाटी

व
विजुभाऊ
Tue, 09/14/2010 - 13:45
🗣 113 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
31932 वाचन

💬 प्रतिसाद (113)
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 09/15/2010 - 09:32 नवीन
पूर्वी सकाळ प्रेस च्या दारात खूप वाहने पार्क केली जात, त्यामुळे आतमधे जाताना त्रास होई. म्हणून तिथे भिंतीवर लिहीले येथे वाहने लावू नयेत. तिथे लोकांनी गाड्या लावणे बंद केले आणि फेरीवाल्या विक्रेत्यांनी रात्री हातगाड्या , सायकली आणून लावायला सुरुवात केली. मग परत भिंत रंगवली, लिहीले येथे कोणत्याही प्रकारची वाहने लावू नयेत. उदा. स्कूटर, चारचाकी, सायकली, हातगाड्या एका टारगट माणसाने विटेच्या तुकड्याने हातगाड्यांच्या पुढे २ शब्द खरडले. आता असे दिसू लागले. येथे कोणत्याही प्रकारची वाहने लावू नयेत. उदा. स्कूटर, चारचाकी, सायकली, हातगाड्या आणि विमाने
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 09/15/2010 - 12:04 नवीन
एका टारगट माणसाने विटेच्या तुकड्याने हातगाड्यांच्या पुढे २ शब्द खरडले तो टारगट इसम नक्की शनीवार पेठेतला सकाळ ऑफीसच्या जवळच रहात असणार. असो. ही घ्या चिंचवडमधील एक पाटी येथे ष्टो दुरुस्ती, नाडी बंडल, घरगुती परकर आणि ताजा काळा मसाला मिळेल.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 09/15/2010 - 12:26 नवीन
>>तो टारगट इसम नक्की शनीवार पेठेतला सकाळ ऑफीसच्या जवळच रहात असणार. ह्म्म्म...कळतायत बरं टोमणे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 09/15/2010 - 12:39 नवीन
धम्या ते विजुभौंनी म्हटलेंलं मोदी गणपती स पेठेत कुठं आहे रे. पत्ता मिळाला तर आम्हाला पण सांग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Wed, 09/15/2010 - 14:32 नवीन
मोदी गणपती ठाऊक नाय? मेल्या लाज आणतोस चारचौघात. स्वतःला पुणेकर म्हणवुन घ्यायच्या लायकीचा न्हाईस लेका. चित्रशाळेपासून सरळ नो वेंट्रीतुन गाडी नारायणपेठेत घातली की जिथं रस्ता संपतो तिथं डाव्या बाजूला मोदी गणपती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 09/15/2010 - 14:42 नवीन
आयला ते होय पण ते तर नारायण पेठेत आहे. हे भौ तर म्हणून राहीले सदाशिव पेठेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Wed, 09/15/2010 - 14:48 नवीन
नाय, पोकळ शब्दात पकडायलायस म्हणुन विचारतो हां. पुणे-व्हाया-मुंबई-व्हाया-होसुर-व्हाया-बारामती-व्हाया-सातारा असा प्रवास झाल्यानंतर एव्हढी तेव्हढी गडबड व्हायचीच की हो. घ्या सांभाळुन. आपलंच हैत ते बी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
प
परिकथेतील राजकुमार Wed, 09/15/2010 - 14:49 नवीन
अभिनंदन हो विजुभौ. अवांतर :- कितीची सुपारी फुटलिये ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
व
विजुभाऊ Wed, 09/15/2010 - 13:18 नवीन
मोदी गणपती स पेठेत कुठं आहे रे पेशवे अभ्यास कमी पडतोय तुमचा जेथे नारायण पेठ सदाशिव पेठेला मिळते तेथे ( जिथे सागरा धरणी मिळते च्या चालीवर ) हा घ्या एक्झॅक्ट पत्ता Coordinates: 18°28'38"N 73°57'20"E ... मोदी गणपती ला बोंबल्या गणपती असेही एक नाव आहे ( Legend has it that Modi Ganpati temple got its name since the temple idol was found in a farm next to Khushrooshet Modi’s garden (how it landed there we do not know). A lesser known name for this charming temple is Bomblya Ganpati (which sounds both fishy and loud)! The story goes that this name got associated with it due to fisher folk selling Bombil (a fish also known as Bombay Duck) nearby. In colloquial Marathi Bomblya also means – one who speaks loudly. This temple from the Peshwa era dates back to before 1811. Bhat (a Maharashtrian surname) from Ratnagiri, later settled in Pune and built the temple. The idol is thought to be 200 years old )
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 09/15/2010 - 13:57 नवीन
जेथे नारायण पेठ सदाशिव पेठेला मिळते तेथे हा हा हा हा हा . उगा काहीतरी फेका मारू नका सवईनुसार.. मोदी गणपती अंमळ नारायण पेठेतच आहे फार्फार पूर्वीपासून. सदाशिव पेठ चांगली दूर आहे तिथून. लक्ष्मीरोडच्या पल्याड सदाशिव पेठ आहे आणि अल्याड नारायणपेठ आहे. उगा आपलं कैच्याकै बरळायचं. आणि जालावर (पुणे हेरीटेज ब्लॉगवर) शोधून माहीती कोणीही देईल हो.. ओरिगिनल करा कधीतरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
पिशी अबोली Sat, 09/14/2013 - 19:58 नवीन
जातीयवादी गणपती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
पर्नल नेने मराठे Wed, 09/15/2010 - 13:42 नवीन
आमच्या गिरगावात ब्राम्हणसभेत महिला मंडळाने भरविलेले विविध वस्तुंचे प्रदर्शन होते. एका मित्राच्या आइचा त्यात स्तॉल असल्याने आम्ही मित्र मैत्रीणी मिळुन सगळे गेलो. बाहेर मोठी पाटी लावली होती "येथे बायकांचे भव्य प्रदर्शन व वि़क्री" :(
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 09/15/2010 - 13:49 नवीन
नशीब "भव्य बायकांचे......" असे नव्हते! "नेटके"पणाचा अभाव, दुसरे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
ध
धमाल मुलगा Wed, 09/15/2010 - 15:04 नवीन
हाण्ण तिच्यायला!!!! =)) =)) =)) अवांतरः पाटी वाचुन प्रदर्शन पहायला झुंबड उडाली होती का? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
र
रेवती Wed, 09/15/2010 - 15:07 नवीन
बायकांचे? आँ? धन्य जाहले!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
स
सूड Wed, 09/15/2010 - 16:33 नवीन
येथे बायकांचे भव्य प्रदर्शन व वि़क्रीImage removed. हे वाचून मला भव्य महिलांचे कबड्डी सामने चा बोर्ड आठवला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
स
सुहास.. Wed, 09/15/2010 - 22:18 नवीन
येथे बायकांचे भव्य प्रदर्शन व वि़क्री >>. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मार डाला !! ही चुचु पण ना !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 09/23/2010 - 13:05 नवीन
आज अजुन एक पाटी वाचली. विसा रिनिवलसाठी मेडीकल टेस्ट होती. खुप दारं शोधली आत जायला. शेवटी एका दारावर मेडिकल फिटनेस टेस्ट( फिमेल कलेक्शन) जरा उडालेच मग खाली अजुन लिहिलेले वाचले ब्लड कलेक्शन मग आत गेले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
व
विजुभाऊ गुरुवार, 09/23/2010 - 14:50 नवीन
स पेठेतली आणखी पाठी जेवणाच्या ऑर्डरी घेतल्या जातील. आजची स्पेश्यालिटी : श्राधाची थाळी बापट उपाहार गृह पुने येथे असलेले स्टॅन्डर्ड पाटी आमचे लस्सी प्यायची नसते खायची असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
ध
धमाल मुलगा गुरुवार, 09/23/2010 - 15:04 नवीन
>>आजची स्पेश्यालिटी : श्राधाची थाळी काहीही फेकू नका भौ! इथं काय सरदारजी जमलेत का सगळे? च्यायला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ Wed, 09/15/2010 - 14:07 नवीन
सातार्‍यात एक पाटी आहे बालाजी मिल्क्...अद्ययावत म्हशींच्या गोठ्यातील दूध. माझ्या एका इरसाल मित्राची कॉमेन्ट " कोण अद्ययावत ?म्हशी की गोठा?"
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 09/23/2010 - 16:35 नवीन
सातार्‍यात एक पाटी आहे सातार्‍यात? शक्य आहे का हे? पुण्यातच असेल नीट आठवून मग सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
श
शेखर Wed, 09/15/2010 - 14:45 नवीन
हा ५० वा प्रतिसाद विजुभाऊ :)
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार गुरुवार, 09/16/2010 - 06:49 नवीन
~~~~~
  • Log in or register to post comments
च
चिगो Wed, 09/15/2010 - 19:43 नवीन
झक्कास देवा... हाणा आणखी..
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र गुरुवार, 09/16/2010 - 07:54 नवीन
डोंबिवलीतील रेतीबंदरवर, खाडीकीनारी असलेली, खास आगरी पाटी. "येते जोरप्यांनी वाय्हात चाले करु नये, पकरल्यास पोकल बांबुचे फटके परतील."
  • Log in or register to post comments
D
Dipankar गुरुवार, 09/16/2010 - 08:57 नवीन
तशीच पाटी भोपर टेकडी, डोंबिवलीला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
अ
अवलिया गुरुवार, 09/16/2010 - 09:07 नवीन
तरीच कुंद्या मागल्या भारत भेटीत पोकल बांबुचे फटके पडलेअसं कोकलत होता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
क
कुंदन गुरुवार, 09/16/2010 - 14:27 नवीन
आचरट ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
विजुभाऊ गुरुवार, 09/16/2010 - 09:53 नवीन
पार्ल्यात बायकोसमवेत आलेल्या एका पुणेकराने भेळपुरीच्या गाडीवर ऑर्डर केली होती हीला चाट आणि मला रगडा..
  • Log in or register to post comments
स
सविता गुरुवार, 09/16/2010 - 10:04 नवीन
ठ्यो......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ग
गणपा गुरुवार, 09/16/2010 - 10:09 नवीन
इजुभौ हे कैच्याकैच हा. हा जुना जोक पुणेकरांच्या नावावर खपवताय. ;) हाच जोक आम्ही शाळेत असताना मारवाड्यांच्या बाबतीत ऐकलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 09/16/2010 - 14:58 नवीन
अहो चालायचंच मार्केटात चालतो तो माल ते खपवतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
व
विजुभाऊ गुरुवार, 09/16/2010 - 11:15 नवीन
हा जुना जोक पुणेकरांच्या नावावर खपवताय. नाय ओ.... मी तो पार्ल्यातला किस्सा सांगितला. मला पुण्यातली स पेठेतली एक पाटी कधीच कळाली नाही वात ! वात !! वात !!! जिवाला खा जिवाला खा...अनरसे सामोसेवाले. या दोन्ही पाट्या ज्ञानप्रबोधिनी च्या बाहेर आहेत स प महाविद्यालायच्या समोर एस पीज असे एक भेळ वगैरे चे दुकान होते/आहे तेथे येथे हात धुवावेत असा उलट्या अक्षरातील बोर्ड आहे. तो बेसीनवरच्या आरशात सुलटा दिसतो. त्याच आरशावर आरशात बघून भांग पाडून नये असाही बोर्ड आहे. तो मात्र सुलटा आहे
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 09/16/2010 - 11:29 नवीन
जंगली महाराज रस्ता, मथुरा हॉटेलच्या एंट्रंसच्या अगदी बाजूला त्या इमारतीचा एंट्रंस आहे तिथे... Image removed.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय गुरुवार, 09/16/2010 - 13:14 नवीन
काय बिका? आता ही पण पुणेकरांचीच चुक का? या बिचार्‍याला शाळेत किती त्रास झाला असेल नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/16/2010 - 13:22 नवीन
बघ बिका, पुणेकरांना किती लगेच शिव्या घातल्यासारखं वाटतं ते! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय गुरुवार, 09/16/2010 - 13:40 नवीन
या शिव्या होत्या? मला कळलेच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विजुभाऊ गुरुवार, 09/16/2010 - 13:38 नवीन
ओ ठणेवाल्या ताई यमक जुळवायला पुणे तेथे काय उणे असे म्हंटले जाते. पण ठाणे तेथे काय उणे असे का म्हंटले जात नाही.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/16/2010 - 14:13 नवीन
ठाण्यात हाय काय तिच्या****? सगळीकडे नुस्ती तळी होती ती बुजवत सुटले आहेत कधीचे, एक पागलखाना होता तो हलवला ... आता ठेवलंय काय तिथे, तर गर्दी? हॅट, ठाणं बेक्कार आहे एक लंबर!! पुण्यात पहा जागोजागी तळी आहेत, जागोजागी नवीन निर्माण होत आहेत, पागलखाना अजून सुरू आहे ... पुण्यात गर्दीही नाही!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
म
मृत्युन्जय गुरुवार, 09/16/2010 - 14:21 नवीन
काय आहे. ठाण्यातले सगळ्यात डेंजर येडे उठुन पुण्यात आले. त्यामुळे गरज उरली नसावी बहुधा पागलखान्याची. पण एकुण ठाण्यात पागलखाना होता तेव्हा(च) ठाण्यात काही शान होती हा विचार आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/16/2010 - 14:23 नवीन
छे छे, ठाण्यात शान कधीच नव्हती; चान्सच नाही! ते आपलं उगाच बोंबलायला लोकं काय वाट्टेल ते बोंबलतात हो, तुम्ही नका लक्ष देऊ! पागलखाना होता तेव्हा ठाण्यात जरातरी काहीतरी सांगण्यासारखं होतं. आता काय आहे, तो टीचभर मासुंदा तलाव आणि आक्रमण झालेला इंचभर आंबेघोसाळे तलाव आणि अतिक्रमणयुक्त येऊर?? हॅट... त्यापेक्षा तळतळाटांचं (भरपूर तळी असलेलं) आणि पागलखाना असलेलं पुणं खूप चांगलं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय गुरुवार, 09/16/2010 - 14:31 नवीन
अवो तो पागलखाना चालु हाये म्हणे अजुन. पुन्यांदा तपासुन बगा जरा. कदी बंद जाला? बाकी ठाणे म्हणजे देसाची शान हाय. कोनालाबी गुनेगाराला पकडलं की तो पिच्चर मधला हवालदार्र म्हनतो ना - चल ठाण्याला म्हननु. आनि उपवन ल्याक आहे ना तिथे अजुन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विजुभाऊ गुरुवार, 09/16/2010 - 15:08 नवीन
आणखी एक.... ठाणेरी पाट्या अजून कुणी प्रसीद्ध केल्या नाहीत.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय गुरुवार, 09/16/2010 - 15:12 नवीन
घ्या वरतीच लिहिली आहे एक ठाणेरी पाटी. इथे परत लिहितो "यशवंत भोजनालय - येथे फक्त राहण्याची सोय केली जाइल "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ग
गांधीवादी Fri, 09/17/2010 - 09:07 नवीन
ढकल पत्रातून मिळालेल्या अजून काही. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. चहाच्या दुकानात हेअरकटिंग! Image removed.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 09/17/2010 - 10:19 नवीन
क ड क! कैलास स्मशानभूमीखालच्या बाणासमोरच 'अब मेरा नंबर है' =)) आणि 'रिटर्नसाठी शववाहिनी उपलब्ध होणार नाही' _/\_ हैट्ट आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
त
तिमा Fri, 09/17/2010 - 10:42 नवीन
मागे एकदा बडोद्यात असताना बसच्या मागे गुजराथीत 'गमे मनने फावे तनने', अशी ड्रेसेसची जाहिरात होती. ती मराठी अर्थाने वाचली. ठ्ठो! गुजराथी लिपी येत असेल तर कळेल.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Sun, 09/15/2013 - 04:09 नवीन
'गमे मनने फावे तनने' याचा मराठीत अर्थ असा होऊ शकतो. (पाहिल्यावर) मनाला (ड्रेस) आवडतो (व परिधान केल्यावर) शरीराला सुखाचा वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
ब
बरखा Fri, 09/17/2010 - 11:32 नवीन
क्रुपया पेश॑टनी नाव नो॑दणी सकाळी ११:१५ च्या आत व रात्री ८:१५ च्या आत करावी, न॑तर आलेल्या पेश॑ट कडुन ५० रुपये ज्यादा आकारण्यात येतील.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा