Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विस्मरणात गेलेले पदार्थ--------- १)डांगर...............

न
निवेदिता-ताई
Wed, 10/13/2010 - 17:16

प्रतिक्रिया द्या
10464 वाचन

💬 प्रतिसाद (27)
स
स्मिता चावरे Wed, 10/13/2010 - 17:20 नवीन
माझा आवडता पदार्थ !
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Sun, 10/17/2010 - 14:11 नवीन
हा घ्या फोटो.........त्यासाठी खास डांगर बनवले व फ़ोटु काढला. Image removed.From
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता चावरे
प
पैसा Wed, 10/13/2010 - 17:24 नवीन
आणखी येऊ दे.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 10/13/2010 - 17:26 नवीन
नाही नाही ,डांगर हा पदार्थ विसरण्या सारखा नाहीच मुळी . आता परत माझ्या घरच थोड वेगळ असत, म्हणजे आम्ही फक्त उडीद डाळीच करतो अन दही असलच पाहीजे अस ही नाही, नुसत पाण्यात सुद्धा कालवल तरी छान लागत. तो कच्चा कांदा, मिरची अन कोथींबीर आहाहा !!
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 10/13/2010 - 20:12 नवीन
नाही नाही ,डांगर हा पदार्थ विसरण्या सारखा नाहीच मुळी . असेच म्हणतो! माझा देखील आवडता पदार्थ. बाकी त्यात काय असते ते माहीत नाही, त्या पिठाचे डांगर पदार्थ मात्र मला देखील करता येतो आणि अर्थातच खाता येतो. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
प
प्राजु Fri, 10/15/2010 - 15:07 नवीन
कोण म्हणतं.. विस्मरणात गेलंय डांगर?? आमच्याकडे खूप आवडतं. आम्ही सुद्धा फक्त उदड डाळीचे करतो. (करतो म्हणजे सहस्त्रबुद्धेंच्या ६५ प्रकारच्या पिठांमधून उचलून आणतो) ;) अतिशय लाडका पदार्थ. कशाबरोबरही छानच लागतो, पोळी, भाकरी, भात.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
ग
गणेशा Wed, 10/13/2010 - 18:33 नवीन
येवुद्या आनखिन वाचत आहे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 10/13/2010 - 18:44 नवीन
आम्हाला पोह्याचं डांगर आवडतं.. (कोकणातला) तात्या. -- शुद्धकल्याण गावा तर करीमखासाहेब, हिराबाई, आणि भीमण्णांनी, हमीर गावा तर गजाननबुवा, यशवंतबुवा, आणि मधुबुवांनी!
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Wed, 10/13/2010 - 18:54 नवीन
आम्हाला पोह्याचं डांगर आवडतं.. ते कस बनवायच......सांगा...पहाते करुन.
  • Log in or register to post comments
त
तर्री Wed, 10/13/2010 - 20:08 नवीन
पोह्याच्या पापडाचे पिठ असते ते. पापड न लटता , तसेच गोळा करून खावे . बरोबर कच्चे गोडे तेल असेल तर काय ? आणि हो त्यामध्ये "टाकणखार" घालतात असे वाट्ते.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Wed, 10/13/2010 - 21:00 नवीन
हा विस्मरणात नक्कीच गेला नाही. कदाचीत नव्या पिढीला माहीत नसेल. कच्चा कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरचिचे तुकडे (लाल तिखटा ऐवजी) यासाह दह्यात भिजविलेले डांगर आणि त्यात हिंग घालुन चरचरित फोडणी म्हणजे एक भन्नाट चव असते.
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 10/13/2010 - 21:06 नवीन
भयानक सहमत!:) माझा आवडता पदार्थ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
श
शुचि गुरुवार, 10/14/2010 - 00:48 नवीन
हा हा "भयानक सहमत" :) हा हा हा पाककृती हा विभागच अतिरेकी घोषीत करा बुवा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
इ
इंटरनेटस्नेही गुरुवार, 10/14/2010 - 09:56 नवीन
+१ असेच म्हणतो.. (अंमळ जुन्या पिढीतला) इंट्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
च
चित्रा गुरुवार, 10/14/2010 - 03:55 नवीन
मला लग्न होईपर्यंत डांगर दह्यात घालून खातात हे माहिती नव्हते. नंतर कळले. आमच्याकडे पोह्याचे डांगर लाट्या करून तेलात बुडवून खात. ते झकास लागते.
  • Log in or register to post comments
र
राधा१ गुरुवार, 10/14/2010 - 06:37 नवीन
य्म्म्मीच असत. त्याची रेसिपी १ वाटी पोह्याचे पीठ १ चमचा लाल भडक तिखट (लाल मिरची ची पुड) १/२ चमचा मिठ पाव चमचा पापडखार २वाट्या पाणी इराणी हिंग नसल्यास वनदेवी हिंग तोही नसल्यास साधा हिंग वासा नुसार साधारण २/३ चिमट्या. प्रथम पोह्याचे पिठ..पोहे मंद आचेवर भाजुन घ्यावेत व ते घरघंटीवर दळुन आणावेत. पोह्याच्या पिठात हिंग, पापड खार, तिखट चांगले मिसळुन घ्यावे. नंतर चवीप्रमाणे मिठ पाण्यात घालावे व त्याला चांगली उकळी येवु द्यावी. याला मिठवणी म्हणतात. हि मिठवणी तिखट मिसळ्लेल्या पिठात आवश्यकतेनुसार घालावी. ह्याची कन्सिसटन्सी पोळीच्या पिठासारखि पाहिजे..नंतर यात थोड तेल घालुन चांगल मळून घ्याव. मग मिक्सरला तेला चा हात लावुन त्यात हे पिठ मउसर फिरवुन घ्याव. आणि मग हाणाव...पण जरा जपुन.. कारणा आजच्या नंतर नेहमी उद्या उगवत असतो... ;)..सो तिखट झेपेल एवढं घाला.. :) ;)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 10/14/2010 - 07:06 नवीन
राधा १ कध्धी ऐकल सुद्धा नाही हो अस पण डांगर !! हे परत आणि तेला बरोबर खायच? कस? वरुन तेल घेउन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राधा१
र
राधा१ गुरुवार, 10/14/2010 - 07:47 नवीन
अग मस्त लागत नक्की करुन बघ. लहानपणी आम्ही पोह्याचे पापड करायचो..अर्धे वाळत घालायचॉ आणि अर्धे गट्टम करायचो..कच्चे/ओले..!! अपर्णा ताई..कच्चया तेलात बुडवुन, माखुन..!!! पण मला नाही आवडत तस..त्या पेक्षा मी नंतर ताक पिते..
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा गुरुवार, 10/14/2010 - 07:51 नवीन
पाकृ छान आहे. :) पण डांगर म्हणजे खान्देशात लाल भोपळ्याला म्हणतात. त्यामुळे गल्लत झाली.
  • Log in or register to post comments
भ
भाऊ पाटील गुरुवार, 10/14/2010 - 09:37 नवीन
>>पण डांगर म्हणजे खान्देशात लाल भोपळ्याला म्हणतात नाही हो.... खान्देशातले डांगर म्हणजे मस्क मेलन (इंग्लिश) खान्देशात लाल भोपळ्याला लाल भोपळाच म्हणतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
स
सुहास.. गुरुवार, 10/14/2010 - 10:23 नवीन
पण डांगर म्हणजे खान्देशात लाल भोपळ्याला म्हणतात. त्यामुळे गल्लत झाली >>. होय आणी त्याची आम्ही भाजी सुध्दा करतो ...अर्थातत्यात अजुन एक अनुस्वार हवा " डांगरं" धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
ज
जागु गुरुवार, 10/14/2010 - 07:59 नवीन
निवेदिता ताई मस्तच. मी केला होता हा प्रकार एकदा पण चणाडाळ ऐवजी मी चण्याचे डाळे म्हणजे चिवड्यात घालतो ती घेतली होती. छान लागतो.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 10/14/2010 - 08:33 नवीन
मस्त मस्त ! लेखातल्या आणि प्रतिसादातल्या पाकृ देखील. फोटु कुठ हाय ? दरवेळी असे चालणार नाही बॉ !
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे गुरुवार, 10/14/2010 - 11:41 नवीन
छानच!! लहानपणी गावी गेल्यावर गरम गरम नाचण्याच्या भाकरीत ताजे ताजे डांगर पसरवून मग भाकरी दुमडून खायचो.. आजीची आठवण आली.. झक्कासच!!
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 10/14/2010 - 14:58 नवीन
विस्मृतीत गेलेल्या डांगराची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ल
लतिका धुमाळे गुरुवार, 10/14/2010 - 19:52 नवीन
मेतकूट दह्यात कलवून त्याला जिरे हिन्ग आणि लाल मिरचिची फोडणी. हे पण छान लागते.
  • Log in or register to post comments
स
सविता Fri, 10/15/2010 - 12:15 नवीन
मस्त......... आम्ही कच्च्या कांद्याच्या ऐवजी तो फोडणी मध्येच परतून टाकतो.... एक नंबर होते... खिचडी..पापड्...डांगर..... मस्त मेनू!!!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा