Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माहिती तंत्रज्ञानातील धडाडीची ५ वर्षे

प
प्रचेतस
Tue, 09/28/2010 - 10:32
🗣 88 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
18963 वाचन

💬 प्रतिसाद (88)
प
पुष्करिणी Tue, 09/28/2010 - 20:23 नवीन
हे ही असू शकतं हं ! म्हणजे भाइ रडत असताना ( डोळे आलेल्या ) दादांनी डोळे पुसायला रूमाल दिला आणि ४-५ भाइ, जी, दादा बळी पडले. कुणाला अंकुरभाइ गरीबांचे हृतिक रोशन हरमन बवेजा यांच्या सारखे दिसतायत का , की मलाच भास होतोय? त्यांचंही असंच झालय ना त्या २०५० सिनेमा नंतर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 09/28/2010 - 20:29 नवीन
इथे मिपावर पण साथ येईल!
गरीबांचे हृतिक रोशन हरमन बवेजा
ह ह पु वा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
प
पुष्करिणी Tue, 09/28/2010 - 20:30 नवीन
तर काय, मी तर गॉगल घालूनच बसलेय दुपारपासून ,कुठे रिस्क घ्या .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/28/2010 - 20:31 नवीन
मलाही असंच वाटतंय गं! आणि एक गॉगलधारी संजय मोनेंचा (अंमळ "हडकुळा") तोतया वाटतोय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
अ
अनामिक Tue, 09/28/2010 - 20:33 नवीन
कित्ती कित्ती ते बघावं ह्या दादा आणि भाईंकडे? उगाच नाही ते तरुणी हृदयसम्राट होत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/28/2010 - 20:35 नवीन
पाशवी असं विशेषण लागल्यावर मग पाशवीपणा करूनच घ्यायचा. ;-) बाकी आम्हां सगळ्यांना तरूणी म्हटल्याबद्दल तुझे खास आभार रे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
र
रेवती Tue, 09/28/2010 - 20:41 नवीन
अगं ए तरुणींनो, जरा हसण्यातून दम घेउ द्या! किती फिदा व्हाल त्या एकट्यावर? डोळ्याचे साथ आलिये म्हणे! आधी ती पाशवीपणाची साथ आवरा!;) मला तर तो माणूस गरिब आणि पाशवी तरुणींचा हिरो वाट्तोय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
पुष्करिणी Tue, 09/28/2010 - 20:50 नवीन
दादा गरीब तर आहेतच, त्याच्याच गुंड मित्रांनी त्याची अशी जाहिर बिनपाण्यानं केलीयं.. पण अगं तरूणी तू असा पाशवीपणा मधेच सोडू नकोस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
परिकथेतील राजकुमार Wed, 09/29/2010 - 07:56 नवीन
अगं ए तरुणींनो, जरा हसण्यातून दम घेउ द्या! किती फिदा व्हाल त्या एकट्यावर?
ऑ ? ह्या पुष्करिणी काकु, जोजो काकु तरुणी कधी पासुन झाल्या ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/29/2010 - 08:19 नवीन
जळजळ पोहोचली; इनो घ्या मालक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
पुष्करिणी Tue, 09/28/2010 - 20:35 नवीन
हो हो, सापडला लब्बाड. अंकुरभाइ अगदीच धर्मबुडवे आहेत्, युके रिटर्न असल्यानं त्यांनी एकट्यानं गंध लावलेलं नाहीये, बाकी सगळ्या दादा आणि जींनी कसं एकसारखं गंध लावलय कपाळाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
र
रेवती Tue, 09/28/2010 - 20:47 नवीन
ए, तो हिरो आहे ना! मग गंध कसा लावेल? आणि पाशवीपणाचा अंश तरी दिसतोय का चेहेर्‍यावर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
प
पुष्करिणी Tue, 09/28/2010 - 20:56 नवीन
ओ हो, हे बाकी विसरलेच हं ! हिरो एकदम न कापलेले केस, गॉगल अशा स्टॅंडर्ड युनिफॉर्मात आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
अ
अनामिक Tue, 09/28/2010 - 20:31 नवीन
त्यांचंही असंच झालय ना त्या २०५० सिनेमा नंतर नाही नाही... त्याचे आता होर्डिंग्जही लागत नाहीत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
प
पुष्करिणी Tue, 09/28/2010 - 20:40 नवीन
अरेरे.. इतका पाशवीपणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
प
पैसा Tue, 09/28/2010 - 20:42 नवीन
तो दुसरा पाशवी धागा सगळ्यांच्या नजरेतून सुटला की काय? :-?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
प
पुष्करिणी Tue, 09/28/2010 - 20:45 नवीन
कोणता कोणता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 09/28/2010 - 20:48 नवीन
त्याची कॉपीराईट फक्त एकाच लेखकाकडे आहे! बिच्चारे पुरुष कसे आत्महत्या करताहेत आणि तुम्ही इकडे दादा भाईची चर्चा करताय? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
प
पुष्करिणी Tue, 09/28/2010 - 20:52 नवीन
जीवंत माणसाला किंमत द्यायची नाही आणि मेल्यावर दु:ख करायचं काय हे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अनामिक Tue, 09/28/2010 - 20:53 नवीन
मग काय? दादा-भाई नंतर आता नौरोजींची चर्चा करायला तिकडे चला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
र
रेवती Tue, 09/28/2010 - 20:59 नवीन
हे पहा अनामिकजी, एकतर या पाशवी धाग्यात तुम्हाला प्रवेश मिळायला नको. पण आता आलात तर ठिके.;) तुम्ही महिती तंत्रज्ञानात ५ वर्षें किंवा जास्त काम केले आहे काय? नाही, नुसते काम करून उपयोग नाही. भरीव कामगिरी, पाठोपाठ सत्कार, होर्डिंग (एकतरी) लागायला हवे. मिपावरचे काही सदस्य पकडून गंध लावून फटू काढलेत काय? नाही ना? मग काय उपयोग? नौरोजींची चर्चा पुढल्या धाग्यात करू!;) तूर्तास गॉगल लावा पाहू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
प
पुष्करिणी Tue, 09/28/2010 - 21:03 नवीन
आता तुम्ही इतकं त्यांच्या नावापुढं 'जी' लावलत, गॉगलवाला फोटू राहिलाय फक्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
अ
अनामिक Tue, 09/28/2010 - 21:17 नवीन
माहिती तंत्रज्ञानात नाही पण गवंडीकामात ५ वर्षाचा अनुभव आहे... शिवाय गवंडी काम असल्याने काम भरीवच आहे. उत्तर्-पुर्वेकडच्या काही संपादकांनी मनावर घेतलं तर आमचाही असाच एक फोटो (संपादकांच्या फोटोसकट) बोस्टनच्या डाउनटाउनमधे लागायला हरकत नाही. बोला, आहे का तयारी? गॉगल लावलेला फोटो लगेच व्यनी करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
प
पुष्करिणी Tue, 09/28/2010 - 21:24 नवीन
इथेच चुकतय...एकट्याचा फोटू काय कराय्चाय? एकतर भाइंसारखं एक मित्र मंडळ काढा आधी स्वतःच्या नावावर, किंवा कोणत्यातरी भाइंच्या मित्रमंडळात सामिल व्हा..( बघा जमलं तर संपादकांनाच पकडा, नुसतीच भीती दाखवत असतात पण फोटो नाही ना पाहिले कधी संपादकांचे म्हणून ). मग सगळ्या गँग्चा टाका फोटू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
र
रेवती Tue, 09/28/2010 - 20:07 नवीन
आईग्ग!! हसून हसून पोट दुखायला लागले. हा धागा माहिती तंत्रज्ञानावरचा असल्याच्या समजुतीमध्ये 'निवांतपणे' वाचण्यासाठी ठेवला होता. चांगली माहिती मिळेल या आशेनं (आणि आदरानं) धागा उघडला आणि जे काय पहायला मिळालं......त्यावरचे प्रतिसादही मजेशीर आलेत. मीही एकदम अंकुरभाईंवर फिदा झालिये.......त्याचे दोन फायदे, एक म्हणजे मला आज्जी म्हणणार्‍यांना मला तरुणी म्हणणे भाग आहे.;) वाचतोयस ना प्रभो! दुसरा फायदा सगळ्यांनाच होणारे. आमच्यासारख्या काकवा फिदा व्हायला लागल्या कि असली होर्डींग्ज लागणार नाहीत.;) अंकुरसाहेबांना हे सगळं कसं चालतं कळत नाही बुवा! बाकिच्या चिल्ल्यापिल्ल्यांना तरी किती हौस म्हणते मी!;) मागच्या भारतभेटीत एकेठिकाणी शाळकरी वाटतील अश्या मुलांचे फोटो होते आणि त्यांनाही जी, साहेब, दादा वगैरे म्हटलेले पाहिले होते. हे सगळे माझ्या नजरेला गुंड वाटतात. काहीजणांना केस कापायला पुरेसे पैसे मिळाले नसल्यागत दिसताहेत. मिपावरचे अनेक सदस्य माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पाच वर्षांपेक्षा जास्त काम (गिरी) करत आहेत त्यांचे असे कौतुक झाले असल्यास आम्हाला आनंदच होइल.
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Tue, 09/28/2010 - 23:53 नवीन
जाउंद्या ओ रेवती मॅम.. तुमचे ३% घ्या आणि मिटवुन टाका! -- इंटरनेटचंद्रभाईस्न्हेहीरावअण्णादादाजी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
व
विश्वनाथ मेहेंदळे Tue, 09/28/2010 - 20:26 नवीन
मला वाटते की कुणाचे तरी या अंकुरशी भांडण झाले असावे म्हणून त्याने असा सूड उगवला. मंडळाचे नाव पाहिल्यावर तर अगदी तसेच वाटते. माझा ही राग आहे काही जणांवर. त्यांचे फोटो शोधतो आहे. मिळाले की लगेच होर्डिंग छापून, लावून, स्वतःच त्याचे फोटो काढून जालावर टाकेन म्हणतो.
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 09/28/2010 - 20:31 नवीन
सूड उगवला? बाप रे! आज आज हसू हसून पुरती वाट लागणार.;) तुमचा राग असलेले लोक्स बघायला आवडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
ह
हुप्प्या Tue, 09/28/2010 - 21:28 नवीन
साहेब, जी, भाई, दादा वगैरे आदरार्थी उपाध्यांची खैरात केलेली दिसते. त्यातल्या खाशा मंडळींच्या नावामागे आणि आडनावामागे दोन्ही उपाध्या दिसत आहेत. अमुकराव तमुकसाहेब वगैरे. एकदा "जाणता राजा" शरद पवार ह्यांच्या नावाचे होर्डिंग होते त्यात श्री शरच्चंद्ररावजीदादासाहेब पवार असा उल्लेख होता. त्यात आणखी अण्णा आणि अप्पा कुठे बसवता आले असते तरी चालले असते. असो. यथा राजा तथा प्रजा.
  • Log in or register to post comments
न
निस्का Tue, 09/28/2010 - 23:02 नवीन
"तरुणी हृदयसम्राटांची भरीव कामगिरी" येथे पाहणे ;-)
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Tue, 09/28/2010 - 23:29 नवीन
यात 'इंग्लंड-UK रिटर्न' असे कुठेच म्हटल्याचे दिसत नसल्याने माहिती अग्राह्य ठरत आहे. सबब चुकीचे असे टाचण दिलेले आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निस्का
न
निस्का Tue, 09/28/2010 - 23:39 नवीन
अहो सिंबी चा कोर्स इंग्लंडातून केला असावा (लाँग डिस्ट्न्स आहे ना ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
र
रेवती Tue, 09/28/2010 - 23:55 नवीन
अरे, काय राव तुम्ही पण! आधी त्या अनामिकजींना मदत करा. एखाद्या विकांताला गंध लावून फोटूगिटू काढून हुप्प्याभाई, निस्काजी, मेघवेडासाहेब अशी नावे लिहून आपण होर्डींग तयार करू. बॉस्टनात लावून टाकू.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 09/29/2010 - 05:56 नवीन
फार अपेक्षेने हा धागा उघडला होता अन त्याचे फळ मिळाले. बाकी 'संतोषभाऊ देशपांडे' हे या गृप फोटोत विसंगत दिसत आहेत नाही?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 09/29/2010 - 06:04 नवीन
माझे तर ही भव्य दिव्य पाटी दिसताच अंकुरदादा(भाई) यांच्या कौतुकाने डोळेच पाणावले.
  • Log in or register to post comments
अ
अनन्ता Wed, 09/29/2010 - 12:09 नवीन
चाय्ला, या अन्कुर च्या "जी" मधे "जी" आहे का स्वतहाला भाई म्हनुन घ्यायला. हा नक्कि हाउस कीपीग मधे असनार.
  • Log in or register to post comments
स
सविता गुरुवार, 09/30/2010 - 06:37 नवीन
ही पण पहा.. मला ढकलपत्रातून आली होती काही दिवसांपुर्वी!! Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी गुरुवार, 09/30/2010 - 07:09 नवीन
शिकागो (USA ) 'कोणीतरी ह्यांच्याकडून काहीतरी शिका गो' असा एक फालतू विनोद आठवला. फ्लेक्स चे बोर्ड किती स्वस्त झाले आहेत, ८ रुपये प्रती चौरस फूट. अवांतर : कोणाला फ्लेक्स चे बोर्ड करून हवे असतील तर त्यांनी कृपया संपर्क साधावा. फ्लेक्स चे बोर्ड करून मिपावर जाहिरात पण केली जाईल. (फुकटात). ग्रुप ने येणार्यांस १० टक्के कमिशन. USA ला जाणार्या साठी बोर्डचे templates तयार आहेत, त्वरा करा. आमचा पत्ता : पुण्यात येऊन कोणत्याही शेंबड्या मुलाला विचारा. ( अट : मुलगा शेंबडाच असला पाहिजे )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा