Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रगती!!! नक्की कशासाठी?

म
मराठमोळा
गुरुवार, 10/14/2010 - 10:43
🗣 72 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
14368 वाचन

💬 प्रतिसाद (72)
स
स्पा गुरुवार, 10/14/2010 - 10:48 नवीन
खरय......................... :(
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 10/14/2010 - 10:50 नवीन
अमेरिकेत जाऊन हे असेच असते आणि तेच बरोबर आहे हे शिकला नाहीस... अरेरे !!
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा गुरुवार, 10/14/2010 - 10:56 नवीन
नाना, यात अमेरिकेचा काय सम्बंध? भारतात अंधानुकरण नाही काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया गुरुवार, 10/14/2010 - 10:59 नवीन
भारतात अंधानुकरण अमेरिकेतल्या विचारांचे होते, हे विचार तिथुनच उगम पावले आहेत असे तुम्हाला वाटत नाही का? तिथे जावुन ह्या विचारांची भलामण करणार्‍या विचारवंतांशी आपली गाठभेट झाली नाही का? त्यांनी हे योग्यच आहे असे आपल्याला समजावुन दिले नाही का? कारण अनेक माझे परिचित तिकडे गेल्यावर या व्यवस्थेचे कट्टर समर्थक झाल्याचे माहित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
म
मराठमोळा गुरुवार, 10/14/2010 - 11:16 नवीन
>>भारतात अंधानुकरण अमेरिकेतल्या विचारांचे होते, सहमत!! >>हे विचार तिथुनच उगम पावले आहेत असे तुम्हाला वाटत नाही का? अगदी वाटते. >> तिथे जावुन ह्या विचारांची भलामण करणार्‍या विचारवंतांशी आपली गाठभेट झाली नाही का? नाही झाली. व्हावी अशी ईच्छा आहे. >> त्यांनी हे योग्यच आहे असे आपल्याला समजावुन दिले नाही का? कुणी असा भेटला असता तर मी माझ्या पद्धतीने समजावले असते.. असो.. >> कारण अनेक माझे परिचित तिकडे गेल्यावर या व्यवस्थेचे कट्टर समर्थक झाल्याचे माहित आहे. बर मग? मी पण तसाच वागु का? त्यांचा आणि माझा काय संबंध?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
न
नगरीनिरंजन गुरुवार, 10/14/2010 - 11:11 नवीन
माणसाने आपली नैसर्गिक शिकारी-संग्राहकाची जीवनपद्धती सोडून शेती करायला सुरुवात केली, उतरंडीचा समाज बनवला आणि नागरीकरणाची सुरुवात झाली तीच पहिली चूक झाली. त्यानंतरच्या सगळ्या चुका अपरिहार्य होत्या. खोटं लपवण्यासाठी जसं वारंवार खोटं बोलावं लागतं तसंच ती पहिली चूक चूक नाही हे गृहीतक सिद्ध करण्यासाठी नव्या नव्या चुका कराव्याच लागतात. तंत्रज्ञान माणसाचे प्रश्न सोडवू शकतं हे आणखी एक गृहीतक. खरं पाहिलं तर जे प्रश्न सोडवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान मिळवलं जातं ते प्रश्न जुन्या तंत्रज्ञानाने निर्माण केलेले आहेत. पाश्चात्य भोगवादी संस्कृती हीच योग्य आहे हे मानून त्या अनुषंगाने प्रत्येक माणसाचं पैसे मिळवणारं यंत्र बनणे ही केवळ पुढची तार्किक पायरी आहे. अधिकाधिक पैसा मिळवणे आणि त्यासाठी अधिकाधिक उत्पादन करुन ते खपवण्यासाठी अधिकाधिक गरजा निर्माण करणे यालाच प्रगती म्हटले जाते. स्वतःच्या भोगासाठी सकल सृष्टीचे शोषण करणे म्हणजेच आधुनिकता. हे सगळं थांबवणे आवश्यक आहे पण त्यासाठी जो उपाय आहे त्याचा स्वीकार या आधुनिकतेच्या भयंकर मार्केटिंगच्या गदारोळात करण्याचा बौद्धिक कणखरपणा किती लोकांकडे आहे? आहे त्या इमारती तोडून तिथे जंगल निर्माण करण्याची आवश्यकता असताना उलट अधिकाधिक गतीने जंगलं साफ करून इमारती बांधल्या जात आहेत. अशा परिस्थितीत हा आक्रोश मात्र अरण्यरुदन ठरणार.
  • Log in or register to post comments
P
Pain गुरुवार, 10/14/2010 - 11:17 नवीन
याच्याशी पूर्णपणे असहमत (अपवाद झाडे आणि बौद्धिक कणखरपणा).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन गुरुवार, 10/14/2010 - 11:29 नवीन
असहमती अपेक्षितच आहे. झाडांच्या बाबतीत सहमती दाखवणे हाही केवळ एक उपचारच झाला. सध्याच्या व्यवस्थेत झाडांची संख्या वाढणे कसे शक्य आहे हे मला कळत नाही. इथे ज्यावर एवढी मोठी लोकसंख्या अवलंबून आहे ती शेतजमीनच कमी पडतेय तिथे नुसत्या झाडांना कोण जागा ठेवणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
P
Pain Fri, 10/15/2010 - 04:58 नवीन
माणसाने आपली नैसर्गिक शिकारी-संग्राहकाची जीवनपद्धती सोडून शेती करायला सुरुवात केली, उतरंडीचा समाज बनवला आणि नागरीकरणाची सुरुवात झाली तीच पहिली चूक झाली...... झाडांच्या बाबतीत सहमती दाखवणे हाही केवळ एक उपचारच झाला उपचार नाही, जे खरे/योग्य, त्याला पाठिंबा आणि जे खोटे/ चुकीचे, त्याला विरोध असे माझे धोरण आहे. तुमच्या प्रतिसादात दिलेली सर्व उदाहरणे चूक आहेत. उदाहरणादाखल एकाची चिरफाड करून दाखवत आहे. अशी त्या दोन गोष्टी वगळता प्रत्येक गोष्टीची करता येईल. तुम्ही कधी शेती केली आहे का ? मी केली आहे. एकदा ट्रेकला जाउन रस्ता चुकला आणि खाणे नसल्याने नैसर्गिक शिकारी-संग्राहक बनण्याचा प्रयत्नही केला होता (संग्राहक, शिकारी नाही) आणि ते जवळजवळ अशक्य आहे. शिवाय प्रचंड अनिश्चित आहे. फक्त खाणे नाही तर सर्व बाबतीत तुमचे आणि धागाकर्त्याचे आजचे अस्तित्त्वच प्रगतीवर अवलंबून आहे. इथे हा जो टाहो फोडता आहात, तोही प्रगतीच्याच जोरावर. तेव्हा ज्या फांदीवर बसला आहात त्यावर घाव कशाला ? तुम्ही आणि धागाकर्त्याने प्रगती, आधुनिकता, तंत्रज्ञानाला लक्ष्य केले आहे. तसेच बरेचदा सत्ता, संपत्ती आणि इतर अनेक गोष्टींना सध्याच्या तीव्र समस्यांसाठी जबाबदार धरले जाते (उदा. power corrupts & absolute power corrupts absolutely). ते सर्व संपूर्णपणे चुकीचे आहे. सत्ता, ज्ञान, यंत्रे किंवा चलन हे आपणहून कधीच कोणाला काही त्रास देत नाहीत. त्याची मालकी असणार्‍याची नीतीमत्ता, चारित्र्य यावर ते अवलंबून असते. ती उच्च असायला हवी. त्याला फारसे महत्त्व दिले जात नाही आणि दुर्दैवाने जे देतात त्यांच्या वाट्याला अडचणीच जास्त येतात. सध्या किंवा ज्ञात इतिहासापासून आजपर्यंत गुन्हे/चुका करू नये आणि केल्यास शिक्षा असे होत नसल्याने/ करता येत नसल्याने आज ही वेळ आली आहे आणि त्याचे खापर वरील गोष्टींवर फोडले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
र
रन्गराव गुरुवार, 10/14/2010 - 12:58 नवीन
चूक हा शब्दच आजकाल चूकिचा झाला आहे म्हणून सोयीस्कर अस म्हणूयात. जे बरोबर असत त्याचा अंगिकार आणि अनुकरण हे नेहमिच सोप असत असा नाही. म्हणून मग बरेचजण जे सोयीच असेल ते करू लागतो. आणि पूनः पून्हा करत रहातो. आणि म्हणून त्यात काहीही वावग नाही असा एक सोयीस्कर तर्क तयार होतो. आणि मग आपण सांगितल्याप्रमाणे सोयीस्कर घातचक्र चालू होत. Its the greatest practical JOKE!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
N
Nile गुरुवार, 10/14/2010 - 11:20 नवीन
ह्या विषयावर घासु गुर्जींनी अनेक उत्तम प्रतिसाद लिहलेले आहेत, ते वाचा हे प्रथम सुचवतो. प्रगती होतच नाही आहे हे टिपीकल निराशावादी माणसाचे बोल आहेत. वेळेत सावरा स्वतःला, हा अनाहुत सल्ला. (बॅक्ग्राउंडाला, अरे बेमट्या साहेबाने पोष्टं आणलं ते चांगल्यासाठीच ना(?), पुर्वी लग्न व्हायची सुतकात. तिकडं कोकणात कोणीतरी मेलं तरी महिना भर पत्ताच नाही मुंबईत...) फायदे तोटे गणित करा. फायद्याचं घ्या तोट्याच घेउ नका शिंपल आहे. इंटरनेट आलं म्हणजे काय तुम्ही त्याचे दुष्परिणामच करुन घ्यायचे का? चांगलं ते घ्या की लेको उगाच रडता कशाला दुष्परिणामापायी. करा पाहु तुमची नैसर्गिक शेती अन जगवा शेतकर्‍याला अन काढा पाहु उत्पन्न! मग फक्त तो श्रीमंत साहेबच मडमेसोबत भाजी खरेदीला जाउ शकेल इतकीच भाजी उरली मंडईत की मग मरा लेको भुकेने. बाकी हा नेमहीचाच रड्या विषय असल्याने इथेच थांबतो...
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 10/14/2010 - 12:53 नवीन
फायदे तोटे गणित करा. फायद्याचं घ्या तोट्याच घेउ नका शिंपल आहे. वा खूप छान वाक्य आहे पण फारच बाळबोध आहे ते. फायद्याचं घ्या पण तोट्याचं न घेण्याच स्वातंत्र्य नाहीये. फायद्याची म्हणून गाडी घेतली तरी तोट्याचं ट्रॅफिक जॅम न मागता मिळालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile गुरुवार, 10/14/2010 - 14:47 नवीन
ओ पेशवे, ट्राफिक जॅम तुमच्या लेखी काय प्रगतीचं लक्षण आहे का? बाकी मतितार्थ घ्या. तोटे तुम्ही स्विकारायलाच हवेत असे नाही. म्हणजे इंटरनेटाचा उपयोग करुन ज्ञानार्जन करा, पोर्न साईट्स बघु नका, असे सांगायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 10/14/2010 - 14:53 नवीन
पोर्न साईट्स म्हणजे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile गुरुवार, 10/14/2010 - 14:56 नवीन
मोठे व्हा, मग कळेल आपॉप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 10/14/2010 - 14:57 नवीन
सांग ना दादा. प्विइइइइइइइइइइइइइइइइइइज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 10/14/2010 - 14:58 नवीन
अरे त्यांना पॉर्न म्हणायचे असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
सुहास.. गुरुवार, 10/14/2010 - 15:00 नवीन
चान चान आगदी पारने फेडलेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
प
पाषाणभेद गुरुवार, 10/14/2010 - 17:04 नवीन
अहो, पॉपकॉर्न खाता खाता बघण्याच्या साईट म्हणजे पॉर्न साईट. आपल्या मिपावरही नाही का काही धाग्याच्या वेळी काही मंडळी जागा राखून ठेवतात अन पॉपकॉर्न खात बसतात तशी साईट म्हणजे पॉर्न साईट. कॉर्न (मका) गरम केल्यावर तो पॉपतो. म्हणजे बाहेर येतो. म्हणजेच कॉर्न-पॉप होतो. काही साईट बघीतल्यावरही आपले डोळे पॉपतात म्हणजे बाहेर येतात. (म्हणजे खरोखर नाही काही. आपला वाक्प्रचार आहे.) अशा साईट म्हणजे पॉपकॉर्न साईट. त्याचे पॉर्न हा अपभ्रंश झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
च
चिगो Fri, 10/15/2010 - 08:28 नवीन
रसग्रहण आणि व्याख्या आवडली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 10/14/2010 - 15:01 नवीन
अहो मतितार्थच सांगू इच्छित आहोत. प्रगतीचे तोटे याच सदरात पॉर्न सायटी आणि ट्रॅफिक जाम हे दोन्ही येतात. आणि तो तोटा स्वीकारावा का नाही याला काही पर्याय उपलब्ध नाहीये. आहे हे असं आहे म्हणून स्वीकारायला लागतं. तोटा टाळण्याची सोय म्हणजे फायदाच न घेणे. म्हणजे गाडी घेऊन ट्रॅफिक न वाढवणं वा घरीच इंटर्नेट न घेणे वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
र
राजेश घासकडवी गुरुवार, 10/14/2010 - 11:27 नवीन
काही वेळा जग बिघडत चाललंय असं प्रकर्षाने वाटत राहातं. जग पूर्वीही चांगलं होतं, वाईट होतं. आपल्या पोराला कुठे ठेवू नि कुठे नको ठेवू असं करणारे बाप पूर्वीही होते, आत्ताही आहेत. पूर्वीचे पालक पोराला जी भौतिक सुखं देत त्यापेक्षा आजचे पालक जास्त देऊ शकतात. पण ती खरी प्रगती नाही. एखाद्या फ्लूच्या साथीमध्ये दशलक्षांनी लोकं मरून अनेक पोरांचे आईबाप नाहीसे होणं ही शोकांतिका. किंवा एखाद्या दुष्काळात आपलं पोर अन्नान्न होऊन मरताना बघायला लागणं ही शोकांतिका. अशा शोकांतिका आजकाल कमी होतात, हीच प्रगती.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन गुरुवार, 10/14/2010 - 12:00 नवीन
हे सापेक्ष आहे. कोणत्या कालखंडाशी तुलना करु त्यावर हे अवलंबून आहे. माणसाचे सरासरी जीवनमान वाढणे आणि एरवी निसर्गात दुर्बळ ठरून जी मेली असती अशी मुले कृत्रिम प्रयत्नांनी वाचवणे ही खरोखर प्रगती आहे का? शेतीमुळे लोकसंख्या वाढली, माणसे, गुरे एकत्र राहू लागली, त्यामुळे साथीचे रोग आणि दुष्काळ वगैरे संकटे वाढली, त्यासाठी औषधे, त्यातून आणखी लोकसंख्या वाढ आणि त्यातून आणखी नवे प्रॉब्लेम्स. कदाचित आता प्रश्न बदललेत आणी नव्या प्रश्नांनी अजून गंभीर रूप घेतलेले नाही. जुने प्रश्न उरले नाही म्हणजे सरसकट प्रगती झाली असं म्हणायचं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
N
Nile गुरुवार, 10/14/2010 - 12:12 नवीन
कुठल्याही कालखंडाशी तुलना करा ही प्रगती आहेच.
माणसाचे सरासरी जीवनमान वाढणे आणि एरवी निसर्गात दुर्बळ ठरून जी मेली असती अशी मुले कृत्रिम प्रयत्नांनी वाचवणे ही खरोखर प्रगती आहे का?
तुमचा मुद्दा जर ही वाढलेली लोकसंख्या खरेच फायद्याची आहे का असा असेल तर तो प्रगती फायद्याची का? अश्या प्रकारचा प्रश्न आहे. पण ही प्रगती आहे ह्यात वाद नसावा. माणसाने (प्रगती करुन) नैसर्गिक आपत्तींपासुन स्वतःचा बचाव करावा का? ही वृती मानवात पुर्वी नव्हती का? ह्या मुद्द्यांवर चर्चा करता येईल. पुर्वीही मानव टोळ्यांमध्ये राहत होता, स्वतःच्या टोळीचा बचाव करण्याची, पालन संगोपन करण्याची वृत्ती तेव्हाही होतीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नितिन थत्ते गुरुवार, 10/14/2010 - 12:15 नवीन
उशीर झाला. अरेरे. आपण ४०-५० हजार वर्षांपूर्वी जन्मला असतात तर बहुधा ही चर्चा करायची वेळ आली नसती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन गुरुवार, 10/14/2010 - 12:22 नवीन
बरोबर. किंवा अजून ७० वर्षे उशीरा जन्मलो असतो तरी अशी चर्चा करायला वेळ नसता मिळाला. स्वतःहून मार्ग बदलणे किंवा मार्ग बदलण्यास भाग पडणे एवढे दोन पर्याय आहेत त्यातला आपण दुसरा निवडतोय एवढंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
र
राजेश घासकडवी गुरुवार, 10/14/2010 - 23:41 नवीन
सापेक्षता, जुने प्रश्न उरले नाही म्हणजे प्रगती झाली का वगैरे विचारणं हा मोघमपणा झाला. त्यापेक्षा काही निरपेक्ष, सर्वमान्य सुख व दुःखांची व्याख्या मांडून तुलना करणं अधिक योग्य होईल. असं का नाही करत, तुम्ही एखादा काळ सांगा - जेव्हा सर्वसाधारण माणसाचं आयुष्य आजच्यापेक्षा सुखी होतं. मग सापेक्षता वगैरे बघता येईल. नुसती जुनी दुःखंच गेली आणि नवी आली इतका फुटकळ व्यवहार नाही. तर सर्वसामान्य व्यक्तीसाठी सनातन व आयुष्यावर ओरखडे उठवणारी, डोळ्यांसमोर दिसणारी दुःखं कमी झाली आहेत, त्यांची जागा काहीशा सौम्य व दूरवर असणाऱ्या शक्यतांनी घेतलेली आहे. पूर्वी साथीत, दुष्काळात कर्ता पुरुष गेल्यावर होणारी कुटुंबाची वाताहत व्हायची, आता लोकसंख्या वाढीच्या किंवा पर्यावरणावर होणाऱ्या दूरगामी परिणामांच्या भीतीने भेडसवायला होतं. पहिलं गळा घोटतं, दुसरं हस्तिदंती मनोऱ्यावर काळी छाया आणतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Fri, 10/15/2010 - 04:22 नवीन
माणूस मरणे हे दु:खदायक आहे हे सध्या आपण गृहीत धरलं तर सध्याच्या दु:खांकडे नजर टाकू या. गूगलबाबावर सहज दोन तीन शोध टाकून पाहिले तर कळेल की एकट्या भारतात दरवर्षी एक लाख तीस हजार लोक रस्त्यांवरच्या अपघातात मरण पावतात. रस्त्यांवर न होणार्‍या अपघातातले वेगळेच. आत्महत्या करणारे वेगळेच. भारतातच जवळजवळ तीन कोटी मघुमेही आणि तितकेच हृद्रोगी आहेत. त्यातले एक टक्का जरी दरवर्षी मरतात असं म्हटलं तर तीन लाख होतात. हे आणि असे आणखी काही मृत्यु जमेस धरले तर तीस लाख हा आकडा फार मोठा नाही असं वाटू लागतं नाही? आणि हे सगळं मानवनिर्मित कारणांमुळे होत नाही आहे असं समजायला काहीही आधार नाही. आणी ज्या दुष्काळात लोक मेले तोही मानवनिर्मितच होता. मृत्युंची आकडेवारी जाऊ द्या. आप्त मरणे हे दु:खदायक असतेच, पण आजकाल दोन-तीन माणसांच्या कुटुंबातला प्रत्येकजण कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी असणे ही सामान्य बाब आहे. आप्त मरणे या बरोबरच तो मरताना आपण तिथे असू शकलो नाही हे दु:ख जास्तीचं आहे. घटस्फोटांची वाढती संख्या हे कशाचं द्योतक आहे? अमेरिकेसारख्या प्रगत देशातही शाळा-कॉलेजांमध्ये वारंवार होणारा गोळीबार, तरूण पिढीतली व्यसनाधीनता हे कशाचं द्योतक आहे? विद्यार्थ्यांच्या आणि शेतकर्‍यांच्या भरमसाठ आत्महत्या हे कशाचं द्योतक आहे? परदेशात गेलेल्या मुलांच्या वाटेकडे डोळे लावून जगणार्‍या किंवा स्वतःच्याच घरात अपमान सहन करत जगणार्‍या वृद्धांच्या संखेतली वाढ हे कशाचं द्योतक आहे? दुष्काळ आणि साथीचे रोग नाहीत म्हणजे प्रगती झाली हे म्हणणेही मोघमच आहे. केवळ लोकसंख्या वाढली म्हणून मरणार्‍यांची टक्केवारी कमी वाटते. संख्या कमी झाली आहे याला काही आधार? आता राहिला तंत्रज्ञानाच्या वापराचा मुद्दा. खाली इंद्रा यांनी म्हटलंय की अतिरेक नाही केला तर तंत्रज्ञान चांगलंच आहे. ते योग्यही आहे, पण किती वापर म्हणजे अतिरेक हे कोण ठरवणार किंवा ठरवतंय? अणुऊर्जा विधायक की घातक? जगातल्या सगळ्यात 'प्रगत' देशाने दुसर्‍या एका देशावर अणुबॉम्ब टाकून लाखो लोक मारले आणि तेवढेच पिढ्यानपिढ्यांसाठी अपंग करून ठेवले ही प्रगती? आज कित्येक देशांकडे अणुबॉम्ब आहेत आणि तीन सेकंदात पृथ्वी नष्ट करण्याच्या बढाया मारल्या जात आहेत, शास्त्रज्ञ चक्क ग्रह सोडून जायचा सल्ला देत आहेत ही प्रगती? असो. बर्‍याच जणाना हे निराश माणसाचे हताश विचार वाटतील आणि बर्‍याच वेळा नकारात्मक विचार करू नको म्हणून मला गप्पही केलं जातं. पण मी बिल्कुल निराशावादी नाही आणि मला खात्री आहे की स्वतःहून किंवा नाईलाजाने का होईना हे सगळं थांबून पुन्हा माणूस निसर्गाच्या आश्रयाला जाईल. दहा हजार वर्षांच्या संस्कृतीच्या चक्राचा शेवट त्यापुर्वीच्या अवस्थेत जाऊन होणे हे स्वप्नरंजन नसून नैसर्गिक आहे. केवळ ते व्हायच्या खूप आधी त्याबद्दल बोलणारी माणसं आजच्या काळात निराशावादी किंवा मूर्खही समजली जाऊ शकतात. स्वतः हस्तिदंती मनोर्‍यात असलं म्हणजे आजूबाजूला दु:खच नाही असं म्हणणं चूक आहे. भविष्याकडे बहिर्वक्र आरसा घेऊन आपण पाहतोय पण त्या आरशावरचा संदेश लक्षात घेण्यासारखा आहे: "थिंग्ज आर क्लोजर दॅन दे अ‍ॅपिअर".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ग
गांधीवादी Fri, 10/15/2010 - 05:00 नवीन
उद्या तुमच्या ह्या प्रतिसादाला अजून कोणी एकजन उच्च विवादास्पद उपप्रतिसाद देऊन तुमचे म्हणणे खोडूनही काढेल, पण त्याने साध्य काय होणार. एकतरी अपघात वाचेल ? एकतरी आत्महत्या टळेल ? एक तरी घटस्फोट होण्यापासून थांबेल ? भविष्य काळात जर युद्ध झालेच तर अणु बॉम्ब वापरण्याचे टाळले जाईल ? दुर्दैवाने ह्या सगळ्यांची उत्तरे आज 'नाही' अशीच आहेत. माझा एक मूळ प्रतिसाद पुन्हा देत आहे. प्रत्येक बाब हि सुखदायक आणि घातक असतेच. जो पर्यंत आपण प्रत्येक बाबीला एक ठराविक गुण देऊन तिचे दरवर्षी मुल्यांकन करत नाही तोपर्यंत आपण नुसते शब्दांचे खेळ पाहू. मोबाईल चांगला का वाईट ? इतके शुल्लक ठरविण्यासाठी आपण ढीगभर लेखांचा पाऊस पडू शकतो. पण शेवटी साध्य काय होते ? केवळ शब्द शब्द आणि शब्द, एकदा तरी अंकांना स्थान द्या ह्या गर्दीत. My boss always says "Just talk numbers" अवांतर : एक अजून सांगावेसे वाटते कि, मिपावरील सर्व विभागानुसार सर्व सदस्यांना देखील वेगवेगळ्या विभागात एक मूल्य जाहीर मतदानाने देण्यात यावे. याने काय होईल ? उदा : आम्हाला संगीतातले 'अ' का 'ब' कळत नाही. ह्या बाबतीती आमचे मूल्य शून्य (०) असे गृहीत धरूया तर मग १) तात्यांच्या एका लेखाची आम्ही कितीही प्रशंसा केली तरी ते झाडावर चढणार नाही. २) कोण्या नवोदित कवीची जरी टीका केली तरी तो इतके मनावर घेणार नाही. कारण ह्या बाबतीत आमचे मूल्य शून्य आल्याने आमच्या प्रतिक्रिया त्याच मापाने तोलल्या जाणार. याउलट जे संगीतात माहीर आहेत, त्यांचे मूल्य जास्त (१० पैकी १०) असेल तर मात्र त्यांची दाद / टीका गंभीर घेण्यात मदत होईल. ह्याला कदाचित मिपाची प्रगती म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
P
Pain Fri, 10/15/2010 - 05:31 नवीन
प्रगतीचा यात फारसा संबंध नाही. मूळ तत्व/ प्रेरणा/ कृती तीच आहे, अमलात आणण्याची साधने बदलली आहेत. माझ्या वरच्या प्रतिसादात आहे तेच डिट्टो. एक उदाहरण घेतो- बेस लोडमधे तर अणुउर्जेला तर काहीच पर्याय नाही. सध्या पुष़्कळ संशोधन चालू आहे पण त्याची जागा घेउ शकेल असे काहीच नाही. भविष्यात काही सापडले तर चित्र कदाचित बदलेल पण ती वेगळी गोष्ट आहे. आरोप करण्याआधी विद्युत उर्जेच्या स्रोतांची आकडेवारीतरी तपासायची होती. असो. आणि अणुबाँब विषयी म्हणाल तर लाख माणसे मारायला अणुबाँबच लागतो असे काही नाही. मुस्लिम बादशहा, ब्रिटीश, हिटलर, जेंगीझखान या महात्म्यांनी मारली की लाखो माणसे अणुबाँबशिवाय. अणुबाँब, बंदूक किंवा तलवार हा प्रश्न नसून उगाचच्या उगाच दुसर्‍याला इजा पोहोचवू नये हे तत्त्व पाळले जात नाही हा खरा प्रश्न आहे. आधी रामराज्य होते आणि औद्योगिक क्रांतीने सगळे बिघडवले हा तुमचा सूर पूर्णपणे चुकीचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Fri, 10/15/2010 - 05:55 नवीन
तेच म्हणतोय मी. पहिली चूक कोणती झाली ते मी वर सांगितलंच आहे. आणि आधीच्या लोकांनी लाखो लोक मारले आणी नंतरच्यांनीही मारले. मग प्रगती कोणती झाली? तुम्ही वर म्हटलंय की तुम्ही वाट चुकलात आणि शिकारी-संग्राहक होऊन राहायचा प्रयत्न केलात आणि ते जमलं नाही. त्याचं कारण तुम्हाला सराव नाही हे असून निसर्गात काही उपलब्ध नाही हे नाही आहे. असो. तुम्ही 'मीट द नेटिव्ह्ज' नावाची एक मालिका पाहिली आहे का? मी त्याचा न्यू यॉर्कचा एपिसोड पाहिला. जमल्यास एकदा मिळवून पाहा आणि अजूनही जंगलात राहणार्‍या त्या लोकांची शरीरयष्टी पाहा, आधुनिक जीवन पद्धतीबद्दल त्यांचे विचार ऐकण्यासारखे आहेत आणि एकंदरीतच त्यांना आपल्यापेक्षा काहीतरी जास्त आणि वेगळं कळतं ही जाणीव नक्कीच होईल. ही त्याबद्द्ल माहिती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
स
स्पा Fri, 10/15/2010 - 08:39 नवीन
स्वतः हस्तिदंती मनोर्‍यात असलं म्हणजे आजूबाजूला दु:खच नाही असं म्हणणं चूक आहे. भविष्याकडे बहिर्वक्र आरसा घेऊन आपण पाहतोय पण त्या आरशावरचा संदेश लक्षात घेण्यासारखा आहे: "थिंग्ज आर क्लोजर दॅन दे अ‍ॅपिअर". क्या बात हे....... निरंजन...... खरच खूप सुंदर..............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
य
यशोधरा गुरुवार, 10/14/2010 - 11:33 नवीन
ममो, तू खूप निराशावादी विचार करतो आहेस असं वाटलं हे वाचून. का बरं?
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 10/14/2010 - 11:35 नवीन
प्रगती म्हणजे जोशी काकांची पोरगी :D
  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 10/14/2010 - 11:38 नवीन
अन तीची खडुस आई म्हणजे महागाई का रे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
सुहास.. गुरुवार, 10/14/2010 - 15:02 नवीन
प्रगती म्हणजे जोशी काकांची पोरगी >>> मी तर ईतके दिवस तिच नाव काहीतरी वेगळच समजत होतो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
च
चिरोटा गुरुवार, 10/14/2010 - 11:42 नवीन
प्रगती म्हणजे अप्पा बळवंत चौकातले प्रगती प्रकाशन. ममो, केस बाय केस प्रगतीचे प्रॉब्लेम काय आहेत ते चर्चा केलेली बरी असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी गुरुवार, 10/14/2010 - 11:43 नवीन
प्रगति काय आहे आणि काय नाही हे पुर्ण पणे माणसाच्या नैतिकतेवर अवलंवुन आहेत. कोणतीहि गोष्ट चांगल्यासाठी कि वाईटासाठी हे केवळ माणुस त्याचा वापर कसा करत आहे पुर्ण पणे ह्यावर अवलंबुन आहे. भौतिक बाबतीत प्रगती झालेली आहे हे नक्की पण मनुष्याने त्याचा जर का योग्य वापर करायला शिकले नाही तर हि प्रगती लवकरच महागात पडेल. उदा अण्वस्त्रे. आम्हीदेखील असा एक प्रयत्न केलेला होते कि काय चांगले आणि काय वाईट ? आपण नजरेखालून घालावा हि विनंती.
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा गुरुवार, 10/14/2010 - 11:46 नवीन
मित्रांनो, एक खुलासा... हाच काय तर माझे ईतरही बरेच लेख निराशावादी नसतात तर तुमच्या माझ्या सारख्या लोकांच्या अनुभवातुन, विचारांमधुन मी लिहिलेले असतात. अर्थात प्रत्य्के वेळी मी माझेच विचार मांडतो असेही नाही. कधी कधी ग्रुपमधे झालेल्या चर्चा, मित्र/मैत्रिणींच्या अडचणी, दु:ख/आनंद मी इथे मांडतो, ते सर्व माझेच विचार आहेत असा गैरसमज करु नये.. अर्थात जे मला ओळखतात त्याना हे सर्व माहित आहेच. पण तरीही कुणीही डोक्याला त्रास करुन घेऊ नये. आजचा लेख हा ईथे २०-३० वर्षापासुन रहाण्यार्‍या लोकांचे बोल मी मांडलेले आहेत. प्रत्येक लेख हा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने लिहिला आहे असे समजुन वाचावा. मग उगाचच माझ्याशी संबंध जोडावे लागणार नाहीत.. :) अधिक स्पष्टीकरण हवे असल्यास व्यनी किंवा खरड करावी. धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 10/14/2010 - 11:48 नवीन
खुलाशाबद्दल धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
र
रन्गराव गुरुवार, 10/14/2010 - 13:10 नवीन
नाव मराठमोळा ठेवून हा पश्चात्य डिसक्लेमर का बरं लावलात. आपण जो विचार मांडलात तो तुम्हला पटल म्हणून लिहिला. त्याला अस मध्येच सोडून शायिस्तेखानगिरी करण नावला शोभत नाही तुमच्या ! बाजीप्रभूंसारखी खिंड लढवा आता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
स
स्पा गुरुवार, 10/14/2010 - 12:05 नवीन
Image removed. "प्रगती" नामक आगगाडी सुद्धा धावते बरका .............. (हि गाडी १९९७ साली सुरु झाली....)
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 10/14/2010 - 12:19 नवीन
बहुधा बरीच आधी असेल. मी १९९६च्या ऑक्टोबरपूर्वी तिच्यातून प्रवास केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ग
गांधीवादी गुरुवार, 10/14/2010 - 12:31 नवीन
अरे व्व्वा, कदाचित तुम्ही मला ओळखत असाल मग , मी त्याच गाडीत वडापाव विकायचो. आठवले का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ग
गांधीवादी गुरुवार, 10/14/2010 - 12:58 नवीन
-
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ग
गांधीवादी गुरुवार, 10/14/2010 - 12:58 नवीन
-
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
स
सुहास.. गुरुवार, 10/14/2010 - 12:59 नवीन
अरे व्व्वा, कदाचित तुम्ही मला ओळखत असाल मग , मी त्याच गाडीत वडापाव विकायचो. >>> व्वा !! व्वा !! व्वा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
स
सुहास.. गुरुवार, 10/14/2010 - 12:59 नवीन
अरे व्व्वा, कदाचित तुम्ही मला ओळखत असाल मग , मी त्याच गाडीत वडापाव विकायचो. >>> व्वा !! व्वा !! व्वा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
स
सुहास.. गुरुवार, 10/14/2010 - 12:59 नवीन
अरे व्व्वा, कदाचित तुम्ही मला ओळखत असाल मग , मी त्याच गाडीत वडापाव विकायचो. >>> व्वा !! व्वा !! व्वा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
स
सुहास.. गुरुवार, 10/14/2010 - 12:59 नवीन
अरे व्व्वा, कदाचित तुम्ही मला ओळखत असाल मग , मी त्याच गाडीत वडापाव विकायचो. >>> व्वा !! व्वा !! व्वा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा